

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती
444 क्लार्क पदासाठी होणार होती नोकर भरती
सलग दुसऱ्यांदा नोकर भरतीला मिळाली स्थगिती.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रक्रिया सुरू झाल्याने सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून देण्यात आली स्थगिती
आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकर भरती बाबत प्रश्न उपस्थित करत, मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार.
दिला बँकेचे निवडणुक प्रक्रिया सुरू झालल्याचे कारण देत सहकार आयुक्तांनी दिली स्थगिती
गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांना पुन्हा चेकमेट करण्यात आल्याची जिल्ह्यात चर्चा.
सावंतवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बांदा व शेर्ले परिसराला बसला आहे. शेर्ले बाजारवाडी येथील रवळनाथ मंदिराचे दर्शनी भागाचे छप्पर अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा मंदिरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. बांदा पंचक्रोशीत झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात काही ठीकाणी झाडे ही मोडून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट गावाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन २२ प्रवासी जखमी झाले. या अपघातात ६ जण गंभीर तर १६ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. राजूराकडून तुमसरकडे जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवून जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सुरू आहे.
कल्याण पूर्वेतील अडवली ढोकली परिसरात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान नाल्यांची वेळेत सफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले, तर नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मागील दोन ते तीन दिवस तळकोकणात समाधानकारक पाऊस कोसळल्याने भात लावणीच्या कामाला वेग आलाय. पावसाच्या विश्रांती मुळे कोकणातील काही भागातील लावणीची कामे राखडली होती मात्र मागील तीन दिवस तळकोकणात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने उर्वरित भागातील शेती कामांना वेग आलाय. तळकोकणात सध्या सर्वत्र शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त झालाय. कणकवलीतील एका शेतमळ्यातील भात लावणीचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेय परेश कांबळी यांनी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ-तलवाडे परिसरातील सुझलॉन टॉवरवर मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर ९ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. स्कॉर्पिओने पाठलाग करून सुरक्षा रक्षकांचे वाहन अडवण्यात आले. त्यानंतर लाकडी दांडके आणि गुप्तीचा धाक दाखवत बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिसांत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी सुरक्षा रक्षकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनसे कडून आयुक्तांच्या कॅबिन मध्ये घुसून आंदोलन सुरू
कपडे काढून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध सुरू
दोषी डॅाक्टरांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला...
राष्ट्रीय महामार्ग 53 वरील कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रॉला दरीत कोसळला....
समोरून येणाऱ्या गुजरात डेपोच्या बसला वाचवताना ट्रॉला दरीत कोसळल्याची माहिती....
उतारावर ट्रॉलाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले....
अपघातात ट्रॉला चालक लोकेशभाई ,अजमेर किरकोळ जखमी,सुदैवाने जीवितहानी नाही....
महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत राबवले मदतकार्य,
विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात चालकावर उपचार सुरू....
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली,घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू....
नांदेड शहरासह परिसरात जोरदार पाऊस.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून कुठे मध्यम तर कुठे मुसळधार पाऊस.
काल रात्री अर्धापूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी.
दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग.
आज नांदेड शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला.
बद्रीनाथ राष्ट्रीय राजमार्ग या ठिकाणी दरड कोसळल्याने शेकडोच्या संख्येने भाविक अडकले
बद्रीनाथ कडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने महाराष्ट्रातल्या भाविकांचा सुद्धा खोळंबा
महाराष्ट्रातील अनेक प्रवासी बद्रीनाथ मध्ये अडकून
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. NEET पेपर फुटी नंतर राज्यात अवघ्या १५ दिवसांत झालेल्या टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पुणे -
पुण्यात कॉकरोच पार्टीचे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
३ जुलै रोजी नीट पेपर घोटाळा विरोधात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन आणि निदर्शने करण्याची मागितली होती परवानगी
पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या आंदोलनाला परवानगी नाकारली
कॉकरोच पार्टी आंदोलन करण्यावर ठाम असून बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे
आदेशाचा भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केले जाणार असल्याचं देखील आदेशात नमूद
माळशेज घाटात संततधार पाऊस सुरू असून परिसर अल्हाददायक झाला आहे.
