Maharashtra News Live Updates: पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या माजी नगरसेवकाने सोडली पक्षाची साथ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 16 september 2024 : आज सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Pune Politics: पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या माजी नगरसेवकाने सोडली पक्षाची साथ

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप कस्पटे यांनी भाजपला राम राम ढोकला आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला वैतागून मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे असा आरोप संदीप कसपटे यांनी केला आहे. संदीप कसपटे हे वाकड परिसरातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामचा ठोकल्याने पिंपरी चिंचवड शहर भारतीय पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे अजून दहा-पंधरा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा देखील संदीप कस्पटे यांनी आपल्या पत्रात केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संदीप कस्पटे यांनी आपला भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

Pune News: महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमिओ तरुणाला नागरिकांकडून बेदम चोप

पिंपरी चिंचवड शहरातील फुलेनगर भागात रोड रोमिओ तरुणाला महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला. मारहाण झालेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

धनगर उपोषणाच्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी ईश्वर वठार येथील संजय चौगुले यांनी उपोषण ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी अमोल देवकाते यांनी विष प्राशन केले होते‌. त्यानंतर आज पुन्हा संजय चौगुले यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. चौगुले यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले आहे. पंढरपूरमध्ये राज्यव्यापी अवरण उपोषण आठवा दिवस असताना ईश्वर वाटर येथील संजय चौगुले यांनी उपोषण ठिकाणी विष प्राशन केले.

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती

अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आहेत. आनंदराव

⁠अडसूळ मागील काही दीवसांपासून महायुतीत नाराज होते. राज्यपाल पदी नियुक्त करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं असल्याचं अडसुळ यांनी म्हटलं होतं.

- ⁠अडसुळ यांची अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी/ बोळवण

- ⁠अडसुळ यांच्या बरोबर उपाध्यक्ष आणि दोन सदस्यांची देखील नियुक्ती

लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

गेल्या १० दिवसांत लालबाग राजाच्या दानपेटीचीगी शान वाढली आहे. दानपेटीत ५ कोटी ५ लाखांची रोकड जमा झालीय.

सोनं- ३८५७.६१० ग्रॅम

चांदी - ५६ किलो ४६३ ग्रॅम

१ किलो सोन्याची कॅटबरी गणेश भाविकाने अर्पण केलीय.

माजी खासदार हेमंत पाटलांचे राजकीय पुनर्वसन, दिला राज्यमंत्री पदाचा दर्जा

माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलाय. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. हेमंत पाटील हिंगोलीचे शिंदे गटाचे माजी खासदार आहेत.

संजय गायकवाड यांचं राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस आक्रमक

काँग्रेस आमजार राजेश इकडे, धीरज लिंगाडे, प्रभारी कुणाल चौधरी, प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या सुरू केलाय. जोपर्यंत आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही काँग्रेसची भूमिका घ्या. उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील व ठाणेदार यांच्याशी चर्चा सुरू आहे. अद्यापपर्यंत ठोस निर्णय न झाल्याने काँग्रेस ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर कार आणि मोटरसायकलचा अपघात

मुंबईकडून गोव्याच्या दिशेने निघालेल्या कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने डिव्हायडर क्रॉस करत मोटर सायकलला धडकली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती

शिंदे गट शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

मुंबईतील अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने अटक; 3 वरिष्ठ आयपीएस अधिकारी निलंबित

मुंबईतील अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने अटक करून कायदेशीर मदत न मिळू दिल्याप्रकरणी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश सरकारने तिघा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तिघा अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. फेब्रुवारी महिन्यात झाली होती मॉडेल सह तिच्या पालकांना अटक केली होती. ४० दिवसांपासून ही अभिनेत्री कारागृहात होती.

