Maharashtra News Live Updates : सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस; तिळगंगा नदी वाहू लागली भरून

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 5 june 2025 : आज, गुरूवार दिनांक ५ जून २०२५, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग खुला होणार, आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी, महाराष्ट्रात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस; तिळगंगा नदी वाहू लागली भरून

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली

वाळवा तालुक्यातील रेठरे धरण परिसरात दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.

त्यामुळे या भागातून वाहणारी तीळगंगा नदीला अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहू लागली होती.

नगर - मनमाड महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात

मनमाड महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक एकमेकात घुसले

अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी

भीषण अपघातामुळे दोन्ही ट्रकचे नुकसान मात्र जीवितहानी नाही

नगर - मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले

अंबादास दानवे पोहचले भाजप कार्यालयात

अंबादास दानवे पोहचले भाजप कार्यालयात

छत्रपती संभाजीनगर भाजप कार्यालयात क्या हुआ तेरा वादा आंदोलनात थेट पोहचले भाजप कार्यालयात

निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाहीत असा आरोप

ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालय वर येऊन दिल्या शुभेच्छा...

नाशिक मधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले या साठी शिवसेना ठाकरे गटाचे पाधिकारी मनसे कार्यालयत आले या दरम्यान ठाकरे गटा काडून फोटो फ्रेम आणण्यात आले आहे त्यामुळे या चर्चेचा विषय बनला आहे या फोटो फ्रेम वर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहे तर या प्रेम लिहिण्यात आले आहे हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र चे हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना यावेळेस शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा शिरकाव

मुंबई,वसई विरार नंतर मिरा-भाईंदर मध्ये देखील कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

भाईंदर पूर्वेच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये एक ४६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह

मिरारोड मधील नया नगर परिसरात महिला राहत आहे.

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पडवळ यांनी ही माहिती दिली.

काळजी घ्या! ठाण्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १३१ वर

आजचे कोरोना रुग्ण - ०१

आजच्यासह आतापर्यंतचे एकूण रुग्ण - १३१

(१०१ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण)

रुग्णालयात दाखल रुग्ण - एकूण १० - (प्रकृती स्थिर)

(त्यापैकी ०७ खाजगी रुग्णालयात आणि ०३ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल.)

गृह विलगीकरण - १९ रुग्ण (प्रकृती स्थिर)

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा पुणे दौरा

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा पुणे दौरा

गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडून करण्यात आली पुण्यातील ऐतिहासिक अशा शनिवार वाड्याची पाहणी

शनिवार वाडा संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा केंद्रीय मंत्री मंडळाकडे प्रस्ताव

आज केंद्रीय मंत्र्यांकडून पाहणी करत शनिवार वाड्याच्या सुशोभीकारणाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्र्यांकडून शनिवारवाड्याची पाहणी

केंद्र सरकारकडून शनिवार वाड्याचे संवर्धन ,सुशोभीकरण यासह पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव

गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह अनेक इतिहास तज्ञ आणि इतिहास अभ्यासकांकडून देखील करण्यात आली शनिवार वाड्याची पाहणी

शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपिठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार

शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपिठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार

अक्कलकोट येथे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे

आज एकनाथ शिंदे यांच्याशी उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदेचे स्वागत करणारी जाहिरात देखील आज राजू खरे यांनी दिली होती

त्यानंतर आता थेट शिवसेनेच्या व्यासपीठावरचं मोहोळचे आमदार राजू खरे पोहोचल्याने राजकीय चार्चना उधाण

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे पण मंचा वर उपस्थित

ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मनसे कार्यालयात जाणार

- ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मनसे कार्यालयात जाणार

- नाशिक मधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे करण्यात आले आहे आयोजन

- ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी प्रसादाचा घेणार लाभ...

- दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच स्थानिक पातळीवर देखिल दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक चर्चेत...

