Maharashtra News Live Update: आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हम्पी येथील पर्यटकांचा मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates : मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज, अभिजित दिपके, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हम्पी येथील पर्यटकांचा मृत्यू

आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटत असताना नागाने चावा घेतल्यामुळे हम्पी कर्नाटक येथील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. गंगाधर मरप्पा असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आंबोली धबधब्यावर आंघोळ करत असताना अचानक एका सापाने चावा घेतला. त्यानंतर तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले.

कल्याण पश्चिम संदीप हॉटेल परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार

रस्त्यावर चालत असताना भटक्या कुत्राने 120 ते 130 नागरिकाना घेतला चावा

संदीप हॉटेल ते खडकपाडा रस्त्यावर घडला प्रकार

जखमी

नागरिक रुक्माई बाई हॉस्पिटल मध्ये दाखल

महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी उद्या नगर बंदची हाक

मुख्य आरोपीच्या अटकेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवणार,आमदार संग्राम जगताप यांची आक्रमक भूमिका

धीरज परदेशी यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आज करण्यात आला रवाना

अकोल्यात मिरवणुकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या PSI आणि पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अकोल्यातल्या महान गांवात आज भव्य मिरवणूकीत वाद झालाये. मिरवणूकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्य आज महान इथे भव्य मिरवणुक होती. या मिरवणुकीत हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

नांदेडमध्ये आरक्षण उपर्गीकरण मोर्चाला मोठा प्रतिसाद

आरक्षण उप वर्गीकरण विरोधात आज नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आला.रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती या मोर्चात सहभागी झाल्या होत्या .. दरम्यान हा मोर्चा राज्य सरकारसाठी इशारा आहे .. फडणवीस यांचा राजीनामा नको असेल तर होश मे आओ असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधात सातत्याने आंदोलन सुरू राहणार असून , हिवाळी अधिवेशनानंतर विधानसभेला घेराव घालणार असल्याचे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, “देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र त्यांच्या त्यागाची स्मृती जपणे, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि भावी पिढीसमोर त्यांचे शौर्य जिवंत ठेवणे, हीच शहीदांना खरी मानवंदना आहे. शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा आहे,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचं ठिय्या आंदोलन ..

माळीवाडा बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या सुरू केले आंदोलन..

महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीं याचा आज उपचारा दरम्यान झाला मृत्यू..

या घटनेतील मुख्य सूत्रधार शोधून तत्काळ अटक करावी..

आमदार अक्षय कर्डिलेंसह शेकडो युवक रस्त्यावर..

धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक..नगर शहरासह परिसरात तणावाचे वातावरण..

मनमाड - मालेगाव रस्त्यावरील वाहतूक दीड तासापासून ठप्प....

पवन चक्कीचे पाते घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या खाली उतरल्याने झाला वाहतूक ठप्प......

वाहतूक कोंडीत अडकले अनेक वाहन चालक.

एकवेळ मी फाशी घेईन पण समाजाला फसवणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचे भाविक आश्वासन

मी मराठा समाजाला कधीच चुकीचे सांगितले नाही. मी एकवेळ स्वतः फाशी घेऊन मरेन पण समाजाला खोटं सांगून फसवणार नाही. समाजाचा माझावर मोठा विश्वास आहे. तो मी कधीच गमावणार नाही असे आश्वासन ही जरांगे पाटील यांनी दिले.

पारंपरिक नृत्य सादर करत आदिवासी बांधवांचा जल्लोष; अकोल्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात

अहिल्यानगर : अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध पारंपरिक नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार किरण लहामटे यांनीही डीजेच्या तालावर ठेका धरत आदिवासी बांधवांसोबत जल्लोष केला. या मिरवणुकीत आदिवासी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समृद्धी महामार्गांवर ट्रक आडवा करून चालक चावी घेऊन पसार

- समृद्धी महामार्गांवर ट्रक आडवा करून चालक चावी घेऊन पसार

- ट्रक आडवा लावल्याने नागपूर मुंबई मार्गांवरील वाहतूक बंद

- समृद्धीच्या चॅनल नंबर 60 वरील घटना

- आरटीओ सोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती

- ट्रक आडवा केल्याने समृद्धीवरील एका मार्गाची वाहतूक विस्कळीत

- महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणी टीम घटनास्थळी दाखल

यवतमाळच्या सद येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

यवतमाळ : आदिवासी विकास परिषदेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थी, महिला आणि आदिवासी बांधव कार्यक्रमात सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत हा दिवस उत्साहात साजरा केला.

