Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये रेशनच्या धान्याचा काळाबाजार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १८ जून २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विधानभवन हाणामारी, गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

अंबरनाथमध्ये रेशनच्या धान्याचा काळाबाजार

अंबरनाथमध्ये गोरगरिबांसाठी आलेल्या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून १५ दिवसात हे गैरप्रकार थांबले नाहीत, तर तुमच्या तोंडाला काळं फासू, असा सज्जड दम शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिला आहे.

राज ठाकरेंच्या सभेमध्ये माईक चालू नसल्याने भाषणात व्यतत्य

मराठीच्या विरोधात मोर्चा चुकीचा, मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदर मध्ये सभा होणारे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या पाहायला मिळते आहे. दिवाळीचा सण आहे असं वाटतं आहे आणि राज ठाकरे यांना समक्ष पाहायला ऐकायला मिळणार आहे हे औत्सुक्य महिला कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते आहे. तसेच मीरा रोड मधील निघालेला मराठी माणसाच्या विरोधातील मोर्चा चुकीचा होता अशी भावना सुद्धा महिलांनी व्यक्त केली आहे.

धुळे येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आज धुळ्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती, यावेळी समीर भुजबळ यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले आहे, यावेळी समीर भुजबळ यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे,

ऋषिकेश टकले यांच्यावरील गुन्हे आणि नितीन देशमुख यांच्यावरील गुन्हे खूप अंतर आहे - जितेंद्र आव्हाड

विधान भवनातील मारहाणीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऋषिकेश टकले यांच्यावरील गुन्हे आणि नितीन देशमुख यांच्यावरील गुन्हे खूप अंतर आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहे. आमदारानी पाच व्यक्तींना खुणावले आणि मग मारामारी झाली मारणारी माणस हा क्रिमिनल बॅक ग्राउंडची आहेत. नितीन देशमुख माझ्यासोबत आलेला नव्हता, तो आतमध्ये जात असताना तो हल्ला झाला आहे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे.

पुण्यात १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारा आरोपी निघाला इंजिनिअरिंगचा टॉपर

पुण्यात १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारा आरोपी निघाला इंजिनिअरिंगचा टॉपर

विश्रामबाग पोलिस पथकाने जिल्हा कोलार कर्नाटक येथुन घेतले ताब्यात

सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांनी केले विष प्राशन !

सांगली... एकाच कुटुंबातील चौघांनी केले विष प्राशन !

सासु-सुनाचा मृत्यू तर बाप-लेकाची प्रकृती गंभीर...

मराठीच्या विरोधात मोर्चा चुकीचा, मीरा भाईंदरमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदर मध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या पाहायला मिळते आहे. दिवाळीचा सण आहे असं वाटतं आहे आणि राज ठाकरे यांना समक्ष पाहायला ऐकायला मिळणार आहे हे औत्सुक्य महिला कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते आहे. तसेच मीरा रोड मधील निघालेला मराठी माणसाच्या विरोधातील मोर्चा चुकीचा होता अशी भावना सुद्धा महिलांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे मीरारोडसाठी शिवतीर्थावरुन रवाना

मराठा आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणीला मुंबई हायकोर्टात सुरूवात

मराठा आरक्षणासंदर्भातील अंतिम सुनावणीला मुंबई हायकोर्टात सुरूवात

मराठा समाज मागास नाही? हे सिद्ध करण्याकरता पुरावे सादर करण्याचे विरोधी याचिकाकर्त्यांना कोर्टाचे निर्देश

राज्य सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणा विरोधातील याचिका दिर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत

या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आज, 18 जुलैपासून यावर हायकोर्टात नव्यान सुनावणीस सुरूवात झाली

मराठा आरक्षणावरील याचिकांची अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात आज पासून सुरू झालीय

न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदिप मारणे आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी सुरूय

हनी ट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल

- हनी ट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल

- नाशिकसह राज्यातील ७२ वरिष्ठ अधिकारी आणि ट्रॅपमध्ये अडकल्याची आहे चर्चा

- या सगळ्या प्रकरणाचा तपास आणि चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा नाशकात दाखल

- ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेल मालकाची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती

शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरवर झळकले राज ठाकरे

मीरा रोड मध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून निघालेला मोर्चा यशस्वी झाला, त्यानंतर आज मीरा रोड मध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.

