
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना फरार होण्यास मदत करणाऱ्या तसेच त्यांना लपण्यासाठी आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातील कर्वेनगर परिसरातील घटना आहे.
अलंकार पोलीस ठाण्यापासून जवळ ही घटना घडली.
राहुल जोशी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पावसामुळे कुजलेले झाड थेट एका दुचाकीस्वराच्या डोक्यात पडले आणि यात या तरुणाचा मृत्यू झाला.
वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींवर मोकका कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. तसेच झालेल्या तपासाची माहिती पोलीस खात्याने कस्पटे कुटुंबीयांना द्यायला हवी. अशी मागणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. आज सायंकाळी जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाट पाऊस झाला आहे.. तर अहमदपूर तालुक्यातल्या गोताळा येथे शेतात वीज पडून 2 दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर 8 जण गंभीर होरपळले आहेत.
आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र कडक उन्हाचा चटका जाणवला. अचानक तापमानात वाढ होऊन 38 अंशापर्यंत गेले होते. पण सायंकाळी खामगाव, नांदुरा आणि बुलढाणा भागात पावसाला सुरुवात झाली.
सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून लागली वाहू
मागच्या अनेक महिन्यापासून भोगावती नदी पडली होती कोरडी
मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून लागली वाहू
दरम्यान,या नदीकाठावरील वाळूज, मनगोली, तडवळे ढोराळे, यावली इर्लेवाडी, इरले, साकत या गावांना सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे
मागील 40 वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहत असल्याच चित्र सध्या दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी
वैराग परिसरातील तडवळे गावाला या जोरदार पावसाचा बसला फटका
या मुसळधार पावसामुळे तडवळे गावातील रस्त्यांना आले नदीचे रूप
मान्सूनच्या या जोरदार पावसामुळे वैराग परिसरातील जवळपास 54 गावातील जनजीवन झालं विस्कळीत
तर तडवळे गावातील अनेक घरात पाणी शिरलं असून, शेतीतील काढलेल धान्य पाण्यात भिजून गेलं आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या धान्यात पाणी गेल्याने,सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे.
धुळे शहरासह जिल्हा विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर सुरू...
विजांच्या गडगडाचा सह मुसळधार पावसाला सुरुवात...
जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची दमदार बॅटिंग...
गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे मिळाला दिलासा...
माजलगाव मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा अपघातात निधन.
लातूर जिल्ह्यातील घडलेली घटना राजकीय वर्तुळात शोककळा.
कल्याणमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
मृत्यूनंतर आलेल्या अहवालात रुग्ण कोविड पोसिटीव्ह असल्याची माहिती
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात चार कोविड रुग्ण दाखल..
दोन कोविड रुगणचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
तर एकाला कळवा रुग्णालयात उपचार सुरु.
एका रुग्णालय उपचार देऊन सोडण्यात आले..
- चाकण शिक्रापुर महामार्गावर वाहतुक ठप्प
- बहुळ गावाजवळ पुलावर पाणी सुरु
- चाकण शिक्रापुर परिसरात मुसळधार पाऊसाचा सर्वत्र हाहाकार
- ओढे नाले दुथडी भरुन वाहत असुन पाणी थेट महामार्गावर
- धोकादायक पाण्यातुन प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
- ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहे
- शेतशिवारही पाण्याखाली गेलाय
- कायम दुष्काळग्रस्त भाग असलेल्या पाबळ परिसरात ढगफुटी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी
- शेतीला नद्याचे स्वरुप आल्याने शेतीचे नुकसान
- शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झालीय
खारघर गोल्फ कोर्स मागील डोंगरावरील घटना.
सायन कोळीवाडा येथील पाच जण फिरण्यासाठी खारघर येथील डोंगरावर गेले होते. मात्र मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने तरुण अडकून पडले
खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या साह्याने पाच तरूणांना सुखरूप रेस्क्यू केले आहे.
कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलाला उल्हास नदीचे पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग केला बंद
अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची कल्याण तहसीलदारांची माहिती
पावसामुळे वसईत दुसरा बळी गेला आहे. सोमवारी विरारच्या गोपचर पाड्यातील पूजा अपार्टमेंचा स्लॅब कोसळून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
ही महिला आपल्या सात महिन्याच्या आणि तीन वर्षाच्या मुलांसह हॉल मध्ये झोपली होती, मात्र घरातील स्लॅब तिच्या डोक्यावर पडला आणि घटनेत तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी राजू सिंह असे महिलेचे नाव आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर चर्चा होऊन समाज हिताचे निर्णय घेणार.
पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये मराठा बांधवांची बैठक.
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाची लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा होणार.
राजकीय सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थितीत
वैष्णवी यांच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच त्यांना ज्या हत्याराने मारहाण केली या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही
ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहेत याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे
यासाठी आणखी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती
यावर न्यायालयाने या तिघांना आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत आहे
राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात मंत्री महाजन यांनी तातडीने भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. राज्यात मान्सून पूर्व पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी यंत्रणा 24x7 सज्ज असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.
मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने थैमान घातले आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. माहीमध्ये आताच एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
- बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथील प्रकार.
- सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाच्या शेजारी असलेल्या वड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले.
- ओढ्यात हे पाणी न बसल्याने गावात घुसले.
- यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली.
- तर वडगाव कळसंबर गावातील केलेले पेवर ब्लॉग च्या कामाचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच मोरे यांनी दिले आहे.
- बीड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपाययोजना करण्याची गरज.
दुपारी ३ नंतर पिंपरी चिंचवड या तिघांना न्यायालयात हजर करणार
वैष्णवी चे पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांची आणखी चौकशी पोलिस करणार
कुठल्या मुद्द्यांवर पोलिस मागणार कोठडी
वैष्णवी यांची नणंद करिष्मा आणि फरार आरोपी निलेश चव्हाण यांच्यात काही आर्थिक संबंध आहेत का याची चौकशी करणे अद्याप बाकी
घरातील आणि परिसरातील सी सी टिव्ही फुटेज तपासणे अद्याप बाकी आहे
शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांनीच रचला स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव.
पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर केला गोळीबार.
१९ मे रोजी वारजे माळवाडी भागात घारे यांच्या गाडीवर गोळीबार.
घारे हे पुणे जिल्ह्याचे शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.
वारजे पोलिसांकडून तीन आरोपींना पुण्यातून अटक.
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील वळसंग या गावात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू.
वळसंग गावात जोरदार पाऊस सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत.
वळसंग गावात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात शिरले पाणी.
सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 171.4 मिमी पावसाची नोंद.
मान्सूनच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी आला अडचणीत.
पनवेल महानगरपालिकेचे हद्दीमध्ये कळंबोली शहर आणि कामोठे शहर हे पाण्याखाली गेलेले दिसून येत आहेत. नालेसफाई त्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कारण तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक कामे अजून पूर्ण झाली नाही, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि रहिवाशांना, तसेतच वाहन चालकांना झालेला दिसून येत आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ५०-६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सर्व नागरिकांना घरातच राहण्याचा आणि आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
- गेल्या दहा ते बारा दिवसात जिल्ह्यातील पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडीद पिकाचे प्रचंड नुकसान..
- बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी रमेश काळे यांच्या शेतातील उन्हाळी उडीद पीक झालं माती मोल..
- उत्तर बार्शी तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या उडीदाला कोंब
- हातातोंडाशी आलेलं उडीद पीक मुसळधार पावसामुळे हिरावले.
- सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिक वाया गेल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी..
- पाऊसासह संपुर्ण परिसरात धुक्याची चादर पसरली
- दिवसाही धुक्यातुन वाट वाहनांचा प्रवास सुरु
- माळशेज घाटात पर्यटक दाखल
- माळशेज घाटात धोकादायक ठिकाणावर थांबण्यास पर्यटकांना बंदी...
