आनंद आश्रमात पैसे उडवणच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही निंदनीय आणि दु:खदायक गोष्ट आहे. दिघे साहेबांना आपण देव मानतो. त्यांच्या फोटो समोर असं होणे हे दुर्देव. यामुळे अनेकांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिघे साहेबांचे कार्यालय हे दिघे साहेबांच राहिले नाही. खर्या अर्थाने आपला आनंद हरपला आहे, असे केदार दिघे म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर
लालबागचा राजासह मुंबईतील नामवंत गणपती मंडळांत लावणार हजेरी
उद्या दुपारी २.२० वाजता लालबागचा राजा चरणी नतमस्तक होणार
चिंचपोकळीचा चिंतामणीचे दुपारी २.४० वाजता दर्शन घेणार
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास दुपारी ३.०५ वाजता देणार भेट
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात
अपघातात बसमधील प्रवासी झाले जखमी
जवळपास पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती
आमदार जयकुमार रावल यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून केले बचाव कार्य
गणपती विसर्जनानंतर शरद पवार गटात मेगाभरती होण्याची शक्यता आहे.
महायुतीमधील अनेक आजी-माजी आमदार शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत.
मोदी लाटेत २०१४-२०१९ मध्ये भाजपात गेलेल्या अनेकांची पवारांकडे घरवापसी होणार
अजित पवारांकडे असलेले काही आमदारही शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं
- कांदा निर्यातीवरील किमान 550 डॉलर निर्यात मूल्य हटवलं
- मात्र 40% निर्यात शुल्क बाबत अद्याप स्पष्टता नाही
पुणे फेस्टीव्हल उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
अजित पवार, सुनेत्रा पवार, सुरेश कलमाडी, सतेज पाटील, रविंद्र धंगेकर फेस्टीव्हल उद्घटनाला उपस्थितीत आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे.
मुंबईत आज सात दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
मुंबईच्या जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांसोबत पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे गणपती विसर्जनामध्ये जीव रक्षकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पोर्ट ब्लेयरचं नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत नामांतराची माहिती दिली.
बीडच्या घोडका राजुरीजवळ एसटी बससमोर कार आडवी लावून चालक आणि मेकॅनिक यांना खाली उतरवून, तीन अज्ञातांनी पेट्रोल ओतून बसमधील सीट पेटवले. या वेळी तरुणांनी 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. दरम्यान चालक आणि मेकॅनिकने प्रसंगावधान राखून आग विझविली. तोपर्यंत बसमधील ४ सीट जळाल्या होत्या. चालकाच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिसात तीन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस करीत आहेत.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई ते भांडुप असा लोकलने प्रवास केलाय. भांडुपमधील मराठा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपती दर्शनाला ते आले होते. यावेळी वैष्णव यांनी भांडुपमधील प्रसिद्ध असा भाऊचा वडापाववर देखील ताव मारलेला पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी मुंबई मुंबई आहे, मुंबईची संस्कृती ही एक युनिक संस्कृती आहे. भाऊच्या वडापावमध्ये एक आनंद आहे. हा अनुभव पण एक युनिक आहे. खूपच आनंद झाला, अशी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे सांगलीच्या दौऱ्यावर
सुप्रिया सुळे जेवणासाठी थेट आर आर आबांच्या घरी पोहोचलेल्या
सुप्रियासुळे यांनी थेट आबांच्या घरातल्या किचनमध्ये जाऊन आबांच्या घरातील महिलांशी संवाद साधला
त्यांच्या घरात जेवणाचा आस्वाद लुटला
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन
पुणे फेस्टीव्हलला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच राहणार उपस्थित
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पुणे फेस्टिवलमध्ये आजवर सहभाग टाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा मात्र फेस्टिवलच्या उद्घाटनाला
माजी खासदार सुरेश कलमाडे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या काळात पुणे फेस्टिवलची सुरुवात .
पुणे फेस्टिव्हलचे हे यंदाचे 36 वे वर्ष
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली.
काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते यांच्या नेतृत्वात गोपालदास अग्रवाल पक्षप्रवेश
महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथल्ला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती.