मुख्यमंत्री देव्रेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण

मुख्यमंत्री देव्रेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण

दोन वर्षापूर्वी नाट्यगृहाला लागली होती आग

कोल्हापूरच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध

Kolhapur: कोल्हापूर बदलत आहे, सर्वच निवडणुकांमध्ये लोकांनी प्रतिसाद दिला - प्रकाश आबिटकर

कोल्हापूर -

प्रकाश आबिटकर -

कोल्हापूर बदलत आहे

सर्वच निवडणुकांमध्ये लोकांनी प्रतिसाद दिला आहे

अनेक वर्षांची आमची स्वप्ने होती ती स्वप्ने आता पूर्ण होत आहेत

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रचा प्रभावी नेता तुम्ही आहात

फक्त आपल्या मनात यावे लागते, ते आले की सगळे होतं

कोल्हापूरच्या विकासाला आपला आशीर्वाद हवाय

Pandharpur: एकादशीच्या निमित्ताने आळंदीत माऊलींची नगरप्रदक्षिणा; संजीवन समाधी फुलांनी सजली

एकादशीच्या निमित्ताने आळंदीत माऊलींची नगरप्रदक्षिणा; संजीवन समाधी फुलांनी सजली

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रात्री आळंदीत दाखल झाल्यानंतर आज एकादशीच्या निमित्ताने माऊलींच्या पालखीची आळंदी नगरीत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.

यावेळी माऊलींची संजीवन समाधी विविध रंगीबेरंगी फुलमाळांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली.

kolhapur: कोल्हापुरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन अन् उद्घाटन कार्यक्रम

कोल्हापूर -

करवीर नगरीतील विविध वास्तूंचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडत आहे.

या कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित आहेत.

Amravati: जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावतीत भव्य आदिवासी सन्मान यात्रा

अमरावती

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावतीत भव्य आदिवासी सन्मान यात्रा

पारंपरिक वेशभूषा अन् आदिवासी नृत्याने अमरावती दुमदुमली; उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा

अमरावतीच्या गाडगेनगर परिसरातून या यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली.

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.

Parbhani: परभणी शहरातील रस्त्यांसह महामार्गांचीही दुरवस्था, नागरिकांचे प्रचंड हाल

परभणी -

परभणी शहरातील अनेक रस्त्याबरोबरच आता शहरातून जाणाऱ्या महामार्गांची ही खड्ड्यांनी चाळणी झाली आहे.

परभणी वसमत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने नागरिकांना वाहने चालवणें मुश्किल झाले आहे.

तिकडे परभणी जिंतूर महामार्गावरील कॅनल परिसरातही अशीच परिस्थिती आहे.परभणी पाथरी असो की परभणी गंगाखेड रस्ता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेत.

खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज नागरिकांना येत नाहीये आणि ज्यामुळे अनेक जण या खड्ड्यांमध्ये पडत आहेत

Latur: लातूरमध्ये सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या

लातूर -

लातूरमध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न..

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या 91 व्या वर्षी निमित्ताने सांगलीच्या आष्टा येथे जाहीर पार पडला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन अण्णासाहेब डांगे यांचा गौरव करण्यात आला.या निमित्ताने अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन चरित्रावर आधारित लिहलेल्या आम्रवृक्ष पुस्तकाचे प्रकाशन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले. या सोहळ्यानिमित्ताने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार सदाभाऊ खोत,आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान केला एकत्रित विमान प्रवास केला आहे. मात्र दोघांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधान आलेले आहे.

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा

नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा.

आरक्षण उपवर्गीकरन विरोधी महा मोर्चा कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन.

नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात.

आनंदराज आंबेडकर, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह दिग्गज नेते मोर्चात सहभागी.

मोर्चात लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी.

नरेंद्र पाटलांनी एमडीच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी 

महामंडळाच्या एमडीनी मागील काळात जे काही एकतर्फी निर्णय घेतले त्यामुळे मुळ मराठा समाज या योजनेतुन वंचित राहीला. नरेंद्र पाटलांनी एमडीच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी . लाभार्थींचे प्रश्न समझुन घेवुन मंगळवारी होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत विखे पाटील यांची भेट घेवुन अडचणी मांडणार आहे, ते योग्य न्याय देतील मला विश्वास आहे.

बारामतीत पुन्हा विमान दर्घटना, प्रशिक्षण विमान कोसळलं 

बारामतीमध्ये प्रशिक्षण विमान दुर्घटना झाली आहे.

लोणावळ्यात रिमझिम पाऊस सुरू;  भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घातली असून, पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांची तौबा गर्दी पाहायला मिळत आहे. एका बाजूला रिमझिम पावसाच्या सरी, धुक्याची दुलई आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श, तर दुसऱ्या बाजूला धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटणारे पर्यटक... अशा उत्साही वातावरणाने भुशी धरण परिसर फुलून गेला आहे.