या सभेच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बॅनरवर राज ठाकरे यांना मीरा भाईंदर नगरात आपले स्वागत आहे असा शुभेच्छा देणारा बॅनर झळकत असल्याचे पाहायला मिळते.

यामुळे राजकीय वर्तुळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत हा बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

विलेपार्ले परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली

विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पिण्याच्या पाण्याची लाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरले पाणी

विलेपार्ले परिसरात नागरिकांना पिण्याचे पाण्याचा अपुरा पुरवठा होणार

महापालिकेच्या के पश्चिम प्रभागाचे जलविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू

बहात्तर तासांनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडेंना तब्बल बहात्तर तासांनंतर उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी त्यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आले.

उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "जर एका महिन्याच्या आत आरोपींना अटक झाली नाही, तर मी आत्मदहन करेन," असा त्यांनी इशारा दिला आहे.

भंडाऱ्यात मुसळधार पावसानं तासभर झोडपलं

भंडाऱ्यात अचानक मेघ दाटून येत मुसळधार पावसानं हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झालं. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठं हलक्या ते कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं सतत हजेरी लावलेली असताना आज भंडाऱ्यात पडलेल्या या मुसळधार पावसानं दुचाकी वाहनधारकांची वाहतूक पूर्णपणे थांबली. मुसळधार पावसानं भंडारा शहरातील काही प्रभागातील सखल भागात पाणी साचलं तर, नाल्यांचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं. मुसळधार पावसानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळतं आहे.

सलग आठव्या दिवशी राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्गाला नागरिकांचा तीव्र विरोध

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी देखील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर, जोडजवळा, रुंज ,गुंज ,बाभुळगाव , माळवटा या सह परिसरातील सात ते आठ गावातील शेकडो नागरिकांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी मोजणी करण्यापासून रोखले आहे, दरम्यान यावेळी महसूल प्रशासनाच्या विरोधात महिला शेतकरी संतप्त झाल्या होत्या.

इथून पुढे माध्यमांशी संवाद साधणार नाही - आ. संजय गायकवाड

'या पुढे मी कुठल्याही माध्यमांशी संवाद साधणार नाही'.

बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी जाहीर केला निर्णय.

आज माध्यम प्रतिनिधी त्यांच्या जनसंपर्क कार्यलयात गेल्यावर त्यांनी यापुढे माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला, तलावाचे ओटी भरण पूर्ण

सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेवक आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते आज कास तलावाचे ओटी भरण करण्यात आले.या कास तलावाची उंची सातारा नगरपालिकेच्या वतीने वाढविण्यात आली आहे.जून महिन्यातच कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Wardha News : वर्ध्यात चोरट्यांचा सुळसुळाट

- इलेक्ट्रिक दुचाकीची चार्जिंग संपली अन चोरटे सोडून झाले पसार

- बंद घरांवर चोरट्यांचा डल्ला, सोने चांदिच्या दागिनासह रोख केली लंपास

- दोन दुचाकीही केल्या लंपास

- दोन पैकी एक दुचाकी नागपूर जिल्ह्यात आढळलीय

राज ठाकरेंची मिरा रोडमध्ये जाहीर सभा होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा रोड येथे सभा होणार आहे. मराठी हिंदी वादावरून ज्या ठिकाणी राडा झाला होता. त्याच ठिकाणी राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता राज ठाकरे हे दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानावरून मिरा रोडसाठी निघणार आहेत. तर बोरिवली येथे मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते पुढे सभेसाठी रवाना होणार आहेत.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संरक्षणाची मागणी 

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करू आणि संरक्षण देऊ असं म्हटलं.