- कल्याण अहिल्यानगर महामार्गावर माळशेट घाटातुन प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्क रहाण्याचे प्रशासनाचे आवाहन
श्रीवर्धन तालुक्यात पावसाचा जोर वाढत असून याचा फटका श्रीवर्धन दिवेआगार रस्त्याला बसला आहे. या मार्गावरील भरडखोल येथे पुलाचे काम सुरु असून यासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता या पावसादरम्यान पाण्याखाली जाऊन येथील वाहतुक बंद झाली आहे. पहिल्या पावसात हि परिस्थिती असेल तर पुढे संपुर्ण पावसाळ्यात काय होणार असा प्रश्न येतील ग्रामस्थांना पडला आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कळंबोली शहर कामोठे शहरांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे तसेच रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी असल्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना पाण्यातून वाट धरत बाहेर पडावे लागते
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मान्सूनपूर्ण पाऊस पडत आहे .या पावसाचा फटका कांदा उत्पादकासह फळबागातदारांना बसतो आहे.जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील गोंदी येथील शेतकरी नितीन तुरुकमारे यांच्या उन्हाळी ज्वारीला देखील मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे.शेतात सांगून ठेवलेल्या ज्वारीचा चाऱ्यासह कणस देखील खराब झाली आहे. त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीने 16.50 मीटर ही इशारा पातळी गाठलीय. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
इंदापुरचे आमदार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे पूर परिस्थिती पाहणी दौरा चक्क केला ट्रॅक्टर मधून सुरू...
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे पूर परिस्थितीमुळे गावाचा संपर्क तुटल्याने चारचाकी जात नसल्याने भरणेंनी ट्रॅक्टर मधून जात घेतला पूर परिस्थितीचा आढावा..
आमदार भरणेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय..
दीपक देशमुख यांचे स्वतःला मातीत गाडून घेत आंदोलन
सरस्वती नदीतील संरक्षण भिंतीचे काम रद्द करावे तसेच भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करावी अशा विविध मागण्यांसाठी केले जात आहे आंदोलन
परळी नगर परिषदेसमोर केले जात आहे आंदोलन
- कालव्याला धरणातून सुरू असलेले पाण्याचा विसर्ग आणि पाऊसाचे मिसळलेले पाणी यामुळे कालवा धुथडी भरुन वाहतोय...
- कालव्याच्या साइड भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात
- कालव्यावरुन नागरिकांचा धोकादायक प्रवासही सुरु
- कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाला नाही तर हा कालवा कधीही फुटण्याची भीती
- वडगाव काशिंबेग परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
- डिंभे डावा कालव्याला धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्याची मागणी
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे,सांगली शहरातल्या आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी आता 16 फुटांवर पोहचलेली आहे, सकाळपासून या पाण्याच्या पातळीमध्ये तब्बल एक फुटाणे वाढ झालेली आहे.. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे..
बीडच्या गेवराई शहरात 10 हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन 20 हजार रूपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा घेतल्या.याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बालाप्रसाद बाहेती रा.गेवराई (लाड गल्ली)नासेर शेख रा.बोधेगाव जि.अहिल्यानगर अशी आरोपीची नावे आहेत.
बालाप्रसाद बाहेती याने चलनातील 10 रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून 20 हजार रुपयांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा घेतल्या.
त्या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला.
पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.
पहिल्याच पावसात रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील सर्व्हीस रोडची पार चाळण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणातील उड्डण पुलाचे या ठिकाणी काम सुरु आहे. या मुळे येथे अरुंद रस्ता असून त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. बांधकाम ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याचे काम केले जात असले तरी खड्डयात टाकलेल्या खडी आणि ग्रीटमुळे देखील त्रास सहन करावा लगतो आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुधडी भरून वाहतीय. बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकला समांतर पाणी वाहत असून पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जाण्याची भीती आहे. 2019 ला याच ठिकाणी पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रॅकवर अडकून पडली होती. याठिकाणी उल्हास नदी रेल्वे ट्रॅकला समांतर असल्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय.
मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे होतात हाल
त्यामुळे प्रवासांना 15 ते 20 मिनिटं वाट पाहावी लागत आहे
नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर काही टवाळखोरांनी हैदोस घातला आहे....
हातात दांडके घेऊन त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केलीय हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला....
असून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे....
नेमका हा हल्ला कशामुळे झाला याची माहिती समजलेली नाही....
सायंकाळच्या सुमारास कार मध्ये आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक शिंदे टोल नाक्यावरील कामगारांना धक्काबुक्की करून टोल नाक्यावरील ऑफिसची काच फोडून नुकसान केले.....
या संदर्भात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे ....
दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी स्वामी चिंचोली येथील नुकसानीची पाहणी केली नुकसानीची पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात होणार असून पंचनामे झाल्यानंतर सानुग्रह अनुदान देखील मिळणार आहे
बदलापूर आणि वांगणी परिसरात पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशन मधील ट्रॅकवर पाणी साचलं होतं. मात्र याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. सध्या थोडा वेळ पाऊस आणि थोडा वेळ उसंत अशी पावसाची स्थिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतय.
राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे
फळ मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक झाली होती
अननस, कलिंगड, पपई, टरबूज इत्यादी माल दाखल झाल्यामुळे मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक आणि पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे
त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे
त्यामुळे व्यापाऱ्यांचं दीड ते दोन कोटी रुपयांचं आजचं नुकसान झालेलं आहे
त्यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दाखल..
नाशिक च्या ssk हॉटेल येथे होणार दाखल...
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण...
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या देखील घेणार गाठीभेटी,
सर्व ठिकाणी पंच नामा करण्याची सूचना दिली आहे, ज्यांचं नुकसान झालं त्यांना सरकार मदत करील
अजित पवार
नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे,बाजार समितीचे सभापती हे मनमानी कारभार करून हेतुपुरस्कार त्रास देत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून हमाल,मापारी,यांच्यासह सत्ताधारी गटातील 11 संचालक तसेच व्यापारी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याने कांदा लिलाव ठप्प झाले त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे.. राहाता नगरपरिषदेची अग्निशमन नादुरुस्त असल्याने शिर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.. अग्निशमन घटनास्थळी पोहचायला एक तास लागला तोपर्यंत कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी फायनान्स कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे.. गेल्या एक महिन्यापासून राहाता नगरपरिषदेची अग्निशमन दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेलेली असून नगरपरिषदेकडे पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे..
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकद, वाघळूद, शेलगाव, गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता अत्यंत खराब झाल्यानं चिखलात वाहन अडकून पडत आहे. अनेक वेळा ग्रामपंचायतने निवेदन देऊनही जिल्हा परिषद प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे, वाशिम जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाकडे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
2003 तीन नंतर प्रशासनाने साधे रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने या तिन्ही गावच्या नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना मोठा त्रास होतय त्यामुळे पावसाळ्या तात्पुरता का होईना रस्ता निर्माण करून येजा करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहे.
स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांची आज 80 वी जयंती आहे.. यानिमित्त बाभळगाव इथल्या विलास बागेत आदरांजली सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल.. दरम्यानच्या यावेळी सिने अभिनेते रितेश देशमुख ,जेनेलिया देशमुख तसेच संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपस्थित होते... तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची देखील उपस्थिती होती....
मातीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांना वाहना घेऊन जाण्यासाठी करावी लागते कसरत.....
पावसामुळे अक्राणी ते केलापाणी दोन किलोमीटरचा रस्ता झाला चिखलमय....
चिखलात रुतलेलं चार चाकी वाहन काढण्यासाठी नागरिकांची नाकेनऊ.....
मातीत रुतलेल्या चार चाकी वाहनाला दोरखंडाचा साह्याने दोन तासांच्या परिश्रमा नंतर काढण्यात आला वाहन....
सुदैवाने कार मधील चारही युवकांचे प्राण वाचले पोलीस व वन विभागाने कारला काढले बाहेर..
गाडीमध्ये बसले होते चार तरुण अचानक पावसामुळे माती खसल्याने उभी असलेली कार कोसळली असती दरीत..
उपस्थित पर्यटकांच्या प्रसंग वधानाने मोठी दुर्घटना टळली चिखलदराच्या गाविलगड किल्ला परिसरातील घटना.
भिमाशंकर भोरगिरी परिसरात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक भिजत भिजत निसर्गाची साथ घेत आहेत. काही पर्यटकांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत पावसात नाचण्याचा आनंद घेतला. भिमाशंकर भोरगिरी परिसर सध्या एक आनंददायी आणि शांत अनुभव देणारे ठिकाण बनले आहे.पावसाचा आनंद घेत असतानाच नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असा सल्लाही स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
भरती -
सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर
ओहोटी-
सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर
भरती -
रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर
ओहोटी-
उद्या २७.०५.२०२५ रोजी पहाटे ०५:२१ वाजता - ०. ०४ मीटर
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान....
चिचखेडी गावातील विजेचे खांब , महू फुलाची झाडे आणि आंब्याची झाले आडवे...
