Maharashtra Live Update: नाशिकमध्ये उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 17th December 2024 : आज मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, संसदेत वन नेशन वन इलेक्शन सादर होणार, महाराष्ट्रात थंडीची लाट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 12 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

नाशिकमध्ये उद्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक. या बैठकीसाठी समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समता सैनिक उपस्थित राहणार आहेत . मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेशना केल्याने समता परिषद आक्रमक झाले आहे.

अर्नाळामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

अर्नाळा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बोळीज येथील राहत्या घरी आत्महत्या केली.पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे असं आत्महत्या केलेल्या पोलीसाचे नाव आहे.

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा- आमदार आमश्या पाडवी

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार आमश्या पाडवींनी कारवाईची मागणी केली. आपल्या मुलीला मारहाण होत होती बाप म्हणून मी त्या ठिकाणी गेलो मात्र माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे आमदारांचे स्पष्टीकरण.

सोलापुरात परभणी घटनेच्या निषेधार्थ डिपीआयचे रास्ता रोको आंदोलन

सोलापुरात परभणी घटनेच्या निषेधार्थ डिपीआयचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सोलापुरातील एसटी स्टँड परिसरात आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांचा लावला आहे कडक बंदोबस्त लावण्यात आलाय. कार्यकर्ते रस्त्यावरच बसून आंदोलन करत आहेत.पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतल. रास्तारोको आंदोलनामुळे स्टॅन्ड परिसरात लागल्या होत्या.

नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी काँग्रेस भवन कार्यालयात बैठकीची तयारी सुरू आहे. नवनिर्वाचित आमदार विधान परिषद सदस्य आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रत्येकांशी 121 चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर मंथन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पद बदलण्याविषयी चर्चा होण्याची शक्यता. सायंकाळी 7 वाजता ही बैठक पार पडणार असून नागपुर ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात तयारी सुरू आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेचे आंदोलन

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अजित पवार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेच, पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले. काळ्या फिती बांधून आणि काळी कपडे परिधान करून निषेध आंदोलन केलं जातं आहे.

कल्याणजवळील टिटवाळा परिसरात पाणीटंचाई

शहरात पाणीटंचाई झाल्याने भाजपा आक्रमक झाले आहे. केडीएमसीच्या माजी उपमहापौर बैलगाडीवर हंडा कळशी घेऊन मोर्चा काढलाय. महापालिकेच्या अ प्रभागात कार्यालयात दाखल अ प्रभाग कार्यालयात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संतोष देशमुख मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करा: रोहित पवार

संतोष देशमुख मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करा, बीडचे पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकाराव, राज्यात अनेक STI स्थापन झाल्यात, मात्र यातून काही निष्पन्न होत नाही, त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा आणि बीड जिल्ह्यातलं पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी घ्याव. बीड जिल्ह्यात चांगला आयपीएस अधिकारी आणा, कुठलाही कलंक नसलेला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणा, तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, आमदार रोहित पवार यांनी मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली त्यावेळी रोहित पवार बोलत होते..

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.

Nagpur News: नागपूर विमानतळावर सुषमा अंधारे यांना एका अनोळखी व्यक्तीकडून धमकी

नागपूर विमानतळावर सुषमा अंधारे यांना एका अनोळखी व्यक्तीकडून धमकी

माज आला का? नीट राहायचं, असं म्हणत सुषमा अंधारे यांना अनोळखी व्यक्ती ने दिली धमकी

नागपूर हून पुण्याला येत असताना सुषमा अंधारे यांना अनोळखी व्यक्तीने समोर येऊन दिली धमकी

नागपूर विमानतळाचे सी सी टिव्ही तपासले पाहिजे, सुषमा अंधारे यांची मागणी

Beed News: संतोष देशमुख खून प्रकरणात जातिवाद नाही - आमदार प्रकाश सोळंके

संतोष देशमुख खून प्रकरणात जातिवाद नाही

राजकारण तर नाहीच नाही

कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केली भूमिका

मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही परंतु मी नाराज नाही

आता मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न

Maharashtra Live Update : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपची नोटीस

भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष विरोधी काम केल्याने प्रदेश भाजप सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती आमदार रणजितसिंह मोहिते यांच्यावर कारवाईची मागणी. त्यानंतर मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली.