Yavatmal News : उमरखेडमध्ये दिव्यांगाचा आक्रोश मोर्चा

दिव्यांगांना शासनाच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाचा पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना राखीव निधी देणे बंधनकारक असताना सुद्धा अद्यापही नगरपरिषदेने दिव्यांगांना पाच टक्के राखीव निधी दिला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यवतमाळच्या उमरखेड नगरपरिषदेवर आक्रोश मोर्चा काढला.यावेळे मोर्चात हजारो दिव्यांग बांधव सामिल झाले होते.त्यामुळे मोर्चा पोलिसांनी नगर परिषदेच्या गेटवर आडवीला.

मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंची सभा, मनसे नेत्यांची पाहणी सुरू

मीरा भाईंदरमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा.

सभास्थळी मनसेचे अविनाश जाधव पोहचले.

सभास्थळी मनसे नेत्यांची पाहणी.

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आज राज ठाकरे जनतेला काय संबोधित करणार, याकडे सर्वांचेच लक्ष.

Nashik: कोथंबीरला भाव न मिळाल्याने शेतक-याने संतापून फेकली रस्त्यावर

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील तळेगावरोही येथिल शेतकरी कैलास नामदेव जीरे या शेतक-याने आपल्या शेतात पिकवलेली कोथंबीर विकण्यासाठी नाशिकच्या बाजार समितीत नेली,लिलाव प्रक्रिया सुर होताच कोथंबीरच्या जुडीला प्रति जुडी एक रुपया दर मिळाला त्यामुळे संतप्त शेतक-यारी हताश होऊन त्याने कोथंबीरने भरलेली गाडी पुन्हा माघारी आणत निफाडच्या रसत्यावर कडेला गाडी ऊभी करत गाडीतील संपुर्ण कोथंबीर रस्त्याच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला.मोठ्या मेहनतीने बीयाने,खत,ओषध फवारणी करुन पिक हाताशी आले असतांना ती काढण्यासाठी मजूरांची मजूरी असा मोठा खर्च करुन विक्रीला गेला असतांना त्याला जुडीला एक रुपयाचा दर मिळत असेल तर साहजिक त्याचा झालेला खर्च वसूल झाला नाही त्यामुळे संतापलेल्या शेतक-याने सगळी कोथंबीर रस्त्याच्या कडेला फेकून दिली.

Sanjay Shirsat:  मंत्री संजय शिरसाट यांचा शिवा संघटनेने जाळला पुतळा

विधिमंडळ अधिवेशनामध्ये बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वरांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवा संघटनेने केला आहे. महात्मा बसवेश्वरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय शिरसाट यांचा शिवा संघटनेने नांदेडमध्ये पुतळा जाळून निषेध केला. विधिमंडळाचा अधिवेशना दरम्यान चर्चा सुरू असताना मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वरांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचं आरोप शिवा संघटनेने केला आहे. मंत्री संजय शिरसाठ यांनी माफी नाही मागितली तर शिरसाट यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शिवा संघटनेने दिला आहे.

आंदोलन आणि राजकारण दोनही वेगळे- बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना आढावा बैठकीत दिल्या सूचना

येत्या 24 जुलै ला बच्चू कडू राज्यभर ट्रॅक्टर घेऊन चक्काजाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी आज बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्ण येथे कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचत कार्यकर्त्यांना काही कानमंत्र दिले आहे. आंदोलन यशस्वी झाल्याने लोक मतं मारतीलच असं नाही आंदोलन वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहे. बाळासाहेब ठाकरे भाषण करायचे आणि मोठमोठ्या सभा गाजवायचे तरीही त्यांचे आमदार निवडून येत नव्हते तिसरी वेळ प्रयत्न केला तेव्हा त्यांचे आमदार निवडून आले आणि वाढले. त्यामुळे मी आंदोलनात पुढे आहे म्हणून मला लोक मारतीलच आणि मी निवडून येईल असं होणार नाही. आणि असं झालं नाही तर तुमचा भ्रमनिराश होईल असेही बच्चू कडू म्हणाले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या राड्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