अजित पवार यांना राष्ट्रवादी पवार गटात येण्यास नो एन्ट्री असल्याची माहिती पवार गटाच्या मोठ्या नेत्याने दिली आहे. अजित पवार यांची माफीची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवरती पवार गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. बारमतीत पवार गटाचाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा पवार गटातल्या सुत्रांने केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. नितेश राणे यांच्या मुस्लिम विरोधी विधानानंतर खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शेकडो कोटी रुपयांची अमली पदार्थ नष्ट केले. तब्बल ९५ केसेसमध्ये जप्त करण्यात आलेलं ९८२ किलोंचे ड्रग्स नष्ट करण्यात आले. मेफेड्रॉन, कोकेन, MDMA, गांजा, चरस, हेरॉईन, तसेच कृत्रिम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेले अमली पदार्थांमध्ये जून २०२३ मध्ये डोंगरी परिसरातून जप्त करण्यात आलेल्या २० किलो मेफेड्रॉनचा देखील समावेश आहे
मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील आढावा घेण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात. यासाठी सर्व जिल्हातील कायदा व सुवस्था त्याच मतदान वेळी किती कर्मचारी आहेत यांची माहिती घेण्यात येत आहे.
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे तीन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठ आणि अनेक घर पाण्याखाली होते. आता पूर ओसरला असून येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम शुक्रवारी सकाळीच भामरागड मध्ये दाखल झाले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी देखील संवाद साधला.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बेळगाववरून आलेल्या ८४ वर्षीय नलिनी पाटील या मुख दर्शन रांगेत उभ्या होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. रक्तदाबाचा त्रास झाल्याचे निदान होताच तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मंडळाच्या या तत्पर भूमिकेमुळे इतर भाविकांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अनागोदी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सांगवी येथील मुळा नदीवरील 32 कोटी 36 लाख
रुपयांच्या नव्य नदीपात्रावरील पुलावर, पिंपरी चिंचवड महापालिका जवळपास 20 कोटी रुपयांचं सुशोभीकरण काम करत आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकणी आरोपी चेतन पाटीलला जामीन नाही. चेतन पाटील 19 सप्टेंबर पर्यंत सावंतवाडी जेलमध्येच राहणार असल्याचं समोर आलंय. चेतन पाटीलचा जेल मुक्काम अजून सहा दिवसांनी वाढला. मुदत मागितल्याने चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडी वाढली. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी माहीती दिलीय.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले. नाशिक भाजपच्या वतीने नाशिकच्या शालीमार येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.
राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झाली असून, राज्यभर आज भाजपकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर पुतळ्या जवळ भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे उपस्थित राहतील.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील निवासस्थाबाहेर मध्यराञीच्या दरम्यान अज्ञात कडुन गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला. यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आले. घटनेनंतर सावंत यांच्या घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सर्व कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वार रूममधून चालतात. त्याची चौकशी करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पंढरपुरात केली.
नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार या दोघांवर गुन्हा दाखल केला होता.यात वाहन मालक संकेत बानवकुळे यांवर कारवाईच्या मागणी विरोधकांनी केली. यात दारू पिल्याचा अहवाला आला असून यावर पोलीस कायदेशीर मत जाणून घेणार आहे...
- यात हे ऑडीचा अपघात झाला तेव्हा ऑडी चालक अपघाताच्या रात्री मद्यप्राशान करून वाहन चालवत असल्याचं तपासात समोर आलेले आहे.
- यात सूत्रांच्या माहितीनुसार दारू पिली असले तरी दारूच्या प्रभावाखाली असण्यासाठीची मर्यादा लागते, त्यातुलनेत अल्कोहोलचे प्रमाण रक्ताच्या नमुन्यात किती आहे, त्यानंतर कारवाईची दिशा ठरेल.