Maharashtra Live Update : विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार

18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख

Maharashtra Live Update : कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राग, मतदारांशी चर्चा करणार - नाराज भुजबळांची प्रतिक्रिया

रोहित पवारांनी घेतली मयत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट

परभणी प्रकरणात मयत झालेले 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी SP चे नेते रोहित पवारांनी भेट घेतलीय,दोन दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती, न्यायालयीन कोठडीत सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र मोठा गदारोळ झाला होता,मयत सोमनाथ यांच्या कुटुंबीची भेट घेऊन परिस्थितीचा काढावा रोहित पवार यांनी घेतला आहे.

मी मागील २ दिवसांपासून अजित पवारांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. पण भेट झालेली नाही.
अमोल मिटकरी

25 जानेवारी 2025 ला पुन्हा एकदा स्थगित केलेल आमरण उपोषण सुरू करतो - मनोज जरांगे

Sangli News : वायफळे खून प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई

सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या वायफळे येथील खून प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली आहे.पाच दिवसांपूर्वी वायफळे येथील फाळके कुटुंबातील वाद उफाळून आला होता.

मनोज जरांगेंचं सामूहिक उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आता सामूहिक उपोषण होणार आहे. कोणावरही उपोषण करावं असं बंधन नाही. इथे येऊन फक्त बसलं तरीही चालतं. ज्यांची इच्छा आहे ते उपोषणाला अंतरवाली सराटीत बसू शकतात.

मनोज जरांगे पाटील

भाजप मध्ये राष्ट्र पहिले नंतर पक्ष आणि स्वतः नंतर त्यामुळें अजिबात कोणाला नाराजी नाही.भाजपा मध्ये सर्वात मोठा पद कार्यकर्ता आहे.त्यामुळे कोणाला मंत्रिपद मिळाला का नाही मिळाला का याबद्दल कोणालाही नाराजी नाही.
राम कदम

Maharashtra Live Update : नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता परिषदेची बैठक होणार

छगन भुजबळ यांना पक्षात अपमानाची भूमिका मिळणार असेल तर आम्ही सर्व एक मुखाने राजीनामा देणार राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खेरे यांनी दिला इशारा.

Yavatmal: यवतमाळ पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात भाजपचे डॉक्टर अशोक उईके, शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचे आहे. आगामी वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्याने यवतमाळ जिल्ह्यात आपली ताकद वाढविणे भाजप तसेच शिवसेना, राष्ट्रवादीसाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत पालकमंत्री पद किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना भाजपाला असून जिल्ह्यात भाजपची ताकद सर्वाधिक असली तरी यंदा दोन आमदार भाजपचे कमी झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देण्याची तयारी भाजपची असणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात पुणेकरांचे आंदोलन

पुणे महानगर पालिकेच्या झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आज निलेश निकम यांनी पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांच्या दालनामध्ये झोप काढत आंदोलन केलं.

दळवी हॉस्पिटल मध्ये चाललेल्या अंदाधुंद कारभाराबाबत पुरावे देऊन सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग कारवाई करत नाही.

तसेच झोपेचं सोंग घेत असल्यामुळे आरोग्य प्रमुखांच्या दालनामध्ये झोपून आंदोलन केले..

दळवी हॉस्पिटलमध्ये मागील दोन वर्षांपासून निलेश निकम यांच्या मागणीनंतर फायर फायटिंग सिस्टीम बसविण्यात आली.

