Maharashtra Live News Update: आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरुवार, दिनांक १७ जून २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.

पुणे रेल्वे स्टेशन विभागात ब्लॅक बॉक्स सारखी यंत्रणा बसवणार

पुणे रेल्वे स्टेशन विभागात अपघाताची माहिती अगोदर किंवा नंतर मिळण्यासाठी ब्लॅक बॉक्स सारखी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यापूर्वीच ही यंत्रणा सुरू आहे मात्र जो संवाद रेल्वे चालक आणि स्टेशन मास्तर कंट्रोल रूम यांच्यात होतो. त्याचा रेकॉर्डिंग या यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे.

मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू

मीरा भाईंदरमध्ये उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मराठीच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद मराठीसाठी काढलेला मोर्चा त्यानंतर राज ठाकरे यांची सभा त्यामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे. ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांवर झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आली असून जय्यत तयारी सुरू झाली आहे.

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी स्टाईल आंदोलन 

कल्याणमध्ये ठाकरे गटाचा गांधीगिरीतून ओला-उबेर बंद न मानणाऱ्या चालकाचा हार-श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. पंधरा तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबेर कंपनीच्या मनमानी विरोधात चालकांचे आंदोलन सुरू आहे.

म्युनिसिपल कामगारांचा आक्रोश, मुख्यमंत्री भेटीसाठी आंदोलन

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन आता अंतर्गत करण्याचे संकलन परिवहन आणि विल्हेवाट हे कामगाज खाजगी कंपनीकडून करून घेण्यात येईल असा जी आर सुधारित करण्यात यावा यासाठी तसेच इतर प्रश्न मागे लावण्याबाबत आज प्रिन्सिपल कामगार ॲक्शन कमिटीतर्फे आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याविषयी तोडगा काढण्यात यावा असे मागणी करण्यात आली या ठिकाणी आंदोलनाला गिरीश महाजन यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडे मांडतील आश्वासन दिले

रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात

रत्नागिरी : संगमेश्वरमधील ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनीबसमध्ये भीषण अपघात

समोरासमोर धडक होऊन झाला अपघात

रत्नागिरीहून चिपळूणकडे जात होती एसटी बस, तर मिनीबस येत होती रत्नागिरीच्या दिशेने

अपघातग्रस्त दोन्ही गाड्या जेसिबीने काढल्या ओढून

दोन्ही गाडीतील काही प्रवासी जखमी, मिनिबसचा चालक गंभीर जखमी

जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दाखल

मिनीबसचा चालक गाडीच्या कॅबिनमध्ये अडकला, त्यांना अर्ध्या तासानंतर काढण्यात आलं बाहेर

जखमी चालकाला प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरीला हलवलं

अपघातामुळे वाहतूक काही काळ झाली होती विस्कळीत

माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई, पीएमआरडीएची संयुक्त मोहीम

आय टी पार्क हिंजवडीसह माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात पीएमआरडीएने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

हिंजवडी, माण आणि मारुंजी या भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहेत. त्याच बरोबर हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.

विधान भवनात हाणामारी, आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले

हिवाळी अधिवेशन ६ डिसेंबरपासून सुरु होणार

प्रसिद्ध उद्योगपती कल्याणी यांच्या कुटुंबात प्रॉपर्टी वरून वाद, मुलगी सुगंधा हिरेमठ कराड कोर्टात

प्रसिद्ध उद्योगपती डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या कुटुंबातील वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून भांवडात वाद सुरू झाले असून कन्या सुगंधा हिरेमठ यांनी कराडमधील कोर्टात बाजू मांडण्यासाठी अर्ज दाखल करत खटल्यात पक्षकार करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार असल्याची माहिती वकील सुखदा वागळे यांनी दिली

सीईटी परीक्षांतील गोंधळ, शुल्क अनियमितता व विलंबावर आमदार सुनिल कांबळे यांचा विधानसभेत सवाल

पुणे : 'खासगी विद्यापीठे आपापल्या परीक्षांसाठी भरमसाठ शुल्क आकारतात. यावर कोणतेही शासन नियंत्रण नसल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसतो,असे कांबळे यांनी सांगितले. त्यांनी खासगी विद्यापीठांच्या सीईटी शुल्कावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली.

