
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात ओवर पेंटग्राम , ओवर हेड वायर तुटल्याने वाहतूक खोळंबली
CSMT च्या दिशेने जाणारी जलद मार्गावर घडली घटना
9 वाजून 55 मिनिटांची घटना... जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली..
कुर्ल्याच्या पुढे कल्याण दिशेने ट्रेन एका पाठोपाठ उभ्या
मोठी भरती असणाऱ्या दिवशी भरती कालावधीच्या काळात समुद्रावर न जाण्याचे मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन
24 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता चार पॉईंट 59 मीटर उंचीची लाट उसळणार
25 जून रोजी 12 .05 वाजता 4.71 मीटर उंचीची लाट उसळणार
26 जून रोजी 12.55 वाजता 4.75 मिटर उंचीची लाट उसळणार
27 जून रोजी 1.40 वाजता 4.73.मीटर उंचीच्या लाटा उसळणार
28 जून रोजी दुपारी 2.26 वाजता 4..64 मीटर उंचीच्या लाटा उसळणार
वसईच्या पापडी येथील मोकळ्या जागेत मित्राच्या वाढदिवसाच्या मेजवानीच्या पार्टीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश पवार (३०) असे या तरुणाचे नाव आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या रुग्णालय उपचार सुरू आहेत.
विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाई यांच्या जन्मस्थळ गंगाखेड येथून संत जनाबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. गेल्या ५३ वर्षांपासूनची पालखीची ही परंपरा यंदाही कायम असून, यात ५०० वारकरी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विठूमाऊलीच्या भक्तांची संख्या वाढली आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज नवी मुंबईच्या शहरामध्ये पावसाचं आगमन झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
अंबरनाथ शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी खासगी इको गाड्यांच्या रचनेत बदल करून एकेका गाडीत २०-२० विद्यार्थी कोंबले जात असल्याचं समोर आलं होतं. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही या अवैध विद्यार्थी वाहतुकीवर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कल्याण RTO च्या पथकाने सोमवारी दुपारी शाळा सुटायच्या वेळी अशा अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी व्हॅन्सवर धडक कारवाई केली
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात सीपीआरमधील अतिदक्षता विभागात एक तासापासून विद्युत पुरवठा खंडित झालाय. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सीपीआरमध्ये भोंगळ कारभार दिसून आला. अतिदक्षता विभागामधील बत्ती गुल झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलाय.
पुणे रेल्वे स्टेशन चे नामकरण करून थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर आता अनेकांनी यात उडी घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती.. मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात नांदेड जिल्ह्यातील जनता पूर्णता वैतागली आहे. नांदेडच्या बिलोली शहरासह तालुक्यातील जनता वीज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरली. मागील चार ते पाच महिन्यापासून नांदेडच्या बिलोली शहरासह तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभाराविरोधात बिलोली येथील नागरिकांनी मोर्चा काढत मोर्चा काढला. नांदेड हैदराबाद महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात बिलोलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आषाढी वारीसाठी श्री क्षेञ शेगावहुन निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी दिंडी हरी नामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली असुन जिल्ह्यातील कळंब शहारात या पालखीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.दरम्यान हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुढील तीन दिवस ही पालखी धाराशिव जिल्ह्यात असणार आहे.आज पालखीचा मुक्काम कळंब शहरात असणार असून संध्याकाळी नगरपालिकेच्या मैदानावर पालखी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या मागील शिवांगी अपार्टमेंटमध्ये आज अचानक एक नारळाचं झाड पार्किंगमध्ये कोसळले. या घटनेत तिथे उभ्या असलेल्या तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे
- नाशिकच्या कडवा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवला
- कडवा धरणातून १,०६० क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यानं विसर्ग वाढवला
- गोदावरीच्या पुराच्या पाण्यात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी
- वस्त्रांतरगृहाच्या इमारतीवरून तरुणांच्या गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उड्या
- नागपूरच्या बैधनाथ चौक ते अशोक चौक मार्गावर 2 खाली ट्रकला लागली आग
- आगीच कारण स्पष्ट नाही मात्र दोन्ही ट्रकच्या कॅबिन जळून खाक झालीय
- अग्निशमन विभागाका माहिती मिळताच पोहचत पाण्याचा मारा करत आग विझविली...
- एका मागे एक दोन ट्रक उभे असताना मात्र एकाच वेळी दोन ट्रकला आग कशी लागली की लावली हा मोठा प्रश्न आहेय..
- सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही झाली नाहीय...
- मोठ्या प्रमाणात वर्दळीच्या या रोडवर आग लागल्याने काही भीतीच वातावरण निर्माण झालं..
- घटनास्थळी पोलीस पोहचत काय झालं याचा शोध घेत आहेय...
- नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ
- गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरीची पाणी पातळी वाढली
- दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी
- गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारपासून पावसाचा जोर जिल्ह्यात वाढलेला असून अधून मधून जोरदार सरी देखील कोसळत आहेत. कणकवली, वैभववाडी तालुक्यासह सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. पुढील २४ तासांत सिंधुदुर्ग येथे बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून सदर रस्त्यावर ये जा करणाऱ्या शेतकरी बांधवांना व तसेच नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते, रस्त्याची तात्काळ आर.सी.सी बांधकाम करावे व रस्त्यावरील येणाऱ्या लेंडी,नाल्यावरील पुलांची उंची वाढवावी या मागणी साठी प्रहाराने पैनगंगा नदी पात्रात शेतकरी बांधवांसह जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आला.
येत्या २९ तारखेला दोन्ही बारामती मध्ये एकत्र दिसणार
बारामती मध्ये सायन्स पार्क मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच मंचावर
डॉ अनिल काकोदकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथसह इतर ठिकाणी रिक्षा चालकांनी केली भाडे वाढायला सुरुवात
गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने ही भाडेवाढ जाहीर केली होती,
मात्र रिक्षेतील मीटरचं रिकॅलिब्रेशनच्या प्रतीक्षेत ती लागू नव्हती.
आता 95% रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशनच्या झाल्याने शेअर रिक्षांमध्येही प्रवासाच्या अंतरानुसार 3 ते 5 रुपयांनी वाढ करण्यात आले आहे
मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील लोकांना दरडीचा व समुद्री उधाणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे १२५ कुटुंबांना स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
दरडप्रवण क्षेत्रात येणाऱ्या या गावातील लोक सध्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
पावसाळ्याच्या काळात घरात राहणे धोकादायक बनलं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
दिवसा घरात थांबावं लागतं, तर रात्री झोपण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्याची वेळ येते. घरांवर दरड कोसळण्याची भीती असल्याने आम्ही जीव मुठीत घेऊन जगतोय.
प्रशासनाने घरे खाली करण्याचा आदेश दिला असला तरी जायचे कोठे, असा मोठा प्रश्न आमच्यासमोर असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
ही समस्या दरवर्षीचीच असल्याने सरकारने आमचं कायस्वरूपी पुनर्वसन करावं, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
सातपुडा परिसरात सकाळपासून तुफान पाऊस...
मुसळधार पावसामुळे पेरणी झालेल्या शेतात साचलं पाणी....
शेतीला आलं तलावाचं स्वरूप....
मुसळधार पावसामुळे वीट भट्टींचं नुकसान....
लातूर जिल्ह्यात आजपासून दोन दिवस बोगस शाळांची शोध मोहिम राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही मोहिम राबविली जाणार आहे.
तर आज आणि उद्या ही मोहीम जिल्हाभरात राबवून, जिल्ह्यात बोगस अनाधिकृत शाळा आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, लातूर शहरामध्ये दोन म शाळा अनाधिकृत आहेत. तिथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन देखील शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील यवतला वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्याची लगबग सुरू झाली आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आक यवत गावी मुक्कामी येत आहे.
यानिमित्ताने यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.
संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते.
यावेळी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास एक हजार किलोपेक्षा अधिक पिठलं तयार करण्यासाठी आज सकाळपासूनच लगबग सुरू झाली आहे.
गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच – दहा भाकरी पासून १०० भाकरी मंदिरात आणून देतात. तर श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मंदिर परिसरात ३०० किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येत असतात
पुण्यात आषाढी वारी सोहळ्यामुळे रस्ते वाहतूक व बसगाड्या बंद असल्याने नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.
पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्गावर 3 लाख 19 हजार 66 प्रवाशांनी प्रवास केलाय.मात्र अचानक वाढलेल्या प्रवाशांमुळे नियोजन करताना मेट्रो प्रशासनाची दमछाक झाली.
पुणे शहरात शुक्रवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले.त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक रस्ते बंद होते.
