Maharashtra News Live Updates : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 14 September : आज शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Ganesh Immersion : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोडसह शहरातील प्रमुख रस्ते बंद

पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, बाजीराव रोड यासह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. अनेक रस्त्यावर नो पार्किंग तर अनेक मार्ग एकेरी होतील.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे प्रमुख रस्ते

लक्ष्मी रोड

टिळक रोड

कुमठेकर रोड

केळकर रोड

शिवाजी रोड

जंगली महाराज रोड

एफ सी रोड

कर्वे रोड

प्रभात रोड

 Bus Accident : चाकरमान्यांना मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला तुळस येथे अपघात

वेंगुर्ला शिरोडा येथून चाकरमान्यांना घेऊन मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला तुळस येथे अपघात झालाय. समोरील वाहनाला बाजू देताना बस भातशेतीत पलटी झाली. बसमधून ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. अपघातात ८ ते १० जण जखमी झाले असून त्यांना वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.

हिंगोलीत विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोलीत खाजगी लॉजवर एका तरुणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

नंदिनी तिवारी - करवा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

PM Narendra Modi : पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार 

पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने केले जाणार आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात होणार आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेला अचानक आली फिट

महिलेला उचलून गर्दीतून मार्ग काढत पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या वाहनानेच महिलेला करण्यात आल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या तत्परतेच समाज माध्यमांवर कौतुक होत आहे.

Maharashtra Politics : उमदेवारी जाहीर होत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील मौन बाळगणार?

भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील मौन बाळगण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जागांवर बोलू नका, महायुतीत वरिष्ठ नेत्यांकडून सूचना आहेत.अजून जागावाटप निश्चित व्हायच आहे त्यामुळे कोणीही प्रतिक्रिया देवू नका

Old Pension : जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने उद्या शिर्डीत महाधिवेशन, उध्दव ठाकरे लावणार उपस्थिती

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने उद्या शिर्डीमध्ये खुल्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीये. उध्दव ठाकरे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून सत्ताधारी पक्षाकडून कोण उपस्थित राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..

Assembly Election 2024 : जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीची २० सप्टेंबर रोजी बैठक

जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीची २० सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यापूर्वी २ बैठका झाल्या असून ही तिसरी बैठक असणार आहे. बैठकीत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसला राज्यात १३५ जागा मिळाव्यात यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

Kolhapur Crime News : कोल्हापुरात पोलिसांनी उधळला गणेशोत्सव काळात अमली पदार्थ तस्करीचा डाव

गणेशोत्सव काळात एम.डी. ड्रग विक्री करण्याचा डाव कोल्हापूर पोलिसांनी उधळला आहे. याप्रकरणी कुख्यात गुंड मनिष नागोरी सह समीर शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १२ ग्रॅम एम.डी. ड्रग सह 15 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

Eknath Shinde : धाराशिवात मराठा आंदोलकांनी CM शिंदे यांना अडवले

धाराशिवात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवलं. हैद्राबाद गॅजेट ही लागू करण्याची मागणी केली. धाराशिव शहरात हातलाई मंगल कार्यालयाजवळ आडवत आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याची मराठा आंदोलकांची मागणी केली.

Uddhav thackeray News : उद्धव ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा उद्या उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. वैजापूर आणि पैठणमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप- सेनेला धक्का देणार आहेत. शिवसेना आणि भाजपमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी ऊबाठा गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येतंय.

j P Nadda News : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतला विधानसभा निवडणुकीचा आढावा

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांनी कानमंत्र दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्या. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केल्या आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका असणार आहे. दोन्ही नेत्यांच्या राज्यात विधानसभा निवडणुकीत १५ ते २० सभा होणार आहेत. प्रत्येक विभागात दोन्ही नेते सभा घेणार आहेत. सोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली.