- त्यामुळे रक्ताच्या नमुनेच्या अहवालानुसार दारू पिले असतानी सुद्धा अर्जुन हावरेला गाडी चालवायला दिली. त्यामुळे संकेत बावनकुळेंवर मोटर व्हेकल अॅक्ट 185 अंतर्गत कारवाई करू शकते की नाही यासाठी कायदेशीर सल्ला घेणार आहे.
- पण रक्ताच्या नमुने अहवालात कायदेशीररित्या प्रमाण मर्यादा कमी असल्यास कारवाई होऊ शकणार नाही अशीही माहिती पुढे येत आहे.
- या पोलीस या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन कशा पद्धतीने कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्या जवळील १ लाख ६७ हजार रुपये लंपास केल्याची घटना अमरावती लागत असलेल्या बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात घडली असून आरोपी cctv मध्ये कैद झाला आहे, बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला.
परभणी जिल्ह्यातील एक हजार दीडशे जिल्हा परिषद शाळेतील एक लाख 17 हजार विद्यार्थ्यांना अद्यापही ही गणवेश दिला गेला नाही, शाळा सुरु होऊन चार महिण्याचा कालावधी लोटलाय, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याने पालकांनी नाराजी जाहीर केली आहे. तालुका स्तरावर कापड वितरित झाल्याचा दावा केला असला तरी विद्यार्थ्यांना कधीपर्यंत गणवेश शिवून मिळेल असा सवाल पालकाकडून विचारला जात आहे.
भंडारा तुमसर बालाघाट हा दोन राज्यांना जोडणारा मार्ग असून या मार्गा वर ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे.. तुमसर वरून मध्यप्रदेशला जाणारा महत्त्वाचं मार्ग खड्डेमय झाला आहे. दररोज अवजड वाहतूक याच मार्गाने जात असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. मात्र या खड्ड्याकडे बांधकाम विभाग अक्षरशः दुर्लक्ष करीत आहेत. याच मार्गावर अनेकदा अपघात देखिल झाले असून नागरिकांना देखिल याच मार्गाचा वापर करावा लागतो. शाळली मुले शाळेत जात असताना. त्यांच्या अंगावर अनेकदा चिखल उडून त्यांचे गणवेश चिखलाने माखले. स्थानीक नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागालानिवेदन देऊन सुध्दा या कडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार काय असा सवाल देखिल उपस्थीत केला जात आहे.
नांदेडच्या विमानतळावर सुविधांचा अभाव आहे. प्यायला पाणी नाही, बाथरूमची सुविधा नाहीयेय प्रवाशी आणि प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना साधी बसण्याची देखील सोय नाहीये. त्यामुळे प्रवाशी आणि नातेवाईकांनी विमानतळ प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केलीये. विमानतळ व्यवस्थापकांनी तात्काळ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी आणि नातेवाईकांनी केलीय.
गणेशोत्सवात तडीपारांची नाशिक पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. 3 दिवसांत 62 जणांवर करण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास साडेतीनशे गुंडांविरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली होती. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करीत शहरात वास्तव्याला असणाऱ्या ६२ गुंडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात तडीपार गुन्हेगार वावरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे.
पार्सल वितरण करण्याचे काम करणाऱ्या एका तरुणाने माडगी येथील वैनगंगेच्या पुलावर स्कूटी उभी केली. तसेच दुथडी वाहणाऱ्या नदीत पुलावरून उडी घेतली. शांतनु ऊर्फ पिकू चाचीरे (२५) असे या तरुणाचे नाव आहे. शांतनूने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.दुथडी वाहणाऱ्या वैनगंगा नदीत शांतनूने उडी का घेतली? त्याचा तपास पोलिस करीत आहे.
वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार होत असल्याचं बघायला मिळालं,रिसोड बाजार समितीत सोमवारी कांडी हळदीला कमाल १४,६२५ आणि किमान १२,५७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. यानंतर दोन दिवसांत हळदीचे दर पाचशे रुपयांनी घसरले. रिसोड बाजार समितीत कांडी हळदीला कमाल १४,१८० आणि किमान १३,३०० रुपयांचे दर मिळाले. दोन दिवसात हळदीच्या दरात ५०० रुपयांची घसरन झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला असून सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत, मात्र त्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन निवडणुक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या , नरसिंग उदगीरकर आणि इतर एक अशा दोन निवडणूक याचिका दाखल होत्या. मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती अरुण पेंढणकर यांनी या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत.., सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले नव्हते.., व सक्षम प्राधिकरणाने वैधता प्रमाणपत्र दिले नव्हते.. हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिकेसोबत जोडलेला नाही. त्यामुळे डॉ.काळगे यांच्या विरोधातील दोन्ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाने फेटाळले आहेत....
