
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई. 12 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा एका चारचाकी गाडीतून नेला जात होता. पुणे पोलिसांनी गांजा जप्त केलाय. गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीय.
पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी हटविण्यात आली. गणेशपेठ, तहसील, कोतवाली या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंशतः संचारबंदी आहे. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री 10 नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असेल.
भाजपचे पदाधिकारी असलेलं पुनीत जोशी यांच्या नृत्य मोहत्सव कार्यक्रमात गोंधळ उडालाय. एक इसमाने महिलांच्या बाथरूममध्ये घुसून व्हिडिओ घेताना आढळून आल्याने तेथील कामगारांनी त्याला पकडलं आणि चोप दिला. व्हिडिओ चित्रित करताना तरुण आढळल्यामुळे लोकांनी गोंधळ केला. व्हिडिओ काढून पळून जात असताना तिथल्या कामगारांनी इसमाला पकडला आणि चोप दिला. त्याचा व्हिडिओ आणि फोन तपासणी केली जात आहे. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलय.
मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर या संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च करण्यात आले. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रिल करण्यात आला. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रिल करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील बहुचर्चित बाभुळगाव येथील अनिकेत सादूडे या ८ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या प्रणय पदमने आणि शुभम इंगळे या दोन्ही आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर समक्ष हजर केलं. न्यायालयाने दोन्ही आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आलीये. या दोघानी १२ मार्चच्या रात्री अनिकेतच अपहरण करून गळा दाबून हत्या केली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ६० लाख रुपये खंडणी मागणारे पत्र अनिकेतच्या घरासमोर टाकले होते. अखेर ९ दिवसानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत या दोन्ही आरोपींना अटक केली होती.
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. या आगीत प्लास्टिक आणि रासायनिक कंपन्यांमधील वापरातील वस्तू जळून खाक झाले आहेत. आग आणि धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाड MIDC तील जीते गावच्या प्रवेशद्वाराजवळ ही भंगाराचे गोडाऊन होते. महाड MIDC आणि लक्ष्मी केमिकल्स कंपनीच्या अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील घटना आहे. येथील तीन वर्ष वयाच्या छोट्या मुलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. गोरेगाव पोलीस ठाण्यात हमजा यासिन दाभिळकर वय वर्ष 80 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आलाय. प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय. कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आलीय.
छगन भुजबळ आणि उज्वल निकम यांच्यात बंद द्वार चर्चा झाली. साधरण 25 मिनिटे चर्चा झाली मात्र माझी राजकीय भेट नाही असंच त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय. आमची भेट रोजच होते, मग आम्ही मारामारी करायच्या काय? ओळखी आहेत, त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला विधानसभेत भेटतो. प्रत्येकजण एकमेकांची विचारणा करतो. राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत. आम्ही शत्रू नाहीत, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
यंदाच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून 103 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्रातील 41,उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू मधील 12, हरियाणा 10, पंजाब,कर्नाटक 5 आणि मध्य प्रदेश उत्तराखंड प्रत्येकी 1 सहभाग घेतला. उत्कृष्ट ऊस उत्पादकता विभागात पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक पटकावलाय.
- नाशिक जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी
- जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय
- मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र बंदी आणि जमावबंदीचे आदेश
- आगामी सण उत्सव, ईद आणि नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- बंदीच्या काळात सभा तसच मिरवणुकांना परवानगी आवश्यक
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी आज कर्नाटक बंद ची हाक
बंदच्या समर्थनार्थ कन्नड रक्षक वेदिका संघटना रस्त्यावर...
बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलक एकत्र
आंदोलकांनी सर्किट हाऊस ते राणी चन्नम्मा सर्कल अशी निषेध रॅली काढली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचं मोठा पोलीस बंदोबस्त
बेळगाव मध्ये निदर्शने करत कन्नड रक्षण वेदिकेचा धिंगाणा..
माझे सर्वात जास्त सोशल मीडियावर फॉलोवर्स आहे, मला 3 लाख रुपये महिन्याला मिळतात
नितीन गडकरी
काल स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना केली अटक
पुढील सुनावणी 24 मार्चला होणार
गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठा दरम्यान दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब उघडकीस आली असून, या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना विविध साथींच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे, या पाण्यातून दुर्गंध येत असल्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत,
हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे पालिका प्रशासनाने शुद्धीकरण केलेल्या पाण्याचाच पुरवठा नागरिकांना पिण्यासाठी करावा अशी मागणी देखील धुळेकर नागरिकांतर्फे पालिका प्रशासनाला करण्यात येत आहे,
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला असून, पालिका आयुक्तांनी त्याची दखल घेत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी देखील मागणी धुळेकर नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
- सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हाय कोर्टात याचिका
- पुरातत्व विभागाने कबरीला दिलेले राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी
- औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा याचिकेत दावा
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक...