वनराज आंदेकर प्रकरण; खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. एकूण २२ आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Uran: उरण मधील ONGC च्या पाईप लाईनमधून तेल गळती

उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी असणाऱ्या पाईप लाईनमधून तेल गळती होणार आहे. खोल समुद्रातून ONGC प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाईप लाईनमधून ही तेल गळती झाली आहे. लिकेज काढण्यात ONGC कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तेल गळतीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरू असून संपूर्ण इन्स्पेकशन नंतरच तेल पुन्हा पाईप लाईन द्वारे ONGC प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंनी निवडणुकीत उतरावं, मनसे नेत्याची इच्छा

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांची इच्छा आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मनसे नेते आग्रही आहेत.

Nagpur Crime:  नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून आरोपीचं स्केच तयार

पूर्व नागपूरच्या आभा नगर परिसरात एका 8 वर्षांच्या मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार करण्यात आला. 8 वर्षीय बालिका आपल्या चार वर्षीय बहिणीसोबत घरी होती. आई वडील कामावर कामाला गेले होते.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण आज झालंय. पुणे-हुबळी पहिली वंदेभारत पुण्यातून रवाना झालीय.

 भाजप आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी- बच्चू कडू

अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडून लढू शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला. शेवटी आमदाराला मतदारसंघात निवडून यायचं असते, पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाचा आहे. लोकांना पटलं नाही. अजित दादा अशी उडी घेणार अशी अपेक्षा नव्हती तर भाजप व राष्ट्रवादीची यांची विचारधारेमध्ये तफावत आहे, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

Nitin Gdakari : मुंबई बंगळुरू महामार्ग 14 पदरी होणार ; नितीन गडकरी यांची घोषणा

मावळ तालुक्यातून जाणारा अति महत्वकांक्षी रस्ते विकास महामंडळाचा प्रकल्प मुंबई ते बेंगळुरू हा चौदा पदरी होणार असल्याने, मुंबई पुणे महामार्गाच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण की लवकरच मुंबई पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात नुकतीच दिली आहे, मुंबईच्या ''अटल सेतू जवळून चौदा पदरी रस्ता तयार होणार असून. मुंबईहून बेंगलोरला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे.

Pune News: पुणे गणेशोत्सव! विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळे सज्ज

पुणे शहरात मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात सुरू असलेला गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होणार आहे. गणेश मंडळांनीही विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजवण्याचे काम सुरू झाले आहे. ढोल-ताशा पथके, शंखनाद पथकेही सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी खास नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला उद्या सकाळी सुरुवात होईल..

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचे नो रिस्क धोरण

- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दिग्गज नेत्यांची फौज

- इतर राज्यातील ६० प्रवासी नेत्यांवर सोपवली २८८ जागांची जबाबदारी

- प्रवासी नेते प्रत्येक मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेणार

- पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागांचा घेतला जाणार आढावा

- महाराष्ट्रातील नेत्यांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात व इतर राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्रात पाचारण

- कैलास विजयवर्गीय, सुनिल देवधर, प्रल्हाद पटेल, व्ही सतिष यांच्यासह प्रमुख नेते महाराष्ट्रात कार्यरत राहणार

- प्रवासी नेते आपला अहवाल प्रभारी भुपेंद्र यादव यांना सादर करणार

- अहवालाच्या आधारे निवडणुकीच्या संदर्भात निर्णय होणार

Vijay Wadettiwar ON Sanjay Gaikwad : 'निवडणुकीत माज, मस्ती उतरेल', विजय वडेट्टीवार यांची शिंदे गटावर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जिभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांच्या या विधानावरुन काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय गायकवाड औकातीबाहेर बोलत आहे, राहुल गांधी यांचे नाव घेण्याची औकात नाही. तो कुठे आणि त्याचा पक्ष कुठे आहे. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत तुमचा माज आणि मस्ती उतरेल, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: गिरडा घाटातून सहावा बिबट्या जेरबंद; अजून एका बिबट्याचा शोध सुरू

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या गिरडा घाटातून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बिबट्याला जेरबंद केलय. गेल्या दोन महिन्यांत पकडलेला हा 6वा बिबट्या असून अजून एका बिबट्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.दरम्यान सिल्लोड तालुक्यातील सावळद बारा आणि गिरडा घाटात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले.त्यामुळं शेतकरी शेतात जातांना घाबरत आहे.शिवाय शाळकरी मुले देखील मोठया व्यक्तीच्या सरक्षणातच शाळा गाठत आहे.