नागमोडी वळणे, डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि दाट धुके पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
मात्र, धुके आणि निसरड्या रस्त्यांमुळे प्रवास तसेच धबधब्यांजवळ जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ठाणे -
शिवसेनेतच नालेसफाई पाहणीवरून खडाजंगी
ठाणे महापालिकेच्या शिवसेना पक्षाच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यातच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली.
स्थानिक नगरसेवकांना न बोलावता पाहणी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी महापौरांनाच जाब विचारला. "हा आमच्या प्रभागाचा दौरा, आम्हालाच का बोलावले नाही? आमच्या भागातील नाले अजूनही तुंबले आहेत, आयुक्तांनाही यायला वेळ नाही," असा संतप्त सवाल त्यांनी केला.
पाहणी दौऱ्यात झालेल्या या शाब्दिक चकमकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे
मालेगाव -
- मालेगाव महापालिकेवर काढण्यात आला 'लँड जिहाद विरोध जनआक्रोश मोर्चा..
- संतप्त आंदोलकांनी मांडला मालेगाव महापालिके समोर ठिय्या...
- आंदोलना दरम्यान, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी केले हनुमान चालिसेचे पठण..
- ' ती '18 एकर जमीन शासन जमा व्हावी , मालेगाव आयुक्तांनी लेखी आदेश द्यावे..
- जोपर्यंत महापालिका आयुक्त ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत महापालिकेसमोरून हटणार नाही , आंदोलकांचा पवित्रा..
- संगमेश्वर भागातील 18 एकर जमिनीचा आहे वाद...
- यापूर्वी क्रीडांगण, शाळा, हॉस्पिटलसाठी या जागेवर होते आरक्षण...
- मात्र या जमिनीचे खरेदी व्यवहार झाल्यानंतर त्या जागेवर एका खाजगी व्यक्तीने पाडले प्लॉट...
नवी मुंबई -
नवी मुंबईतील बोगस स्टे ऑर्डर प्रकरण दडपण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न
अनधिकृत इमारती वरील तोडक कारवाई थांबवण्यासाठी ज्यांनी बोगस स्टे ऑर्डर बनवली त्यांना वाचवण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप..
दोन दिवसांपूर्वी एका बंगल्यावर संबंधित लोकांसोबत आयुक्तांची बैठक झाल्याचा केला गौप्यस्फोट
आयुक्तांनी सर्व प्रकरण जनते समोर मांडव अन्यथा आम्ही आयुक्तांना ही न्यायालयात जाणार
ज्या नंबरवरून महापालिका आयुक्तांना मॅसेज करण्यात आला.. त्या व्यक्तींचा नगरसेवक पद रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार — शिवसेना
शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप..
- बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात लोकनृत्य या प्रकरणात महाराष्ट्रातील लोकनृत्यंपेक्षा इतर राज्यातील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्याने नवा वाद
- पाच लोकनृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या या धड्यात केवळ महाराष्ट्रातील एका लोकनृत्याचा तर महाराष्ट्र बाहेरील चार लोकनृत्यांचा समावेश करण्यात आला आहे
- यावरून शिक्षण क्षेत्रातील अभ्यासात आणि सांस्कृतिक जाणकारांनी टीका केली आहे
- महाराष्ट्रातील 'दिंडी नृत्य' या एकमेव प्रकाराचा परिचय करून देण्यात आला आहे
- तर गुजरातमधील 'रास नृत्य', पंजाबमधील 'भांगडा', छत्तीसगड मधील 'शेतकऱ्यांचे नृत्य' आणि बिहार मधील 'आदिवासी नृत्य' याचा समावेश करण्यात आला आहे
- अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी यावर आक्षेप घेतला आहे
अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात, 3700 हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड
अंबरनाथ तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरीराजा सुखावलाय.
इथल्या ग्रामीण पट्ट्यात भात पेरणीला सुरुवात झालीय.
तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो.
मात्र, यंदा पावसानं सुरुवातीला मोठी ओढ दिली.