प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच सपकाळ पुण्यात
पुण्यात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून ती कमी करण्यासाठी सपकाळ काही करणार का हे पहावं लागेल
हर्षवर्धन सपकाळ यपत्रकार परिषद
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष
पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्वागताचे लागले बॅनर....
समता परिषदेचा ओबीसी महाएल्गार मेळावा आज जळगावात होत असून याला ओबीसी नेते आ. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून यात ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
सतीश उर्फ खोक्या भोसलेने क्रिकेटच्या बॅटने अमानुष मारहाण केली होती
या प्रकरणी त्याच्या विरोधात चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
आज चकलांबा पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसले ला शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर केले होते
यावेळेस त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कैलास वाघ या व्यक्तीला अमानुष बॅटच्या साह्याने मारहाण केली होती.
या तपासाकामी त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे
नक्कीच त्या व्यक्तीला बॅटने का मारहाण केली हे तपासामधनं समोर येणार आहे
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आज वारकऱ्यांचा मेळा भरलाय..
आजपासून दोन दिवसीय 13 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डीत प्रारंभ झालाय..
शिर्डी शहरातून सकाळी वारकऱ्यांनी वीठू नामाचा गजर करत पालखी मिरवणूक काढली..
या संमेलनात राज्यभरातील विविध साहित्यिकांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत..
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे..
नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्टा आणि सातपुड्याच्या दुर्गम भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटर पर्यत पायपीट करावी लागते
मात्र प्रशासन या पाणीटंचाई वर उपाय योजना करण्यापेक्षा कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र असून मार्च महिन्यात पाण्याची इतकी विदारक स्थिती आहे तर एप्रिल मे आणि जून महिन्यात या भागात पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र होणार असल्याचे चित्र आहे...
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय
नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायटी पाणी वाया घालत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे
महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत पालिकेकडून शहरातील पाणीपुरवठ्याचे १४१ झोन तयार करण्यात आले आहेत.
त्यातील ४७ झोन तयार झाले आहेत. तर, ४१ झोनमध्ये मीटरद्वारे मुख्य टाकीतून सोडण्यात आलेले पाणी, सोसायटीच्या टाकीत पडलेले पाणी याची मोजणी केली जात आहे.
त्यानुसार,प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे सोसायटीने पाणी घेणे आवश्यक आहे.
मात्र, काही सोसायट्यांचा पाणी वापर ५०० ते ६०० लीटर पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे
पाण्याचा हाच उपद्रव टाळण्यासाठी महापालिका आता थेट नळ कनेक्शन तोडणार आहे.
गंगाखेड शहरातील नगरे नगरेश्वर गल्ली येथील घटना, काही काळ तणावाचे वातावरण
आठ आरोपी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शर्ट फाटे पर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण , अभिषेक खडवे वय 22 वर्ष असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव
पुणे शहर,पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या ते काँग्रेसभवनमध्ये बैठका घेणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असून त्यामुळेच त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा मागील जवळपास तीन पंचवार्षिक सलग पराभव होतो आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही. तीन आमदार होते, मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला.
काँग्रेसचा एकही आमदार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाच मागील ३ वर्षे झालेल्या नाहीत.त्यामुळे तिथेही पक्षाचा कोणीही नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य नाही.
एकूणच राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेसला सध्या तरी एकही लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही.
उमरगा बसस्थानकातून कलबुर्गी मार्गावर जाणाऱ्या विविध आगाराची बस वाहतूक बंद
आज कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदची हाक दिली असून,या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये वाहतूक करणारी बससेवा करण्यात आली बंद
महाराष्ट्रातील जालना,छत्रपती संभाजी नगर व लातूर अदी आगाराच्या एस.टी बस धावतात उमरगा कलबुर्गी या मार्गावर
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी
सर्वत्र कन्नड भाषेला प्राधान्य द्यावे, म्हादई योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी,
अशा विविध मागण्यांसाठी आज कर्नाटकमध्ये पुकारण्यात आला आहे बंद
शनिवारी व रविवारी सलग सुट्यांमुळे त्यातच दहावी बारावीच्या परिक्षा संपल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे.
