
वैयक्तिक भांडणातून एकाला चाकुने भोकसले आहे. आदिवासी समाजाकडून लातूर बार्शी रोडवर चक्काजाम आंदोलन केले आहे. महामार्ग जाम केल्याने वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा,पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तडवळा गावात तणावाचे वातावरण, पोलिसांकडून रोडवरील जमाव पांगवण्याचे प्रयत्न केले जात आहे. आदिवासी समुदाय आक्रमक, महिला मुला बाळासह महामार्ग जाम केला आहे.
न्यायालयाने ज्या अटी शर्तीवर विशाल गवळीला जामीन दिला होता, त्या अटी शर्ती न पाळता आरोपी गुन्हे करत असल्याने त्यांच्या सर्वच गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी कल्याण कोळसेवाडी पोलीस न्यायालयाला पत्र देणार आहे.
बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसलीय. कराड तालुक्यातील येणपे येथे हा अपघात झालाय. महिनाभरापासून अनेक शेतकऱ्यांना आढळून येत होता. बिबट्या जखमी अवस्थेत असून तो अद्यापही रस्त्यावर पडून आहे.
वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने, मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध २९-१२-२०२४ ते ०२-०१-२०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील.
जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. रूपाली ठोंबरे यांनी स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही तक्रार दाखल केलीय.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत. फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश फडणवीस यांनी सीआयडीच्या पथकाला दिले आहेत.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली आहे शनिवार सुट्टी असल्याने भाविकांच्या सकाळपासूनच जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या लग्नसराई सुरू असल्याने नवदांपत्येही जेजुरी दर्शनासाठी येत असल्याने भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरात पावसाच्या सरी कोसळल्या.
लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, धुळ्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये हा लाडक्या बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, परंतु लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीपूर्वी जिंकून आल्यानंतर 2100 रुपये आपल्या खात्यावरती जमा होतील असे आश्वासन तत्कालीन शिंदे सरकारने दिले होते,
परंतु निवडणुकीनंतर विजय प्राप्त झाला परंतु या विजयानंतरचा पहिला हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये इतकाच जमा झाला आहे, त्यामुळे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून सुरू होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना कायम असल्याचे दिसून येत आहे.
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
- राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर बसस्थानकाला घाणीचा विळखा
- बस स्थानकात असणाऱ्या अपुऱ्या, घाणेरड्या स्वच्छ्तागृहामुळे प्रत्येक प्रवाशावर उघड्यावरच लघुशंका करण्याची वेळ
- स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्याने लाडक्या बहिणींचे देखील हाल
- नवीन वर्षाला १ जानेवारी रोजी 'हनुमान चालीसा' या स्तोत्राचे सामूहिक पठन
- श्रीराम शोभायात्रा समिती, श्रीराम मंदिर देवस्थानचा कार्यक्रम
- यावर्षी सुमारे ३०० मंदिरांत या कार्यक्रमासाठी संपर्क करणार
- १ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजता दरम्यान हनुमान चालीसा या स्तोत्राचे किमान ५ व अधिकाधिक ११ वेळा सामूहिक पठन
- दरवर्षी या आयोजनाला वाढत आहे प्रतिसाद
जुन्या पुणे - मुंबई-महामार्गावरील भक्ती-शक्ती चौकात डंपर पलटी झालाय. दुमजली पुलावर हा अपघात काहीवेळापूर्वी झालाय. यामुळं पिंपरी चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळील वाहतूक विस्कळीत झालीये. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यानं कोंडी टळलेली आहे. डंपरमधील वाळू मार्गावर कोसळलेली असून ती बाजूला घेऊन मार्ग खुला करण्याचे प्रयत्न सुरुयेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
- 01 जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिनानिमीत्त भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला भेट देऊन पाहणी करणार
- पुण्यातील सामाजिक न्याय विभागाच्या होस्टेलची पहाणी करणार
- बार्टी संस्थेला संजय शिरसाट भेट देणार
- त्यानंतर दुपारी 01 वाजता बार्टी येथे माध्यमांशी संवाद साधणार
बारामती तालुक्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यातील लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकेमध्ये जमा होऊ लागल्याने महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अल्पावधीत लाडकी बहिण योजना ही लोकप्रिय झाली असून या योजनेचा फायदा महिला वर्गाला होत आहे.
- येत्या 30 तारखेला सोलापूर जिल्ह्यात साजरा केला जाणार वेळअमावस्या सण
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना असणार सुट्टी
- वेळअमावस्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर एपीएमसी मार्केट ही असणारे आहे बंद
- त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन सोलापूर एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे
इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा अवघ्या तीन महिन्यावर, मात्र इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान...