एक परवाना 20 लाख रुपयांना, गुप्ता आणि सुपेकर जोडगोळी असल्याचा पुण्यातून आरोप

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला. या निमित्ताने पुणे पोलिसांनी गेल्या ३ वर्षात ५०० पेक्षा जास्त शस्त्र परवाने दिल्याचे समोर आलं. असं असताना पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि तत्कालीन अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा आरोप आर टी आय कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केला आहे. एका परवान्यासाठी गुप्ता आणि सुपेकर हे २० लाख रुपये घेत होते असा आरोप आल्हाट यांनी केला आहे. परवान्याचा अहवाल पुढे पाठवण्यासाठी पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपायुक्त यांच्यावर देखील दडपण असायचे कारण गुप्ता आणि सुपेकर हे जोडगोळी होते असा आरोप सुद्धा आल्हाट यांनी केला आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकात आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धुराचे लोट पाहायला मिळत असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरात पावसाच्या सरी, नागरिकांना दिलासा

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र शहराकडं पावसाने पाठ फिरवली होती. आज दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसरात पाऊस झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

तब्बल ७ दिवसानंतर नाशिक शहरात पावसाच्या सरी

तब्बल ७ दिवसानंतर नाशिक शहरात पावसाच्या सरी

७ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नाशिक शहरात पावसाच्या जोरदार सरी

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ

आज नाशिकला देण्यात आलाय यलो अलर्ट

वाढीव कचरा शुल्काविरोधात मनसे आक्रमक

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव कचरा शुल्काविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक भूमिका घेतली आहे. हजारो कार्यकर्त्यांसह मनसेने केडीएमसी मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला .या वेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत, "कर रद्द करा – जनतेला न्याय द्या" अशा घोषणा देण्यात आल्या.

बदलापुरात उद्या रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यात आलंय. उद्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते या स्मारकाचं जीर्णोद्धार आणि लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे रायगड आणि संगमनेर इथून आणण्यात आलेल्या दगडापासून स्मारकाची निर्मिती करण्यात आलीय. शिवस्मारकासाठी वापरण्यात आलेले दगड हाताने घडवण्यात आले आहेत. त्यामुळे या स्मारकाची बदलापुरात चर्चा आहे.

‘पर्यावरण दिना’निमित्त शिवसेनेकडून जनजागृती दिंडीचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने ‘पर्यावरण जनजागृती दिंडी’चे आयोजन करण्यात आले.

मित्र मंडळ चौकातील पर्यावरण शिल्पाला रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.

दिंडीची सुरुवात टाळ-मृदुंगाच्या निनादात, आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली.

“झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्ग आहे आपले घर, त्याचे करा रक्षण खरं”, या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली.

महिला कार्यकर्त्यांनी पारंपरिक फुगडी खेळत “झाडे लावा, झाडे जगवा”चा संदेश दिला. यानिमित्ताने पाच हजार तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.

Sharmishtha Panoli: शर्मिष्ठा पानोली यांना कोलकाता उच्च न्यायालयाकडून दिलासा

कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली यांना जातीय व्हिडिओ पोस्टप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे.

न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असून, देशाबाहेर जाण्यावर बंदी घातली आहे.

Badlapur: बदलापुरात उद्या रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यात आलय.

उद्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते या स्मारकाचं जीर्णोद्धार आणि लोकार्पण होणारय.

यानिमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलय.

या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे रायगड आणि संगमनेर इथून आणण्यात आलेल्या दगडापासून स्मारकाची निर्मिती करण्यात आलीय.

शिवस्मारकासाठी वापरण्यात आलेले दगड हाताने घडवण्यात आले आहेत. त्यामुळे या स्मारकाची बदलापुरात चर्चा आहे.

विविध मागण्यांचे ठाकरे गटाच्या शिवसेनेने दिले तहसीलदारांना निवेदन

विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने अनेक आश्वासन दिली होती. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप करण्यात आली नाही.

असा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज जिल्हाभरातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा आश्वासन विधानसभा निवडणुकीत देण्यात आले होते. त्यासोबतच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा महायुतीने केली होती.

यासह इतर आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिले होते.

माहितीने दिलेले आश्वासन निवडून आल्यानंतर पूर्ण केली नाहीत. त्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला आहे.

