Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५, आज कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Nandurbar News : नंदुरबार शहरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

वारकरी संप्रदायाच्या प्रमुख एकादशींपैकी एक असलेल्या कार्तिकी एकादशीच्या मंगलमय मुहूर्तावर नंदुरबार शहरातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे, ज्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड

- विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी

- सिन्नर मतदारसंघातून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघातून सुनिता चारोस्कर यांनी लढवली होती निवडणूक

- स्वार्थी आणि दलबदलू मानसिकतेचे तसेच पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने हकालपट्टी करण्यात आल्याची शरद पवार गटाकडून काढण्यात आलेल्या पत्रात नोंद

- हे दोन्ही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मात्र त्यापूर्वीच पक्षातून करण्यात आली हकालपट्टी

महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला गंभिर स्वरूपाची मारहाण

मनसेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे याला मारहाण

० पंकज उमासरे याच्या चवदार तळे येथील दुकानात शिरून करण्यात आली मारहाण

० पंकज उमासरे याने दोन दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती

० या मुलाखतीच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय

० मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

० गंभिर जखमी पंकज उमासरे याच्यावर महाडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु

कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याचे धमकी

अज्ञात इसमांनी उदय नारकर यांना फोनवरून धमकी दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्याने धमकी आल्याचा नारकर यांचा दावा. घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची दिली फोनवरून धमकी

साईंच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह

साईबाबांच्या शिर्डीतही कार्तिकी एकादशीचा उत्साह बघायला मिळतोय.. साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली असून साई मूर्तीला सुवर्ण आभूषणासह तुळशी पत्रांची माळ परिधान परिधान करण्यात आली आहे.. साईबाबांचे विठ्ठलरूपी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.. साई मंदिरात दररोज 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती संपन्न होत असल्याने विठुरायाचे आणि साईबाबांचे आध्यात्मिक नाते जपण्याचे काम आजही साई संस्थानकडून केले जाते आहे..

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात

पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे

अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गाडीतील एक जण गंभीर जखमी आहे..

कोरेगाव पोलीस स्टेशन कडून तपास सुरू आहे अपघात नेमका कसा झाला याचा

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक : महिला गंभीर जखमी

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पोलीसांना पाचारण केले. दरम्यान या अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

भाषा धोरणाला राज्यातून विरोधच - डॉ. नरेंद्र जाधव

त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून सुरू करावी, असे स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभार चिंध्या, अशी अवस्था होईल. रत्नागिरीत बहुतांशी नागरिकांनी पाचवीपासून हिंदी असावी.राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाला. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांनी घेतल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे अध्यादेश रद्द केले.राज्यातील आठ विभागांमध्ये जाऊन स्थानिक मते जाणून घेतली जात आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येत असून पुढे किमान २० वर्षे हा अहवाल चालेल. हा अहवाल ४२ कोटी बालकांचे भविष्य घडवणारा आहे. भविष्यातील मुलांचे हित लक्षात घेऊन अहवाल दिला जाईल.

अमेरिकन लोकांना फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरला २२ वर्षांच्या तरुणाचे फंडिंग 

छत्रपती संभाजी नगर मधील अमेरिकन लोकांना फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरला एका २२ वर्षांच्या तरुणाने फंडिंग केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी राजवीर प्रदीप शर्मा (२२, रा. वल्लभनगर, अहमदाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे., या रॅकेटला फंड हा राजवीर करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याला आरोपी जॉनने छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर सुरू करण्याचे सुचवले होते. त्यानुसार बलवीरने फारुकीच्या मदतीने हे बोगस कॉल सेंटर शहरात उभारले. बलवीर-राजवीर यांचे नातेवाईक मोहाली, अहमदाबाद, मुंबई तसेच परदेशात वास्तव्यास असून या टोळीला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडूनच साहाय्य मिळत असल्याची माहिती फारुकीने चौकशीत उघड केली.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भगवा फडकणार- संजय शिरसाट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत.मेळावे, बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.दरम्यान समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी पक्षाचा आदेश येईल तो आम्ही पाळू.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भगवा फडकणार असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जालन्यातील उमरी गावात विविध मागण्यांसाठी तरुणांचे आमरण उपोषण

जालन्यातील उमरी गावात विविध मागण्यांसाठी तरुणांचे आमरण उपोषण सुरू आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्थानिक मागण्यासाठी तरुणांनी थेट गावातच आमरण उपोषण सुरुवात केली.जालना तालुक्यातील उमरी येथील तरुणांनी विविध मागण्यासंदर्भात गावातीलच मंदिराच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे .शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पाथरूड ते उमरी दरम्यान असलेल्या पुलाची उंची वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी उमरी येथील तरुणांचे गावात उपोषण सुरू आहे.

