Maharashtra News Live Updates : अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही- यशोमती ठाकूर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 16 October 2024: आज बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, जागावाटप, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Yashomati Thakur On Amravati Crime: अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही-यशोमती ठाकूर यांचा घणाघात

मरावती शहरात हत्येच प्रमाण वाढलं आहे तर बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली होती यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्र व अमरावतीची गती अशी केव्हा झाली नव्हती, दिवसाला दोन मर्डर, भर चौकात मर्डर होत आहे,त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच फेलिव्हर आहे तर अमरावती मध्ये तर पोलिसांचा धाकच राहिला नाही, सत्तेतील आमदार पोलीस ठाण्यात खून खराबा करत त्यामुळे महाराष्ट्र यांना माफ करणार नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केला

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीचे जागा वाटप याच आठवड्यात होणार

महाविकास आघाडीचा जागावाटप याच आठवड्यात जाहीर करून उमेदवारांच्या नावा संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीतील पक्ष निर्णय घेणार

जागावाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण बैठका होणार

महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा असलेल्या चाळीसच्या जवळपास जागांवर पुन्हा एकदा बैठकांमध्ये चर्चा होणार

काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीत बैठकीसाठी जाणार असल्याने आज उद्या मध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या जागावाटपसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती

अधिकाधिक जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून पुढील दोन दिवसात प्रयत्न केला जाणार

या आठवड्यात महाविकास आघाडी कडून 200 ते 220 जागांचं जागा वाटप जाहीर केले जाणार असल्याची शक्यता आहे

निवडणूक मतदानाचा अवघे 35 दिवस राहिलेले असताना तातडीने जागावाटप जाहीर करून उमेदवारांच्या याद्या याच आठवड्यात महाविकास आघाडीचे पक्ष जाहीर करू शकतात

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी अवघे काही दिवस मिळालेले असताना लवकरात लवकर उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचा महाविकास आघाडीतील पक्षांचा प्रयत्न

Bopdev Ghat Crime: बोपदेव घाट अत्याचार प्रकरण: दुसऱ्या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

- बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

- ⁠आरोपीला 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

- ⁠दुसरे आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मधून केली होती अटक

- ⁠आरोपीची ससून रुग्णालयामध्ये करण्यात येत आहे वैद्यकीय तपासणी

कोणत्याही प्रकारची योजना जाहीर केली की ती घोटाळ्यासाठी केली अशा पद्धतीचा विरोधक आरोप करतात.
गिरीश महाजन

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

पुण्यातील सर्व जलकेंद्रतील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक दुरूस्तीची कामे

संपुर्ण शहराला शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग या ठिकाणी दुरुस्तीचे कामं

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली माहिती

आम्ही जे बोलते ते करतो...मराठा समाज्याला आराक्षण देणार..ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार - शिंदे

आमचं जागावाटप जवळपास झालं आहे. अगदी बोटावर मोजण्या इतक्या जागा राहिल्या आहेत. कोणाचा उमेदवार कुठे स्ट्राँग आहे, हे बघून आम्ही जागावाटप करतोय - देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझं त्यांना आव्हान आहे - देवेंद्र फडणवीस

भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहे त्यांनी भाजप सोबत बंडखोरी केली..त्यामुळे या दोघांवरही कारवाई केली पाहिजे...
रवि राणा

महाविकास आघाडीमध्ये ऐरोली मतदारसंघाचा तिढा सुटेना.

महाविकास आघाडीमध्ये ऐरोली मतदारसंघाचा तिढा सुटेना.

ऐरोली मतदार संघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही.

काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांच्यासाठी आग्रही तर शिवसेना उबाठा तर्फे एम के मढवी यांच्यासाठी माजी खासदार राजन विचारे आग्रही.

एम के मढवी यांची गुन्हेगारी पाश्वभूमी असेल्याने मविआ चे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मढवी च्या उमेदवारीला विरोध.

काँग्रेसच्या स्क्रिनिंग बैठकीत अनिकेत म्हात्रे यांच्या नावावर चर्चा.

अनिकेत म्हात्रे यांना ठाकरे गटात पाठवून उमेदवारी देण्यासंबंधी देखील काँग्रेस सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती.