देभरातील चलनी नोटांचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता

- चलनी नोटांसह पासपोर्ट, मुद्रांक आणि निवडणूक सामग्रीचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

- देशभरातील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कामगार ३१ जुलैपासून संपावर

- मजदुर संघाची व्यवस्थापनाला ३१ जुलैपासून संपाची नोटीस

- नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील ९ करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांचा ३१ जुलैपासून संपाचा इशारा

सत्तेचा उन्मतपणा भाजपच्या गृह खात्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आलाय- वैभव नाईक

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेले नाही हे अनेक घटनेवरून सिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांना दिवसाढवळ्या मारहाण झाली. आता सर्वोच्च सभागृहाच्या बाहेर एकमेकांना शिवीगाळ घालण्याचा प्रकार घडला हे चुकीचे आहे. सत्तेचा उन्मतपणा भारतीय जनता पक्षाच्या गृह खात्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आला आहे, अशी बोचरी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण जवळपास 94% इतके भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात आला आहे. कालपासून धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 15 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणीपातळी वाढल्याने चंद्रभागा नदी पात्रातील भक्त पुंडलिकाच्या मंदिरा जवळ पाणी पोहोचले आहे. तर इतर साधू संतांच्या समाधींना पाण्याने वेडा दिला आहे. नदीपात्रातील खोल पाण्यात भाविकांनी स्नानासाठी जाऊ नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नंदुरबारच्या भूमाफियाना डॉ. विजयकुमार गावित यांचा दणका...

नंदुरबार मध्ये गाजत असलेल्या जमीन घोटाळे प्रकरणी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे नंदुरबार येथील भूमाफियांना मोठा दणका बसला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात नंदुरबार येथील तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

Vinayak Raut: विधिमंडळ काल झालेल्या प्रकार म्हणजे काळा दिवस - विनायक राऊत

महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट

याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी

राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी अन्यथा खुर्ची सोडावी

अशा घटनेनंतर दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा- विनायक राऊत

Raigad: किल्ले रायगडच्या पायरी मार्ग वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश

पावसाळ्याच्या काळात किल्ले रायगडावर जाण्यासाठी पायरी मार्गाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल किंवा अतिवृष्टी होत असेल तर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला तर स्थानिक व्यवसायीकांचे व्यवसाय देखील बंद पडले होते.

आज सुधारीत आदेश काढत जिल्हाधिकारी यांनी रायगडचा पायरी मार्ग खुला केला आणि महाड तालुका पोलिसांनी किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर लावलेले बॅरेगेटिंग हलवले.

काल विधानभवनात आमदारांच्या मारामारीनंतर गुंडांचा पोलीस स्टेशनमध्येच राडा

पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये पकडलेल्या आरोपीने पोलीस स्टेशनची तोडफोड केलेली आहे.

पुणे पोलीस आयुक्त त्याचबरोबर पुणे पोलीसचे उपायुक्त हे पूर्ण अपयशी असल्याचं पाहायला मिळतंय.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या जातील असं पोलीस आयुक्त सांगत असले तरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस स्टेशनची तोडफोड करण्याची हिम्मत गुंडांमध्ये येतेच कशी?

त्यामुळे सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे वागायचं असा प्रश्न उपस्थित होतो..

काल विधानसभेमध्ये मारामारी पाहायला मिळाली आज पोलीस स्टेशन सुरक्षित नाहीत सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचं..

Toranmal Ghat: थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा घाटात रस्ता खचला

सातपायरी घाटाजवळ रस्त्यावरचा मला मोठा भाग खचल्याने मोठ्या अपघाताची शक्यता...

खचलेल्या रस्त्यावरूनच पर्यटकांचा जीवघेणा प्रवास....

मुसळधार पावसामुळे रस्ता अनेक दिवसापासून खचलेल्या अवस्थेत....

खचलेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

सातपुड्याचे नैसर्गिक सौंदर्य बहरल्याने पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळ कडे दाखल होत आहेत मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने पर्यटकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती...

