
नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घराला आग लागलीय. आग लागली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळलीय. अग्निशमन दलाच्या टीमला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाला भेट दिलीय. त्याआधी मुलुंड येथील स्नेह मिलन आणि वार्षिक पूजेसाठी देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून रवाना होत मुलुंड या ठिकाणी एका खासगी कार्यक्रमात हजेरी लावली. नंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी फडवणीस शिंदे यांच्या ठाण्यातील घरी जाऊ शकतात.
शंकर नगर चौकात लागलेलं हे बॅनर लक्ष वेधून घेत आहे."वापस आना पडता है फिर वापस आना पडता है ' पत्थर की बंदिश से भी क्या बहती नदिया रुकती है.
हालातो की धमकी से क्या अपनी नजरे झुकती है
किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखना पडता है
जिसमे मशाल साजबा हो वो दीप जलाना पडता है वापस आना पडता है
फिर वापस आना पडता है, फिर वापस आना पड़ता है
हिंदी भाषेत लिहिलेल्या ओळीचे या होर्डिंगने नागपुरकरंच लक्ष वेधून घेतलंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाटा दरम्यान साधरण तीन किलो मिटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालीय.
मराठा आरक्षणासाठी इथून पुढचे सामुहीक आंदोलन मुंबई येथे होणार असुन सरकार कुणाचे ही असो मुडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय.
पवार गटाच्या आमदारांची बैठक झाली. गटनेते म्हणून जितेन्द्र आव्हाड यांची निवड झाली. मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटिल यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नेमणूक झाली.
तीन दिवस दरे येथे मुक्काम केल्यानंतर मुंबईकडं निघाले. तब्येत बरी नसल्यानं दोन दिवस कोणालाही भेटले नव्हते. आज ग्रामदैवताच दर्शन घेऊन आज लोकांना भेटले. तीन दिवसाच्या अचानक दौऱ्यामुळं अनेक तर्कवितर्क काढण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कसबा बावडा परिसरात झळकले बॅनर्स
कोल्हापूर दक्षिण मधून काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांचा पराभव आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना आलेलं अपयश यावरून झाली होती राज्यभर चर्चा
विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे बॅनर्स कसबा बावडा परिसरात झळकले
सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांचे फोटो असलेले बॅनर्स संपूर्ण बावडा परिसरात झळकले
शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्याविरोधात आदिवासी संघटना आक्रमक
महिलेच्या विनयभंग मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाजात प्रचंड संताप.....
आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात मोलगी गावात काढण्यात आला निषेध मोर्चा....
पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो महिला उतरल्या रस्त्यावर.....
आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात घोषणाबाजी....
हातात काळे फिती काळे झेंडे घेत व्यक्त केला रोष....
महिलेला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी.....
- बार्शी शहरात धाडसी चोरी, एटीएम फोडून लंपास केली मोठी रक्कम..
- बार्शी शहरातील परांडा रोडवरील एसबीआय एटीएम फोडून 23 लाख रुपयांची रक्कम केली पोबारा
- रविवारी पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास एसबीआय बँक एटीएमचे शटर तोडून एटीएम फोडण्याचे घटना
- एटीएमच्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेजवर चोरट्यांकडून मारण्यात आला स्प्रे
- शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी घटना घडल्यामुळे बार्शी शहरात उडाली खळबळ
- बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेडच्या सिडको एमआयडीसी भागात तिरुमल्ला ऑइल इंडस्ट्रीजला लागली आग.
आगीत कंपनीच्या मालकासह पाच जण गंभीर जखमी.
आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती.
माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ काम केले नाही
केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप ..
आमदार. संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने जाळण्यात आली ईव्हीएम मशीनची प्रतिकृती ..
तहसील कार्यालयासमोर हजारो कार्यकर्त्यांसह evm मशीनचे करण्यात आले दहन...
आमदार रोहित पवार, प्रताप ढाकणे, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले पाथर्डी तहसील कार्यालयासमोर evm विरोधात आंदोलन..