हिंगोलीच्या विधानसभेत भाजप विरोध भाजप

रामदास पाटील सुमठानकर विधानसभा निवडणूक लढविणार

भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

हिंगोली शहरात मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांशी पाच वर्षे समन्वय ठेवला नसल्याने तसेच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने आमदार मूटकुळे यांचा विधानसभा निवडणुकीतील प्रवास अडचणीचा ठरणार असल्याने भाजप निर्णय घेण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत रामदास पाटील सुमठाणकर यांनी वरिष्ठांच्या विनंती वरून घेतली होती माघार

विदर्भातील भाजपचे ३ माजी आमदार जानकरांच्या संपर्कात

विदर्भातील भाजपचे तीन माजी आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्या संपर्कात. यासोबतच एका विद्यमान आमदारांचा मुलगाही जानकरांना भेटलाये. रासपमधील विश्वसनीय सूत्रांची माहिती. तिन्ही माजी आमदार पश्चिम विदर्भातील असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेच्या मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याने चौघांची जानकरांकडे चाचपणी. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जानकरांनी विधानसभेसाठी दिला‌ 'एकला चलो रे'चा दिला नारा.‌ राज्यातील 288 मतदार संघातील लढण्याची जानकरांची तयारी.

महायुतीचे रिपोर्टकार्ड

Maharashtra News Live Updates : योजना बंद होणार नाही - अजित पवार

लाडकी बहीण योजना भविष्याचा विचार करुन आणली आहे. ही योजना बंद होणार आहे. यामध्ये वाढ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केला आहे. विज माफ, लाडकी बहीण यापुढेही सुरु राहील, असा विश्वास आम्ही देतोय, असे अजित पवार म्हणाले.

पारनेर मध्ये महाविकास आघाडीतला धक्का..

विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

आरोप-प्रत्यारोप करावे, पण तारतम्य असावे - अजित पवार

Maharashtra News Live Updates : थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद, अजित पवार दाखल

Maharashtra News Live Updates :  काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates : नागपूर ग्रामीण मधील काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ऐनवेळी रद्द

त्यांच्यात कोण मुख्यमंत्री याच्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण? यातच गुंतून राहावे. आमचे नियोजन झालं आहे.
छत्रपती संभाजी राजे

Pune Crime : अल्पवयीन मुलाने धारधार शस्त्राने हल्ला

पुण्याला लागून असलेल्या निगडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये काल रात्री दोन मुलांनी एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि हा गुन्हा करून फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांची निगडी पोलिसांनी अटक केली आहे

वंदे मातरम ला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करतात आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच माणसाने एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. तुम्ही वंदे मातरम याला विरोध करणाऱ्याला आमदार केला, काय तुमची नियत असेल?
संजय राऊत, शिवसेना(UBT)

Marathi Breaking Live Marathi  संजय राऊतांचा हल्लाबोल

अमित शहा आणि भाजप यांनी कोणताही त्याग केला नाही. अमित शहा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता, अमित शहा यांना शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला जातोय. त्यासाठी शिंदे यांचा वापर केला. त्याग आणि बलिदान हा शब्द भारतीय जनता पक्षाला शोभत नाही, हा अपमान आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितले त्याला त्याग नाही स्वार्थ बोलतात. बावनकुळे यांचा त्यात पहिला 50 कोटीची जमीन कवडीमोल गावात सरकारकडून ओढली आहे, हा त्याग का? शिंदे अजित पवार यांचा खेळ आहे, भारतीय जनता पक्ष मदारी आहे आणि हे सर्व माकडं आहेत, हे आता त्या तालावर माकडांना नाचवणार, असे संजय राऊत म्हणाले.

अमित शाह आणि भाजपने कोणताही त्याग केला नाही. महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता. त्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. भाजप आणि नेत्यांना त्याग आणि बलिदान शब्द शोभत नाही.
संजय राऊत, शिवसेना(UBT)

२६ तारखेला मविआचं सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही - संजय राऊत

Marathi Breaking Live Marathi : विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Maharashtra News : विधानसभेचा बिगुल वाजताच महायुती आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण

Mumbai News: महायुतीच्या पत्रकार परिषदेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

आज होणाऱ्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पत्रकार परिषद.

तिन्ही पक्षात तिढा नसणाऱ्या जागा पहिल्या यादीत होतील जाहीर.

ज्या जागांवर अजूनही तिढा कायम आहे त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर काढला जाणार मार्ग.