कार्तिकी एकादशी निमित्ताने मावळतील शेतकऱ्यांनी घातले विठ्ठलाला साकडे... देवा आत्तातरी पाऊस थांबव

कार्तिकी एकादशी निमित्ताने मावळ तालुक्यामधील घोणशेत गावांमधील शेतकऱ्यांनी काकड आरतीचे आयोजन करत विठ्ठलाला साकडे घातले की देवा आत्तातरी पाऊस थांबाव. मावळ तालुक्यामध्ये गेले दहा दिवस झाले सतत अवकाळी पाऊस चालू आहे. त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वर्षभर आम्ही शेतकऱ्यांनी खायचं काय असा प्रश्न विठ्ठलाला शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. सतत पडलेल्या पावसामुळे भाताचे मोठे नुकसान होऊन भातावर करपा रोख तर आलाच आहे. मात्र या पावसामुळे भाताला बुरशी यायला लागले. राज्यातील नागरिक पाऊस पडाव म्हणून देवाला साखळी घालतात मात्र मावळ्यातील शेतकरी पाऊस थांबव देवा असा विठ्ठलाला साखर घालत आहे.

महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार-इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आनंत मुळे यांनी दिली आहे. MARD असोसिएशनच्या रेसिडंट डॉक्टरांकडुन शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरूग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची देखील माहिती यावेळी असोसिएशनकडून देण्यात आली आहे. तसेच महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही तर 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टर्स सेवा बंद ठेवणार आहेत.

वाशिमच्या शिरपूर मध्ये 4 ते 5 जणांनी केला एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला

वाशिमच्या शिरपूर बस स्थानक परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांनी विशाल गोपाल देशमुख या तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना घडली असून,या हल्ल्यात तरुणाच्या पोटावर चाकूचे वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी अकोला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.चाकू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून यातील आरोपी फरार झाले आहेत.

 समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल प्लाझा परिसर मागील आठ दिवसापासून अंधारात

प्रवाशांना समृद्धी महामार्गाचा प्रवास अत्यंत सुरक्षित प्रवास असं राज्य शासनाकडून सांगितलं जात असताना वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझा परिसरात मागील आठ दिवसापासून रात्रीला अंधाराच साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे रात्रीला प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. महावितरणच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून मालेगाव जहांगीर येथील टोल प्लाझाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे,त्यामुळे रात्रीला प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. या ठिकाणी आपले वाहन रात्रीला थांबणे म्हणजे अपघाताला आणि डिझेल चोरीला आमंत्रण देणे अशीच परिस्थिती मागील आठ दिवसापासून झाली आहे. टोल प्लाझा च्या अत्यावश्यक सेवेकरिता काही काळ जनरेटर चालू करून बॅटऱ्या चार्ज करून वापरल्या जात आहे.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

कार्तिकी वारीसाठी 6 लाख वारकरी दाखल झाले असून, वैष्णवांच्या गर्दीने पंढरी नगरी दुमदुमली आहे. राज्याच्या काही भागात पूर आणि अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कार्तिकी वारीच्या संख्येत घट झाली आहे. मध्यरात्री पासूनच वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करून देवाच्या पद स्पर्श दर्शन रांग मुख दर्शन रांगेत दर्शन जात आहेत. प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर मधील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांची दाटी झाली आहे. अवघी पंढरी विठू नामाच्या जय घोषाने दुमदुमली आहे. टाळ वीणा अभंग पताका घेतलेले वारकरी आपल्या दिंडी घेऊन प्रदक्षिणेला निघाले आहेत.

Hingoli News : संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 755 व्या जन्मउत्सव सुरू

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्म सोहळ्या निमित्त हिंगोलीत दीप उत्सव साजरा करण्यात आला आहे. संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी येथे हजारो महिलांनी दीप पेटवत या सोहळ्यात उपस्थिती लावली आहे. गेल्या सात दिवसांपासून या कार्यक्रमांची तयारी सुरू करण्यात येती. आज सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या मूर्तीची नरसीमध्ये मंदिर समितीच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात येतो तर उद्या दहा ते बारा या कार्यक्रमाची समाप्ती होती.

नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. गेल्या काही वर्षात या मध्ये वाढ झाल्याने सिडकोने या विरोधात कडक ॲक्शन घेण्यास सुरवात केली आहे. विशेषतः गावठाण भागात ही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. वर्षभरात सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ६५० अनधिकृत इमारती तोडल्या आहेत. या मध्ये ३ मजल्यां पासून १० मजल्या पर्यंतच्या इमारतींचा समावेश आहे. खारघर येथील दोन इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला.

विठ्ठलाची महापूजा होताच एकनाथ शिंदे यांनी वारकरी महाराज मंडळींचे केले संतपूजन

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील धुंडा महाराज देगलूरकर मठाला भेट दिली. विठ्ठलाची महापूजा होताच पंढरपुरातील अनेक संत महाराज मंडळींची भेट घेऊन त्यांना आहेर करत एकनाथ शिंदे यांनी संत पूजन केले. यावेळी वारकऱ्यांना देखील भजनी साहित्याचे वाटप एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. एकादशीच्या पर्वणी निमित्त विठ्ठलाच्या महापूजा नंतर थेट महाराज मंडळी यांचे संत पूजन करत वारकर यांची संवाद साधण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्याकडून घडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com