सोलापूर अक्कलकोट महामार्गावर उभ्या असणाऱ्या टेम्पोला ट्रॅकने दिली जोरदार धडक, ट्रक ड्रायव्हर झाला फरार

- विटाने भरलेला टेम्पो पंक्चर झाला म्हणून थांबला असताना वेगवान ट्रकने धडक दिल्यामुळे जोरदार अपघात..

- ट्रकने उभारलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिल्यामुळे दुभाजकावर जाऊन झाला पलटी

- टेम्पोमध्ये कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी नाही..

- विटाने भरलेला टेम्पो दुभाजकावर झाल्यामुळे सर्वत्र विटा पडल्याचं आलं दिसून..

- सोलापूर ग्रामीण घटनास्थळी झाले दाखल, ट्रक आणि टेम्पो काढण्याचं काम सुरू..

Sion - Panvel : सायन पनवेल महामार्गावरील वाशी खाडी ब्रिजचे उद्घाटन संपन्न

सायन पनवेल महामार्गावरील वाशी येथील खाडी ब्रिजचे उद्घाटन बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं

त्यामुळे नवी मुंबईकरांची वाहतुकीतून आता सुटका होणार आहे

हा ब्रिज दोन किलोमीटरचा असणार आहे दोन्ही बाजूंना तीन मार्गिका आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे

Pune-Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर अपघात

केळवडे हद्दीत शिवापूर टोलनाक्याच्या दिशेने भरधाव जात असलेला क्रेसेंटने भरलेला डंपर मागून आलेल्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने जाग्यावरच पलटी झाला.

धडक इतकी तीव्र होती की डंपरचा डावीकडील टायर फुटून वाहन उलटले.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही,मात्र क्रेसेंट रस्त्यावर सांडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

या परिसरातील हॉटेल्ससमोरच्या सर्विस रोडवर असलेले डिव्हायडर्स बेकायदेशीररित्या फोडून काही ठिकाणी थेट महामार्गावर प्रवेश मिळवणारे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना थेट महामार्गावर उतरण्याची संधी मिळते आणि मागून येणाऱ्या वेगात असलेल्या वाहनांना ब्रेक लावण्याची संधी न मिळाल्याने अनेकदा अपघात होत असल्याचा आरोप केला जातोय...

पुसदमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्य जागर दिंडी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यवतमाळच्या पुसद येथील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पर्यवरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या पर्यावरण दिंडीची सुरवात गीताई केंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन करण्यात आली.मिशन ग्रीनचे सदस्य गजानन दत्तात्रय जाधव यांना 2025 चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार मिळाला.

पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडोरला मंत्री नितेश राणे यांनी जाहीर पाठिंबा

पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडोरला मंत्री नितेश राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

हिंदूंच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कॉरिडॉरची गरज आहे.

पंढरपुरातील स्थानिक लोकांनी देखील कॉरिडोरला सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

उज्जैन, काशी विश्वेश्वर या ठिकाणी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.

या ठिकाणच्या हिंदू लोकांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले आहे त्यामुळे पंढरपुरात देखील कॉरिडॉर व्हावा ही सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे.

समृद्धीचं लोकार्पण! मुंबई ते नागपूर प्रवास ८ तासांत

महायुती सरकारसाठी आनंदाचा दिवस

नागपूर ते मुंबई प्रवास आता ८ तासांत पार पडणार

इगतपूरीत ७.७८ लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भोगदा

२४ जिल्हे JNPT बंदराला जोडले

शिरुर तालुक्याचील वडगाव रासाई येथे किराणा दुकानात धाडसी चोरी

- पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश

- दुकानदार महिलेच्या गळ्यातील ₹1.58 लाखांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावले

- महिलेच्या गळ्यातुन चोरट्यांनी गंठण हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले

- व्यवसायिक महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर

- शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू

Vasai-Virar: वसई विरार शहरात आढळले आठ नवे कोरोना रुग्ण

वसई विरार शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शहरात आता पर्यंत एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यावर पालिकेच्या जीवदानी रुग्णालय उपचार सुरु आहेत,

या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यास पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरुवात केली आहे.

