Maharashtra News Live Updates: खडसेंची आणि माझी नार्कोटेस करा - महाजन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 28 september 2024: आज गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
खडसेंची आणि माझी नार्कोटेस करा. खरं ते समोर येईल. नेहमी भाषणात माझा विषय असतो. सारखं सीडी आहे, डिलीट झाली. माझा भाजपात प्रवेश झाला पण फोटो मिळत नाही.
गिरीश महाजन

Latur News : महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे महावितरण च्या कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे... कनिष्ठ अभियंता अमोल सूर्यवंशी हे आपल्या कार्यालयात काम करत होते , दरम्यान यावेळी कृष्णा जाधव या युवकाने.. शेतात लाईटचे पोल झुकला आहे.. त्याची काम कधी करणार. यावर जाब विचारत मारहाण केली आहे... तर या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या युवका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे..

Sangli News : संजयकाका पाटलांची,रोहित पाटलांवर टीका  

भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांवर जोरदार टीका केली आहे कवठेमंकाळ मधल्या राड्याप्रकरणी रोहित पाटलांकडून घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत, राजकीय हेतूने रोहित पाटलांनी पोलिसांच्यावर दबाव आणून आपल्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप देखील संजयकाका पाटलांनी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष यांना संजयकाका पाटलांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्या समोर आंदोलन केलं होतं,त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, यावर संजयकाका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Kolhapur News: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा आज शुभारंभ, ८०० लाभार्थी अयोध्येला रवाना

कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी होणार अयोध्येला रवाना.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्स्प्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते संपन्न

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर फक्त ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत,  प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

- दररोज लाखो प्रवासी प्रवास करणार्या पुणे रेल्वे स्थानकावर केवळ ७४ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत.

- अवाढव्य पुणे स्थानकावर फक्त एकूण १२० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

- ⁠यापैकी ७४ कॅमेरे सध्या पुणे रेल्वे स्थानकात कार्यरत.

- ⁠प्रवासी आणि रेल्वे स्थानकाचा आकार यातुलनेत सीसीटीव्हीची संख्या अपुरी.

- ⁠त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ⁠

Mumbai News: आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?: प्रवीण दरेकर

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं सामना अग्रलेखाला चोख प्रत्युत्तर

आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?

देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू, तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी ते ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी सक्षम

‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल?

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा संजय राऊत यांना सवाल

Tirupati Prasad: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी.

सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी दाखल केल्या होत्या याचिका.

लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी

नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी.

आणखीन १० विद्यार्थीनी केल्या तक्रारी.

विनयभंगाच्या आरोपानंतर सहाय्यक प्राध्यापकाला करण्यात आल होत निलंबित.

चौकशी समितीसमोर करण्यात आल्या तक्रारी.

प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com