Dhangar reservation :राज्य सरकारमधील मंत्री आणि धनगर समाजाची चर्चा ठरली निष्फळ

सरकारमधील मंत्री आणि धनगर समाजाची चर्चा ठरली निष्फळ ठरली आहे. मुंबई येथील उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत धनगर समाज चर्चा करणार आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अधिवेशन घेणार का? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्वाची माहिती 

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्याचे अद्याप निश्चित नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात दिली.

Pandharpur News : पंढरपुरात धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं विशिष्ट मंडळ दाखल

पंढरपूर येथील धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे विशिष्ट मंडळ दाखल झालं आहे. मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री प्रकाश शेंडगे उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहे.

Kolhapur News: गणेश विसर्जन मिरवणूकीत हुल्लडबाजी, १६ जणांवर गुन्हे दाखल 

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या चार महिलांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांचा दणका

करवीर पोलीस ठाण्यात 16 जणांवर गुन्हे दाखल

करवीर तालुक्यातील म्हारूळ या गावी गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या डान्स ग्रुपवर गुन्हे दाखल

भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126 (2) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश मंडळांना केलेला आवाहन कार्यकर्त्यांनी जुगारलं

Nashik News: नाशिक: पावसामुळे माती खचली, नाशिकमध्ये चार ते पाच घर कोसळली

नाशिक पावसामुळे जुने नाशिक परिसरात काझीगढीची माती खचल्याने चार ते पाच घरे कोसळले. घटनेत कुठलीही जीवितहानी नाही मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन ते तीन संसार उध्वस्त झालेत. काझीगढीला संरक्षण भिंत बांधण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून नागरिक लढा देत आहेत. मात्र नाशिक महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचा दुर्लक्षामुळे दर पावसाळ्यात घर कोसळण्याची होत आहे.

Kalyan News: विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा

आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिल्याने डोंबिवलीतील एम आय डी सी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाविरोधात डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाने कर्मचारी वर्ग देण्यास नकार दिला. या शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार देऊन राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाचे दावडीसह डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळे विरूध्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .

Amravati News: अमरावतीत भटक्या विमुक्त आदिवासींची संवाद यात्रा, आदिवासी बांधवांची हजेरी

भटक्या विमुक्त, आदिवासींच्या नाय हक्कासाठी संवाद यात्रा निघाली असून अमरावती शहरात या संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आल, या यात्रेत जिल्ह्यातील भटक्या विमुक्त व आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा आहे, भटक्या विमुक्त आदिवासींची जातनिहाय जनगणना करावी,भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी यासह शोषित पीडित, भटके विमुक्त, आदिवासी यांना सरकारच्या योजनाचा लाभ द्यावा या मागण्यासाठी ही यात्रा निघाली यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही यात्रा पोलिसांनी बॅरिकेट लावून ही यात्रा अडवण्यात आली आहे,दरम्यान आमच्या मागण्या राज्य व केंद्र सरकारने पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल 

मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. माणगाव आणि इंदापुरमध्ये वाहनांच्या लांबलांब रांगा लागल्या असून यामुळे प्रवाशी आणि परतीचा प्रवास करणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी शिवसेना आमने सामने, सुनील तटकरे यांना महेंद्र थोरवे यांचे प्रत्यूत्तर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते 288 ही जागा मागतील असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला आहे. महायुतीचा निर्णय महायुतीतील नेते घेतील, तटकरे साहेब 288 सिटवर लढतील हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, महायुतीचा निर्णय महायुतीचे नेते घेतील.

Dhangar Protest: धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला! उपोषणस्थळी विषारी औषध पिण्याचा प्रयत्न

धनगर समाजातील अमोल देवकते या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी विषारी औषध प्राशन केले. माढा तालुक्यातील आलेगाव येथील सरपंच अमोल देवकाते यांनीउपोषणस्थळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. अमोल देवकाते यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. धनगर उपोषणाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असताना अमोल देवकाते यांनी विषारी औषध घेत आत्महत्याचा प्रयत्न केला.

