
अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दाखल केला फेर मत मोजणीचा अर्ज
कर्जत खोपोली मतदार संघातील 18 बुथ वरील मतदान यंत्रांची फेर मतमोजणी होणार आहे. फेर मतमोजणीसाठी सुधाकर घारे यांनी निवडणुक आयोगाच्या खात्यात 8 लाख 49 हजार 600 रुपये जमा केले जाणार आहेत. पुढील 25 दिवसांत फेर मतमोजणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुधाकर घारे यांचा 5 हजार 694 मतांनी पराभव झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात साधु संतांना रस्त्यावर तुडवले जात होते, अन्याय अत्याचार केला जात होतं.माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, देवेंद्र फडणवीस यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न त्या काळात झाला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सूडाच राजकारण केलं. उद्धव ठाकरेंची रिक्षा पुढे ही जात नव्हती आणि मागे जात नव्हती.
बाड़मेर - यशवंतपुर एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याने वसई दिवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. बाड़मेर - यशवंतपुर एक्सप्रेसच्या एका डब्याचे व्हील जाम झाल्याने गाडी थांबवली आहे. दिव्यावरून वसईकडे येणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. गाड्या थांबल्यामुळे प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले आहेत.
पीक विमा भरपाईतील अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनास सूचना
धान खरेदीची नोंदणी बंद राहिल्यास संस्थांवर कडक कारवाईचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिलेत.
विदर्भातील शिवसेनेच्या एकमेव महिला माजी खासदार आणि विद्यमान विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना मंत्रिमंडळात मंत्रीपद देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी वाशिम जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांनी पत्रकार परिषद घेत यासाठी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून भावना गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अखेर ठरलं, ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ- सूत्रांची माहिती
५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार शपथविधी
महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय
लवकरच होणार अधिकृत घोषना
रेल्वे रुळाने पायदळ जात असलेल्या दोघांना मागाहून येणाऱ्या रेल्वे गाडीची जबर धडक बसल्याने दोघांचाही रेल्वेने कटून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज दुपारच्या सुमारास वरुड रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.
महायुतीच्या शपथविधीसाठी तयारीला वेग
देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून घेतला मुंबईतील मैदानांचा आढावा
2 डिसेंबरला शपथविधी झाला तर सोहळा शिवाजी पार्कवर होणार
मात्र, विलंब झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा एमएमआरडीए मैदानाचाही प्रशासनाकडून विचार
एकनाथ शिंदे यांनी दिलेला प्रस्ताव भाजपकडून मंजूर न झाल्यास पुन्हा दिल्लीत बैठक ?
दोन दिवसात शिवसेनेच्या प्रस्तावाबद्दल भाजप माहिती देणार
शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावात बदल झाल्यास एकनाथ शिंदे पुन्हा अमित शाह यांची भेट घेणार
शाह यांची भेट घेऊन अपेक्षित असलेली मंत्रिपद पदरात पाडून घेण्यावर शिंदे यांचा भर
एकनाथ शिंदे यांचं समाधान करण्याचं भाजप समोर आव्हान
सूत्रांची माहिती
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% मतदान झाले होते. दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५% होती. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३% ची तफावत कुठून आली?
एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? लोकशाहीत प्रत्येक मताला किंमत असते. त्यामुळे वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने चालवलेली लोकशाहीची थट्टा आम्ही खापवून घेणार नाही.
काळजीवाहू मुख्यमंत्री आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहीती…
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीत…
महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार.
दिल्लीमधील महाबैठकीनंतर आज राज्यात महायुतीची बैठक होणार होती. पण आजची बैठक रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून देविदास लक्ष्मण उरकुडे, आणि देविदास केशव, मडावी अशी मृतांची नावे आहेत.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर ईडीचे छापे
जुहू येथील घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाडा खडकोना ते मेंढवन खिंडीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांच्या जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने विरुद्ध दिशेच्या लेनवरून जात असल्याने गुजरात मुंबई वाहिनीवर ही वाहतूक कोंडी, वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल नाहीत.