रायगड -
- रायगडमध्ये NDRF दाखल
- रायगड जिल्ह्यातील पूर आणि दरड परिस्थितीत मदत आणि बचाव कार्यकरण्यासाठी NDRF ची एक तुकडी रायगडमध्ये दाखल
- पूर परिस्थिती, दरड दुर्घटना आणि रासायनीक अपघाताचे वेळी मदत आणि बचाव कार्य करणार
- होडी, पिकाप, पावडे, कटर, जॅक आदी सामुग्रीसह महाडच्या रमाबाई विहारमध्ये सज्ज
- NDRF टिममध्ये शोध पथकात सेंट्रो नामक श्वानाचा देखील समावेश
- रायगड जिल्ह्यात कोठेही मदत, बचाव कार्याची गरज लागेल त्या ठिकाणी ही टिम पोहचणार
हिंगोली -
हिंगोलीत तिकिटाच्या कारणावरून एसटी वाहकाला फायटरने मारहाण
प्रवाशाला बोगस तिकिटावरून जाब विचारल्याने प्रवासाने 10 ते 12 जणांना बोलून हिंगोलीच्या बस स्थानकामध्ये केली मारहाण
मारहाणी मध्ये मध्ये बस वाहक संजय अडकिने गंभीर जखमी
महाराणीच्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी डेपो केला बंद
तातडीने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू
नागपूर
- नागपुरातील ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत बुधवारी रात्री विजेचा शॉक लागल्याने रस्त्यावर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
- या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
- गटार लाईनच्या खोदकामादरम्यान स्ट्रीट लाईटची भूमिगत वीज वाहिनी खराब झाली होती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
- त्याच केबलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने महिला तिच्या संपर्कात आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
- या अपघातानंतर नागरिकांनी मनपा आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
- खोदकामानंतर सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतली गेली नसल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय.
बुलडाणा -
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहे.
त्याचबरोबर काही नदी नाल्यांना पूर देखील आल्याचे चित्र दिसत आहे.
तर काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्या संदर्भातील कामावर असलेल्या कच्चा पुल वाहून गेला आहे
ब्रह्मपुरी, दुधा, रायपुर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे.
तर काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याचे ही घटना घडली आहे
सांगली-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम
22 नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश..
सहकारी विभागाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
22 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे बँकेच्या विविध मतदार गटातील सभासदांचे ठराव गोळा करणे, मतदार यादी अद्यावत करणे, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याच्या कामाला आता वेग आला आहे.
21 संचालक पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
सिंधुदुर्ग- कुडाळ शहरातील लॅबला आग; लॅबमधील साहित्य व उपकरणे जळाली
कुडाळ शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र लॅबमधील साहित्य, उपकरणे जळून मोठे नुकसान झाले.
आग लागल्याची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र शाॅर्ट सर्कीट मुळे आग लागल्याच बोलल जात आहे.
बुलडाण्यात भरधाव स्विफ्ट कारचा भीषण अपघात
मेहकर खामगाव मार्गावरील वाडी गावाजवळ एका भरधाव स्विफ्ट कार आधी बैलगाडीला धडक देऊन नंतर हॅन्ड पंपला धडक देऊन घराची वॉल कंपाऊंड तोडून घरात शिरली.
हा अपघात इतका भीषण होता की कार आधी बैलगाडीला धडकून हवेत उडाली
त्यानंतर एका हॅन्ड पंपला धडकून थेट घराचे वॉल कंपाऊंड तोडून घराच्या भिंतीला धडकली नशीब बलवत तर म्हणून या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला.
या अपघातात कार सह बैलगाडी व घराचं नुकसान झालं आहे .
पालघर -
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय.
तर दुसऱ्या बाजूला या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सध्या भात पेरणीची काम हाती घेतली असून पारंपरिक आणि तांत्रिक या दोन्ही पद्धतीने जिल्ह्यात भात पेरण्या सुरू आहेत .
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला असून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आला आहे .
अमरावती -
अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक
MPSC आयोगाने ऑनलाइन परीक्षा न घेता ऑफलाईनच परीक्षा घ्यावी या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी धडकले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर
MPSC आयोगाची परीक्षा ऑनलाईन घेण्यास विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध....
पारदर्शक पद्धतीने MPSC आयोगानेच ऑफलाइन परीक्षा घ्यावी विद्यार्थ्यांची मागणी....
ऑनलाइन परीक्षेवर आमचा विश्वास नाही.. आतापर्यंत ज्या पद्धतीने एमपीएससीने ऑफलाईन परीक्षा घेतल्या त्या तशाच सुरू ठेवाव्या,विद्यार्थ्यांची मागणी
शेकडो व विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
पंढरपुरात अतिक्रमण विरोधात कारवाई
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.
नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणा विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरातील प्रदक्षिणामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, टिळस्मारक रोड आदी भागातील अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
रस्त्यावर लावण्यात आलेले हात गाडे आणि कमानी देखील काढण्यात आल्या आहेत.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.
नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणा विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पवारांची राष्ट्रवादी कायम एकत्रच राहणार - अमोल कोल्हे
ऑफरवर विचार करू या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला
पवारांची राष्ट्रवादी कायम एकत्रच राहणार
इतरांच्या चर्चांकडे लक्ष देत नाही, आम्ही सगळे खासदार एकत्र आहोत
- आष्टी तालुक्यात रात्री मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत
- बाकळी नदीला आला पूर
- नरसिंगपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने शैक्षणिक साहित्य व शालेय पोषण आहाराचे मोठे नुकसान.
अमरावती जिल्ह्यात २९ ते ३० जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान.
चांदूरबाजार तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू.
तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीत बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू.
दोन दिवसांत एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद.
शिरूर शहरातील एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या ॲक्टिव्हाच्या डिकीतून १ लाख १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.
चौहान कॉलनीतील 26 वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय.
दिड वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं.
जून महिन्यात भंडारा जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही.
परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी पीक पेरणीला घेऊन चिंताग्रस्त झाला होता.
मात्र, आता काल दिवसभर रिमझिम तर, रात्रीच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली.
आज सकाळपासून पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
- नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना काँग्रेसने भेट दिली संविधानाची प्रत
- आरएसएसच्या हिंदू संमेलनात विश्वास नांगरे पाटील गेले होते,त्यावरून काँग्रेसने नांगरे पाटील यांच्यावर टीका केली होती
- त्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यावर नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नांगरे पाटील यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली
कृषी दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात अधिकारी व राजकीय व्यक्तींनी थेट शेतात उतरून बळीराजासोबत पेरणीचा आनंद घेतला.
शेतकऱ्यांच्या कामात सहभाग घेत त्यांनी शेतीप्रती आपली बांधिलकी दर्शवली.
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सिंदखेडराजा परिसरातील शेतात पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या सहाय्याने सोयाबीन पेरणी केली.
देहूत पालखी सोहळ्याची जयत तयारी सुरू
टाळ मृदुंग दुरुस्तीला आला वेग
तर कपडे शिवण्यासाठी दुकानदाराची लगबग सुरू
रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट
रात्री पावसाची विश्रांती पण सकाळपासून सरींवर बरसतोय पाऊस
काल दिवसभरात कोकणात अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग
सतत पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ
सर्वच नद्या दुथडी भरून, काजळी नदी सुद्धा दुथडी भरून प्रवाहित
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ
अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली
सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी 8.20 मीटरवर
जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास गाढी नद्यांचे पाणी इशारा पातळी खालून वाहत आहे
पुढील 3 दिवस रायगड जिल्ह्याला अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
० नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश
महाराष्ट्र मंदीर महासंघाच्या पाठपुराव्यानंतर महसूलमंत्र्यांचे धाराशिव जिल्हाधिकार्यांना निर्देश
महाराष्ट्र मंदीर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनिल घनवट यांची माहीती
मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला
मुंबई गोवा महामार्गावर कोसळली दरड
महामार्गावरील निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ही कोसळली दरड
दरडीचा बहुतांश भाग हा रस्त्यावर
दगड देखील रस्त्यावर आल्याने वाहतुकीस धोका
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
याआधी भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील एक हजार 216 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार
ठाकरे गटातील पडझडीनंतर पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर जाणार
जुन्या शिवसैनिकांची पक्षनिष्ठा कशी आहे हे दाखवण्यासाठी पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिक रविवारी मातोश्रीवर जाणार
या ज्येष्ठ शिवसैनिकांकडून चलो मातोश्री दर्शन यात्रेचे आयोजन
रायगडच्या अलिबाग बायपास रस्त्यावर पहिल्या पावसापासून पाणी साचत असून या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वाहन चालकांना येथून प्रवास करावा लागत आहे.
अलिबाग बायपास हा परिसर चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत येत असून येथील समस्येकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
पुणे विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मेट्रो प्रकल्पांबाबत निर्देश
कल्याणीनगर ते पुणे विमानतळ नवा मेट्रो मार्ग होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.