बारामतीत बँक ऑफ बडौदाच्या प्रबंधकाची बँकेतच आत्महत्या

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरी बँक ऑफ बडौदाचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी गुरुवारी मध्यरात्री बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली.

बँकेच्या कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, या साठी कोणालाही जबाबदार धरु नये, पत्नीला उदेदशून आपल्याला तिने माफ करावे, असेही त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहले आहे.

मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असहय होत होता.

शेवटी या ताणाला कंटाळून त्यांनी थेट आत्महत्येचाच निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते.

Maharashtra Live News: पिक विम्याच्या निकषांमुळे पंतप्रधान पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

पंतप्रधान पिक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्केच शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई वेळेत मिळत नाही,

एक रुपयातील पिक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याने अनेक शेतकरी पिक विमा काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

Gopichand Padalkar: सहकाऱ्यांकडून चूक झाली, कारवाई करा- गोपीचंद पडळकर

काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, मी अध्यक्षांकडे जाऊन कालच दिलगिरी व्यक्त केली. सहकाऱ्यांकडून चुकी झाली, कारवाई करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pune News: पुण्यात महापालिकेच्या सेवकाला स्थानिका कडून मारहाण करत शिवीगाळ

पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सेवकाला स्थानिक नागरिका कडून बांबूने मारहाण करत करण्यात आली शिवीगाळ

पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात घडली घटना

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या हनुमंत लोंढे या स्वच्छता कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण

किरकोळ कारणावरून वाद घालत स्थानिक नागरिकांनी शिवीगाळ केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप

महानगरपालिका कर्मचाऱ्याने पुणे पोलिसांकडे केली तक्रार

जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांना अटक

काल जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधीमंडळात तुफान राडा झाला. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना अटक करण्यात आली आहे.

बदलापुरातील गोहत्या करणारे कत्तलखाने जमीनदोस्त

बदलापुरात बेकायदेशीरपणे गोहत्या करणारे कत्तलखाने पालिकेनं धडक कारवाई करत उध्वस्त केले.

बदलापूर गावालगत कान्होर रोडवर हे कत्तलखाने सुरू होते.

बदलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या कत्तलखान्यांवर धाड टाकत कारवाई केली होती.

यानंतर गुरुवारी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यानंतर ऍक्शन मोडमध्ये आलेल्या पालिका प्रशासनाने कत्तलखान्यांवर बुलडोझर चालवत ते जमीनदोस्त केले. या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पालिकेनं 3 बेकायदेशीर कत्तलखाने पाडले असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहिल अशी माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे.

पावसाच्या हुलकावणीने धाराशिव जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पीक धोक्यात

धाराशिव जिल्हयात साडेचार लाख हेक्टर वरील सोयाबीन पीक धोक्यात आले.जवळपास महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली.

त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला असून पुढील तीन ते चार दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पेरणी झाल्यानंतर जून ते जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 149 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी यावेळी साडेतीनशे मिलिमीटर पाऊस झाला होता.

पाऊस गायब झाल्याने तुषार सिंचनचा वापर करत पीक जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Vasai Virar: वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांची बदली

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मोठा बदल करण्यात आला आहे. वसई विरार शहर पालिकेच्या आयुक्तपदी आयएएस मनोज कुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे.

मनोज कुमार सूर्यवंशी हे याआधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई येथे कार्यरत होते.

तर आताचे आयुक्त अनिलकुमार पवार यांची मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

अनिलकुमार पवार यांनी जानेवारी २०२२ पासून वसई-विरार महापालिकेचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय आणि विकास प्रकल्प राबवण्यात आले होते.

बाजारात मेथी, शेपूचे भाव पडले; पाच रुपयांना जुडी विकण्याची वेळ

आवक वाढल्याने मेथी,शेपूचे भाव पडले आहेत.