मागच्या लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल असे नाही मी अनेक वेळा पाहिलेय. लोकसभेचा वेगळा असतो विधानसभेचा वेगळा असतो तर महापालिकेचा आणखीन वेगळा असतो. केंद्राचे प्रश्न लोकसभेच्या वेळी वेगळे होते, त्यामध्ये फेक निरीटिव्ह सेट झाले , संविधान बदलणार त्याचा परिणाम झाला. एनडीएच्या जागा पण कमी झाल्या , त्याचा प्रश्न इथे नाही महायुतीचा सरकार लाडक्या बहिणीची योजना असेल , शेतकऱ्यांच्या योजना असतील विद्यार्थ्यांना स्टायपेंड असेल, मुलींना डिग्री , शिक्षण मोफत तीन सिलेंडर फुकट या सगळ्या योजनांचा परिणाम असा दिसतो निश्चितपणे महायुती आघाडी पुढे जात आहे. महायुती आघाडीचे सरकार परत राज्यात येईल.
मंत्री छगन भुजबळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदे परांडामध्ये दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघात

महीला सशक्तीकरण अभियानाचा निमित्ताने मुख्यमंत्र्याची सभा

व्यासपीठावर आरोग्यमंञी डॉ.तानाजी सावंत,आमदार ज्ञानराज चौगुले,माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

आनंद दिघे असते तर यांना फोडून खाल्ले असते, संजय राऊताचा हल्लाबोल

चिमुकलीने अजितदादांना दिली भली मोठी पुस्तकांची भेट..!

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी अजित दादांनी भेट दिली असता त्यांच्या घरातील एका चिमुकलीने दादांना भली मोठी पुस्तके भेट म्हणून देण्याचा हट्ट केला. दादांनीही ती पुस्तकरुपी भेट स्वीकारत चिमुकलीची विचारपूस केली.

Crime News : मुलीची छेडछाड, दोन गटात राडा , परस्पर विरोधी गुन्हे दाखल, पाच जणांना अटक

कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात मुलीची छेड काढल्याचा आरोप करत दोन गटात जोरदार राडा झाला .या हाणामारीत दोन्ही गटातील काही जण जखमी झाले. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गोपाल अग्रवाल यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासाठी आम्ही काल गेलो होतो. निवडणुका आहेत म्हणून दिल्लीत बैठक होत आहे. जागा वाटपबद्दल जाहीर बोलणे योग्य नाही
पृथ्वीराज चव्हाण
आनंद आश्रममध्ये हजारो शिवसैनिक घडले. त्यांनी समाजसेवेचे काम केले. मात्र, आताचे शिवसैनिक हे बारमधील शिवसैनिक आहेत, हे उघड झाले आहे. बदलापूर घटनेनंतर दिघे यांच्या कार्यशेत्रात अशा घटना घडल्या नसत्या. मुख्यमंत्री यांनी गाजावाजा करून सिनेमा काढला. बार सुरू झाले त्यावेळी ते फोडले गेले. मात्र, आज आनंद आश्रममध्ये पैसे उडविले जातात हा दिघेसाहेबांचा अपमान आहे.
वैभव नाईक, आमदार

लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार

आगामी विधानसभेच्या तोंडावर लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संभाजी पाटील, यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

लातूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे , आगामी विधानसभेच्या तोंडावर निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर-अनंतपाळ इथल्या शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच काँग्रेसला या मतदारसंघातून खिंडार पडले आहे.

खासगी आणि सरकारी शाळेत मराठी विषय सक्तीचा, राज्य शासनाचे निर्देश

मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा शासनाचे मराठी भाषा सक्ती कडे पाऊल

याबताचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घ्यावीच लागणार आहे.

या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन केलं जाणार आहे.

इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे..