Goa Bus Accident: गोव्याहून मालवणला जाणाऱ्या बसला अपघात; तीन प्रवासी जखमी 

गोव्याहून मालवणला जाणाऱ्या गोव्याच्या कंदबा बसला अपघात.

कुडाळ मालवण रस्त्यावर काळसे येथे अपघात.

समोरून येणाऱ्या आशयर टॅप्मोला कदंबा बसची जोरदार धडक.

या अपघात तीन प्रवासी जखमी.

जखमींना कुडाळ ग्रामिण रूग्णालयात केले दाखल.

CM Eknath Shinde Lalbagcha Raja: मुख्यमंत्री शिंदेंकडून लालबागच्या राजाची आरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्राक्ष देखील आरतीमध्ये सहभागी झाले होते. गणपती बाप्पा आशीर्वाद देईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Chandrapur News: ईदनिमित्त चंद्रपुरात मिरवणूक

चंद्रपूरात मुस्लिम बांधवांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीत मक्का मदिना साकारत आकर्षक अशी मिरवणूक लक्षवेधी ठरली. पैगंबरांचा वाढदिवस आज ईद ए मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो. या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Ajit Pawar News : ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार )तर्फे मिठाई वाटप

तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत स्वागत केलेव ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा दिल्या,दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर शहर तर्फे तुमसर येथील संताजी मंगल कार्यालय समोर मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा देत मिठाई चे वाटप करण्यात आले.

Accident News : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एका मागोमाग एक दोन डंपर डावीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार अचानक मागच्या डंपरच्या चाकाखाली आला. यात त्याच्या दुचाकीवरून डंपरची दोनही चाकं गेल्यानं दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार यातून सुखरूप बचावला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. या घटनेनंतर डंपर मालकाने दुचाकीस्वाराला नुकसान भरपाई दिल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक ; शहरात शोले स्टाईल आंदोलन सुरू

छत्रपती संभाजी नगर शहरातील शिवाजीनगर भागात पाण्याच्या टाकीवर चडून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते चांगले आक्रमक झालेले आहेत. दिव्यांग शेतकरी आणि मराठवाड्यातील विविध मागन्या तात्काळ पूर्ण करा यासाठी या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन सुरू केलय. दरम्यान मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर उद्या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहणला येणार असल्याने आम्ही त्याच दिवशी या कोरड्या पाण्याच्या टाकीत उड्या मारू, असा कडक इशारा यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Chandrapur News : चंद्रपूरमध्ये ३३ ग्रामसेवकांकडून बीअर बार अन् रेस्टॉरंट बांधकामाला अनधिकृत परवानगी

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यावर दारू दुकाने, बिअर बार व रेस्टॉरंटचे अमाप पीक आले आहे. मात्र ग्रामपंचायत कार्यालय सक्षम प्राधिकारी नसताना चक्क ग्राम‌सेवकांनी गावठाणाबाहेरील जागेवर हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही माहिती पुढे आल्यावर जि. प. प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

Pune Crime : ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्व संध्येला पुण्यात गोळीबार

ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्व संध्येला पुण्यात गोळीबार झालाय. वाळू व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आलाय. पुण्यातील गंगाधाम परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात वाळू व्यावसायिक जखमी झालाय.

