
नाशिकच्या देवळा तालूक्यातील माळवाडी येथील शेतकरी गणेश दत्तू बागूल यांनी आपल्या शेतात पपई बागेची डिसेंबर महिन्यात लागवड केली होती. सात महिन्यानंतर फळ येण्याच्या अवस्थेत असताना अज्ञात लोकांनी शेतात प्रवेश करत त्यांच्या पपई बागेवर तणनाशकाची फवारणी केली. दहा दिवसानंतर ही घटना उघडीस आली असून या प्रकरणी त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचनामा करण्याची मागणी करत अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले त्यांना शोधून कारवाईची मागणी केलीय.
नवी मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे
क्षणभर विश्रांतीनंतर आज पावसाला सुरुवात झाली आहे
बेलापूर खारघर इत्यादी ठिकाणी पाऊस पडत आहे
मावळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. समुद्राला देखील उधाण आले असून जवळपास तीन मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे
० माथेरानच्या शॉर्लोट तलावात तीन पर्यटक बुडाले
० तिघेही पर्यटक नवी मुंबई येथील असल्याची माहिती
० सुमित चव्हाण वय 16 वर्ष, आर्यन खोब्रागडे वय 19 वर्ष आणि फिरोज शेख वय 19 वर्ष अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत
० 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी तिघेजण बुडाल्याची माहिती मिळते आहे.
० सह्याद्री सेस्क्यू टीम आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी बचाव कार्य करीत आहेत तर अन्य बचाव पथकेदेखील पोहोचत आहेत
- नाशिक शहरात अवघ्या तासभर पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
- नाशिक त्र्यंबक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना या पाण्यातून वाहन चालवताना करावी लागत आहे कसरत
- रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन चालवल्याने अनेक वाहन पडत आहे बंद
- नाशिक त्र्यंबक रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने
- तब्बल तीन ते चार किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा
- त्र्यंबकेश्वरहून नाशिकला येणारा आणि नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता वाहतूक कोंडीमुळे ठप्प
- नाशिक महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या मान्सूनपूर्व कामांचा फज्जा
- मान्सूनपूर्व काम केवळ कागदावरच पूर्ण झाल्याने शहरात प्रमुख रस्त्यांवर साचले पाणी
देड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगाना राज्यातील श्रीक्षेत्र बासर येथील श्री सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबाद मधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील १८ जण आले होते.
- नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात...
- गेल्या अर्धा तासापासून वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू...
- अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची झाली तारांबळ...
- नाशिक शहराला आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा देण्यात आला होता इशारा...
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरीता रत्नागिरी, रायगड या जिल्ह्याला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मावळातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. रविवारी पर्यटनासाठी आलेले अनेक जण नदीत पडल्याची भीती. बचावकार्य सुरू असून मुसळधार पावसामुळे शोध मोहीमेत अडथळे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील गावंडगाव येथे काही दिवसांपूर्वी गंगाराम भागवत यांच्या घराचे नुकसान होऊन त्यात त्यांचे आई-वडील जखमी झाले होते,छगन भुजबळ हे आज त्यांच्या घरी पाहणी करण्यास गेले असता जोरदार पाऊस सुरू झाला. अशा परिस्थितीत भुजबळांनी त्यांच्या घरी जात जखमींची विचारपूस केली,त्यांना शासनाकडून घरकुलसाठी जी मदत असेल ती देण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. रविवारची सुट्टी असल्याने भक्तांचा सागर माहुर गडावर पाहायला मिळाला. भक्तीमय वातावरणाने संपूर्ण माहूरगड गजबजून गेला होता.
अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ...
पावसामुळे नागरिकांना मिळणार उकाड्यापासून दिलासा..
अनेक भागांमध्ये शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांसाठी हक्कांची पूर्तता यासह एकूण १७ मागण्यांसाठी सलग सात दिवस उपोषण केलं. सातव्या दिवशी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली, मात्र त्यानंतरही काही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही.
आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्णबधिर व मूकबधिरांनी थाळ्या वाजवून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. शेकडो कर्णबधिर व मूकबधिर आंदोलनात सहभागी झाले होते.
- शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतात पेरणी.
- यावेळी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केले.
- पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र खरीप पेरणीला सुरुवात.
पद्मश्री अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते निसर्ग हॉटेल रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि निवेदिता सराफ, यांची उपस्थिती.
राज्यात गेल्या २४ तासात रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात रेड अलर्ट आणि अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर, जालना या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आले होते. तसेच राज्यातील पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय हवामान विभागाकडुन देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढिल २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तसेच पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापुर घाट, आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे NDRF व SDRF यांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा रविवार असल्याने आज शिर्डीत साईभक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे.. साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या असून सर्वत्र साईनामाचा जयघोष बघायला मिळतोय.. गर्दी नियंत्रित करताना सुरक्षा रक्षकांची दमछाक होत असली तरी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी साई संस्थान विशेष खबरदारी घेत आहेत..
नाशिक जिल्ह्यातील कळवण,निवाणे या परीसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे,अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा मात्र सुखावला असून, पेरणीच्या कामांना जोरदार सुरूवात होणार आहे.
वर्धेच्या देवळी तालुक्यातील देवळी ते दिघी रोडवर जागोजागी खड्डे पडले असून दिघी गावाला येणारी बस बंद झाली आहे.
विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
अनेकदा तक्रारी करून सुद्धा उपाययोजना झाली नसल्याने युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये उतरून आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी येऊन रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच युवा संघर्ष मोर्चा ने सांगितलंय.
उद्धव जी आणि राज एकत्र येतील असे ही मला काही दिसत नाही
छगन भुजबळ
चंदन नगर भागातील एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळी सोलापूर ग्रामीण पोलीस पथक दाखल
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून चंदन नगर भागात केला जातोय पंचनामा
एन्काऊंटर करण्यात आलेल्या घराला पोलिसांनी केलं सीलबद्ध
डॉक्टर्स आणि फॉरेन्सिक टिम पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी झाली दाखल
काल सायंकाळी आलेल्या वादळामुळे तब्बल 200 घरांचे नुकसान....
म्हसावद परिसरासह राज्यमार्ग क्रमांक एकवर 100 हून अधिक झाडे पडली उल्मळून.....
विद्युत खांबवर झाड पडल्याने गेल्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित....
गेल्या दोन दिवसात 100 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद...
शेतीसह व्यापारांचा प्रचंड नुकसान अनेक दुकानदारांना बसला फटका....
० रोहा तालुक्यातील गारभट गावाजवळची रात्रीची घटना
० कोलाड जवळील पुगाव इथून पाली नांदगावकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याचा काही भाग मोरीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला
० वाहून गेलेल्या रस्त्याच्या भागात आज सकाळी अडकला टेम्पो
० सुदैवाने टेम्पोचालक बचावला
० या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे
० खालचे गारभट, हांडेवाडी, खरबाची वाडी या गावांचा रस्ताने असलेला संपर्क तुटला आहे
आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून साकारलं अहिल्यादेवी चौकात राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचा सुंदर असे शिल्प या ठिकाणी उभारून सुरुवात करण्यात येत आहे
- मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कारवाईला सुरुवात
- अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
- महापालिका आणि पोलिसांचे संयुक्तरीत्या कारवाई
- नाशिक शहराचा मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरात अतिक्रमणाची मोहीम
- शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिक्रमण मोहीम
केदारनाथ येथे दर्शनाकरिता गेलेले वणी येथील तीन लोक हेलीकॉप्टर क्रैश मधे मरण पावलेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.राजकुमार सुरेश जयस्वाल (स्वतः)
श्रद्धा राजकुमार जयस्वाल (पत्नी
काशी राजकुमार जयस्वाल (मुलगी)
ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात राहत आहोत हा आमचा गुन्हा आहे का
भीक नको हवे आमच्या जागेत राहावे
घंटा नाद आंदोलन
शनिवार वाड्याच्या शंभर फुटापर्यंत बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी घंटा नाद आंदोलन
भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे ह्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत, त्यांनी सकाळी विदर्भाचे कुलदैवत माता अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन घेतलं,
यावेळी पंकजा मुंडे यांनी अंबादेवीची ओटी भरत मनोभावे पूजा केली... तर अंबादेवी संस्थानच्या वतीने पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला,
तर जुनी अंबा नदी असलेल्या अंबा नाल्याच संवर्धन करून त्याच जतन करावं अशी मागणी संस्थांच्या वतीने करण्यात आली
याबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा मुद्दा निकाली काढू अस आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने केली स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
व्हिडियो व्हायरल
स्मार्ट मीटर लावण्यास रहिवाशांसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध
कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरातील कैलास होम्स सोसायटी मधील घटना
स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आणखी तीव्र आंदोलन करू ठाकरे गटाचा इशारा
वसई विरार शहरात रात्री पासून पावसाचा जोर कायम, यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले
साचलेल्या पाण्यावर उपयोजना करण्यासाठी पालिकेची कोणतीही यंत्रणा सज्ज नाही.