2025- 2026 या शैक्षणिक वर्षापासून होणार या नव्या पद्धतीची अंमलबजावणी

राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांंचं शिष्टमंडळ धाराशिवला जाऊन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आचारसंहिता लागण्याच्या अगोदर विशेष अधिवेशन घ्यावं यासाठी मागच्या 2 दिवसांपासून राजेंद्र राऊत करतायत ठिय्या आंदोलन

बार्शीतून 200 गाड्यांच्या ताफ्यासह राजेंद्र यांचे शिष्टमंडळ घेणार मुखमंत्र्यांची भेट

अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आजचा आहे तिसरा दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी आहेत धाराशिव दौऱ्यावर

तर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आंदोलन आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाला देणार आहेर भेट

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटी नंतर राजेंद्र राऊत यांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वादावर तोडगा काढण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न दिसत आहे.

दोन्ही नेत्यांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते बैठक घेणार आहेत. काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेंनिथाल्ला यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धनगर समाजाच्या आरक्षणाची परिस्थिती क्रिटिकल आमदार गोपीचंद पडळकर यांची कबुली

देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या केबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणाले होते पण त्यांनी स्पष्टता दिली आहे त्यातील काही क्रीटीकल परिस्थिती त्यांना ही व मला ही माहित आहेत

धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात सुरू आहे आमरण उपोषण.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषण स्थळी दिली भेट.

उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची केली विचारपूस.

देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हणाले होते मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाची परिस्थिती क्रिटिकल आहे तसेच आम्ही चारी बाजूंनी प्रयत्न करत आहोत पुनर्विचार याचिका कशा पद्धतीने दाखल करायची याचाही विचार सुरू असल्याचे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

स्वप्न बघायला पैसे लागत नाही. त्यांनी स्वप्न बघत राहावं. पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली याच त्यांनी आत्मचिंतन करावं. राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात। त्यावर देखील खुलासा करावा. काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्र आणि देशासमोर आलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण वेगळ्या ट्रॅकवर जनतेला नेण्यासाठी अशा पद्धतीच वक्तव्य करत आहे. फेक नरेटीव सेट केला होता. त्याला उत्तर देण्याचे काम राहुल गांधी यांनी अमेरिकीत जाऊन केलं. मलमपट्टी लावण्यासाठीच काम सध्या पृथ्वीराज चव्हाण करत आहे.
उदय सामंत

महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप नेतृत्वाचा अजेंडा

महायुतीसोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप नेतृत्वाचा अजेंडा

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर

स्थानिक पातळीवरील वाद टाळा - केंद्रीय नेतृत्वाचे भाजप नेत्यांना निर्देश

देवेंद्र फडणवीसांनीही आमदारांना दिल्या होत्या सूचना

कोल्हापूर : वंदे भारत एक्सप्रेसची घेतली चाचणी, सोमवारपासून धावणार

आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. कोल्हापूर - पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कंत्राट भरतीला विद्यार्थ्यांचा विरोध

निवडणुकीपूर्वीच कंत्राट भरतीचा अध्यादेश आरोग्य विभागाने केला जाहीर राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती प्रशासानावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकिय विभागाने शक्य असेल तिथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे बाह्ययंत्रणेकडून करावयाची आहेत. काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे बाह्ययंत्रणेव्दारे कंत्राटी स्वरुपात भरण्याकरीता होणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता शासनाने निर्णय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघातून लढवण्याची शक्यता

माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या वादाचा सलील देशमुख यांना फायदा होण्याची शक्यता

नवा चेहरा देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आग्रही असल्याची माहिती

पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव नवीन चेहरा म्हणून सलील देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

वरुड मोर्शी मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून असल्याने सलील देशमुख यांना फायदा होण्याची शक्यता

दोघांनाच्या भांडणात होणार तिसऱ्याचा लाभ

विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात सलील देशमुख सामना होण्याची शक्यता

Chakan News : चाकणमध्ये चिमुकल्यावर केला कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला 

कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळच असताना कुत्र्यांच्या टोळक्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडुन त्याचे लचके तोडण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला हा हल्लाचा अंगावर काटा आणणार थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झालाय. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही हैदोस घातला. कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंत्तेची बाब असुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.