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टीळक रस्त्यावरील बंदोबस्तासाठी जवळपास पाचशे आधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी तैनात करण्यात आलेला बंदोबस्त विसर्जन मिरवणुक संपेपंर्यत म्हणजे, १८ तारखेपंर्यत असणार आहे. नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घालुन दिलेल्या वाहतुक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Thane News : बदलापूर एसी लोकलच्या पंटाग्राफमध्ये बिघाड; मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतुक विस्कळीत

मुंब्रा दिवा दरम्यान दादर बदलापूर एसी लोकलच्या पंटाग्राफमध्ये बिघाड झालाय. मुंबईच्या दिशेने जाणारी ac लोकलमध्ये बिघाड झालाय. 12 वाजून 10 मिनिटानी ही घटना घडली. रेल्वेकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतुक विस्कळीत झालीय.

Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दगडूशेठ बापाची मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत.

संजय राऊत रोज सकाळी उद्धव ठाकरे साहेबांची अशी मार्केटिंग करतात जस रामदेव बाबा पंतजलीची मार्केटिंग करतात.आपलं प्रॉडक्ट लोकांसाठी किती गुणकारी आणि फायद्यांचं आहे हे सांगत असतात आणि दोन्हीही प्रॉडक्ट फायद्याचे आहेत याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास बसत नाही.संजय राऊत यांच्या सारखे मार्केटिंग हेड असतील तर मार्केट मध्ये चालणार प्रॉडक्ट बंद पडेल.
सूरज चव्हाण
संजय गायकवाड यांचं समर्थन करत नाही, आम्ही आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होतो त्याच आज ओठात आलं. NDA सरकार संविधान बदलनार असं वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे.
चंद्रशेखर बावनकुळे

Sharad Pawar : शरद पवारांनी लिहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

Summary

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी बैठक आयोजित करावी शरद पवारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

राज्यसेवा कृषी सेवा पोलीस उपनिरीक्षक विक्रीकर सहाय्यक इतर ठिकाणी पदावर निवडून बराच कालावधी उलटला आहे .त्यामुळे या उमेदवारांना लवकर नियुक्तीचे आदेश द्यावेत

लिपिक पदाकरता 7000 हुंन अधिक जागांची भरती यासह काही अन्य भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या आहेत त्यावर त्वरित निर्णय घ्यावा

राज्यात शिक्षक तसेच प्राध्यापक देखील बहुतांशय जागा रिक्त असल्याने रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती प्राध्यापक भरती गतीलां द्यावी

वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागत असून वेळ मिळत नाही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावेत व बैठक लावावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बाहेरील राज्यातील नेत्यांची फौज मैदानात

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बाहेरील राज्यातील नेत्यांची फौज मैदानात

विधानसभेसाठी दिग्गजांच्या आधारे भाजपकडून आढावा

विविध राज्यातील नेत्यांकडून घेण्यात आला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा

अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी केला महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरा

आढावा घेतलेल्या प्रवासी नेत्यांची भाजप मुख्यालयात बैठक सुरू

प्रभारी भुपेंद्र यादव, सह संघटनमंत्री शिवप्रकाश, माजी मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर नेते सहभागी

देशभरातील वाहतूक आणि दळणवळण मजबूत राहावं यासाठी नरेंद्र मोदी यांनी भरघोस निधी दिलेला आहे. कोल्हापूरात अत्याधुनिक विमानतळ आणि आता कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. आपल्या देशात रेल्वेने सर्वाधिक नागरिक प्रवास करत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस मुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुखकर प्रवास होईल .
खासदार धनंजय महाडिक

Pune News : उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक आणि तब्बल १७५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. शनिवारी पुण्यातील उरूळी कांचनमधील इनामदारवस्ती याठिकाणी एका जणाने त्याच्या बंदुकीतून दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आलं आहे. दशरथ शितोळे यासह तीन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. या गोळीबारात काळूराम महादेव गोते हे जखमी झाले आहेत. अर्थिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

हर्षवर्धन देशमुख यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Summary

अजित पवार गटाचे वरुड मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात शरद पवारांकडून तगडा उमेदवार?

शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख हे देवेंद्र भुयार यांच्या विरोधात निवडणुक लढण्याच्या तयारीत

सध्या या मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रम ठाकरे देखील उमेदवारीची मागणी करत आहेत

मतदारसंघात विक्रम ठाकरे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्यात वाद असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मागचा काही दिवसांपासून केली आहे

Crime News : तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या....

तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात तसेच अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी म्हणून सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागणीसाठी तळोदा शहरातील हजारो महिला नागरिक रस्त्यावर उतरले आहेत शहरातील बिरसा मुंडा चौकात कॅण्डल मार्च काढत नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे..

Nandurbar News: भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

शहादा तालुक्यातील चिखली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चिखली येथील भाजपा काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने राजकीय हालचाली गतिमान झाले आहे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे वतीने कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिली आहे.

Ahmednagar News: शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी मुंडन आंदोलन

श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा करावा” ह्या मागणीच्या साखळी उपोषणाच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झालाय.. मात्र प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांच्या संदर्भात अद्यापपर्यंत ठोस कारवाई केली नसल्याने शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष सूरज आगे आंदोलनस्थळी मुंडन करत प्रशासनाचा निषेध केलाय...

उपमुख्यमंत्री अजित पवार सागर बंगल्यावर दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार सागर बंगल्यावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानी गणपती दर्शन घेण्यासाठी अजित पवार सागर बंगल्यावर

सागर बंगल्यावर अजित पवार करणार गणरायाची आरती

शहादा येथील भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात केला प्रवेश

शहादा तालुक्यातील चिखली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चिखली येथील भाजपा काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने राजकीय हालचाली गतिमान झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे वतीने कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रम आयोजित केले जात, असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिली आहे.

धक्कादायक, डेंगूबाधित महिला रुग्णांवर जमिनीवर उपचार

Summary

अमरावतीच्या मेळघाटातून आरोग्य व्यवस्थेचा गलथान व निष्काळजीपणाचा कळस गाठणारा प्रकार समोर आलाय.अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील हे जामली आर गावामध्ये दोन दिवसांपूर्वी अतिसाराच्या रुग्णांनी थैमान घातलं होतं.. हे रुग्ण बरे होत नाहीच तर आता डेंगूची रुग्ण इथे वाढत आहेत..सध्या इथे 6 डेंगूचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत..यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे..या डेंगू बाधित महिला रुग्णांवर अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर उपचार केले जात आहे. पण, या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळतंय. तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे मात्र कोणत्याही बडे अधिकाऱ्यांना रुग्णांना बेड उपलब्ध करून द्यावा याची जाग आली नाही.. ज्यावेळी यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं त्यावर अधिकारी सावरा सावर करताना दिसून आले.

नितेश राणे विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नितेश राणे विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उलवे येथे आक्षेपर्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

उलवे येथे गणेश दर्शना दरम्यान केले होते आक्षेपर्ह वक्तव्य.

2 समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

Mumbai  : वांद्रे वरळी सी लिंकवर कार रेसिंग दरम्यान अपघात

वांद्रे वरळी सी लिंकवर कार रेसिंग दरम्यान अपघात

बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजच्या रेसिंग दरम्यान

अपघात

शर्यती दरम्यान गाडीवरील ताबा सुटल्यामुळे अपघात

शर्यती दरम्यान ओला गाडीला धडक

सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही

मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूच्या चालकांना केली वरळी पोलिसांनी अटक

सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

तारिक चौधरी,२९ आणि शाहबाझ खान, ३१ नावाच्या दोघांना अटक

Crime News : 9 वर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार

आता एक धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मधून. खाजगी क्लास मध्ये शिकत असणाऱ्या 9 वर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खाजगी क्लास मध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने क्लासमध्ये बोलावून संबंधित बालिकेवर अत्याचार केल्याचा गुन्हा राधानगरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी श्रीपती भोसले याला अटक केली आहे.

jalgaon News : शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा, बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती..