शाळेमध्ये पालकांनी वारंवार तक्रार करूनही शाळा व्यवस्थापकाकडून कोणतीही कारवाई नाही...
शिक्षक नसल्याने पालकांनी संताप व्यक्त करत गाठले शिक्षणाधिकारी कार्यालय,जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन
आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण पालकांनी केले प्रश्न उपस्थित
विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध न झाल्यास पालकांनी दिला उपोषणाचा इशारा
आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहर गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.....
काल सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पादनात मोठी घट.....
एकदा गळून पडलेला मोहोर पुन्हा येत नसल्याने आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरी संकटात.....
अक्राणी तालुक्यात कैरीवर प्रक्रिया करून तयार केले जाते आमचुल.....
आंब्याचे मोर घडून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचा नुकसान....
वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या दोन्ही शाखा दिग्रस पोलिसांनी रात्री सील केल्या आहेत. मानोरा बँकेत 1 कोटी 53 लाख आणि कारंजा शाखेत 96 लाखांचा घोटाळा झाल्याची तक्रार होती. या जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या एकूण 7 शाखा असून त्यात 44 कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता असून मागील 8 डिसेंबर पासून काही संचालक फरार आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस करत आहेत.
अमरावती जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वेचणीला आणलेला कापूस पूर्ण ओला झालेला आहे..पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी देखील खराब झल्याने त्याला भाव देखील कमी मिळणार असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे..सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी घेऊन आलेल्या एसटी बसचा देवगड कुणकेश्वर खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला. चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाईपलाईनला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. एसटी नळयोजनेच्या पाईप लाईनला धडकल्याने पाईपलाईन फुटून पाणी रस्त्यावर आले त्यामुळे देवगड जामसंडे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. बस मध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. अपघाताची माहिती समजतात स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला अजूनही उसाची पहिली उचल जाहीर केली नाही त्यामुळे प्रांत अधिकारी यांनी ऊस दाराची कोंडी फोडावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येचे पडसाद तिसऱ्या दिवशी राजगुरुनगर शहरात पडत असुन आज खेड तालुका बंदची हाक देण्यात आलीय...
राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही निषेधार्थ पडसाद उमटत असुन राजगुरुनगर शहरील बाजारपेठांसह सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आलीय..
जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येत तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे पीक विम्याच्या मागणीसाठी धडक दिली.
त्यामध्ये २०२३ या मागील वर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाऊस पडल्याने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन-कापूस पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पिक-विमा मिळण्यापासुन अजुनही वंचित आहेत.
पिकविम्या पासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा मिळावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणारा असून त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कंधार आणि लोहा तालुक्यातून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कंधार आगारातून माळेगाव यात्रेसाठी भाविकासाठी 35 जादा एसटी बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती कंधार आगार प्रमुख अभिजीत वाडवे यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये जागा नाही....!" असं कारण देत राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - नागपूर बस क्रमांक 5924 या बसच्या वाहकाने दिव्यांग व्यक्तीला बसमधून ढकलून दिल्याने दिव्यांग व्यक्ती पडून जखमी झाला आहे. काल सायंकाळी मलकापूर स्थानकावरून अनिल साबे नामक दिव्यांग व्यक्तींल नांदुरा येथे बस मधून जायचं होतं. वास्तविकता दिव्यांग व्यक्तींसाठी बसमध्ये राखीव जागा असतात मात्र बस मध्ये जागा नसल्याचे कारण देत बसच्या वाहकाने अनिल साबे यांना दरवाजातूनच बाहेर ढकलून देत बस चा दरवाजा बंद करून घेतला. यात बसच्या दरवाज्यातून पडून अनिल साबे हे जखमी झाले.
बुलढाणा तालुक्यातील देवपूर येथे पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करावे, या मागणीसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हे गावातील जलकुंभावर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे...
गावातील ५५ फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढत सरपंचपतीसह ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन सुरू केले होते. गत दोन वर्षांपासून गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे आले. जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका सरपंच सदस्य यांनी घेतली आहे... या आंदोलनात आस्तिक वारे, सुनील नरोटे, रघुनाथ नरोटे, हरिष कांबळे, किरण दुतोंडे, दशरथ नरोटे, भगवान धनवटे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सज्ज झाली असून भाविकांच्या गर्दीने अवघी शिर्डी दुमदुमून गेलीये.. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने नविन वार्षिक दैनंदिनी, पॉकेट डायरी, कॅलेंडर, थ्री - डी कॅलेंडर आदी प्रकाशने नुकतीच प्रकाशित केलीये.. ही आकर्षक प्रकाशने अल्प दरात उपलब्ध होत असल्याने भाविकांच्या पसंतीला उतरली आहेत.. संस्थानने साई मंदिर परिसरात ठिक ठिकाणी विक्री स्टॉल लावले असून भाविकांनी सुद्धा डायरी आणि कॅलेंडर खरेदीला पसंती दिल्याचे बघायला मिळतंय..
परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आता वडार समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल वडार समाज संघर्ष समितीची बैठक पार पडली.सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू नंतर, न्याय हक्कासाठी वडार समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला आहे.राज्यभरात वडार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा सकल वडार समाज संघर्ष समितीने दिला आहे.सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,कुटूंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे,एक कोटी रुपयांची आर्थिक मदत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटूंबियांना देण्यात यावी अशी मागणी सकल वडार समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
31 डिसेंबरच्या पार्ट्या निमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे.
या काळात निकृष्ट अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.
सर्वाधिक पार्ट्या 31 डिसेंबरला होतात. मात्र,हॉटेलचालक अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल एक ते दोन आठवड्यांपूर्वी खरेदी करतात.
तपासणी मोहीम २४ डिसेंबरपासून हाती घेण्यात आली आहे.
या कालावधीत जास्तीत जास्त हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सापडली गोवा राज्यातील बनावट दारू
बनावट दारू विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात कारवाई
अशोक घार्गे आणि गणेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
आरोपींकडून बनावट दारूच्या ४० बॉक्सेसह ४ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा. खंडणी प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करा. खंडणीतील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करा, यासह मस्साजोग येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी.
या प्रमुख मागण्यांसाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय भव्य मूक मोर्चा निघत आहे. तर या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील सहभागी होणार आहेत.
- नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणीबाणी
- मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी राहणार बंद
- वीज पुरवठा बंद राहणार असल्यानं पाणीपुरवठा राहणार बंद
- आज सिडको, नाशिकरोड, पाथर्डीसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद
- तर उद्या रविवारी सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
- नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपर मध्ये देखील एक टेंपो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत प्रीती रितेश पटेल या महाराष्ट्रात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत. या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिराग नगर मार्केटमध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चालक आणि टेम्पो ला ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरा पर्यंत या बाबत पोलिसांचा तपास सुरू होता.
नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगर परिषदेला मंजुर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना गेल्या नऊ महिन्यांपासून जाणूनबुजून अडवून ठेवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय. तर दरम्यान ८ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत निविदा सादर करण्याची मुदत होती. २९ मार्च २०२४ रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या माञ निविदा प्रक्रिया जाणूनबुजून उघडू दिली नाही यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी जेणेकरून कोणाच्या सांगण्यावरून कामे थांबवली हे लक्षात येईल अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय.
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्यांवरील होणारे हल्ले थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर आले असुन जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी अधिकाऱ्यांची पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची गठीत केली आहे.दरम्यान या समीतीची पहीलीची बैठक पार पडली यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी मांडल्या तर जिल्हाधिकारी नेमकं किती व कोठे पवनचक्की उभारण्यात येतेय याची प्रशासनाला माहीती देण्यात आली नसल्याची बाब उघड झाली असुन पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हा स्तरावर विविध स्वरूपाच्या परवानगी देण्यासाठी नियमावली बनविण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची थेट तक्रार असेल तिथे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी पंचनामा करतील व काही गैर कारवाई होत आहे असे आढळल्यास प्रकल्प बंद केला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी दिलीय.
उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ढग अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या भागातील जरा दोन दिवसांपासून उष्मा वाढला होता. तसच रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागातील थंडी गायब झाली असून वातावरणात उष्मा वाढला होता. तसेच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र बदलापूरच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या भागात हंगामी टोमॅटो, वांगी, वाल, हरभरा पिकवला जातो. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि असाच पाऊस राहिला तर टोमॅटो, वांगी तसेच इतर पिकांना फटका बसू शकतो.
वाशिमच्या मालेगाव शहरात काही इसम वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत. अशा गोपनीय माहितीवरुन वाशिमचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी त्यांच्या पथकासह बस स्टँड व आठवडी बाजार या दोन ठिकाणी छापा टाकला असता येथे मिलन तसेच कल्याण नावाचे जुगार खेळतांना मिळुन आले. यात आरोपीकडून नगदी 1 लाख 27 हजार 905 रुपये, वरली मटक्याच्या चिठ्या, 5 दुचाकी,19 मोबाईल असा एकूण 4 लाख 96 हजार 805 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणारे एकूण 21 आरोपींवर मालेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.