Solapur News : पंढरपुरात 'स्वराज्य संग्राम' संघटनेचे उद्या राज्यव्यापी अधिवेशन

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम या संघटनेत उभी फूट पडली.शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी 'स्वराज्य संग्राम' या संघटनेच्या माध्यमातून नवी चूल मांडली आहे.त्यामुळे उद्या पंढरपुरात 'स्वराज्य संग्राम' संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे.आगामी विधानसभेच्या दृष्टिने या अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे उद्या पार पडणाऱ्या अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी पंढरपुरात जमणार आहेत.

Gold Rate : अमेरिकन आर्थिक स्थितीचा परिणाम; चांदीत ४ तर सोन्याच्या किमतीत दीड हजार रुपयांनी वाढ

चांदीत ४, हजार रुपये तर सोने एक हजार पाचशे रुपये भाव वाढ

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून थोडाफार चढ-उतार सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. चांदीच्या भावात चार हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ९१ हजार रुपये प्रति किलो तर सोन्याच्या भावात एक हजार पाचशे रुपयांनी वाढ होऊन ते ७४ हजार रुपये जीएसटी सह ७६०० हजार प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अमेरिकन आर्थिक स्थितीचा परिणाम झाल्याने ही भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये PM मोदी यांच्या सभेपूर्वी भारतीय सैन्याची मोठी कारवाई, २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी भारतीय सैन्याने मोठी कारवाई केलीय. बारामुल्ला परिसरात सुरू असलेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. काल रात्रीपासून अनेक ठिकाणी सुरू चकमकी होत्या. अजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती असल्याने सर्च ऑपरेशन सुरू होते. दहशतवादी नेमक कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

 Beed News : बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू

बीड जिल्हा रुग्णालयात आता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आलाय. आता रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या रुग्णाला भेटायचं असेल तर पासची आवश्यकता असणार आहे..रुग्णसेवा करताना अनेकदा डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर हल्ला होतो, रुग्णांनाही त्रास होतो. कोलकाता येथील दुर्घटनेमुळे सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी पास आवश्यक असणार आहे. एका रुग्णामागे -दोघांना पास दिला जाणार असून, त्याची मुदत 5 दिवस राहणार आहे. विशेष म्हणजे याची अंमलबजावणी येणाऱ्या सोमवारपासून होणार आहे.

Beed News : बीडमध्ये जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या दोन सरपंचांवर अपात्रतेची कारवाई 

जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणाऱ्या 2 सरपंचांसह एका सदस्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दणका दिलाय. या तिघांवरही जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील पांढरवाढीचे सरपंच महंमद यासीन आखिल व सदस्य रहेनाबी रऊफ यांच्यासह पोखरी गावचे सरपंच शेख अशाबी बशीर असे अपात्र केलेल्या दोन सरपंचासह एका सदस्याचे नाव आहे..

jayakwadi dam water level : जायकवाडी धरण तुडुंब; जॅकवेल चे काम बंद, मागील दहा दिवसापासून पाण्याचा पाझर वाढला.

पैठणच्या जायकवाडी धरणात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम मागील दहा दिवसापासून बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली. जायकवाडी धरण यंदा पूर्णपणे भरले असून धरणाचे 12 दरवाजे उघडून काही प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातील पाणी पातळी ही प्रचंड प्रमाणात वाढल्याने जॅकवेल मध्ये पाण्याचा पाझर वाढला. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. जायकवाडी धरणाच्या 18 मीटर खोल खाली हे काम सुरू असून कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून चारही बाजूंनी सिमेंट कॉपर डॅम बांधण्यात आले. दरम्यान धरणातील पाणी पातळी कमी होताच जॅकवेलचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकांनी दिली.