जुना पुणे-मुंबई महामार्ग,रस्ते वाहतूक, पीएमपी बंद असल्यामुळे मेट्रोला गर्दी वाढली.पिंपरी ते स्वारगेट (पर्पल मार्गिका) मार्गावर १ लाख ५० हजार ३८५, तर वनाज ते रामवाडी (ॲक्वा मार्गिका) मार्गावर १ लाख ६८ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रो प्रशासनाला ५३ लाख १४ हजार ५२९ रुपये उत्पन्न मिळाले आहे.मात्र, गुरुवारी केवळ १ लाख ५२ हजार ४८४ प्रवाशांनी प्रवास केला होता.
पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आहे म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची मागणी
पुणे रेल्वे स्टेशन चे सुशोबिरकरण आणि तसेच स्वच्छता आणि इतर विषयांवर सुद्धा करावी अशी मागणी
वाशिम जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, यांच्याकडून अंगणवाडी सेविकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयावर महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आज शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. त्यांना अपशब्द वापरणे, लाज-लज्जा काढणे, कामातून कमी करण्याची धमकी देणे, असे मानसिक त्रास अंगणवाडी सेविकांना दिले जात असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
पालघरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मनोर विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद. पाचमाड जवळील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद .
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे... आष्टी तालुक्यातील दोन तांड्यांमधून तब्बल 15 बालकामगारांची सुटका करण्यात आलीय. यामध्ये 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे. यांच्याकडून मागील काही वर्षांपासून जनावरांची राखण, धुणीभांडी, आणि घरगुती कामे जबरदस्तीने करून घेतली जात होती. या मुलांचे पालक कर्नाटकात कोळसा तयार करण्याच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांची ही मुले गहूखेल आणि सेवालाल लमान तांड्यावर घरकामासाठी ठेवली जात होती. हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा दोन बालकं निसटून अहिल्यानगर येथे पोहोचली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 15 बालकामगारांची सुटका केली.
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाकडे मुख्यमंत्री यांनी वळवला मोर्चा..
विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
येणाऱ्या काही दिवसात प्रवीण माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
माने कुटुंबीय पवारांचे जवळचे मानले जातात. मात्र विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवली होती.
गुजरातमधील सुरत येथे खूप जोरदार पाऊस पडत आहे. धो धो पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे सुरतमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राक्कलन समितीचे ( अंदाज समिती) काम खूप परिणामकारक ठरते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज संसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
विधानभवनातील सभागृहात या दोन दिवसीय परिषदेची सुरुवात आज सकाळी झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंह, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, लोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित होते.
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे स्मशानभूमीत जागा मिळण्यासाठी आंदोलकांनी जिवंतपणे प्रेत आंदोलन केले आहे बाळापुर परिसरात बौद्ध समाजाच्या वस्तीत स्मशानभूमीला प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे मात्र जिल्हा प्रशासन अंतिम मान्यता देत नसल्याने बाळापुर मधील बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न जैसेथे आहे दरम्यान गावात कुणाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीत जागा उपलब्ध मिळत नसल्याने या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे थेट जिवंतपणे मृत झाल्याचे सांगत हे अनोखे आंदोलन केले आहे या आंदोलन स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय बनले होते.
सध्या हिंदी ही तिसरी भाषा शिकवणाऱ्यावरून राज्यात नवीन वाद सुरू झाला आहे. या निर्णयाला अनेकांकडून विरोध होतोय असं असताना आता पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांचे अध्यक्षा सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांना मोडी लिपी शिकवावी अशी मागणी केली आहे. रयतेचे राजे शिवाजी महाराजांची राजलिपी म्हणजेच मोडी लिपी विद्यार्थ्यांना शिकवा, आणि हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मराठी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात एकत्र येऊयात असं ते म्हणाले.
साताऱ्याच्या कण्हेर धरणातून 1540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय
अँकर-सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे यामुळे जिल्ह्यातल्या धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढताना पाहायला मिळतीये सातारा जिल्ह्यातलं जे कण्हेर धरण आहे याची पाणी पातळी सुद्धा झपाट्याने वाढत असल्यामुळे धरण प्रशासनानं या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय.
ठाण्यातील कासावडवली गावामध्ये भले मोठे झाड पडून चार गाड्यांचे नुकसान कोणतीही जीवितहानी नाही...
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल टीम दाखल....
झाड कापून बाजूला करण्याचे काम सुरू.....
सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणची झाडे पडत आहे....