रायगड दौऱ्यात राज ठाकरे यांनी घडवले शिवप्रेमाचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे मन सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज ठाकरे यांचे मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांनी शिव प्रेमाचे दर्शन घडवले. राज ठाकरे यांना मन सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली प्रतिमा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आठवणीने आपल्या पायातील चपला काढून ठेवल्या.

चार चाकी वाहन चालकाने, सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला चिरडलं घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर 12 परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला एका चार चाकी वाहन चालकाने आपल्या चार चाकी वाहनाच्या चाकाखाली चिरडलं आहे. या दुर्दैवी घटनेत चिमुरडी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सात ऑगस्टला रात्री दहा वाजता दरम्यान सेक्टर 12 या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून "विद्यार्थी क्रांती रॅलीचे आयोजन"

पुण्यातील कोथरूड परिसरातून मनविष्येच्या विद्यार्थी क्रांती रॅलीला सुरुवात

पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत सदस्य नोंदणीच्या अभियानासाठी बाईक रॅलीचे आयोजन

पुणे शहरात 51 हजार सदस्य नोंदणीच मनविसेच उद्दिष्ट

मानविसे कडून याच उपक्रमासाठी कोथरूड ते कोंढवा बाईक रॅलीचे आयोजन

महिलांना ‘शेतकरी’ म्हणून सन्मान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

निश्चित प्रकारे भावना खूप चांगली आहे... माझी महिला बहिणी ग्रामीण भागामध्ये राहते.. तिच्या नवऱ्याच्या नावावर शेती असते तर तिच्या नावावर नसते काही महिला अशा आहेत.. पिढ्याआणि पिढ्या त्यांच्या घरातील कोणाच्या नावावर सातबारा नाही... त्या महिलांना महिला शेतकरी म्हणून सन्मान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतूक कोंडी; रास्तारोकोमुळे वाहनांच्या रांगा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गाच्या मागणीसाठी चाकणमध्ये सुरू असलेल्या रास्तारोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

आंदोलकांनी महामार्ग रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर

विविध मागण्यासाठी कोल्हापुरात लिंगायत समाज आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

Raj Thackeray : मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन

मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन

गडकरी यांनी कंत्रटदार पळून गेले असल्याचे उत्तर दिले - राज ठाकरे

१५ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेलं - राज ठाकरे

जमीन विकली तर तुमचं अस्तित्व संपलं - राज ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

राठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील रात्री पंढरपुरात मुक्कामी होती. आज सकाळी अनेक मराठा समाज बांधवांनी त्यांची भेट घेतली.

फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेचा बार्शी मतदार संघात काकडे यांची नियुक्ती

फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेचा बार्शी मतदार संघात काकडे यांची नियुक्ती केली आहे.

त्यासोबतच ओमराजे यांच्या निषेधाचा ठराव मंजूर केला आहे.

ओमराजे निंबाळकर किंवा जो कोणी संघटनेच्या आड येईल त्याला तेवढ्याच ताकदीने विरोध केला जाईल

जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणनाऱ्यांनी राम मंदिरातील पैशाची चोरी केली,त्यासंदर्भात राम रक्षा आंदोलन सुरु असणार आहे.

Nashik Pune : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन...

पद्मश्री रघुवीर खेडकर देखील आंदोलनात सहभागी...

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव टोलनाक्यावर आंदोलन...

नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी आंदोलन...

हजारो नागरिक आंदोलनात सहभागी...

सोलापुरात बर्निंग टेम्पोचा थरार,सर्व घटना मोबाईल कॅमेरात कैद

- सोलापुरात बर्निंग टेम्पोचा थरार,सर्व घटना मोबाईल कॅमेरात कैद

- सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग टेम्पोचा थरार

- मोहोळ नजीकच्या सावळेश्वर टोलनाक्याजवळ घडली थरारक घटना

- काल रात्रीच्या दरम्यान टेम्पोला लागली अचानक आग

- सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadnavis Kolhapur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

गुलाब पुष्प देऊन केलं स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज ठाकरे माणगाव मध्ये दाखल

सोबत मनसे नेते संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित

थोड्याच वेळात करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी

माणगाव बायपास मार्गाची करणार पाहणी

त्यानंतर माणगाव मधील मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार

साताऱ्यातील गोडोलीत उद्यापासून अतिक्रमणावर 'हातोडा'

साताऱ्यातील गोडोलीत उद्यापासून अतिक्रमणावर 'हातोडा'

पोवई नाका - साईबाबा मंदिर व जकात नाका परिसरात होणार कारवाई

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनांची पालिकेची तयारी

Pune : चाकणहून मुंबई-ठाण्याकडे लालपरीचा धोकादायक प्रवास; बसची अवस्था सुधारण्याची चालकाचीच भावना

चाकणहून मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या एसटी बसची दुरवस्था समोर आली आहे. समोरील भाग तुटलेला असतानाही बस लांब पल्ल्याच्या प्रवासावर धावत आहे. मात्र, बसची अवस्था सुधारली पाहिजे, अशी भावना खुद्द चालकाने व्यक्त केली आहे.