रॉबर्ट वाड्रा यांच्या ४३ मालमत्ता जप्त, आरोपपत्रही दाखल; जमीन व्यवहार प्रकरणात ईडीची कारवाई

धाराशिवमध्ये शेतात चरण्यासाठी गेलेल्या 16 शेळ्या खड्ड्यातील दुषित पाणी पिल्याने दगावल्या

धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील ईट परिसरामध्ये चरण्यासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांच्या १६ शेळ्या खड्ड्यातील साठलेले दुषीत पाणी पिण्यामुळे दगावल्या आहेत.यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ईट परीसरातील संगमेश्वर प्रकल्प शिवारातील खड्ड्यातील पाणी पिण्यामुळे शेळ्या दगवाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तर यामध्ये बाबु शिंदे,मदन शिंदे व भाऊ शिंदे या शेतकऱ्याचे नुकसान झाल आहे.

Dharashiv: शेतात चरण्यासाठी गेलेल्या 16 शेळ्या खड्ड्यातील दुषीत पाणी प्यायल्याने  दगावल्या

धाराशिव -

शेतात चरण्यासाठी गेलेल्या 16, शेळ्या खड्ड्यातील दुषीत पाणी पिल्याने दगावल्या

तीन शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान, भुम तालुक्यातील ईट परिसरातील घटना

धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील ईट परिसरामध्ये ही घटना घडली

Pune: चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुककोंडी संकट कायम, पुणे- नाशिक महामार्गावर ५ किमीपर्यत वाहनांच्या रांगा

पुणे -

चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुककोंडी संकट कायम

पुणे नाशिक महामार्गावर पाच किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा..

तासंतास वाहने एकाच जागेवर..

वाहतुककोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नागरिकांना कालच चाकणमध्ये आंदोलन केलं होतं

आज दुस-याच दिवशी वाहतुकोंडी झाल्यानं प्रवाशांसह कामगार अवजड वाहतुक वाहतुकोंडी अडकले

वाहतुकोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची चांगलीच दमछाक

Nagpur: नागपुरात आज झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर पाणीच पाणी

नागपूर -

नागपुरात आज झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर पाणीच पाणी...

शहरात आज खरतर अचानक दुपारनंतर पाऊस सुरू झाला.

जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ पाऊस झाला..

या पवसांमुळे रेल्वे स्थानक परिसरात टेकडी गणेश मंदिर रोड समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल....

रस्त्यावर पाणी साचल्याने आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यान रस्त्यावर पाणी भरून आहे...

त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहन नेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे...

Solapur: शाई फेक प्रकरण, आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना जामीन

सोलापूर -

शाई फेक प्रकरणातील आरोपी दीपक काटे सह एकाला अक्कलकोट न्यायालयाकडून जामीन मंजूर

२० हजारांच्या जात-मचुलक्यावर तसेच वेगवेगळ्या अटी व शर्तीवर मंजूर करण्यात आला जमीन,

आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे दोघांनाही न्यायालयाने दिला जामीन

Solapur: प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोपीला जामीन

प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोपीला जामीन

प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झाला होता हल्ला

दीपक काटेने त्यांच्यावर हल्ला केला होता

याप्रकरणी दीपक काटेला अटक करण्यात आली होती

आज दीपक काटेला जामीन देण्यात आला

Dhule: बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धुळ्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

४ बांगलादेशी नागरिकांना वेगवेगळ्या कलमान्वये सहा महिने आणि तीन महिने अशा साध्या कारावासाची शिक्षा धुळे न्यायालयाने सुनावली आहे.

या ४ बांगलादेशी नागरिकांकडून जप्त करण्यात आलेली बनावट कागदपत्रे संबंधित विभागाकडून रद्द करण्यात यावी, अशा सूचना देखील न्यायालयाने निकालपत्रात दिल्या आहेत,

Pune: पुण्यात कृषी आयुक्तांच्या नावाने वावरणाऱ्या प्रशांत गवळीच्या विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा

पुणे -

पुण्यात कृषी आयुक्तांच्या नावाने वावरणाऱ्या प्रशांत गवळीच्या विरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल.

याप्रकरणी धनंजय दिनकरराव पाटील

कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.