सकाळपासूनच वातावरणात झालेल्या ढगाळ वातावरणामुळे वसई विरार शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळपासूनच रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
राजकुमार जयस्वाल,श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल नामक मुलगी असे मृतकाची नावे असल्याची माहिती
12 जून रोजी वणी इथून केदारनाथ साठी गेले
शहरातील ३२ महत्त्वाच्या चौकांवर प्रवेश बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालक-मालकांविरोधात पुणे पोलिसांनी १८ गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या चार दिवसांत अवजड वाहनांमुळे दोन महिलांना प्राण गमवावे लागल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.
नागपूर विभागातील ब्रम्हपुरी - नागभीड मार्गा दरम्यान एका वळणाला मुख्य ट्रॅकशी जोडण्याचे काम सुरू असल्याने आठ तासांचा मेगा ब्लॉक करण्यात आला आहे.
यामुळे त्यामुळे गोंदिया - नागभीड - बल्लारशा ही महत्त्वाची पॅसेंजर आणि छत्तीसगड, तसेच दक्षिणेत जाणाऱ्या जलद गाड्या प्रभावित झाल्या आहेत.
यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली.
कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन एसटी बसेस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या असून, या नव्या बसांचा लोकार्पण समारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला..
या बसेस कर्जत, पनवेल, खोपोली, शहापूर, वाशी, तुळजापूर या परिसरात नियमितपणे धावणार आहेत.
यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह व नियमित सेवा मिळणार आहे.
माथेरानमध्ये, पर्यटकांच्या गाड्यांसाठी असलेल्या पार्किंगमध्ये एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे.
यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र पर्यटकांचे आर्थिक नुकसान झाले असून आता या वाहनांची भरपाई कोण देणार म्हणून प्रश्न पुढे आला आहे.
० पुणा हद्दीत रस्त्यावरील मोरी खचून त्या ठिकाणी ट्रक आडकल्याने घाट रस्त्यात वाहनांच्या रांगा
० रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
० प्रवासी आणि पर्यटक वाहतुक कोंडीत आडकले
० रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, पोलादपुर, श्रीवर्धन आणि म्हसळ्यात जोरदार पाऊस
० माणगाव 170 MM, सुधागड 126 MM, पोलादपुर 128 MM, श्रीवर्धन 1 43 MM आणि म्हसळ्यात 145 MM पावसाची नोंद
० हवामान खात्याने शनिवारी रायगडला पावसाचा रेड अलर्ट दिला होता
० काल रात्रभर पावसाचा जोर कायम होता मात्र सकाळी पावसाने उसंत घेतली असून पावसा रिपरीप सुरु आहे
रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग
सकाळपासून सरींवर पाऊस
दक्षिण रत्नागिरी मध्ये पावसाचा जोर कायम
जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून
काजळी, अर्जुना, गोदावली दुथडी भरून
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 114 मिलिमीटर पावसाची नोंद
मंडणगड मध्ये सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस
त्या खालोखाल गुहागर 140, दापोली 138, रत्नागिरी 123, लांजा 118 मिलिमीटर पावसाची नोंद
आज दिवसभर पावसाचा जोर कायम असणार
मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात काही भागांत दमदार पावसाची नोंद झाली, मात्र, जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाचे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्प मात्र आजही तहानलेलेच आहेत. जिल्ह्यातील ९२ प्रकल्पांपैकी तब्बल ५५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. सध्या उर्वरित प्रकल्पात केवळ ११.३९ टक्केच जलसाठा उपलब्ध असून, अनेक प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने नदी-नाले वाहते झाले, विहिरींच्या पातळीत थोडी वाढ झाली असली, तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात अजूनही दमदार मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोकणाला हावामान खात्याने रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अलिबागसह महाड, पोलादपूर, माणगाव भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळ पासून सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिप रिप सुरू आहे.