अशातच मंदिर परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने मांडली आहेत.
यांचा भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय मंदिराच्या प्रवेशद्वारातच दुकाने मांडण्यात आल्याने मंदिराची सुरक्षा धोक्यात आली आहे.
येथील वाढत्या अतिक्रमणामुळे मंदिर परिसरात नवीन समस्या निर्माण झाली आहे.
याकडे पोलिस मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले च्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत तर चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये बॅटच्या साह्याने अमानुष मारहाण प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले ला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती ती पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे यानंतर न्यायालयीन कोठडी मदन त्याला चकलांबा पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेऊन त्याला आज गेवराईच्या तालुका न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे पुन्हा सतीश उर्फ खोक्या भोसले ची पोलीस कोठडी मागणार आहेत. अशी माहिती तर पैसे अधिकारी यांनी दिली आहे.
आमदार झाल्यानंतर अमरावती शहरात प्रथम आगमनानिमित्य कार्यकर्त्यांनी अमरावती रेल्वे स्टेशन वर स्वागतासाठी केली मोठी गर्दी
ढोल ताशे, फटाक्याच्या आतषबाजीत आमदार संजय खोडके यांचे अमरावती मध्ये स्वागत
आ. सुलभा खोडके, आणि आ.संजय खोडके दोन्ही पती पत्नी अमरावती मध्ये आमदार झाल्याने अमरावतीकरणा विकासाचा मोठ्या अशा...
अमरावती च्या व विदर्भाच्या विकासासाठी,मी प्रयत्नशील राहील..अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने जो माझ्यावर विस्वास् टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो..
विदर्भाच्या विकासाच जे धोरण आमच्या पार्टीने ठरविलं आहे,ते विदर्भाच्या विकासासाठी कसोटीने पर्यन्त करू अशी प्रतिक्रिया आ.संजय खोडके यांनी दिली
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये कुठल्याही परीस्थितीत मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
माणसांनी ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा या मानवी हक्कांचे उल्लंघन करतात.
माथेरानमध्ये तूर्तास ई रिक्षांची संख्या वाढवली जाणार नसून त्यासाठी सरकारने फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
माथेरामधील विविध प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात सलग चार दिवस सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने आपली भूमिका मांडली.
माथेरानमध्ये पेव्हर ब्लॉक टाकण्यासंदर्भात नीरीकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रूपये देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
धाराशिवच्या भूम उपविभागीय अधिकाऱ्यांना ठाकरे गटाकडून निवेदन देत ही मागणी करण्यात आलीय.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निवडणूक जाहीर नाम्यात 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
ते द्यावे अशी आठवण निवेदनाद्वारे करून देण्यात आलीय.
यावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
यातूनच विक्रेत्यांनी 24 लाख पॅकेट्सची नोंदणी केली आहे.
207 कोटी रुपयांचे कापसाचे बियाणे जिल्ह्याला लागणार आहे यासोबतच सोयाबीन, तूर, मुंग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका या विविध पिकांच्या बियाण्यासह खताची तीनशे कोटीची उलाढाल जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.
शिरवणे एमआईडीसी मधील सुबोधा कंपनीमध्ये लागली आग
रात्रीच्या सुमारास लागली आग
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी झाल्ल्या असून त्यांच्या रात्रभर करण्यात आलेल्या प्रयत्नाने पहाटे आगीवर नियंत्रण.
सुदैवाने जीवितहानी नाही.
रात्री एक वाजता दरम्यान मार्केट मध्ये भीषण आग,आगीत चार दुकाने जळून खाक
आगीत पन्नास लाख रूपयाचे साहित्य जळून खाक,राळेगाव पालिकेची अग्निशामक यंत्रणा ठरली फेल,त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
आग लागण्याचे कारण अस्पष्ट,आगीत साडी सेंटर,इलेक्ट्रॉनिक,फर्निचर ही दुकाने जळून खाक
० महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर
० राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण
० आज सुतारवाडीत सुनील तटकरेंसोबत अंतिम चर्चा
० हनुमंत जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
० स्नेहल जगताप बैठकीला अनुपस्थित राहणार
० भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांची खेळी ?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.