Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Assembly Session : गेल्या काही दिवसात नवी मुंबई भागामध्ये फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या मुद्द्यावरती चर्चा करत असताना या फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे होतोय यावरती सभागृहात चर्चा झाली.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaam Digital
Published On

सुनिल काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

विधानसभेच्या सभागृहात नेहमी विविध मुद्द्यांवरती चर्चा होत असते. आज प्लेमिंगो पक्षाच्या मृत्यूवर चर्चा करुन सभागृहात मुकजीवांबद्दलची संवेदनशीलता दिसून आली. नवी मुंबईतल्या फ्लेमिंगो पक्षांच्या संदर्भात आज विधिमंडळात चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसात नवी मुंबई भागामध्ये फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या मुद्द्यावरती चर्चा करत असताना या फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे होतोय यावरती सभागृहात चर्चा सुरू झाली.

Maharashtra Monsoon Session
Bajaj Freedom 125 : जगातील पहिली CNG बाईक भारतात लॉन्च; १२५ CC इंजिन, ३३०km अॅव्हरेज

आमदार चेतन तुपे आणि आशिष शेलार यांनी त्यावरून प्रश्न निर्माण केला. ६ फ्लेमिंगोपैकी ४ फ्लेंमिगोच्या मृत्यूचा अहवाल आला. पण दोन फ्लेंमिगोंच्या मृत्यूचा रिपोर्ट आला नाही. त्याशिवाय फ्लेमिंगो मध्य आशियामधून येत असतील तर मग त्यांच्या जीवाचा किंवा मृत्यूला नक्की कारण काय असा सवाल करण्यात आला.

त्यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी मृत्यूचं कारण प्रदूषित पाणी नसल्याचे म्हणत कार्डियक फेल्युअरमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तसंच फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू बोर्ड आणि लाइट्सला धडकून होत असल्याचा अंदाज व्यक्त केला.  या प्रकरणात आता उच्चस्तरीय चौकशी समिती सरकारनं नेमली आहे.

Maharashtra Monsoon Session
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दिलासा; रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे या महिन्यापर्यंत असणार निशुल्क

विशेष म्हणजे या वैज्ञानिक कारणाबरोबरच 86 लक्ष योनीच्या संदर्भातलं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किलरित्या केलं. त्याला सभागृहातले किती आमदार 86 लक्ष योनीमधून फ्लेमिंगो रूपात येतील अशा पद्धतीची विचारणा आशिष शेलार यांनी केली. त्यावर ही माहिती गुप्त असल्याचे सांगत कोणीही फ्लेमिंगोच्या रूपात येऊ शकतो त्यामुळे ती पटलावर ठेवता येणार नाही असं मिश्किल उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आणि फ्लेमिंगोच्या चर्चेचा प्रश्नाचा शेवट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com