यामध्ये एकूण 9 हजाराहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

नागरिकांनी वर्दळीच्या ठिकाणी मास्क घालावा, घरी गेल्यावर हात स्वच्छ पाण्याने धुवावे तसेच पालिकेने दिलेल्या निर्देशांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी केले आहे.

मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर जन आक्रोश मोर्चा

केडीएमसी कडून आकारण्यात येणाऱ्या कचरा शुल्काला मनसेने तीव्र विरोध करत आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत कचरा वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी केली .या मोर्चादरम्यान मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी हे कचराशुल्क रद्द झालेच पाहिजे .ठेकेदाराच्या घशात टाकण्यासाठी कल्याणकरांच्या घराघरातून पैसे काढणार असाल तर आमचा विरोधच असणार, आमच्याकडून शांततेची अपेक्षा बाळगू नका असा इशारा केडीएमसीला दिलाय.

जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय

लता आणि शशांक या हगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. आता अटकेत असणारे तीन आरोपी हे इंडस इंड बँकेचे एजंट असल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिलीये. या एजंटना बँकेने कोणतीही सूचना दिलेली नसताना त्यांनी प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त केला, मात्र तो जेसीबी येळवंडे यांना परत करण्याचा आदेश बँकेने दिला होता. परंतु या तिन्ही एजंटनी जेसीबी शशांक हगवणेच्या ताब्यात दिला. त्यामुळं हे एजंट बँकेचं काम करत होते की शशांकच्या कटाचा भाग होते? याचा तपास म्हाळुंगे पोलीस करतायेत.

राज्यातील पहिल्या वन नियंत्रण कक्षाचं उद्घाटन

- चंद्रपूरप्रमाणे राज्यातील इतरही संवेदनशील जिल्ह्यात वन नियंत्रण कक्ष उभारण्याची वनमंत्र्यांची घोषणा

राज्यातील पहिल्या वन नियंत्रण कक्षाचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज चंद्रपुरात उद्घाटन करण्यात आलं. गेली अनेक दिवस वने व वन्यजीवविषयक कामांना एकाच ठिकाणी नोंदविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची गरज व्यक्त केली जात होती. हीच गरज लक्षात घेता चंद्रपूर शहरातील रामबाग वन संकुलात आता राज्यातील वन विभागाचा पहिला वन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. सुमारे 3 कोटी रुपये खर्चून हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा व ताडोबा परिघात प्रत्यक्ष जंगलात असणाऱ्या सर्व वनरक्षक -कर्मचारी व अधिकाऱ्यांना एका ॲपद्वारे या नियंत्रण कक्षाशी जोडले गेले आहे.

नाशिक महापालिकेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला 100 प्लसचा नारा

- युती झाली तर ठीक नाही तर गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा

- नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत गिरीश महाजन यांचे मोठं विधान

- गटबाजी थांबवून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, गिरीश महाजन यांच्या सूचना

- तसच सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचे संभाव्य पालकमंत्री म्हणून देखील उल्लेख

अंबादास दानवे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

आठवडाभर चालणाऱ्या 'क्या हुवा तेरा वादा' या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिले निवेदन

शेतकरी प्रश्न, तसेच शहारातील विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा

संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन होणार असून सरकारने केलेले वादे फेल ठरल्याचा ठपका

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवेदन स्विकारले निवेदन

Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगर जिल्ह्यातील 2 हजार 399 शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिकवेळा अनुदान...

राज्यातील अनेक भागात शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, मात्र दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक वेळा अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार लेखा परीक्षणानंतर समोर आला आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 2022 - 23 मध्ये महसूल विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 2 हजार399 शेतकऱ्यांना एक पेक्षा अधिक वेळा अनुदान देण्यात आले. आता प्रशासनाकडून याची वसुली सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 464 शेतकऱ्यांनी 39 लाख 27 हजार 831 रुपये शासनाकडे जमा केले आहे .

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील शिंदे सेनेतील गटबाजी समोर...

शिवसेना शिदे गटाला सोलापूर जिल्हात गटबाजीचे ग्रहण...

-शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंताचां फोटो जाहीरातीमधून गायब...