काजूकतलीच्या बॉक्समध्ये बुरशी अन् जिवंत अळ्या; बुलढाण्यात खळबळ...

बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या “सीताश्री-लक्ष्मीनारायण” कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली. तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली FDA पथकाने संबंधित ठिकाणी धडक देत उत्पादन व उपलब्ध साठ्याची तपासणी सुरू केली. संबंधित उत्पादनावर बॅच/बारकोड क्रमांक 8906151422017 नमूद असल्याची माहिती आहे. या मिठाईची साठवणूक, गुणवत्ता आणि विक्रीबाबतच्या नियमांची तपासणी करण्यात येत असून, पुढील कारवाई प्रयोगशाळा अहवालानंतर कारवाई होणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे ..

भरतशेठ गोगावले यांचं पालकमंत्रीपद जवळपास निश्चित - गृहराज्यमंत्री योगेश कदम

भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री पद मिळणार आहे, हे जवळपास निश्चित झालेलं आहे, याबाबतची अधिकृत घोषणा व्हायची आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.. सच्चा शिवसैनिकाला न्याय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळतोय, त्यामुळे आमच्या शुभेच्छा भरतशेठ यांच्यासोबत असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलं आहे..

नंदुरबार शहरात पोलिसांची मोठी कारवाई...

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिराग गल्ली परिसरातून सात धारदार लोखंडी तलवारी जप्त केल्या आहेत. नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरातील अदनान खान सफदन खान पठाण याच्या घराच्या छतावर छापा टाकण्यात आला.पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून ठेवलेल्या 24 हजार रुपये किमतीच्या सात तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तोरणमाळवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर..

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी वाढण्यासोबतच हुल्लडबाजी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. या संदर्भात साम टीव्ही ने दाखवलेल्या विशेष बातमीची जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, नंदुरबारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या आदेशानंतर तोरणमाळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता; चाकण ते सिन्नरदरम्यान ठिकठिकाणी रास्तारोको

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या जुन्या मार्गाच्या मागणीसाठी आज चाकण ते सिन्नरदरम्यान ठिकठिकाणी सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन होणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माणगाव बायपास कधी पूर्ण होणार? महामार्ग रखडला Raj Thackeray मैदानात

अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची राज ठाकरे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत... राज ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील माणगाव दौऱ्यावर जाणार असून, अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा घेणार आहेत... यादरम्यान ते दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचंही उद्घाटन करणार आहेत...

पुणे-नाशिक रेल्वेसाठी रस्तारोको; चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाट्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

GMRTच्या अडथळ्यामुळे बदललेल्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या नवीन मार्गाला विरोध करत आज सर्वपक्षीय रस्तारोको आंदोलन होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकण, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर आणि चाकणमार्गे प्रस्तावित होता. मात्र, खोडद येथील GMRTमुळे अडथळा निर्माण होत असल्याने नवीन अलाईनमेंट प्रस्तावित करण्यात आली आहे. या मार्गाला विरोध करत सर्वपक्षीय रस्तारोको आंदोलन करण्यात येत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चारही ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मेहकर तालुक्यात पाण्याने भरलेल्या खदानीत दोन मावस भावंडे बुडाली; एकाचा मृत्यू..

पाय धुण्यासाठी पाण्याने तुडुंब भरलेल्या खदानीत उतरलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून दुर्दैवी अपघात झाला. देऊळगाव माळीजवळील कोराडी प्रकल्प परिसरात ही घटना घडली. अयान राजू शेख (२०, रा. देऊळगाव माळी) याचा मृतदेह रात्री उशिरा शोधमोहीम राबवून पाण्याबाहेर काढण्यात आला, तर आवेद इब्राहिम शेख (१९, रा. लोणार) याचा शोध अद्याप सुरू आहे. स्थानिक तरुण, ग्रामस्थ, पोलीस व प्रशासनाच्या मदतीने रात्रीही शोधमोहीम राबविण्यात आली. या घटनेने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेडमध्ये घडलेल्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच सीसीटीव्ही समोर आलं आहे. टोळीतील पाच ते सहा जणांनी दुचाकीवर जातं असलेल्या 25 वर्षीय इंदरजीतसिंघ बावरी याचा चाकूने भोसकून खुन केला. शनिवारी दुपारी भरदिवसा वाजेगाव पेट्रोल पंपाजवळ हीं घटना घडली.फायनान्सच्या कारणावरून केबी गँगमधील सहकाऱ्यांनी खुन केल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमदार रवी राणा यांच्या फोटोला कॅप्शन देत नवनीत राणांचं व्हाट्सअप स्टेटस...

दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है, लेकिन मै खेल नही खेल खेलने वाले बदल देता हु....

आमदार रवी राणा यांच्या फोटोला कॅप्शन देत नवनीत राणांच व्हाट्सअप स्टेटस...

व्हाट्सअप स्टेटस च्या माध्यमातून नवनीत राणांचा इशारा कोणाला राजकीय वर्तुळात चर्चा...

दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार राजेश वानखडे यांच्या मतदारसंघात बदल घडवनार आमदार रवी राणा यांनी केलं होतं वक्तव्य..

रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर तीन भाजप आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं होतं...

राज्यात पावसाने सरासरी गाठली मात्र मराठवाडा आणि विदर्भ कडेपाठ

हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस

ऑगस्ट महिन्यात पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली असल्याचं दिसून आले आहे

राज्यात आतापर्यंत ६३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे

मराठवाडा आणि विदर्भ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी झाला आहे

मुंबई उपनगर, पुणे जळगाव, पालघर नाशिक , सातारा संभाजीनगर या जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे

महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले

- युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले.

- तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

- मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या या खळबळजनक प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याचे एक दिवसीय दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत असून दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड मधील मनसे पक्ष कार्यालयाच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. माणगाव येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. राज ठाकरे हे आज माणगाव मधील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील बायपासचे देखील पहाणी करून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार; महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’!

मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोंदिया ते कोल्हापूर धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये झुरळांचं अक्षरशः साम्राज्य असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रत्येक कोचमध्ये झुरळांचा वावर दिसून येत असल्याने आरामदायी प्रवासासाठी महागडं तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.... ट्रेन क्रमांक 11040 असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. पूर्वी या एक्सप्रेसमधील सेवा व्यवस्थित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे; मात्र आता रेल्वेच्या स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रीपासून मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. काल रात्रीपासून भंडाऱ्यासह साकोली, मोहाडी, तुमसर आणि संपूर्ण ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती कामांना गती आल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पावसाने दांडी मारल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती.

नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन..

चाकण पासून सिन्नर पर्यंत केला जाणार चक्काजाम...

नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने आयोजित आंदोलनात अनेक नेत्यांचा समावेश...

नारायणगाव मधील GMRT चे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी.

सोलर प्लांटवर डल्ला मारणारी टोळी गजाआड

यवतमाळ जिल्ह्यात सोलर प्लांट मधून सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने आर्णी येथे कारवाई करून केबल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून या कारवाईत पोलिसांनी सहा लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.शेख अहमद शेख सादिक आणि शेख कादर उर्फ कलिम शेख दोघे राहणार आर्णी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हत्तींच्या दहशतीने देसाईगंज तालुका हादरला!

वडसा तालुक्यात जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, चिखली, तुकूम चिखली, रीड आणि हलबी डोंगरगाव परिसरातील शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत. सुमारे ३५ हत्तींच्या कळपामुळे धान रोवणी, झटका मशीन, शेतघरे आणि शेती साहित्याचे मोठे नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे, शिवमंदिरातील नंदीची मूर्तीही हत्तींनी फोडल्याची घटना समोर आली आहे.

गुहागर-विजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे

गुहागर-विजापूर महामार्गावर चिपळूण ते पाटण १२३५ खड्डे पडलेले असून दूरदैवाने अनेक अपघात होत आहेत संबधित अधिकारी बघ्याची भूमिका घेत असून त्यांच्या डोळ्यावरची झापड उडवण्यासाठी चिपळूण चे माजी सभापती व प्रयावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी संताप व्यक्त करून तिव्र आंदोलना चा इशारा दिला आहे त्यांनी जागेवर जाऊन खड्याची पहाणी केली व यावर ताबडतोब खड्डे भरावे , दूरदैवाने खड्यामुळे अपघात झाल्यास संबधित खाते जबाबदार असेल असा इशारा दिलाय.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात चार जाहीर सभा

राठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होत आहे.. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.. सांगलीच्या आटपाडी कवठेमंकाळ, बोरगाव आणि कडेगाव येथे सभा होणार आहेत..

नाशिकला भूकंपाचे धक्के

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. रात्री झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com