Evm विरोधातील राज्यातील अहिल्यानगर मध्ये पहिलेच आंदोलन..
विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात बुलढाणा मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला. मात्र हा काठावरील विजय त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसतंय. त्यांनी आपल्याच पक्षातील नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना माझ्याशी त्यांनी गद्दारी केल्याचं म्हटलंय. इतकंच काय तर प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर तर भाजपा चे आमदार संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून हा सर्व कट केला, असा गौप्यस्फोट केल्याने शिवसेनेत आता वाद उफाळून आल्याचं चित्र आहे.
एकीकडे नाशिक शहरात सुहास कांदे नाशिकचे पालकमंत्री व्हावे यासाठी नाशिकमध्ये होल्डिंग लावण्यात आले आहे, तर दुसरीकडे, छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उद्या नाशिकमध्ये मृत्युंजय महादेव मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महायुतीतील तिन्ही पक्षांकडून दावा आणि दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महायुतीच्या 15 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय झाला असून नाशिक मधील सर्वाधिक चर्चेतील लढत मानली जाणारी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ ही पाहायला मिळाली. नाशिक मध्ये कांदे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष युतीत असतानाही नाशिककरांनी बघितला. नांदगाव मधून सुहास कांदे 90 हजारांच्या फरकाने निवडून आल्यानंतर आता सुहास कांदे यांचा नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री असा बॅनर नाशिक मध्ये पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव देखील अग्रस्थानी असून भुजबळांना शह देण्यासाठी कांदे समर्थकांकडून सुहास कांदे यांचा भावी पालकमंत्री असा बॅनर लावला असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.
२००५ मध्ये शिवसेना सोडलेल्या नारायण राणे यांची सभा उधळल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता
शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर, बाळा नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी यांची शनिवारी निर्दोष मुक्तता
घटनेच्या १९ वर्षांनंतर आला निकाल
नांदेड शहरा लगत असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील कंपनीला आग लागली.कंपनीत काही कामगार काम करीत होते.कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु आगीच्या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत.अद्याप या आगीचे कारण समजू शकले नाही.आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर या परिसरात पसरले.या घटनेने एमआयडीसी परिसरात एकाच धावपळ उडाली.
विधानसभा निवडणुकीच्यानंतर पुन्हा एकदा मनाेज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचा एल्गार पुकारणार असल्याचे जाहीर केले हाेते. यावेळी आपण एकटेच नाही तर माेठ्या संख्येने मराठा समाज आंतरवाली सराटीत आमरण उपाेषणाला बसणार असल्याचेही म्हटले हाेते.हे आंदाेलन सुरू करण्यापूर्वी आज म्हणजे 1 डिसेंबर राेजी मनाेज जरांगे पाटील तुळजापूर आणि पंढरपूरला दर्शनासाठी रवाना झाले आहेत. बीडमध्ये जातांना त्यांच्यासोबत मोठा ताफा असल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी जरांगे पाटलांचे बीडमध्ये काही मराठा बांधवांनी स्वागत देखील केले..दरम्यान त्यानंतर त्यांच्यासाेबत माेठा ताफा हा तुळजापूरकडे रवाना झाला असून या दर्शनानंतर जरांगे पाटील आंदाेलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.
शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा खोटा असल्याने अक्कलकुवा आणि खापर या गावात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. आमदार आमच्या पाडवी आणि भाजपाचे पंचायत समिती सदस्य सुधीर पालवी यांच्या त विकास कामांवरून वादविवाद सुरू होता मात्र आमश्या पाडवी यांनी पंचायत समिती सदस्य यांच्यावर आणि त्यांच्या बहिणीवर मारहाण करत विनयभंग केले असल्याच्या तक्रार देण्यात आली होती तर हा गुन्हा खोटा दाखल केला असून या गुन्हेच्या निषेधार्थ अक्कलकुवा आणि खापर गावातील आस्थापना बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
लातूरच्या एका नामांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याने 30 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे.. पाहुण्यासारखे येऊन साखरपुड्याच्या कार्यक्रमात आणलेली सोन्याची बॅग घेऊन चोरटा पसार झाला आहे.. तर ही सगळी घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.. दरम्यान पोलीस या व्हिडिओच्या आधारे चोरचा तपास घेत आहेत..