हॉस्पिटलच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेल्या सुया उघड्यावरती फेकण्यात आलेले आहेत .हॉस्पिटल प्रशासनाला विचारणा केली असता त्या आमच्या नाही येत असे उत्तर देत याकडे गांभीर्यपूर्व लक्ष दिले गेले नाही.

तसेच या हॉस्पिटलची सुरक्षा ही रामभरोसे आहे हॉस्पिटलचे सीसीटीव्ही सुधा पूर्णपणे कार्यरत नाही...

हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचा पूर्णवेळ डॉक्टर नाही . निकम यांच्या म्हणण्यानुसार या हॉस्पिटलमध्ये छत्रपती शिवाजीनगर परिसरातील गोरगरीब नागरिक नागरिक उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या जीवाची खेळत आहे.

अशा मध्येच जर या उघड्या पडलेल्या सुया कुणाला लागल्या तर मोठ्या गंभीर आजाराने त्रस्त होऊ शकतात .

योग्य ती खबरदारी प्रशासनाने घेऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

Pune News: पुण्यात थंडी वाढल्याने चहाच्या दुकानावर गर्दी

राज्यात मागील दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी तीव्र झाल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. तापमान नीचांकी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला पुण्यातील चहा टपऱ्यांवर सध्या पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये आज 8 अंश सेल्सिअस

तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर आणि कश्मीरचे फील पुण्यात येत आहे. लोकांनी महाबळेश्वरला फिरायला जाण्यापेक्षा पुण्यातच फिरायला यावं.

नांदेडच्या बारड येथे लालचुटुक स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग

नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांनी फुलवली स्ट्रॉबेरी शेती

बारड येथील शेतकऱ्यांचे स्टोबेरी शेतीचे पाचवे वर्ष

महाबळेश्वर सारख्या थंड वातावरण येणारी स्ट्रॉबेरी मराठवाड्या सारख्या परिसरात पहावयास मिळत नाही. मात्र नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आता हा शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती साधत आहेत.बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याचे बी.एससी.ऍग्री पर्यंत शिक्षण झाले आहे.मागील पाच वर्षापासून उपवार हे आपल्या शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहे.सुरुवातीला उपवार या शेतकऱ्याला अनेकांनी वेड्यात काढले.परंतु जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला.यंदा उपवार याने आपल्या 15 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.उपवार या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे.थेट शेतीच्या बंधावरूनच 400 किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत असल्याचे बालाजी उपवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना 241 कोटींच्या नुकसान भरपाईची प्रतिक्षा

यवतमाळ जिल्ह्याला चार महिन्यापूर्वी अतिवृष्टीने चांगले झोडपून काढले होते. त्यामुळे तब्बल पावणे दोन लाख हेक्टर वरील खरीप पिकांना तडाखा बसला त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला मात्र शासनाने हा प्रस्तावच मंजूर केलाच नसल्याने दोन लाख शेतकरी 241 कोटीची प्रतीक्षा करीत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार मागील २४ तासांपासून कुणालाच भेटले नाहीत

एकीकडे छगन भुजबळांची नाराजी दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील २४ तासांपासून कुणालाच भेटले नाहीत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत.

अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे.

Solapur Live : सोलापुरात एसटी शिवशाही बस पेटवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

सोलापुरात एसटी शिवशाही बस पेटवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात करण्यात आला गुन्हा दाखल

सोलापूर एस टी बस आगारात मध्यरात्री पेटवून दिली होती शिवशाही बस

सोलापूर एसटी बस स्टॅन्ड आणि आगार परिसरात तैनात करण्यात आला आहे तगडा पोलीस बंदोबस्त..

Maharashtra Live Update : बदलापुरात नामांकित बिस्किटांमध्ये आढळल्या अळ्या

बदलापूरमध्ये नामांकित कंपन्यांच्या बिस्किटांमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. हे बिस्किटं एका चिमुकलीने खाल्ल्यानं पालक चिंतेत असून दुकानदारानं कंपनीकडे बोट दाखवत हात वर केल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com