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरल्याने पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळशी गेलेलं पवना धरण शंभरीच्या जवळपास पोचले होते. . उशिरा का होईना धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी पवन मावळ, तळेगाव, देहूरोड या भागासह पिंपरी चिंचवड शहर व एमआयडीसी भागात दिले जाते. साडेआठ टीएमसी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणा आत्ता तेराशे 68 मिली मिटर या मोसमात पाणीसाठा तयार झाला आहे. पाण्यावर पवन मावळ्याची शेती देखील होते. असे हे अतिशय महत्त्वाचे धरण भरल्याने मावळ व पिंपरी चिंचवडकरांनी आनंद व्यक्त केला आहे....
लातूर वरून उदगीर कडे जात असताना महामार्गावर रिक्षाचालकाचा एका हरणाला वाचवताना अपघात झाला... आणि या अपघातात रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे...दरम्यान जखमी व्यक्तीला खासदार डॉ.शिवाजी काळगे यांनी तात्काळ गाडी थांबून प्राथमिक उपचारा देत मदत केली आहे.. आणि पुढील उपचारासाठी जखमी व्यक्तीला लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे...
Nagpur News :
- अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या नऊ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा जोरदार दणका
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व आरोपींचे अटकपूर्वक जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले..
- राज्य सरकारच्या अंगणवाडी श्रेणी वर्धन योजनेअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेला 49 अंगणवाड्यांसाठी दोन टप्प्यात एक कोटी सहा लाख रुपये दिले
यात आरोपींनी त्यांना मिळालेल्या रकमेतून साहित्य खरेदी करताना प्रक्रियेचे पालन केले नाही..
त्यांनी ई टेंडर प्रक्रिया बाजूला ठेवून थेट पुरवठादारांकडून बाजार भाव पेक्षा जास्त दराने साहित्य खरेदी केले...
त्यापैकी काही साहित्य निर्धारित दर्जाचे नव्हते, अशी तक्रार आहे.
त्यावर सुनावणी न घेता हायकोर्टाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले.
विमानसेवेसाठी सोलापूरच होटगी रोड विमानतळ सज्ज असून डीजीसीएकडून लवकरच विमानसेवेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे.त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सोलापुरात आणून विमानसेवा सुरू करण्याची विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत फोनवर चर्चा केली आहे.
हडपसरमधील साडे सतरा नळी येथे टोळक्याने कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली.
इतकेच नाही तर हवेत कोयते फिरवून एका घरावर दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रात्री दत्त नगर येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना बापू मकवाना आणि प्रसाद ढगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवली. तक्रारदारांना शिवीगाळ केली. नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. पुढे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी खाली पाडून गोंधळ घातला. तसेच, एका घरावर दगडफेक देखील केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे.
डीपीसीचे ३० सदस्य, २२ आमदार आणि शहरी भाग असल्याने पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळवगळून तीन खासदार यांनी कामाच्या शिफारशी यापूर्वीच दिल्या आहेत.
त्यातील किती कामांना मंजुरी मिळाली याबाबत छाननीनंतरच स्पष्टता येणार आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडून कोणाला भरघोस निधी आणि कुणाच्या कामांना कात्री लावण्यात आली आहे, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी पुणे जिल्ह्याचा १२५६ कोटी रुपयांचा सर्वसाधारण आराखडा मंजूर करण्यात आला.
यापूर्वी निधी वाटपावरून अजित पवार यांच्याविरोधात भाजप, शिवसेना सदस्य झाले होते आक्रमक.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.