एसटीमध्ये भाडे वाढ करणे गरजेचे आहे. त्याशिवाय महामंडळ चालू शकत नाही. डिझेलसह कामगारांचा पगार वाढलेला आहे. वारंवार मागणी केलेली सरकार कानाडोळा करत आहे. मात्र एसटी महामंडळाला निधी दिला नाही तर महामंडळ वाचणार नाही. याशिवाय नव्या परिवहन मंत्र्यांच्या समोर महामंडळ संभाळण्याचे मोठे आव्हाण असल्याची प्रतिक्रिया श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे.
रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेला बीड जिल्हा आता बाजारपेठेसाठी ही प्रसिद्ध होऊ लागलाय.. बीडच्या बाजार समितीने सुरू केलेल्या रेशीम खरेदी केंद्रामुळे आता राज्यभरातील शेतकरी या ठिकाणी दाखल होत आहेत. रेशीम खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी या ठिकाणी येत असल्याने भाव चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .. गत दोन महिन्यात या ठिकाणी 14 कोटी रुपयांच्या रेशीमची विक्री शेतकऱ्यांनी केलीय. यामुळे शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे जात असल्याच पाहायला मिळत आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या जालना वडीगोद्री महामार्गावर पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क मातीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येत आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढ उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे एक हजार रूपयाची घसरण झाली आहे. जिल्ह्यात काही दिवसापुर्वी कापसाला 7 हजार 500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कापसाला 6 हजार 500 रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.क्विंटल मागे एक हजार रूपयांची घसरण झाल्याने कापुस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील हेदेखील आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली.
जिल्ह्यात मागिल काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. याचाच फटका आता रब्बी हंगामातील अनेक पिकांना बसताना दिसत आहे. ऊस पिकावर देखील रोगांचा प्रादृर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. ऊस लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच वाढलेल्या थंडीने ऊसाच्या कवळ्या पानावर रोगाचा प्रदृर्भाव होण्यास सुरूवात झाल्याने याचा फटका आता ऊस उत्पादक शेतक-यांना बसण्याची शक्यता आहे.ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबियांना शुल्लक कारणावरून करण्यात आली मारहाण.
सीआयएसएफ च्या 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण.
सीआयएसएफ च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक डावीकडे बस वळवल्याचा जाब विचारल्याने परब कुटुंबियांना 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण.
शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहना मधील इतरांना करण्यात आली मारहाण.
परब कुटुंबियांना करण्यात आलेल्या मारहाणी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येतोय.नवी मुंबई
खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबियांना शुल्लक कारणावरून करण्यात आली मारहाण.
सीआयएसएफ च्या 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण.
सीआयएसएफ च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक डावीकडे बस वळवल्याचा जाब विचारल्याने परब कुटुंबियांना 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण.
शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहना मधील इतरांना करण्यात आली मारहाण.
परब कुटुंबियांना करण्यात आलेल्या मारहाणी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येतोय.
सांगली... उरुसात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ.. 20 ते 25 भाविकांच्या वर हल्ला करून लचके तोडल्याची घटना.
EVM हॅक होऊ शकत नाही, वायफायला आणि ब्लू टूथला कनेक्ट होऊ शकत नाही... एस चोकलिंगम यांचा दावा
कोणतेही अतिरिक्त मतदान मोठे नाही .. परळीत काही लोकांनी गोंधळ घातला आणि पोलिसांनीही यावेळी चोख प्रत्युत्तर दिले.
हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे, 12 सेल्सी अंशाच्या खाली पारा घसरल्याने हिंगोली शहरात नागरिकांनी अंगात भरलेली थंडीची हुडहुडी काढण्यासाठी चक्क चहाचे ठेले, उबदार कपड्यांची दुकाने आणि शेकोटी असलेली ठिकाणे गाठल्याच पाहायला मिळाला, सायंकाळी पाच वाजता सुरू होणारी गुलाबी थंडी सकाळी दहा वाजे पर्यंत कायम राहत असल्याने सर्व सामान्यांच्या दैनंदिन कामकाजावर देखील परिणाम झाला आहे
मराठवाड्यात पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत, पाच महिन्यांपासून पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेल्या पेरूच्या बागांवर अचानक आसमानी संकटाने आक्रमण केल्याने तोडणी ला आलेले पेरू नष्ट होत आहेत, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो पेरूच्या बागांवर अळ्या निर्मिती झाल्याने पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत, या संकटामुळे तोडणीला आलेले पेरू बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्याऐवजी शेतातच फेकून द्यावे लागत असल्याचे चित्र आहे
युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते. पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दुपारी घेणार बाबा आढाव याची भेट
पुण्यातील बिबवेवाडी अरोरा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार
बाबा आढाव यांनी गेले तीन दिवस पुण्यातील फुलेवाडा येथे आत्मक्लेष आंदोलन केले आहे.काल सायंकाळी त्यांनी आंदोलन थांबवलं.
काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,जयंत पाटील,संजय राऊत यांनी बाबा आढाव यांची आंदोलन स्थळी घेतली होती भेट
Dhule weather News Update : धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे, आज देखील धुळ्यात 6.1 सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात तापमानामध्ये प्रचंड घट झाल्याचे बघावयास मिळाले आहे,
थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नागरिक गरम व उबदार कपड्यांचा आधार घेत असल्याचे दिसून येत असून, मॉरणींग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देश भरातुन भाविक येत असतात अनेक भाविक देवीला दान करत अर्पण करत असतात.परभणी येथील भाविक जयश्री रमेशराव देशमुख यांनी तुळजाभवानी चरणी ११ तोळ्याची मोहनमाळ अर्पण केली असुन मंदीर संस्थानच्या वतीने भाविकांच्या सूलभ दर्शनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पाश्र्वभूमीवर तुळजाभवानी चरणी भाविक भरभरून दाण अर्पण करत आहेत दरम्यान देशमुख कुटुंबीयांनी देवीला सोन्याची मोहनमाळ अर्पण केली तर यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने देशमुख कुटुंबीयांचा देवीची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल वाढू लागली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात थंडीने नागरिकांना हुडहुडी भरू लागल्याचे दिसत आहे. रात्रीच्या तापमानात दिवसागणिक घट होत असून हवेतील गारवा वाढू लागल्यामुळे ऊबदार कपड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी रात्री व पहाटेच्या सुमारास शेकोट्या पेटत आहेत. थंडीची हुडहुडी घालविण्यासाठी नागरिक शेकोट्यांभोवती गोलाकार बसून, शेकोटीचा आधार घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. अशात थंडीमुळे महामार्ग सुद्धा निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे.
हेल्मेट न घालता सरकारी कार्यालयात येणाऱ्या वाहनचालकांवरही उद्यापासून कारवाई करण्यात येणार
आरटीओचा निर्णय २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दंड.
पुणे,पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह,ग्रामीण भागातील हेल्मेट परिधान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) २०० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.
आता सोमवारपासून सरकारी कार्यालयांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
- बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदुंवरील अत्याचारच्या विरोधात नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले....
- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कडून बामगलादेशछटा घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
- चिन्मयानंद दास स्वामीजी महाराजसह 17 जणांवर राजद्रोहचां आरोप लावर तुरुंगात टाकले.
- या घटनेसह बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंचे घर, मंदिर जाळण्याचा प्रयत्न होत आहे.
- हे त्याच्या थांबविण्यात यावे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबावे अन्यथा याचे तीव्र पडसाद भारतातही दिसते हा इशाराही देण्यात आला.
बेलापूर मध्ये परदेशी नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. इंडोनेशिया मध्ये जॉब लावण्याच्या बहाण्याने तरुणांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन कंपनीला टाळे लावून चार जण फरार झाले आहेत. 50 पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक करण्यात आली असून बेलापूर पोलिसांतर्फे याप्रकरणाची दखल घेत अधिक तपास करण्यात येतोय.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. त्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदेही रात्री दरे येथे दाखल झाले आहेत. आज ते मुंबईला जाण्याची शक्यता आहे.
आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बैठकीचे दुपारी ३ वाजता आयोजन
उद्याच्या बैठकीत गटनेता, विधीमंडळ पक्ष नेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता
पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक
कात्रज चौकातील वाहतूकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. अवजड वाहनांना चौकात बंदी
भोर तालुक्यातील डोंगरी भाग असलेल्या वाढाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात खोंडाचा मृत्यू, खोंड शेतात चरत असताना बिबट्याचा हल्ला.. वाढण्यातली आठवडाभरातली ही दुसरी घटना
गाईच्या खोंडाचा मृत्यू झाल्यानं शेतकरी राजेंद्र गुलाब बोडके यांच आर्थिक नुकसान, वनखात्याने पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, गावकऱ्यांची मागणी
बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले, गेल्या काही दिवसात परिसरातील जवळपासं 10 हून अधिक पाळीव प्राण्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
राजगडमधल्या अडवली, करंजावणे गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या
रात्रीच्या 11 ते 2 वाजे दरम्यान काल पुन्हा एकदा 4 ते 5 ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळालं.. याआधीही 3-4 महिन्यांपूर्वी अशाच घिरट्या या परिसरात ड्रोन घालत असल्याचं पाहायला मिळाल होतं..
ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसताच नागरीकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात या ड्रोनच्या घिरट्या कैद केल्यात..
रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या या ड्रोनचा तपास अद्याप पोलिसांनाही लागलेला नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम..
उडवण्यात येणाऱ्या या ड्रोनमुळं अद्याप कुठलाही अनुचित प्रकार समोर आलेला नाहीय..मात्र ड्रोन नक्की कोण उडवतयं?.. त्यामागचा उद्देश कायं?.. याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी नागरिकांची मागणी..
chikungunya symptoms : सातत्याने बदलणाऱया वातावरणात डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात झाल्याने यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्यात आतापर्यंत ५ हजार ४४५ चिकुनगुनिया बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तीन ते साडेतीनपटीने वाढली आहे.तर मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद यावर्षी झाली आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असून, शनिवारी एनडीए परिसरात 8.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. तापमानाचा पारा खाली आल्याने पुणेकर गारठले.
थंडीपासून बचाव करण्यासाठी ,रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्या पेटवण्यात येतायत. पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळं गायब झालेल्या थंडीचा कडका,मागील चार दिवसांपासून पुन्हा वाढलाय.त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी ,रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्या पेटवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तापमानाचा पारा घसरल्यानंतर नागरिकांनी उबदार कपडे घालायला सुरुवात केलीय..
थंडीचा जोर वाढल्याने उल्हासनगर,अंबरनाथ परिसरातील सर्व भागात थंडीमुळे हूडहूडी भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक चौकात शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे. अचानक चार-पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने पहाटे, रात्री तर दिवसभर थंडीचा गारवा वाढला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदलाने शितलहर कायम आहे. त्यामुळे उल्हासनगर,अंबरनाथ येथील नागरिक थंडीने गारठले आहेत तर कमाल आणि किमान तपमानात कमालीची घट झाल्यामुळे नागरिक शेकोट्या चा आनंद घेत असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. हवामानातील या बदलामुळे अनेक लोकांना सांधेदुखी, श्वसन विकाराचे त्रासदेखील होत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याने महायुती विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आली. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार याची चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एक हाती सत्ता मिळाली हा निकाल पाहता गेल्या काही वर्षांपासून रखडून पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीची वाट पाहणाऱ्या सर्व इच्छुकांच्या अशा पल्लवीत झाल्याची यवतमाळ जिल्ह्यात दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरात 318 अपघात झाले असून यात तब्बल 351 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद यवतमाळ वाहतूक प्रशासनाकडे करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर तुळजापूर आणि दिल्ली ते कन्याकुमारी असे दोन राष्ट्रीय महामार्ग जाताहेत.यावरून प्रवास करतांना वाहनचलक सर्रास वाहतुकीचे नियम डावलून प्रवास करित असल्याने वर्षभरात 351 जणांना अपघात जीव गमवावा लागलाय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज देवदर्शनासाठी तुळजापूर आणि पंढरपूरला जाणार आहेत. सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ते आंतरवाली सराटीतून तुळजापूरच्या दिशेने रवाना होतील. दरम्यान नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषण करणार आहे. त्यापूर्वी जरांगे पाटील तुळजाभवानी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जात आहे.