कोल्हापूरच्या हद्दवाढी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली असून हद्दवाढ दृष्टिक्षेपात असल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा
तर कोल्हापूरच्या हद्द वाढीसाठी मंत्रालयात कोणतीही अधिकृत बैठक झाली नाही
करवीर चे आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रतिदावा
मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर हद्द वाढ हवी असलेल्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त काही मिनिटे चर्चा केली
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली
गेल्या ३ ते ४ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ४ धरणांमध्ये एकूण ३५ टक्के पाणीसाठा
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 23 टक्के जास्त पाणी साठा
खडकवासला: 62.17 टक्के
पानशेत: 31.34 टक्के
वरसगाव: 40.44 टक्के
टेमघर: 18.78 टक्के
चार ही धरणात एकूण धरण साठा: 35.83 टक्के
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशाने पहिली पासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने विरोध केला आहे.. तरी आज अनेक शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवल्या जात असल्याच निदर्शनात आले.... त्यावर अकोला शहरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेय. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं आहे... जोपर्यंत तिसरी भाषा म्हणजे हिंदीची भाषा सक्तीचा आदेश रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा, या ठिकाणी आंदोलन कर्त्यांनी दिलाय..
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोझरी,अनकवाडी येथील शेतक-यांनी बापना कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली.परंतु गेल्या पंधरा दिवसांपासुन हे बियाणे उगवलेच नाही.त्यामुळे बोगस बियाण्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसुन येत असल्याचा आरोप।शेतकऱ्यांनिं केला आहे.
अपतामध्ये एका 65 वर्षीय महीलेचा मृत्यू तर 6 ते 7 जन जखमी, जखमींना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात केले दाखल
ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप पलटी झाल्याची प्राथमिक माहिती
मयत महीला व सर्व जखमी बार्शी तालुक्यातील चिखर्डा गावातील असल्याची माहिती
लोणी काळभोर मधून पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचा आज मुक्काम सासवड मध्येच
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू सोपानकाका महाराज यांची पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
दर वर्षी माऊलींची पालखी २ दिवस सासवड मध्ये मुक्कामी असते
बीडच्या शासकीय रूग्णालयात नर्सिंगच्या मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. याच वसतिगृहात साप आढळल्याने मुलींमध्ये एकच धावपळ उडाली.. साप पाहून एक मुलगी चक्क बेहोश पडली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुलांचे वस्तीगृह कालबाह्य ठरवले होते. या वसतिगृहात मानवी जिवाला धोका होऊ शकतो त्यामुळे सदर ईमारत जमीनदोस्त करावी असे स्पष्ट अहवालात म्हटले आहे. तरीही याच जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीत मुलींचा रहिवास आहे. आज साप आढळल्याने अनेक मुली वसतिगृहाच्या बाहेर आल्याच नाहीत.
एअर इंडियाच्या मानांची तपासण होणार
अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी
पुर्ण-सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग, इतर विमानांची तपासणी
माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी घटना आज सकाळी घडली माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पसारवाडी गावाचा संपर्क तुटला आहे,
पीएमपिएल चालकाची प्रवाशाला मारहाण
प्रवाशी तरुण आणि चालकामध्ये प्रवासादरम्यान झाला होता वाद
या वादातुन शिक्रापुर येथे भरचौकात दोघांमध्ये चांगलीच मारहाण आणि राडा झालाय
- दारणा धरण - 4079 Cusec
- गंगापूर धरण - 3944 Cusec
- कडवा - 795 Cusec
- नांदूरमधमेश्वर - 9465 Cusec.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला. भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी निवडणूक म्हणून बँकेच्या निवडणुकीकडं बघितल्या जातं. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २१ संचालक निवडून देण्यासाठी १०५६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी आजपासून २७ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २७ जुलैला मतदान होणार असून २८ जुलैला मतमोजणी होणार आहे. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीकडं आता भंडारा जिल्ह्याततील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची धावपळ बघायला मिळणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघेल. जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना ११ जून रोजी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरून जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जलील यांच्या वक्तव्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आंबेडकरी समाजाने आणखी किती दिवस अपमान सहन करायचा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचारविरोधी कृती समितीकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
- दिल्ली विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका
- आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार नाशिक दिल्ली विमानसेवा
- रोज सुरू असलेली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार असल्याने प्रवाशांना बसणार फटका
- 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम
- सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या जमिनीवर आज होणार सुनावणी
- डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने 20 एप्रिल पासून आहे अटकेत
- मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांच्या माध्यमातून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात जामिनासाठी करण्यात येईल अर्ज
- जिल्हा सरकारी वकील प्रदीप राजपूत हे आजारी असल्यामुळे अर्जावरील सुनावणी ढकलली होती पुढे
- आज आरोपी मनीषा माने यांच्या जामीनावर होणार निर्णय
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले आहे. या शक्ती विरोधात आज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर नाकाच्या बाहेर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात एक सही हिंदी सक्ती विरोधात आंदोलन सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्रातील संपवण्याचा डाव आहे महाराष्ट्र गृही सरकारचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर लावून एक सही हिंदी सक्ती विरोधात करण्यात येत आहे. या वेळी राज ठाकरे यांनी दिलेलं पत्रक वाटप करून हिंदी सक्ती विरोधात लोकांनी सह्या केल्या. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.