विश्व हिंदू परिषदेची आजपासून बैठक देश-विदेशातून प्रतिनिधी हजर

विश्व हिंदू परिषदेची राज्यातील चौथी व जळगावातील पहिली आंतरराष्ट्रीय स्तरीय ५ दिवसीय निवासी बैठक १७ ते २१ जुलै दरम्यान एमआयडीसीतील एका लॉन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस देशभरातून ३५० तर ५ देशातून प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदे यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडळ व केंद्रीय प्रबंध समिती यांची वर्षातून दोन वेळेस बैठक होत असते. आतापर्यंत गेल्या ६१ वर्षांत महाराष्ट्रात केवळ मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणी बैठक झाली आहे.यंदा ही बैठक नॉन मेट्रो सिटीत म्हणजे जळगाव शहरात प्रथमच घेण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे काम भारतासह ४० देशांत चालते. त्यामुळे या बैठकीस भारतातून ३५० तर ५ देशातून प्रतिनिधी आले आहेत. बैठकीच्या व्यवस्थापनासाठी व प्रतिनिधींच्या सुविधेसाठी २१ समित्या गठीत करण्यात आल्या आहे. त्यात ७५ स्वयंसेवक काम पाहत आहे,

वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत

मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

Amravati: अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे काम बंद आंदोलन

आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य परिचारिकानी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.राज्य शासनाने आम्हाला कोविड काळातील भत्ता द्यावा,सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर झाली पाहिजे,आम्हाला गणवेश भत्ता मिळाला पाहिजे,एन जी पी वाय चा थकीत भत्ता अजून पर्यंत शासनाणे आम्हाला दिला नाही तो तात्काळ शासनाने आम्हाला द्यावा,यासोबतच कंत्राटी पद्धतीने पदनिर्मिती बंद करून नियमित पद भरती शासनाने तात्काळ करावी,या मागणीसाठी आरोग्य सेविकेने आज जोरदार घोषणा दिल्या तर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य न केल्यास आम्ही अजून आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील यावेळी परिचारिकांनी दिला आहे

Nashik: नाशिकमध्ये काँग्रेस इलेक्शन मोडवर

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोर्चे बांधणीला सुरुवात

- आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू

- नाशिकच्या काँग्रेस कमिटी कार्यालयात इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू

- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस कार्यालयात उमेदवारांची गर्दी

कोल्हापुरात सोन्याच्या गावात राजकीय गोंधळ, सरपंचाच्या विरोधात झालेल्या अविश्वासाच्या ठरावावर ग्रामस्थांच मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोन्याचे गाव समजले जाणाऱ्या बीड गावात राजकीय गोंधळ उडाला आहे. सरपंचावर सदस्याने अविश्वास ठराव आणल्यानंतर गावाची सहमती असावी यासाठी समर्थणार्थ आणि विरोधात मतदान आज पार पडत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव मतदानासाठी रस्त्यावर उतरले आहे. मतदानासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागलेले दिसून येत आहे.

Nalasopara: नालासोपाऱ्यात ओला उबर चालकाची विष प्राशन करून आत्महत्या

वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून ओला आणि उबर चालकांचे भाडेवाढीसाठी सुरू असलेले आंदोलन आता भीषण वळणावर पोहोचले आहे.

शासनाकडून कोणतेही सकारात्मक आश्वासन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एका ओला चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सरोज सक्सेना (वय अंदाजे ४५), असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून तो नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात वास्तव्यास होता. त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Nanded: नांदेड मध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

विविध मागण्यासाठी परिचारिका संघटना आक्रमक.

आंदोलनात परिचारिका संघटनेचे 550 कर्मचारी सहभागी.

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा.

अँकर:-महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू केल आहे. या आंदोलनात परिचारिका संघटनेचे 550 कर्मचारी सहभागी झाले आहेत. सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी रद्द करण्यात यावी, नवीन भरतीत 80 टक्के महिला आणि 20% पुरुष हे धोरण बंद झालं पाहिजे, कोविड भत्ता देण्यात यावा यासह विवीध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना न्यायलयीन कोठडी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या आरोपीना न्यायालयीन कोठडी

आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगरे दोघांना ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर

पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र मागणी नाकारत न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आलीय

अक्कलकोट दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने मंजूर केली न्यायालयीन कोठडी

मंगळवारी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती

Pune News: सुजाण पुण्याला अघोरी विद्येचा विळखा? गुप्तधन शोधून देतोच्या बहाण्याने महिलेला गंडा

पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क मधील धक्कादायक घटना

भोंदू बाबाकडून महिलेला २ लाख ६० हजार रुपयांचा गंडा

गंडा घालून "खान बाबा" फरार झालेल्या भोंदू बाबाला अटक

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापुरातील कसबा बीड मध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा सरपंचावर अविश्वास ठराव

कोल्हापुरातील कसबा बीडमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा सरपंचावर अविश्वास ठराव

अविश्वास ठराव संमत करण्यासाठी गावात सुरू झालं मतदान.