धाराशिव च्या भुम येथे मोबाईल दुकान फोडुन चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.आरोपीकडुन 5 लाख 36 हजार रुपयांचे 25 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत गुन्हे शाखेकडुन तांञिक विश्लेषणाच्या आधारे काही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव,भुम,मोहा, ढोकी,माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत होते दरम्यान पथकाने शोध घेतला असता भुम तालुक्यातील गोलेगाव व ढोकी येथील दोघांनी मिळून भुम शहरातील मोबाईल शॉपीचे शटर तोडुन चोरी केल्याची उघडकीस आले दरम्यान पुढील कारवाईसाठी दोन आरोपींना चोरीच्या फोनसह भुम पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आ
अमरावती जिल्ह्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे,वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे,सध्या अमरावती जिल्ह्याचा पारा 12अंशापर्यंत खाली आला आहे. तर विदर्भाच नंदनवन असलेल्या मेळघाटात आठ ते नऊ अंशापर्यंत परत खाली घसरला आहे ही थंडी हरभरा व गहू पिकांसाठी फायद्यासाठी आहे मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी ही थंडी घातक असल्याचा सांगण्यात आलं आहे,ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या असून सकाळी उबदार कपडे,स्वेटर व मपरेल घालून लोक घराबाहेर पडले आहे,तर सकाळी व्यायाम करणाऱ्या मंडळीचा उत्साह कुठेहिं कमी झालेला नाही, ते उबदार कपडे घालून व्यायाम करताना दिसून येत आहे, व्यायाम केल्याने शरीरात एनर्जी येते त्यामुळे शरिरातील थंडी कमी होते अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकानी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील रुख्मिणीचे माहेर घर असलेल्या कौडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रात नयनरम्य अशा बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचे विहंगमय दृश्य कौडण्यपूर च्या वर्धा नदीपात्रात पाहायला मिळाले. फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखाउपक्रम आयोजित करण्यात आला असून या बोटिंग स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला
धाराशिव - तुळजापूर - सोलापुर रेल्वेमार्गाच्या कामाला आता मोठी गती आली असुन धाराशिव - तुळजापूर या पहील्या टप्प्यातील ३० किलोमीटर कामापैकी साधारणपणे ८ किलोमीटर अंतराचे काम वेगात सुरू आहे जवळपास २५ टक्के काम पुर्णत्वाकडे आले असुन या मार्गावर एकुण लहान मोठे एकुण ५० पुल असणार आहेत.त्यापैकी सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मिटर लांबीचा सर्वात मोठा पुल सरकारला जात आहे तर पहिल्या टप्प्यातील २५ टक्के काम पुर्णत्वाच्या दिशेने आले आहे.सध्या तीन टप्प्यात काम सुरू असुन त्यानुसार खोदकाम,भराव आणि पुलाच्या कामांना हाती घेण्यात आले आहे.
Maharashtra Breaking Live Marathi Headlines : बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावात रात्री टिपू सुलतान जयंती मिरवणुकी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात वाद निर्माण झाला. दगडफेक व जाळपोळीत झालं... मोठ्या प्रमाणात धाड शहरात दगडफेक झाल्याने अनेक नागरिक जखमी झाले तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अनेक वाहनांची जाळपोळ ही करण्यात आली. जवळपास दोन तास हा राडा सुरू होता..
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्रीपर्यंत ताप आला होता. दरे येथील निवासस्थानी उपचार झाले. आज दुपारनंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.