- शिवसेनेचे सोलापूरचे लोकसभा प्रमुख- महेश साठे आणी जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांनी आज विविध वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीत शिवाजीराव सावंत यांचा फोटोला स्थान नाही.

सोलापूर जिल्हातील सावंत समर्थकांमधून नाराजी...

शिवाजी सावंत अक्कलकोटच्या जाहीर सभेकडे पाठ फिरवण्याची शक्यता...

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील या गटबाजी कशी थोपवतात याकडे लक्ष...

जागतिक पर्यावरण दिननिमित्त पर्यावरण परिषदचे आयोजन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून परिषदेचे आयोजन

ताज लॅन्डस बांद्रा येथे पर्यावरण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे

मंत्री पंकजा मुंडे ,पालक मंत्री आशिष शेलार आणि पर्यावरण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित

पंकजा मुंडे यांच्या हस्ते महापर्यावरण अँपचा शुभारंभ करण्यात आला

मंत्री नितेश राणे यांची शिवसेना ठाकरे गटावर सडकून टीका

- ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं

- उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे.

- त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत

- त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे.

- याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्याचे तळजाई टेकडी येथे राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वनविभागाच्या वतीने करण्यात होते. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते...

सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती

- ठाकरे गटाच्या उपनेते पदी दत्ता गायकवाड यांना संधी

- सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करताच दुसऱ्याच दिवशी सामना दैनिकातून दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा

सरपंच देशमुख हत्येप्रकरणी जरांगेंनी कानाला हात लावला

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली

पुर्ण कार्यक्रम केलाय

आरोपीच्या वतीने वकिलाने बाजु मांडली मोक्यातुन दोषमुक्त करा

हरकत नाही असं सरकारी वकील म्हणत आ

पुण्यात आयटी इंजिनियर तरुणीची आत्महत्या

सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे.... अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका 25 वर्षीय आय टी अभियंता तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मे च्या पहाटे घडले आहे.

बेंगळुरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणावर आज दुपारी सुनावणी

कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यात 18 मोठ्या भरतीचे दिवस

या अठरा दिवसांमध्ये पावणे पाच मीटर एवढ्या उंचीच्या अजस्त्र लाटा उसळण्याचा अंदाज

समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर दिला गेलाय अलर्ट

11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट या दिवशी असणार सर्वात मोठी भरती

समुद्रात ठराविक काळात अजस्त्र लाटांचा होतो मारा

समुद्राचं पाणी मानवी वस्तीमध्ये जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न

मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर सध्या समुद्र खवळलेला

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात

० लोणेरे नजीक टेमपाले गाव हद्दीतील उड्डाण पुलावर झाला अपघात

० कारवर ट्रक कोसळला

० चार जण जखमी

० सुदैवाने जीवीत हानी नाही

० जखमींवर माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु

० अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू

० वाहतूक सुरळीत

अग्नीवीरच्या पाचव्या बॅचची आज श्रीनगरमध्ये परेड

लता हगवणे व शशांक हगवणे यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे लता हगवणे व शशांक हगवणे यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचे तपासा बाबत..

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्याचे तपासात इंडसइंड बँक चे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकवरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचे सांगितले आहे.

असे असताना, खालील तीन इसम यांनी जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले व ते आरोपी शशांक हगवणे याचे ताब्यात दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिघांना आज रोजी 02.07 वा. अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे..

1. योगेश राजेंद्र रासकर, व. 25, रा. तळेगाव ढमढेरे

2. गणेश रमेश पोतले, व. 30, रा. मोहितेवाडी

3. वैभव मोहन पिंगळे, व. 27, रा. तळेगाव ढमढेरे

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात, ३० जण जखमी

सोलापूर पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी झाली

पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यांमुळे ट्रॅव्हल्स खड्ड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे

यामध्ये पुणे आणि मराठवाड्यातील 30 प्रवासी जखमी झाले असून वीस जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे .

सदर ट्रॅव्हल्स शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती.

कुडाळ एसटी आगाराच्या बसचा अपघात

कुडाळ एसटी आगाराच्या बसने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. हा अपघात रात्री उशिरा कुडाळ-बाव मार्गावर घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सध्या जखमींना ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे.

हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर

प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडे कडून जप्त केला नाही, असा खुलासा आधी इंडस इंड बँकेने केला. तर आता जप्त केलेला जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये ठेवला जातो त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी ही हगवणेंची पोलखोल केलीये.

 Maharashtra News Live Updates : अवकाळीच्या मदतीचे वाटप सुरू, पहिल्या टप्प्यात 4. 23 कोटी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्णत्वाकडे असून आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास सातारा जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 4 कोटी 23 लाखांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा केले जाणार असून इतर नुकसानीचे महसूल विभागाकडून ज्या त्या तहसील कार्यालयाकडून पैसे दिले जाणार आहेत. सातारा जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये शेतीचे 2 हजार 484 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याचा 7 हजार 661 शेतकऱ्यांना फटका बसला होता.

सोलापूर रेल्वे स्थानकास सिद्धरामेश्वर यांचे नाव द्यावे

सोलापूर रेल्वे स्थानकाचे श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जागतिक लिंगायत महासभेने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांना दिले. रेल्वे स्टेशन नामकरण बरोबरच सोलापूर - दिल्ली नवी बसव सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, नियोजित टिकेकर वाडी टर्मिनल मंजुरी द्यावी, सोलापूर बंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, या मागण्या मान्य झाल्यास दळणवळण वाढून नागरिकांना फायदा होणार असल्याचेही या निवेदनात म्हंटलेय.

नागपूर - मुंबई थेट प्रवास आज पासून खुला होणार

नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास आज पासून करता येणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून म्हणजे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटा टप्पा इगतपुरी ते आमने असा 76 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

नागपूर ते मुंबई जलद प्रवासासाठी एमएसआरडीसी ने 701 किलोमीटर लांबीचा प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील 625 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. तर समृद्धी महामार्गाचा शेवटा टप्पा आज पासून इगतपुरी ते आमने मार्ग खुला झाल्यानंतर नागपूर हून निघालेल्या वाहनांना थेट मुंबई च्या वेशीवर आठ तासात पोहोचता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

अकरावी प्रवेशासाठी 26 मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी 3 जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर 5 पर्यंत वाढवण्यात आली, गुरुवार दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील.

Maharashtra News Live Updates : ज्योतिबा प्राधिकरणाचे आज अचानक उद्घाटन

जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ज्योतिबा प्राधिकरणाचा प्रारंभ अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र ज्योतिबा ग्रामस्थ, पुजारी आणि ग्रामपंचायतीला या प्रक्रियेत सामावून घेतले नसल्याने जोतिबा डोंगरावर मोठी नाराजी दिसून येत आहे. दरम्यान या संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी डोंगरावर आज दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. डोंगरावरील विकास कामांचे आराखडे तयार करताना ग्रामस्थांची मते विचारात घेतली नाहीत. त्यांच्याशी साधी चर्चा व संवाद साधलेला नाही। आराखडे तयार झाल्यानंतर त्याचे ग्रामस्थान समोर कोणत्याही प्रकारचे सादरीकरण केलेले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे.

गणपतीपुळे समुद्र समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत डॉल्फिन

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन पडलेला आढळला. किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये हा मृत डॉल्फिन पडलेला दिसला. त्यानंतर अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. या डॉल्फिनची लांबी चार फुटापर्यंत आहे. हा डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वन विभागाला कळवण्यात आली आहे. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात

गोंदिया येथून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याकडं येत असलेल्या गोंदिया आगाराच्या एसटी बसची समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक बसली. या भीषण अपघातानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोसळल्यानं या अपघातात ट्रॅक्टर चालकमालक असलेले लेकचंद उर्फ रोमन कापगते (५०) यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीच्या विर्शी फाट्यावर घडला.