भाजपचा विधीमंडळ गटनेता नेमणूक केली जाणार आहे त्यानंतर २ तारखेला मुख्यमंत्री शपथ होऊ शकते - सूत्राची माहिती
लातूरच्या उदगीर शहरात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय.. शहरातल्या पारकट्टी गल्लीत आणि परिसरात बिबट्या वावरत असतानाच व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीच वातावरण पसरल आहे.. दरम्यान प्रशासनाच्या वतीने बिबट्या जेरबंद होईपर्यंत सावधानी बाळगावी असं आव्हान करण्यात आले आहे...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे,
बॅकलॉक भरून काढावा, त्यांना कुबड्यांचा गरज नाही, उलट कुबड्या देवेंद्र फडणवीसवर अवलंबून आहे
त्यांना कोणी थांबवु शकत नाही...
विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रातील विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवू या...
मध्यंतरी त्यांचा नाव बदला घेण्याचं राजकारण करते असा ठपका होता, ते पुसून निघेल अशी अपेक्षा आहे
विचारधारेची लढाई असावी वैयक्तिक वैरी नाही, जो समज झाला होता तो समज ती पुसून निघेल,
स्वाभाविक मुख्यमंत्री राहिले शिंदे यांना सत्ता मिळून सत्तेचा सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्याने चेहरा पडून दिसेल
2029 मध्ये दोन्ही शिंदे पवार यांची उपयुक्तता संपली असावी,
शिंदे पवार यांना आता मोदी फडणविस यांच्या आशिर्वादाने राहावे लागणार, काही दिल नाही तर चुपचाप राहावे लागतील
शिंदे उपमुख्यमंत्री पद नाही घेतलं तर दुसरा चेहरा आहे, त्यांची मजबुरी आहे, पक्ष संभाळण्यासाठी त्यांना घ्यावं लागेल,
मुख्यमंत्री राहणाऱ्यानी मंत्री पद घेतले, त्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यातील निवडून आलेल्या आमदारांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात येणार
सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे जिल्हाध्यक्षांचे आदेश
पुणे शहरातील धनकवडी येथील शिवस्मारक सभागृहात होणार नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार
जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सत्कार सोहळ्याचे आयोजन
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे काल उशिरा शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.. यावेळी त्यांनी सच्चिनांद सद्गुरू श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आहे. जनसेवेचा घेतलेला वसा निभावण्यासाठी शक्ती द्या, अशी प्रार्थना यावेळी मुंडेंनी बाबांच्या चरणी केलीय.
धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या आधीही साईंचे आशीर्वाद घेतले होते. आता पुन्हा साई दरबारात नतमस्तक होऊन मन प्रसन्न झाल्याचे मत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
नांदेड जिल्ह्यात मागिल तीन दिवसापासून किमान तापमानात घट मोठी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी तर दुपारीदेखील थंडी असल्याने थंडीपासून संरक्षण करण्याठी नागरिक उबदार कपडे घालत आहेत . त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा यासाठी ग्रामिण भागात जागोजागी शेकोट्या देखील पेटवल्या जात आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी ही परभणीत थंडीचा कडाका कायम आहे, बुधवार पासून परभणी जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढलाय., पारा 8 अंशावर पोहोचलाय,या हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय,तापमानात घट झाल्याने गहू सारख्या पिकांना मोठा लाभदायक ठरणार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे. थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी शेकोट्याचा आधार घेतलाय.. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
दुचाकी चालकासह मागे बसलेल्या सहप्रवाशांला आज पासून हेल्मेट घालणे बंधनकारक, नागपूरकरांचा मात्र याला विरोध....
- नागपूर पोलिसांनी संदर्भात नोटिफिकेशन काढत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय असल्याचं म्हणणं
- दुचाकी वरील सहप्रवासी हेल्मेट घालून नसेल तर आज पासून होणार कारवाई,
- दुचाकीस्वारावर जागोजागी लागलेल्या कॅमेऱ्यामधून लक्ष ठेवणार आहेत आणि अशा चालकांना आता थेट ई चालन पाठवण्यात येणार...
- नागपूरकरांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे हे विशेष...
Maharashtra Live Update :
- निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नको
- निवडणुकीनंतर नाशिकमधील स्थानिक भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका
- निवडणूक काळात वेगवेगळ्या कारणामुळे माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत धरली होती अन्य पक्षांची वाट
- याच मुद्द्यावर नवनिर्वाचित आमदारांसह स्थानिक नेते देखील आक्रमक भूमिकेत
- कुठल्याही मुद्द्यावर सोडून गेलेल्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, नवनिर्वाचित आमदारांसह पदाधिकाऱ्यांची भूमिका
- नाशिकच्या भाजप कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पक्ष सोडून गेलेल्यांवर टीकेची झोड
- स्थानिक भाजप नेत्यांकडून वरिष्ठांना दिला जाणार अहवाल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.