शिक्षण संस्थांच्या विविध योजनांसह आरटीई योजनेअंतर्गत 2400 कोटी शासनाकडे थकीत असताना आम्हाला या वर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहे. त्या शिवाय मालमत्ता करातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे, अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे, सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य द्यावी, अशा अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी कडून महावितरच्या अधिकाऱ्याना सुनावलं...
- मागील काही काळापासून नागपूर शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या मनात सरकारविरोधात नाराजीचा सूर
- काल हैदराबाद हाऊस इथं झालेल्या बैठकीत नागपूरतील लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापारेषांच्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी केली..
- या कानउघडणी नंतर तरी महावितरणचा कारभार सुरळीत होणार का? हा मात्र मोठा प्रश्न आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी मजल दरमजल करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.आज या पालखीने अहिल्यानगर शहरात प्रवेश केला असून ही दिंडी नगर शहरात दोन दिवस मुक्कामी असते. नगर शहराच्या प्रवेशद्वारावर या दिंडीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकऱ्यांची भाविकांनी सेवा केली चहा नाष्टा आणि फळ देऊन नगर शहरात या दिंडीचे स्वागत करण्यात आले.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठू नामाच्या गजरात गावकऱ्यांसह नगर मधील भक्तांनी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर ठेका धरला होता. नगर शहरातील मार्केट यार्ड भागात या दिंडीचा आज मुक्काम असणार आहे. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वाशिम शहरासाठी पाणीटंचाईच संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने हे पाणी टंचाईचे संकट अधिक गढद झाल आहे. येणाऱ्या दिवसात दमदार स्वरूपात मान्सून बरसला नाही तर वाशिम शहराला कसा पाणीपुरवठा करायचा कसा,असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे.
तुषार उर्फ प्रेम व्यंकटेश ढगे असं या २३ वर्षीय चोरट्याचं नाव असून तो वांगणीला राहणारा आहे. त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केली होती. तसंच बदलापूर पूर्व, हिललाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. त्यामुळे क्राइम ब्रँच त्याच्या मागावर होती. हा चोरटा शनिवारी खरवई परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच क्राइम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, शेखर भावेकर, सुरेश जाधव आणि रेवननाथ शेकडे यांच्या पथकाने सापळा रचून तुषार ढगेला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीत त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सोनसाखळी चोरी, तसंच बदलापूर पूर्व, हिललाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बाईक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १५ ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र आणि ३ दुचाकी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुषार याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरी असे १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी शाळेकडे येण्याचा पालकांचा कल कमी होत आहे. याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर दिसून येत आहे. यामुळेच गेल्या दहा वर्षात यवतमाळ नगर परिषदेच्या तब्बल पाच मराठी शाळा बंद झाल्या असून विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची संख्याही घटली आहे. शहरात पालिकेच्या 2015 - 16 या वर्षात 31 शाळा होत्या पूर्वी या शाळेत शिक्षण घेऊन अनेक जण अधिकारी झाले काही राजकारणात मोठ्या पदावर पोहोचले परंतु आता याच पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे.