Nashik News: - नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

- जन्माला आला मुलगा आणि हातात दिली मुलगी

- जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा म्हणून नोंद

- मात्र डिस्चार्ज देताना हातात दिली मुलगी

- हातात मुलगी दिल्यानंतर नातेवाईक झाले अवाक

- नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात घातला गोंधळ

- अपत्य घेण्यास नातेवाईकांचा नकार वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरूच

- प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी घटनेला फोडली वाचा

- जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले चौकशीचे आदेश

Assembly Election 2024: आचार संहिता लागू होताच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर; दीड हजार गुन्हेगारांची कुंडली तयार

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होतात शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघ तसेच फुलंब्री मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दल तयारीला लागलं असून आता अलर्ट मोडवर आलं आहे.

या अनुषंगाने दीड हजार समाजकंटकाची कुंडली देखील तयार करण्यात आली असून अवैध धंद्यावर पोलीस आता करडी नजर ठेवणार आहे. पोलिसांनी सावधगिरी बाळगून 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार यांची कुंडली तयार केली असून त्यांची सर्व माहिती देखील मागविण्यात येत आहे. दरम्यान निवडणूक काळात पोलीस आयुक्तांनी शहरातील 97 जणांना आपली शस्त्रे जमा करण्याच्या नोटीसा बजावल्या असून सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर देखील आता सायबर विभागाची करडी नजर राहणार आहे.

Mumbai Fire News: ओशिवरा परिसरातील इमारतीला मोठी आग

ओशिवरा परिसरातील इमारतीला मोठी आग

ओशिवरातील रिया पॅलेस इमारतीला दहाव्या मजल्यावर लागली मोठी आग

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर

इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती

गणेशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे काम सुरू

Maharashtra Politics: महायुती- मनसेच्या युतीची चर्चा 

विधानसभेचा बिगुल वाजताच महायुती आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण

महायुती आणि मनसेमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती

मुंबईतील काही जागांवर महायुती मनसे विरोधात उमेदवार न देण्याच्या तय्यारीत ?

लोकसभेत मनसेने महायुतीला दिला होता बिनशर्त पाठिंबा

Sharad Pawar Baramati: शरद पवार यांचा आज बारामती, सांगली दौरा

गेले दोन दिवस शरद पवार पुण्यात होते

कार्यकर्ते भेटीसह इच्छुक उमेदवार पवारांना भेटले

शरद पवार आज सकाळी 11 वाजता बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर दुपारी 3 वाजता सांगलीला जाणार

सांगली इस्लामपूर येथे शिवस्वराज यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पवार उपस्थितीत राहणार आहेत

Chhatrapati Sambhjinagar: आचारसंहितेपूर्वी 48 तासात 200 कोटीच्या कामांना मंजुरी

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच छत्रपती संभाजी नगर मध्ये कोट्यावधी रुपयांची उड्डाणे पूर्ण करावी लागली. आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्यातील तब्बल 400 कोटी रुपयांची बिले काढण्यात आली तर 200 कोटींच्या कामांचे आदेश मंजूर करण्यात आल्याची माहिती कोशागर विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मार्च 2025 पर्यंत मंजूर करण्यात आलेला निधी हा आताच संपवण्यात आलाय.

Amravati News: -सुलभा खोडके यांच्या निलंबनानंतर काँग्रेस चे माजी मंत्री सुनील देशमुख यांचा मार्ग मोकळा

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आलं आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात मविआचे नेते व काँग्रेसचे नेते डॉ.सुनील देशमुख यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला तर विद्यमान आमदार सुलभा खोडके ह्या महायुतीच्या उमेदवार असणार आहे.कारण त्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे..

Beed News: सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून चोरट्यांकडून रेल्वेत चोरी; प्रवाशांचे दागिने लंपास

परळी लोहमार्गावर थेट रेल्वेत चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानका दरम्यान कोल्हापूर/नागपूर रेल्वे गाडी क्रॉसिंगसाठी थांबली असता दोन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मागील महिनाभरात ही चौथी घटना असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूर/नागपूर एक्सप्रेस रेल्वे क्रॉसिंग साठी थांबली होती. याचाच फायदा घेत चोरट्याने दोन प्रवाशांचे दागिने लंपास केले आहे. यापूर्वी देखील सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड करत चोरट्यांनी रेल्वे थांबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यात चोरीच्या घटना देखील घडल्या आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रवाशांच्या फिर्यादीवरून परळी रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Maharashtra News:  अंतरवालीत सरटीत आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद, काय भूमिका घेणार?

जालन्याच्या अंतरवालीत आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 11 वाजता मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मनोज जरांगे आज मराठा समाजाच्या बैठकीची तारीख घोषित करणार असल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com