किरकोळ बाजारात दहा रुपयांना दोन पेंड्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

त्यामुळे केलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

ज्या बाजारात मेथी पाच रुपयांना पेंडी विकावी लागते त्याच रस्त्यावरील हॉटेलमध्ये मात्र शंभर ते दीडशे रुपयांना मेथीच्या भाजीची प्लेट विकली जाते.

त्यामुळे स्वतः पिकविलेल्या मेथीची हॉटेलात दिलेली फोडणी शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर आहे.

Pune News: पुण्यातील धोकादायक पूल पावसाळ्यानंतर पाडणार

पुणे जिल्ह्यातील ६१ पूल धोकादायक स्थितीत आहेत ..यातील ५८ जिल्हा परिषद व ३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे पूल पाडण्याचे आदेश दिले आहेत ..

प्रत्यक्ष धोकादायक पूल पाडण्याची कारवाई पावसाळ्यानंतर होणार आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला गती; शेतकऱ्यांना चौपट मोबदला

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला आहे.. शेतकऱ्यांना चौपट मोबदला आणि दहा टक्के जमीन परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच बाधित शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी व व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विकास महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या २०१९च्या पुनर्वसन धोरणानुसार भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे....पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ती लवकर पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवीन विमानतळ टर्मिनलला एक वर्ष पूर्ण

एक वर्षात पुणे विमानतळावरून 68,830 देशांतर्गत तर 2136 आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाले आहेत

नवीन टर्मिनल वरून देशांतर्गत एक कोटी तीन लाख प्रवाशांनी प्रवास केला तर तीन लाख प्रवाशांनी परदेशात प्रवेश केला

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल मुळे प्रवासी क्षमता वाढली येथून विमानसेवा चा आणखी विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Maharashtra Live News: वाटद एमआयडीसीवरुन वातावरण तापलं, उद्या जनआक्रोश सभा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीवरून वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या एमआयडीसीविरोधात जनआक्रोश सभा घेण्यात येणार आहे.

वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने खंडाळा येथे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि मानवाधिकार विश्लेषक अँड. असीम सरोदे यांच्या उपस्थितीत जनआक्रोश सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, ही प्रमुख मागणी केली जाणार आहे.

या सभेच्या अनुषंगाने खंडाळा येथे कडक बंदोबस्त तैनात करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लम्पी आजाराचा चा शिरकाव, 12 जनावरांना लम्पी सदृश्य आजाराची लागण

कृषिप्रधान तसेच पाळीव प्राण्यांची लक्षणीय संख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी लम्पि आजाराने धुमाकूळ घातला होता..

मुक्या जनावरांचा कर्दनकाळ ठरलेल्या या लम्पिने जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केला आहे.. विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर ,देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यातील 12 पाळीव जनावरांना लम्पी सदृश्य आजाराची लागण झाली आहे..

तर मलकापूर मध्ये एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे..

या जनावरांच्या नमुने तपासणीसाठी घेतले असून यामुळे जिल्ह्यातील लाखो पशुधन मालक भयभीत झाले असतानाच पशु संवर्धन विभाग अलर्ट मोड वर आल्याचे चित्र आहे

Pune Crime News: पुण्यातील मंतरवाडी चौकात मध्यरात्री कोयता टोळीचा तुफान राडा

मंतरवाडी परिसरातील विश्व हाईट्स च्या एस के एस सोसायटीत कोयता आठवणीने राडा घालत गाड्यांची तोडफोड करत पेटवली..

कोयता टोळीने राडा घालत वाहने पेटवली

आठ ते दहा वान पेटवली असल्याची माहिती

मंतरवाडी चौकातील एका प्रसिद्ध सोसायटीत मध्यरात्री हातात शस्त्राने वाहने तोडफोड करून पेटवली..

अनेक दुचाकी जळून खाक..

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थे बाबत कालच जयंत पाटील यांनी केला होता विधानसभेत  प्रश्न

Jalna News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला आणि परिसरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस

जालना जिल्ह्यात कालपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.जिल्ह्यात जवळपास दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

काल रात्री बदनापूर तालुक्यातील अकोला आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बदनापूर तालुक्यातील अकोला आणि परिसरामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे अकोला शिवारातील मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे.