वाशिमच्या कारंजा शहराच्या बसस्थानकाजवळील टी-पॉईंट परिसरात पोलिसांनी सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ५५७.७ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, त्याची अंदाजे बाजार किंमत ५२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात
आयर्न एव्हिएशनचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू
गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले
परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीला परभणी पोलिसांनी गजाआड केले आहे. कारवाईत पोलिसांनी १ म्हैस, चोरलेल्या शेळ्या विकून मिळालेले १.३५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली २ वाहने असा एकूण सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी परभणी जिल्ह्यातून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरल्याची, तसेच जालना जिल्ह्यातून इतर दोन साथीदारांच्या मदतीने एक म्हैस चोरल्याची कबुली दिली. पोलीसांच्या या कारवाईमुळे जनावर चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत
दस्तूरी ते साखरोळी पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद
खेड सुर्वे इंजिनिअरिंग येथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी
खेडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं नारंगी आणि जगबुडी नदिच्या पाणी पातळीत वाढ
काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर पावसाने उसंती घेतली होती
मात्र आज सकाळपासून उल्हासनगर अंबरनाथ शहरात ढगाळ वातावरण होते
आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट ठाणे जिल्ह्याला दिलेला आहे.
या शहरांमध्ये ढगाळ वातावरणामुळे आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे
तीन दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांतही मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे पुण्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
असा आहे अंदाज
आज पुणे परिसरात कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर सोमवारी कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपटी ते निगुडघर सुरु असलेले काम बंद पाडत केले आंदोलन
- अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकऱ्यांची बैठक लावुन प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
- भोर हद्दीतील वरंधा घाट ते शिंदेवाडी फाटा या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी निधी मंजूर असलेल्या भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरूयं
- शेतकऱ्यांच्या जमिनी, दुकाने, घरे या रुंदीकरणात जात असून मोबदला दिला जात नसल्याने शेतकरी आक्रमक
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज वसंत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्या दिवशी असतील त्या दिवशी पुणे शहराच्या हद्दीतील सर्व मटण, चिकन व दारू विक्री दुकाने बंद ठेवा 21 व 22 जून रोजी पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मुक्कामी थांबणार आहे.
लाखो भाविक व वारकरी या पालखी दर्शनासाठी पुण्यामध्ये येत असतात.
अशा आनंदमय वातावरणामध्ये पुणे शहरातील सर्व चिकन.मटन व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पुणे शहरात येणार आहेत.
त्यांना कोणत्या ही प्रकार अडचण येऊ नये. त्रास होऊ नये म्हणून आपण शहरातील मटण, चिकन, मद्य विक्री बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.
मूळशी तालुक्यात आज ढग फूटी होऊन लवासा रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
सायंकाळी सुमारे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या या पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले होते.
त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक हैराण झाले.
उरवडे गावाच्या पुढे मुठा खिंडीकडे जाताना आंबेगाव हद्दीतील साई मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते.
राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली.
नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ.
लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा,अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, बांधकामचे कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.