मुख्य आरोपी मिठू सिंहचा दोष्मुक्तीचा अर्ज सत्र न्यायलयाने फेटाळला

एमबीबीएस विद्यार्थीनी स्वदिच्छा साने हत्या प्रकरण

मुख्य आरोपी मिठू सिंहचा दोष्मुक्तीचा अर्ज सत्र न्यायलयाने फेटाळला

आरोपी विरोधात पुरवावे असल्याचे केलं कोर्टाने स्पष्ट

बेपत्ता होण्यापूर्वी स्वदिच्छाने आरोपी सोबत त्याच्याच मोबाईल मध्ये काढला होता सेल्फी

बेपत्ता होण्यापूर्वी काढलेला आरोपी सोबतचा सेल्फी महत्वाचा पुरावा कोर्टाच निष्कर्षण

बेपत्ता होण्याच्या पहाटे ३.४१ ला काढलेला सेल्फी ठरला महत्वाचा पुरावा

स्वदिच्छाने आत्महत्या केल्याच देखील कुठे सिद्ध होत नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा

सिंग हा जीवरक्षक (लाईफगार्ड) असून त्याला समुद्राच्या खोलीची तसेच समुद्र किनाऱ्याची पूर्ण माहिती असल्याचं कोर्टाने केलं आदेशात नमूद

सरकारी पक्षाच्या लास्ट सीन थेअरीला साजेशे पुरावे असल्याचा कोर्टाचा निर्वाळा

२९ नोव्हेंबर २०२१ ला वांद्र्याच्या बँडस्टँड येथे झाली होती स्वदिच्छाची हत्या

jayakwadi dam water level : जायकवाडी धरणात ९८ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. जायकवाडी धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर २७ पैकी १८ दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलुन गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात होते. त्यानंतर १२ दरवाजे बंद करून सहा दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. आवक कमी झाल्याने हे सहा दरवाजेही बंद करण्यात आले. पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू केला जाणार आहे. सध्या धरणात ९८.३८ टक्के पाणीसाठा आहे. उजव्या कालव्यातून ६०० क्यूसेक पाणी माजलगाव धरणासाठी सोडणे सुरूच आहे.

अहमदनगर : पांढरीपूल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात

अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात..

चार वाहने एकमेकांना मागून धडकल्याने झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान...

तर दोन ट्रक रोड सोडून थेट दुकानात घुसले.... सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही...

सकाळी सहाच्या दरम्यान झाला अपघात... अपघातामुळे दोन किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा...क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू

महात्मा फुले युवा मंच च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय जाणीवपूर्वक लोकमान्य टिळक यांना दिलं जाते. तथापी त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली महात्मा जोतीराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध असतांना, १८६९ साली महात्मा जोतीराव फुलेंनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार..

Samruddhi Mahamarg News Update : इंजिन गरम झाल्यामुळे धावत्या कारने पेट घेतल्याची घटना समृध्दी महामार्गावर दुसरबीड जवळ घडली... मात्र गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचे कारचालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ गाडी थांबवून गाडीतील प्रवशाना खाली उतरविले, त्यामुळे गाडीतील तिघेजण बचावले...अमरावती येथून जयंत बंदिवान, पूर्वी जयस्वाल आणि रोहित सरिया रा. अमरावती हे कार क्रमांक एमएच ०४ एचयू १०७६ ने मुंबईकडे जात होते...

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३११ मुंबई कॉरिडॉरवर इंजिन गरम झाल्याने कारने पेट घेतला. ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच त्याने समयसूचकता ठेवत सर्वांना सुरक्षित खाली उतरवले. आग लागल्याचे कळताच कारचालकाने समृद्धी कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर तत्काळ महामार्ग पोलिसांनी घटनस्थाल गाठून कार ची आग विझविली.. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती .. यामध्ये कारमधील प्रवाशाचे बॅगमध्ये भरलेले सामान, महत्त्वाचे डॉक्युमेंट सह इतर साहित्य जळून खाक झाले.