जळगाव जामोद तालुक्यातील जलंब या गावातील अंगणवाडी तील बालकाना अत्यन्त निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वितरित केल्या जात आहे... आता आहाराचा वास अत्यंत घाणेरडा येत असून तो आहार् जनावरे सुद्धा खात नसल्याने बालकां चे आरोग्य धोक्यात आले असून याची तक्रार महिला बाल् विकास अधिकारी यांच्याकडे केली असून प्रशासनाने अद्याप पर्यंत कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप पालकांनी केलाय..

Pune News : राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार

शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे आज लोकार्पण

Summary

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असून पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या असून यात पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Pune : राज्य शासनाने ग्रामीण भागातील झाडांबाबत कडक नियम लागू केला

राज्य शासनाने ग्रामीण भागातील झाडांबाबत कडक नियम लागू केला

आता झाडाची छाटणी केली किंवा साल काढल्यास ५० हजार रुपयांचा दंड होणार

राज्यात लागू असलेल्या वृक्षतोड नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात आली

वृक्षतोडीला पूर्वी केवळ एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होती. १९६४ पासून या दंडात कोणतीही वाढ केली नव्हती. किरकोळ दंड होत असल्यामुळे वृक्षतोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थात, या कायद्यातून नागरी क्षेत्रे वगळण्यात आली आहेत.

Pune : आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.

आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.

आरोग्य विभागाने मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या ठाणे, पालघर, रायगड येथे.

तर पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या सातारा सोलापूर येथे करण्याचा शासन निर्णय काढल्याच्या विरोधात.

कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

या कर्मचाऱ्यांनी 18 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi : मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण

मोदी सरकार याच कार्यकाळात एकदा एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता

मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा संकल्प

वेळ आणि पैशांची बचत यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

एक देश एक निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा

2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता

accident news : दोन कंटेनर व पिकअप वाहनाचा तिहेरी अपघात १ठार १गंभीर जखमी

नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावर येवला त्लूक्यातील काळमाथा जवळ दोन कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा नादात समोरून येणा-या मालवाहू पिकअप वाहनाला धडक बसून झालेल्या अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर झाला.सुभाष रावसाहेब भोसले असे मृत झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे,अपघातामुळे रात्री या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

crime News : मंत्री विजयकुमार गावित यांच्या बदनामी करणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल....

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची बदनामी करणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या विरोधात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून बदनामीकारक मेसेज आणि फोटो वायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात भाजपचे नेते सुभाष पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बदनामी करणाऱ्या के टी गावित यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुभाष पावरा यांच्या वतीने आली आहे..

Crime News : निर्बंधाला कंटाळून मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी.

Summary

बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेल मध्ये घडलेय. प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आलेय. प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून मागील 2 वर्षांपासून पती सोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

Crime News : पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला

वसमत शहरात भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यानंतर संबंधित तरुणीने तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने वसमत पोलिसांच्या विरोधात रात्री दोन तास पोलीस स्थानकाच्या पुढे नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले होते.

Sports News : मनमाडच्या वेटलिफ्टिंग खेळाडूंची भारतीय संघात निवड

वेटलिफ्टिंग खेळात मनमाडच्या वेटलिफ्टिंग मध्ये चांगलाच ठसा उमवटला असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांशा व्यवहारे व साईराज परदेशी या दोघांची सुवा फिजी येथे होणा-या कॉमनवेल्थ चँपियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची सलग आठव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

crime News : अहमदपूर तालुक्यातल्या रूद्धा शिवारात दरोडा टाकत, 62 वर्षीय वृद्धाचा खून

Summary

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील रूद्धा शिवारात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत चोरी केली आहे... रावसाहेब केंद्रे वय 62 वर्षे हे आपल्या पत्नी सोबत आणि मुलासोबत शेतामध्ये राहत होते., मध्यरात्री तीन चोरट्यांनी केंद्रे यांच्या घरावरती दरोडा टाकत घरातील रोख रक्कम, आणि सोन्याचे दागिने असा एकूण 53 हजाराचा मुद्देमाल चोरी केला आहे.. मात्र दुर्दैवी घटना म्हणजे रावसाहेब केंद्रे व त्यांच्या पत्नी या दोघांना जबर मारहाण झाली यात पत्नी बेशुद्ध झाली., मात्र पतीचा जागीच मृत्यू झाला आहे... दरम्यान घटनास्थळाची पाहणी पोलीस अधिकारी आणि श्वान पथकाने केली आहे ., तर पुढील तपास पोलीस करत आहेत..