लोकनियुक्त सरपंच असल्याने अविश्वास ठरावासाठी गावकऱ्यांनाही करावं लागतंय मतदान.

3218 मतदारांपैकी 1834 मतदारांनी केली मतदानासाठी नोंदणी.

सरपंच उत्तम वरुटे यांच्याविरोधात सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव.

माजलगावची हिवरा नदी दुथडी भरून वाहू लागली

दोन आठवडे विश्रांती घेतलेल्या पावसाने, बीड जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार हजेरी लावली. बीडच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, नदी ओढे दुथडी भरून वाहत आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा नदीला पूर आला आहे.

जबरदस्तीने दूध पाजल्याने विठ्ठल मंदिरातील गोशाळेत वासराचा मृत्यू

विठ्ठल मंदिरातील गोशाळेतील एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेमुळे मंदिराच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा या निमित्ताने पुढे आला आहे. जबरदस्तीने दूध पाजल्यामुळे वासराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पुणे ,मुंबई ,नागपूरमध्ये रिक्षा चालकांचा उद्या संप

पुणे ,मुंबई ,नागपूरमधील रिक्षा चालकांनी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर अर्बन कंपनी सारख्या एप्लीकेशन वर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, "महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट", लागू करण्याची मागणी बघतोय रिक्षावाला संघटनेने केली आहे.

देशातील कोणतेच कायदे न पाळता रिक्षा, कॅब, बाईक टॅक्सी व आता काल परिवहन विभागाच्या पत्रानुसार बस सुद्धा बेकायदा चालवणाऱ्या ओला, उबर व रॅपिडो विरोधात कारवाई चे कागदोपत्री आदेश काढण्याशिवाय परिवहन विभाग काहीही करत नाही. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर उद्यापासून आजच मैदानावर उपोषण सुरू करणार असल्याचा केशव सागर यांनी सांगितले.

अहिल्यानगरात फेरफटका मारताना बिबट्याच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल

शहराच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव गुप्ता येथे बुधवारी सायंकाळी दोन बिबट्यांची जोडी दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेताजवळील विहिरीच्या कडेला फिरत असलेल्या या बिबट्यांचा व्हिडीओ एका युवा शेतकऱ्याने काढला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बिबट्यांची जोडी अगदी निर्भयपणे फेरफटका मारताना दिसते, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शहरवासीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खरंतर गेल्याच काही महिन्यांपूर्वी नगर शहरातील केडगाव परिसरात बिबट्याने नागरी वसाहतीत शिरून अनेकांवर हल्ला चढवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा बिबटे शहराच्या दाराशी आल्याने नागरिकांमध्ये आणखी भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

वर्ध्यात विद्युत दुरुस्तीदरम्यान कामगाराचा मृत्यू

वर्धा तालुक्याच्या वायगाव निपानी येथील वीज वितरणच्या शाखेत कंत्राटी

कामगार म्हणून कार्यरत असलेल्या युवकाचा दुरुस्तीचे काम करीत असताना

विद्युत प्रवाहाचा झटक्याने मृत्यू झाला.

यवतमाळमध्ये परिचारिका संघटनेचा कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे.शासनाने याची दखल न घेतल्यास उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे.या आंदोलनात राज्यातील परिचारिका संघटना असून रुग्णसेवर परिणाम पडणार आहे.आपल्या मागण्यामध्ये कर्मचाऱ्याचे वेतन त्रुटी दूर करावे,राज्यातील परिचरिकाणा केंद्राशासनाप्रमाणे भत्ता देण्यात यावा,कंत्राटीकरण थांबविण्यात यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

नागपूरसह विदर्भातील परिचारीकांचं आज कामबंद आंदोलन

राज्यभरातील 15 ते 20 हजारच्या घरात परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी असल्याचा दावा केला

बदलापूर पोलिसांनी नागरिकांना मिळवून दिले 20 मोबाईल

बदलापूर पूर्व पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले, चोरी झालेले 20 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले. यानंतर या नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याकडून नागरिकांच्या हरवलेल्या, चोरी झालेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय. या पथकाने मागील काही दिवसात हरवलेल्या 20 नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केले. विशेष पथकाच्या माध्यमातून दर महिन्याला असे 20 ते 25 मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले जात असल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिलीय.