उल्हासनगर आणि कल्याण शहरांना जोडणाऱ्या शहाड उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भाजप आमदार कुमार आयलानी यांनी वाहतूक कोंडीतून मोटार सायकल वरून जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.गुलशन नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन केल्यानंतर आमदार आयलानी यांनी मोटरसायकलवरून स्वतः उड्डाणपुलावर जाऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनीष राजे पठाणे यांनी पुलावरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत आमदारांना माहिती दिली.खड्ड्यांमुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक मंदावते आहे आणि त्यामुळे सेंचुरी रेऑन कंपनीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते, हे आमदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ मोबाईलवरून संपर्क साधून खड्डे तात्काळ भरून काढण्याच्या सूचना दिल्या.नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन केलेली ही तत्पर कारवाई नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रायगडमधील भातशेतीच्या पारंपारीक कामांचा खोळंबा झाला. लावणी आधी शेतात केली जाणारी साफसफाई, तरवे भाजणी, मशागत, धुळ पेरणी, नांगरणी आदी कोणतीच काम पावसामुळे होऊ शकली नाहीत. सलग सात आठ दिवस पडणाऱ्या पावसाने शेतात चिखल झाला आणि या चिखलामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत उगवले. आता लावणी योग्य शेत तयार करण्यासाठी शेतकऱ्याला हे गवत काढण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव मिरची वाडी परिसरातील पटेल प्रेस्टिज इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री १ वाजता या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तिथे जुगार खेळताना ११ पुरुष आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे २ महिलांकडून हा जुगाराचा अड्डा चालवला जात होता, तसंच तिथे पकडलेल्या ११ पुरुषांपैकी ८ पुरुष हे कल्याण आणि डोंबिवली परिसरातून या जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेले असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. या छापा कारवाईत पोलिसांनी ३१ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला असून सर्व आरोपींच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
दापोली तालुक्यातील शिरखल-दगडवणे पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या गंभीर अवस्थेमुळे प्रशासनाने अवजड वाहनांची वाहतूक पूलावरुन बंद करण्यात आलीय. पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती निर्माण झाली हा पूल 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, मात्र खराब बांधकामामुळे तो वेळेआधीच नादुरुस्त झालाय .या पुलाच्या दुरवस्थेमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जातेय.
कामोठे सेक्टर ६ए येथील सरोवर हॉटेलसमोर मद्यधुंद चालकाने एमएच 02 बीजी 6723 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने एका महिलेला धडक दिली. अपघातानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे जाऊन पार्किंगमधील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.
Cctv समोर आला आहे
प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. ३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मौजा वांजरा येथे उभारण्यात आलेल्या 'स्वप्ननिकेतन' प्रकल्पातील ४८० ईडब्ल्यूएस सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वितरण.
- प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपाच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करीत शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत किमान एक हजार घरे उभारली जातील.
- झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही लवकरच मालकी हक्क मिळेल, अशी ग्वाही दिली.
- नागपूरला 'हरित शहर' म्हणून होत असलेल्या विकासाचा उल्लेख करत पर्यावरणपूरक ई-बस व सार्वजनिक वाहतुकीच्या प्रोत्साहनावर भर दिला.
- मनपाने उभारलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांना आकर्षक व दर्जेदार स्वरूप देण्याच्या सूचनाही दिल्या.
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घरांची रजिस्ट्री प्रक्रिया फक्त एक हजार रुपयांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षभरात केंद्राच्या सहकार्याने ३० लाख नवीन घरे राज्यात उभारण्याचे लक्ष्य आहे.
जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते आणि बियाणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून सर्व खत उत्पादक कंपन्यांना कृषी आयुक्तालयामार्फत मंजूर नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खताचा पुरवठा करावा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी खताची नियमित उपलब्धता राखली जाईल असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले असून पुढील नियोजनाबाबतही सूचना केल्या. सध्या स्थितीला जालना जिल्ह्यामध्ये 21 हजार 196 मे टन युरिया,5 हजार 218 मे टन सिंगल सुपर फॉस्फेट, आणि 43 हजार 314 npk संयुक इतक्याच रासायनिक खताचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. शिवाय जून 2025 अखेर जालना जिल्ह्यात एकूण 97 हजार 285 मे टन खताचे आवर्तन मंजूर असून त्यापैकी 71 हजार 25 मे टन खत साठा उपलब्ध झाला.दरम्यान शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्र किंवा विक्रेत्याकडूनच खरेदी करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
बहुचर्चित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर याला तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर अटक करण्यात आली आहे. कदम-परमेश्वरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून त्याला अटक केली असून,या अटकेने पोलिस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण ३८ आरोपी आहेत.यापैकी २२ आरोपींना अटक करण्यात आली असून, १ जण अटकपूर्व जामिनावर आहे.तर अजूनही १५ आरोपी फरार आहेत.गुन्हा दाखल झाल्यापासून संतोष कदम- परमेश्वर पोलिसांच्या रडारवर होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अकलूजमधून त्याला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.