एन सीजन मध्ये आंब्याचे झाडे उमळून पडल्याने शेतकरी संकटात....
विजेचे खांब पडल्याने 2 दिवसापासून चिचखेडी गाव अंधारात....
लोणावळा शरदवारी पावसाने अक्षरशः कहर केला 24 तासात तब्बल 232 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पावसाने शहरात थैमान घातले होते. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच साचले होते गवडीवाडा भागात काही घरांमध्ये पाणी देखील घुसले होते. राज्यात यावर्षी मान्सून मे महिन्यात दाखल झाला आहे. तसेच समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व मोसमी पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू झाला आहे. याचा देखील परिणाम जोरदार पावसावर झाला आहे.
सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन दगडी पुलासह पाच बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना आहे आणि संपूर्ण वाळवंटाला देखील पाण्याने वेढा दिलाय. चंद्रभागा नदी 45 हजार क्युसेक्स इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे. तर पूर सदृश्य परिस्थिती पंढरपुरात निर्माण होत आहे
मुंबईमध्ये होणाऱ्या अतिमुसलधार पावसामुळे याचा थेट फटका रेल्वे वाहतुकीवर होताना पाहायला मिळत आहे.
रेल्वे पकडण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात कामावर जाणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
मात्र रेल्वे गाड्या १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशी हवालदिन झाले आहेत, याचा आढाव घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी.
मुरूड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुरूड शहराच्या दत्त मंदिर परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळी पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले आणि पाण्याचा प्रवाह पायरी मार्गाने खाली उतरला . यामुळे रस्त्यावर पाणी साचले अनेकांच्या घरात देखील पाणी शिरून नुकसान झाले. दत्त मंदिर परीसरात डोंगर फोडून भराव करण्यात आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पहिल्यांदाच ही वेळ ओढवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आज सकाळी संपलेल्या 24 तासात मुरूड तालुक्यात सर्वाधिक 370 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
पहिल्याच पावसामध्ये जोरदार मुसळधार पावसामुळे सायन पनवेल वर मोठ्या प्रमाणात कोंडी
सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्त्यांवर पाणी
त्यामुळे वाहन चालकांचे पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे
रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहन चालकांना होते त्रास
उल्हासनगर, अंबरनाथ मध्ये रात्रभर जोरदार सरी तर कधी रिमझिम पाऊस पडला, सहा वाजता बंद झालेला पाऊस विश्रांती नंतर पुन्हा आता सकाळी सुरू झाला असून उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात रिमझिम आणि मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच परिसरात वातावरण ढगाळ झाले असून, अंधारमय वातावरण दिसत आहे, रात्रभर पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे उल्हासनगर मध्ये एक झाड उमळून पडले,
भंडाऱ्यात मागील तीन दिवसात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यातं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं भातपीक सापडलं.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेला भातपीक मळणीसाठी शेतात ठेवला होता, तो पाण्याखाली आला.
तर काहींचे भात पीक कापणीला आलेला असताना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसात भातपीक अक्षरश: शेतात भुईसपाट झाला.
तर, अनेक शेतकऱ्यांचं मळणी केलेलं भातपीक अचानक आलेल्या बेमोसमी पावसात ओलचिंब झालं.
काहींचं भातपीक पाण्याखाली सडायला आलं तर, मळणी झालेल्या भातपिकाला पावसाचा फटका बसल्यानं व्यापाऱ्यांनीही ते खरेदीकरिता पाठ दाखली आहे. कर्ज आणि सोनं गहाण ठेवून शेती पिकविण्याचा खटाटोप करणाऱ्या शेतकऱ्यांवर या मान्सूनपूर्व पावसानं मोठं आर्थिक संकट उभ केलं आहे.
चार दिवसा पूर्वी अवकाळी ने सरु झालेल्या पावसाने काल रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात मागील 24 तासात जोरदार पाऊस बरसला आहे. असून मुरुड 371, श्रीवर्धन 307, म्हसळा 300 मिमी पावसाची नोंद तर माथेरान येथे 181 मीमी, तळा 102 रोहा 166 मीमी पावसाची नोंद आहे.
- बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथील प्रकार.
- सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाच्या शेजारी असलेल्या वड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले.
- ओढ्यात हे पाणी न बसल्याने गावात घुसले.
- यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली.
- तर वडगाव कळसंबर गावातील केलेले पेवर ब्लॉग च्या कामाचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच मोरे यांनी दिले आहे.
- बीड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपाययोजना करण्याची गरज.
जिल्ह्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज
29 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात मान्सून सक्रिय
कालपासून रत्नागिरी जोरदार पाऊस
पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनि असणाऱ्या उजनी धरणात तब्बल 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
तर धरण सात टक्क्यांनी वधारलेला आहे.
रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणात 55 टीएमसी पाणी होते तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
तर उजनी धरण वजा सात टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 18 हजार क्युसेक्य इतका विसर्ग येतोय.
तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रात आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे..
त्यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजाक्षमतेतून प्लस मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. तसेच आसपासच्या परिसरात छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे. डोंगर रांगातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.
अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे.
महाड, पोलादपूर , माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळ पासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे.
रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत.
या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. 12 तासात श्रीवर्धन मध्ये 136 तर मुरूड मध्ये 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
दुपारी बारा ते एक च्या दरम्यान आम्ही शहा यांचे नांदेड मध्ये आगमन होईल.
आज दिवसभर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे.
या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलेल आहे. या सभेची भाजपाच्या वतीने जयत तयारी करण्यात आलेली आहे.
पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे.
50 ते 60 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. कोयना नदीवरील निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसडून वाहू लागले आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
गेले तीन ते चार दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला आहे. धामापूर मोगरणे जाधववाडी येथील जयंत सदानंद ठोंबरे यांच्या राहत्या घरावर संरक्षक भिंत व मातीचा भराव कोसळून घराच्या मागील बाजूची पडवी पूर्णपणे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
या पडवीमध्ये ठोंबरे यांची गाय बांधलेली होती. सुदैवाने या दुर्घटनेत गायीचा जीव वाचला असून तिला गंभीर दुखापत झाली आहे.
० कोंझर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचला
० डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी गेली वाहून
० रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद
जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, खामगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने चितोडा पळशी येथील सूर्या नदीला पूर आल्याने खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला आहे... पाऊस धो धो कोसळत असल्याने नदी नाले ओढे दुथडी भरून वाहताना दिसत आहे.. या पावसाने शेतातील मशागतीचे कामे खोलांबली आहेत
फरार कॉल सेंटरच्या चालकासह तीन साथीदारांच्या शोधार्थ पोलिसांच्या गुन्हे शाखेची नवी मुंबईत छापेमारी
बनावट कॉल सेंटर मधून अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत होती
शनिवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कॉल सेंटर वर छापा टाकला
याप्रकरणी करणसिंह शेखावत, संजय मोरे आणि केतन रवानी हे फरार झाले आहेत
शेखावत हा या बनावट कॉल सेंटरचा मास्टरमाईंड
मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टंट या नावाने हे बनावट कॉल सेंटर सुरू होते
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वाहनांची तोडफोड
परिसरात दहशत माजवण्यासाठी आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी वाहनांची तोडफोड
सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे अल्पवयीन मुलांकडून १० ते १५ वाहनांची तोडफोड
काल रात्री १० वाजताची घटना
दोन अल्पवयीन मुलांनी कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे
नागरिकांत दहशतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र शहर आणि जिल्ह्यात कायम
शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले
गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली
हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत
पुणे जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढले
त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे, नागरिक अडकणे अशा घटना घडल्या
प्रशासनाला मदतकार्यासाठी पथके रवाना करावी लागली आहेत
बारामती आणि इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस
बारामतीमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी
बारामती: ७७ मिमी
माळेगाव: ८२.८ मिमी
पनदरे: १०४.८ मिमी
वडगाव: ९६.३ मिमी
लोणी: ८६ मिमी
सुपा: ७६ मिमी
मोरगाव: ७५.५
उडवडी: ८५.३
शिर्सुफळ: ७४.३
इंदापूरमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी
भिगवण: ६३.३ मिमी
इंदापूर: २३.५ मिमी
लोणी भापकर: ४८.३ मिमी
बावडा: २३ मिमी
काटी: २६.५ मिमी
निमगाव केतकी: १८ मिमी
अंथुरने: ४४ मिमी
पळसदेव: ४८.३ मिमी
लाखेवाडी: २६.५ मिमी
धाराशिव जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सातत्याने झालेल्या अवकाळी पावसाचा फळबागांसह पालेभाज्यांना तडाखा बसला आहे.