एकीकडे जिल्ह्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्याने बळीराजा सुखावला असला तरी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतपिकांचं देखील नुकसान होत आहे..

लक्ष्‍मण चव्हाण यांनी घेतली खासदार बजरंग सोनवणे यांची भेट

बीडच्या माजलगाव तालुक्यातील परभणी या मुख्य रस्त्यावर निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना गेल्या काही दिवसांपूर्वी काठी आणि दगडाने अमानुष मारहाण करण्यात आली होती.

ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने ही मारहाण झाली होती.

त्यांच्यावर जखमी असल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान काल रात्री त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची भेट घेऊन अर्ज दिला आहे.

यामध्ये झालेल्या मारहाणी संदर्भातली सविस्तर माहिती देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार बजरंग सोनवणे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासमोर मृत महादेव मुंडे यांच्या आईने हंबर्डा फोडला.

खासदार बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

या भेटीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांना पाहून महादेव मुंडे यांच्या आईने हंबरडा फोडला..

बजरंग सोनवणे यांच्या खांद्यावर डोके ठेवत या माऊलीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. मुलगा गेला आता तुम्ही सांभाळा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.. या शब्दात सोनवणे यांनी मुंडे कुटुंबांना धीर दिला..

तुम्ही आता टोकाचे पाऊल उचलू नका.. आम्ही तुमच्या सोबत असून न्याय मिळाला पाहिजे.. या प्रश्नावर आवाज उठवू.. मी मुलांना काय सांगू.. असा प्रति सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खासदार सोनवणे यांच्यासमोर उपस्थित केल

Akkalkot Band: प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी सकल मराठा समाजाची आज अक्कलकोट बंदची हाक

सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाकडून आज पुकारण्यात आला आहे अक्कलकोट बंद

सकाळच्या सत्रात अक्कलकोट बंदला अक्कलकोटकरांनी दिलाय उत्स्फूर्त प्रतिसाद

दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला अक्कलकोट सत्र न्यायालयाने काल दिला आहे जामीन

आजच्या अक्कलकोट बंदला जन्मजयराजे भोसले आणि मित्र परिवाराने दिला आहे पाठिंबा

त्यामुळे आजचा अक्कलकोट बंद यशस्वी होतो की नाही हे पाहने महत्वाचे ठरणार आहे

Jalna Rain: जालना जिल्ह्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर काल मुसळधार पाऊस

महिनाभराच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यात मान्सूनने कमबॅक केल असून काल जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे काल घनसावंगी, परतुर या परिसरामध्ये शेताला तालावाचं स्वरूप आल्याच पाहायला मिळालं.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्याचे नुकसान देखील होत आहे.

जालना जिल्ह्यामध्ये धनगर पिंपरी, सुखापुरी, आष्टी ,सातोना ,घनसावंगी, राणीउचेगाव, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, रांजणी आणि जामसमर्थ या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

दरम्यान मुसळधार पावसामुळे एकीकडे बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.

शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे..

विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग शिक्षकांचे काम बंद आंदोलन

शासकीय नर्सिंग शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 15 जुलैपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे,

त्या अनुषंगाने आज संपूर्ण कर्मचाऱ्यांकडून काम बंद ठेवण्यात आल आहे, तर मागण्या मंजूर न झाल्यास आजपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा या शिक्षीकांनी दिला आहे,

त्यांच्या मागण्यांसाठी बक्षी समिती व राज्य वेतन त्रुटी निवारणासाठी खुल्लर समिती नेमण्यात आली,

मात्र अजूनही त्यांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न मार्गी लागला नाही, डिप्लोमा धारकांपेक्षा डिग्रीधारकांवर एक प्रकारे हा अन्याय होत असल्याच्या भावना या शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत,

बुलढाणा शासकीय नर्सिंग कॉलेजमधील 10 शिक्षिका संपावर गेल्या आहेत, दहा दिवसांवर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आली आहे,

त्यामुळे कॉलेजमधील शंभर पेक्षा अधिक नरसिंगच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे...