सर्पमित्रांने दिले घोरपड आणि तिच्या 31 पिलांना जीवदान

निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या घोरपड व तिच्या 31 पिल्लांना जीवदान देण्यात दापोलीतील सर्पमित्र सुरेश खानविलकर ओम साळवी यांना यश आले आहे.दापोली गिम्हवणे येथे 20 ऑक्टोबर 2024 रोजी मानवी वस्तीत घोरपड असल्याचा कॉल सर्पमित्र सुरेश खानविलकर यांना आला होता ,घोरपडीला रेस्क्यू करत पकडण्यात यश आले मात्र या ठिकाणी घोरपडीची अंडी असल्याचे दिसून आले, घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सोडून देत, तिची 32 अंडी कृत्रिम हॅचरीत ठेवण्यात आली त्यातून तब्बल चार महिन्यानंतर 31 पिल्लं त्या अंड्यातून बाहेर पडली,तीच्या तब्बल 31 पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात सर्पमित्र सुरेश खानविलकर, ओम साळवे यांना यश आले आहे

परभणीत मे महिन्यात धो धो पाऊस

परभणी जिल्ह्यात मे महिन्यातच जोरदार पाऊस पडल्यामुळे शेती मधील मशागतीची काम थांबली होती आता जूनमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेली कामे हातात घेतली आहेत जिल्ह्यातील शेत शिवारात शेतकरी व्यस्त झाला असुन शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागती व शेतीची कामे करताना दिसत आहे.खरिप हंगाम तोंडावर असल्याने मशागतीची कामे उरकून पाऊस झाल्यावर लगेच पेरणीची लगबग ही असणार आहे परभणीतील शेतीत बळीराजा व्यस्त आहे याच शेती कामाचा आढावा आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी घेतला आहे

अंबरनाथमध्ये गॅसच्या गाडीतून सिलेंडर चोरले!

अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगरमध्ये दुपार chya सुमारास सिलेंडर पोहोचवण्यासाठी गॅसची गाडी आली होती. एका इमारतीबाहेर ही गाडी थांबवून गॅस कर्मचारी सिलेंडर पोहोचवण्यासाठी इमारतीत गेला. हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या गॅसच्या गाडीतून २ सिलेंडर चोरून नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस या सिलेंडर चोरांचा शोध घेत आहेत.

जालन्यातील परतुर पोलिसांनी चोरीच्या 14 दुचाकी केल्या जप्त

जालन्यातील परतूर पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 14 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींनी जालना, बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यातील दुचाकी चोरी केल्याचं देखील तपासात समोर आल आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून जवळपास 13 गुन्हे उघडकीस आले असून दुचाकीचोरीचे अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अमोल चव्हाण आणि अभिषेक धनवडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परतुर पोलीस करत आहे.

अमरावतीत आयपीएलच्या फायनल मॅच वर ऑनलाईन सट्टा...पोलिसांनी सहा आरोपींना केली अटक

अमरावती शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाने आयपीएलच्या फायनल मॅच वर ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक केली आहे.. त्यांच्याकडून 3 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडगे नगर व राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली... पंजाब आणि बेंगलोर मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात होता यादरम्यान प्रत्येक बॉलवर व कोण किती रन्स काढणार व कोण जिंकणार यावर सट्टा लावला जात होता, मात्र अमरावती शहर पोलिसांनी यात सहा आरोपीना अटक करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

अमरावती मनपाकडून 85 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण

अमरावती महानगरपालिकेद्वारे मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने अमरावती शहरातील 18 मोठे नाले आणि लहान 22 नाल्यांच्या सफाईचे कामे सध्या सुरू आहेत, सद्यस्थितीत 85 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून 15 टक्के काम अजून शिल्लक आहे,येत्या पंधरा दिवसात संपूर्ण शंभर टक्के नालेसफाई होईल असा दावा महानगरपालिकेने केला आहे... तर नालेसफाई केल्यानंतर नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा अथवा कुठली वस्तू टाकू नये असं आवाहन महानगरपालिकेने केल आहे

छत्रपती संभाजी राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून ४५ विभागांमध्ये प्रवेश प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ते ३० जूनच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. यंदाही प्रवेशासाठी 'सीईटी' होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी २००, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे. ५ ते ३० जून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंर नोंदणीची माहिती १ जुलै रोजी विभागांकडे सुपुर्द करण्यात येईलत्यानंतर, विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत संबंधित विभागांत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. १४ जुलै रोजी कागदपत्रांची छाननी पूर्ण होईल. १७ जुलै रोजी सर्व सामान्य गुणवत्ता यादी जाहीर होईल. आक्षेपासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, सुधारित गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर, २२ जुलै रोजी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैच्या दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

जालना जिल्ह्यातील 98 पाणी नमुने आढळले दूषित; जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली तपासणी...

जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत 98 पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. मे महिन्यात आरोग्य विभागाकडून 873 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 98 नमुने हे दूषित आढळून आले आले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे दूषित नमुने आढळून आले आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यात 27, तर बदनापूर तालुक्यात 24 पाण्याचे नमूने दुषित आढळून आल्यानं जिल्हा परिषदे आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

तुळजापुर ड्रग्स तस्करीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार,पोलिस तपासात ञुटी :खासदार ओमराजे निंबाळकर

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी आरोपीना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे.पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत असून आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिलीय.तपासात चुका असुन आरोपीना अभय दिले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहे.तुळजापूरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती डिसेंबर २०२३ मध्येच माहीती होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास १ वर्षे १ महिण्याचा कालावधी का लागला असा असा प्रश्न उपस्थित करत १ वर्षाच्या कालावधीत केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी आ.राणा पाटील त्यांनी पोलिसांना काही सांगितले नसल्याचा आरोप देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.

हातात तलवार घेऊन रिस बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी केली अटक

हातात तलवार घेऊन रिल्स बनून सोशल मीडियावर व्हायरल करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी येथील आलिम सलीम खा पठाण असं रिल्स बनवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हातात तलवार घेऊन या तरुणाने अनेक रिल्स बनवल्या.आणि ह्या रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या.लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तलवार देखील जप्त केली आहे. या तरुणावर बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सुनीता जामगडे हिच्या मोबाईलमध्ये आढळले दोन संशयित पाकिस्तानी ॲप

- ‘एनआयए’च्या पथकाने मागीतले सुनीता जामगडे प्रकरणाचे संपूर्ण तपशील

- सुनीताच्या मोबाईलमध्ये ते अँप पाकिस्तानी एजन्सीजने डाऊनलोड केले का? याची सखोल फॅारेन्सीक चौकशी सुरु, अहवालाची प्रतीक्षा

- १४ मे रोजी सुनीता जामगडे पाकिस्तानात गेली होती.

- एलओसी पार केल्यानंतर सुनीताला एका पाकिस्तानी नागरिकाने लिफ्ट दिल्याची माहिती..

- प्रोडक्शन वॅारंट निघाल्यानंतर कारगील पोलीस तिला घेऊन जाणार आणि चौकशी करणार

- काल न्यायालयाने तांत्रिक कारणाने कारगिल पोलिसांना प्रोडक्शन वॉरंट नाकारला होता...आज कारगिल पोलिसांना प्रोडक्शन वॉरंट मिळणार का याकडे लक्ष लागले आहे

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरांचे निलंबन

छत्रपती संभाजी नगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरांचे निलंबन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी खिरोळकरच्या निलंबनाचे आदेश जारी करतानाच त्यांना निलंबन काळात मुख्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय राहणार असून जालना जिल्हाधिकारी यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशात म्हटले आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अहवालानुसार निवासीउपजिल्हाधिकारी विनोद गोंडूराव खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप मधुकरराव त्रिभुवन यांना २७ मे रोजी रात्री ११.४७ वाजता अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता १ जूनपर्यंतपोलीस कोठडी देण्यात आली होती. त्या दोघांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्ग लगत तलवारींचा साठा जप्त

अवैधरित्या तलवारींचा साठा घेऊन समृद्धी महामार्गलगत असलेल्या शेवगा शिवारात एक संशयित थांबण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत आरोपी उदयसिंग उर्फ विकी बहुरे याला अटक केली त्याच्या ताब्यातून दहा तलवारी जप्त करण्यात आले आहे. या तलवारी तो कुठे नेऊन जात होता, कशासाठी नेऊन जात होता .याचा तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com