Solapur News: बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा हल्ला

बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा हल्ला

येलो मोझॅकमुळे आगळगाव परिसरातील सर्व सोयाबीन पीक पडली पिवळी जरद

अधूनमधून येणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकाला येलो मोझॅक विषाणूचा बसला फटका

येलो मोझॅक हा विषाणूजण्य प्रकार असल्याने फवारणीचा ही होत नाहीये उपयोग,त्यामुळे सोयाबीन शेंगाही पडतायत गळून

येलो मोझॅकमुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहन कराव लागत आहे आर्थिक नुकसान

त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Shree TuljaBhavani Pratishthan Mandir

Summary

श्री तुळजाभवानी मंदीराच्या महत्त्वाकांक्षी प्रारूप विकास आराखड्यातील कामाला येत्या दहा दिवसात होणार सुरुवात

तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची माहिती

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार प्रारूप विकास आराखड्यातील संपूर्ण कामे

पहील्या टप्यात मंदिरातील उपयोगी नसलेली बांधकाम हाटवली जाणार,तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना मंदिरामध्ये लिफ्ट ची सोय देखील करण्यात येणार

तुळजाभवानी मंदिर आणि शंकर मंदिर या दोन्ही मंदिरांमधील सभा मंडपाच्या कामापासून होणार सुरुवात - मंदिरातील जीर्ण झालेले दगड उतरवून ते पुन्हा नव्याने बसविण्यात येणार

मंदिर संस्थांच्या निधीतून केली जाणार पहिल्या टप्यातील 60 कोटी रुपयांची कामे

विकास आराखड्यातील तीन टप्प्यापैकी पहिला टप्पा मंदिर संस्थांच्या निधीतून दुसरा टप्पा राज्य सरकारच्या निधीतून तर तिसरा टप्पा केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेतून केला जाणार पुर्ण

2019 ला विधानसभेच्या प्रचारावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी तुळजाभवानी मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचे दिले होते आश्वासन

Solapur News : सुभाष देशमुख यांना मोठा राजकीय धक्का

- भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा राजकीय धक्का

- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुभाष देशमुख यांच्या गटात मोठी बंडाळी

- आमदार सुभाष देशमुख गटाच्या 6 नगरसवेकांनी दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना दिला लेखी पाठिंबा

- दक्षिण सोलापूर मधून सोमनाथ वैद्य यांना भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी भाजप शहराध्यक्षांकडे दिले लेखी पत्र

- विशेष म्हणजे भाजपचे सभागृह नेते असलेले श्रीनिवास करली यांनीही दिले पाठिंब्याचे पत्र

- दक्षिण सोलापूर मधील निर्णायक ठरणाऱ्या सुभाष देशमुख गटाच्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार सोमनाथ यांना पाठिंबा दिल्याने आमदार देशमुख यांची वाट बिकट

- नगरसेवकांसोबतच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत सरपंचांचा ही मोठ्या संख्येने पाठिंबा असल्याचा ऍड. वैद्यने केला दावा

bibtya : विज निर्मिती प्रकल्पात बिबट्यांनी मांडले ठाण

अकोले तालुक्यातील कोंदणी येथे दोन बिबट्यांनी चक्क विज निर्मिती प्रकल्पातच मुक्काम ठोकला आहे.. बिबट्यांच्या मुक्त संचाराने विज कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून प्रकल्पाचे नियोजन बिघडले आहे.. वीज निर्मिती प्रकल्पातील बिबट्यांचा वावर सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंदणी ग्रामस्थांनी केली आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com