वादळाच्या वेगाने केला घात विमा कंपनीकडून भरपाईस नकार

रावेर, तालुक्यातील सात मंडलांमध्ये २९ जूनला झालेल्या वादळामुळे केळीचे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांचे ९०० हेक्टरवरील केळीचे सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सर्वांना विमा कंपनीकडून सुमारे साडेसात कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना, 'वाऱ्याचा वेग निकषात बसत नसल्याने भरपाई देणे शक्य नाही', असे कारण विमा कंपनीचे अधिकारी देत असून, शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी विमा कंपनीने हवामान मोजणी यंत्रावरील आकडे न पाहता प्रत्यक्ष नुकसान पाहून भरपाई द्यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे

बैलगाडा शर्यतीवर लंम्पी आजाराचे संकट, शर्यती बंद ठेवण्याचे आवाहन

उत्तर पुणे जिल्ह्यात लंम्पी आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने ३१ जुलै २०२५ पर्यंत बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सर्व गाडेमालकांना शर्यतीत सहभागी होऊ नये, असे आवाहन करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडेमालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

असे असतानाही आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे नियम धाब्यावर बसवत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून सलग दोन दिवस या शर्यती होणार आहेत.

लंम्पी संसर्गाचा धोका लक्षात घेता या शर्यती आयोजनावर टीका होत असून, सहभागी होणाऱ्या गाडेमालकांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाने या शर्यतीत भाग घेऊ नये, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण जळगाव महापालिका १६७ वरून ५२ व्या क्रमांकावर

जळगाव शहराने 'स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

मागील वर्षीच्या १६७ व्या स्थानावरून थेट ५२ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात हे यश मिळाले असून, महाराष्ट्रात जळगावला १७ वा क्रमांक मिळाला आहे.

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२४'चा निकाल केंद्र सरकारने जाहीर केला.

त्यात तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात जळगाव मनपाला देशात ५२ वी रँक मिळाली असून, मागील वर्षी १६७ वी रँक मिळाली होती.

यंदा त्यात सुधारणा झाली आहे.

अवधूतवाडी पोलीस ठाण्याची एसपींकडून झाडाझडती

अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हे नोंद होणारे पोलीस ठाणे म्हणून यवतमाळ शहरातील अवधूतवाडी ठाण्याची ओळख आहे.

इथे मोठ्या संख्येत गुन्हे घडतात पोलीस ठाण्यातील यंत्रणा काही दिवसांपासून केवळ गुन्हा घडला की नोंद करण्यापुरतेच काम करत आहे.

यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस ठाण्याची झाडाझडती घेतली एकूण कारभारावरून त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे

Ratnagiri: स्वच्छ , सुंदर बस स्थानकात रत्नागिरीची बाजी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यात सुरू आहे.

एसटी विभागाचे पथकांनी राज्यातील सर्वच बसस्थानाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

पहिल्या सर्वेक्षणात मुंबई प्रदेशातून (कोकण विभाग) रत्नागिरी बसस्थानकाने बाजी मारली असून, १०० पैकी तब्बल ८९ गुणप्राप्त करीत अ मानांकन मिळवलं आहे.

तर रत्नागिरीतीलच पाली बसस्थानकास व आणि माखजन बसस्थानकास क मानांकन मिळालं आहे.

उल्हासनगरमध्ये तिकट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी

तिकीट बुकिंग च्या नावाखाली बेकायदेशीरपणे महागड्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या एका इसमाला राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या पथकाने उल्हासनगर येथे एका दुकानात छापा टाकत केली आहे .

परदेशातून विनापरवाना आयात केलेल्या 1 लाख 7 हजार रुपये किमतीच्या 21 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

राजेश विषणदास छाबरिया असे आरोपीचे नाव आहे .

राज्य उत्पादन शुल्कच्या कल्याण विभागाच्या भरारी पथक निरीक्षक दीपक परब यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com