नाथसागरात आता सौर ऊर्जा प्रकल्प

जायकवाडी धरणातील नाथसागरात आता सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लागणार अशी चिन्हे आहेत. पक्षी अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेल्या जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याला विरोध सुरू होता, राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फेटाळली आहे. टिहरी हायड्रो कंपनी ही राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) मालकीची आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जायकवाडी धरणावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेसाठी निविदा जारी केली आहे. तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जलचरांसाठी हानिकारक ठरेल आणि पक्षी अभयारण्यातील जैवविविधतेला कायमचे नुकसान पोहोचेल, अशी माहिती यापूर्वी याचिकाकर्त्याच्या वतीने सादर करण्यात आली होती. धरणातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरवले जाते. सौर पॅनेलने झाकल्याने पाणी दूषित होईल, असा मुद्दाही मांडण्यात आला होता. या याचिकेवर ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक मत्स्यव्यवसाय मंत्रालय यांनी न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार अहवाल सादर केला. संरक्षित अभयारण्यात प्रकल्प उभारण्यास परवानगी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण आणि वन विभागाने संबंधित कायद्याची प्रत सादर केली.

केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

- केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

- कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्कात निम्म्याने कपात

- कांद्यावरील निर्यात शुल्क ४० ऐवजी आता २० टक्के, आजपासून निर्णय लागू

- आजपासून कांदा निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क

- काल केंद्राने कांदा निर्यातीवरील ५५० डॉलर निर्यात मूल्य हटवल्यानंतर आजपासून निर्यात शुल्कात देखील केली कपात

- कांदा निर्यातीवरील बंधनं कमी करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न

- कांदा निर्यातीत वाढ होण्यास होणार मदत

- निर्यतीवरील बंधनं कमी केल्याने आगामी काळात कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता

Yavatmal News : यवतमाळात अतिवृष्टीचा फळबागांना फटका

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता संत्रा, मोसंबी फळबागांना बसू लागला आहे. अति पावसामुळे मोसंबीच्या फळांना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.परिणामी संपूर्ण मोसंबी फळाची उतरण झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कलगाव, डेहणी, वरंदळी, कांदळी, बेलोरा, तुपटाकळी, डोळंबा आदी गावांच्या शिवारात संत्रा व मोसंबी फळबागांची संख्या लक्षणीय आहे. तेथे बुरशीजन्य रोगांची लागण होऊन संत्रा आणि मोसंबी फळांना गळती लागली आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या बागा उध्वस्त होत असल्याने संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.

Pune News : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रचित संतोष गोयल (वय ३४, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला.

Pune News : पुण्यात वडाचीवाडी परिसरात बिबट्याच्या दर्शन

Summary

सध्या बिबट्या येथील मानवी वस्तीच्या जवळ्च दीसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मागील महिन्यापासून बिबट्या फिरत असल्याचे माहिती होती.मात्र बिबट्या दिसला नसल्याने खात्रीशीर सांगता येत नव्हते.सध्या मात्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालाच दिसला असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत झाली आहे. ग्रामस्थानी एकमेकांना सांगत डोंगराकडे जाताना एकटे न जाण्याचे आवाहन करून खबरदारी बाळगण्यासाठी सांगितले आहे.

Pune News : पुण्यात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी

पुण्यात देखावे पाहण्यासाठी मध्यभागात काल रात्री मोठी गर्दी झाली होती

सलग सुट्यांमुळे अनेकांनी सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद लुटला.

मध्यरात्रीपर्यंत मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी होणार आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारच्या सुटीला सोमवारी (१६ सप्टेंबर) ईद- ए- मिलादची सुटी जोडून आल्याने शुक्रवारी सायंकाळनंतर मध्यभागात देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

सलग सुट्यांमुळे शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी सहकुटुंब देखावे पाहण्याठी गर्दी केली होती.

वाढती गर्दी आणि वाहनांमुळे चौकाचौकात काल रात्री कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com