भाज्यांचे नुकसान झाल्याने आहेत त्या भाज्या तशाच असुन काढणे कठीण झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर दुप्पटीने वाढले आहे.
मागील आठवड्यात 20 रुपये किलोने मिळणारे टॉमेटोचे दर आता 40 रुपयांवर पोहचले आहेत तर दोडगा व शेवग्याने शंभरी गाठली आहे.
तर पालेभाज्यांच्या किमतीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.
आगामी दोन महीने भाजीपाल्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता भाजी विक्रेते यांनी व्यक्त केलीय.
डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरुन वाहिले
भिमानदीला पहिल्याच पाऊसात पुर
भिमानदीवरील बंधारे ,पुल पाण्याखाली
अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांचे नुकसान
भिमाशंकर भोरगिरी परिसरात शेतातील घरांसह पशुधनांचे नुकसान
रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला मात्र शेतीसह पशुधनाचे मोठं नुकसान
पेरणी तोंडावर घेऊन ठेपली आहे अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जाची जुनीच परतफेड करता आलेली नाही, यामुळे असे शेतकरी नव्याने कर्ज मिळवण्यास अपात्र ठरले आहेत.यातून गावपातळीवर कृषी क्षेत्राची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 28 टक्के कर्जाचे वाटप झाले आहे. तर 72% शेतकऱ्यांना अजूनही कर्जाची परतफेड करता आलेली नाही यावर्षी जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करणार आहेत.
गंगाखेड ते राणीसावरगाव रोडवर रेशनचा तांदूळ घेऊन जाणार ट्रक पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईत रेशनचा तांदूळ अंदाजे किंमत 3 लाख 52 हजार रुपये आणि ट्रकची किंमत 25 लाख एकूणअसा ऐकून 28 लाख 52 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील ट्रॅक कारवाई साठी गंगाखेड पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील आज सावंगी भुजबळ येथील गोदावरी नदीपात्रातील प्रभू श्री राम यांच्या हस्ते स्थापन केलेल्या संभु महादेव मंदिरात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि परभणीच्या पालक मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये सोमवती अमावस्या निमित्ताने महाजालभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन अहमदूर तालुक्यातील शिंदे खानापूर येथील राजकुमार शिंदे आणि नारायणराव शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाला खा संजय जाधव गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे उपस्थित राहणार आहेत. यावेळीदुपरी 1 वाजल्या पासून रात्री 10 वाजे पर्यंत कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
गेला पाच ते सहा दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी ही जवळ जवळ पंधरा फुटापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे शेतीला पूरक असा पाऊस पडत आहे. मात्र नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होत आहे.
महामार्गवरील चिपळूण परशुराम घाटातील घाटाच्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट
धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आणि गॅबियन वॉल उभारणीच्या कामात पावसाचा खोडा
पावसामुळे सुरक्षा वॉल चे काम थांबलं यंत्रसामग्री जागेवर पडून
यवतमाळ शहराला लागून असलेल्या निळोणा धरण परिसरातील बरबडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाच मित्र पोहण्यासाठी उतरले यातील एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मोनीस शाह रफिक शाह वय 19 वर्षे राहणार चमेडिया ले-आउट यवतमाळ असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा त्यांच्या मित्रासोबत पोण्यासाठी गेला होता. मोनीस याने सर्वात पहिले विहिरीत उडी घेतली. मात्र तो बराच वेळ बाहेरू न आल्याने बाकीच्या मित्रांनी घाबरून आरडाओरड केली स्थानिक नागरिकांना बोलवण्यात आले आणि तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.
भीमा आणि नीरा खोर्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.
त्यामुळे भीमा नदीच्या पाणी वाढली आहे.
पंढरपुरात चंद्रभागा नदीची पाणी पातळी दोन मीटर ने वाढली आहे.
दरम्यान पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचे 40 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
त्यामुळे चंद्र भागा नदी खळखळून वाहून लागली आहे.
वीर धरणातून नीरा नदीत रात्री 10 वाजता सूमारे 30 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.