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून एसआयटी बीडमध्ये तळ ठोकून

बीडच्या नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये मुलीचा वर्षभर लैंगिक छळ केला जात होता. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांना अटक करण्यात आली असून ते सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी SIT मार्फत तपास केला जाईल त्यासाठी SIT गठीत करण्याचं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाहीर केलं होतं.

Maharashtra Live News Update: शेतात दगडं का टाकलेस? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण

शिरूर कासार तालुक्यातील खोलेवाडी येथील जानु केदार हे आपल्या शेतात काम करत होते. भावकितील लोकांनी त्यांच्या शेतात दगड टाकले. आमच्या शेतात दगड का टाकले? असे विचारल्यानंतर तुझ्यासोबत मला वाद करायचा आहे, आणि तुला जीवे मारायचे आहे असे म्हणत आरोपींनी लोखंडी रॉडने आणि दगडाने बेदम मारहाण केली.

जानु केदार आणि रंगनाथ केदार यांना भावकीतील तुकाराम केदार आणि आप्पा केदार या दोघांनी लोखंडी रॉडने आणि दगडाने बेदम मारहाण केली. तर मारहाण करताना तुकाराम केदार यांना तुला जिवे मारणार असल्याची देखील धमकी आरोपींनी दिली.

यामध्ये जानु केदार आणि रंगनाथ केदार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर कासार पोलिसात यासंदर्भातली तक्रार देण्यात आली आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढल्यानं दोन्ही कालव्यातून सोडले पाणी

जुलै महिन्याच्या मध्यावधीमध्ये ७८ टक्के पाणीसाठा जमा होण्याची ही पहिलीच वेळ

आणखी पाऊस वाढला तर आवक वाढण्याची चिन्ह असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कालव्याद्वारे सुरू केला. जायकवाडी धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाल्याने पाणी सोडण्याचा निर्णय

उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेक विसर्ग सुरू

मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांमधील जवळपास २ लाख ४० हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा सिंचनासाठी फायदा होणार

डाव्या कालव्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. तर उजवा कालवा १३२ किलोमीटरचा असून यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

कर्ज काढून बियाणे पेरले, बनावट निघाले कारवाई झाली

जळगाव कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा दुबार पेरणीचे संकट आले आहे.खरीप हंगामात बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुळसुळाट वाढला असून, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही किंवा अपेक्षित वाढ झाली नाही, अशा तक्रारीदेखील जळगाव जिल्ह्यातून कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.चालू खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात बनावट बियाणे, खते आणि औषधे विकल्याप्रकरणी कृषी विभागाला ३१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या `तक्रारींमध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असून, दुबार पेरणीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या तक्रारी गंभीरपणे घेत कारवाई सुरू केली आहे

Maharashtra Live News Update:राज्यात जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ

सध्या राज्याचा एकूण पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी केवळ २९ टक्के जलसाठा होता. कोकण विभागात सर्वाधिक ७५.०६ टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभागात ६९.५६ टक्के जलसाठा नोंदवण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठाही ७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणांचा एकत्रित उपयुक्त साठा २०.५७ टीएमसी इतका झाला आहे.

कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे, तर उजनीसारखी मोठी धरणे नियोजित वेळेपेक्षा दीड महिना आधीच भरली आहेत.

राज्यातील २,९९७ धरणांपैकी कोकण, पुणे, नाशिक आणि विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक साठा असून, यंदा पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

लातूरमध्ये दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

लातूर जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाने अक्षरशः उघडीत दिली होती, मात्र काल मध्यरात्रीपासून, जिल्ह्यातल्या रेनापुर अहमदपूर औसा, भागात पावसाला सुरुवात झाली आहे.. तर आज सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे अनेक भागात रिमझिम पाऊस देखील सुरू आहे.. त्यामुळे मरगळलेल्या पिकांना आता पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे

शक्तीपीठ रद्द होण्यासाठी राजू शेट्टी यांनी घातले पत्रादेवीला साकडे

प्रस्तावित पवनार-पत्रादेवी हा ८०२ किमी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची समस्या उद्भवेल. २७ हजार एकर जमीन खरेदी करून ५५ हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे राज्य शासनाला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे असे साकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्री पत्रादेवी चरणी घातले.राजू शेट्टी हे सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यानी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या ठीकणची पाहणी केली.

भिमाशंकर मार्ग खड्ड्यात, अपघातांचं सत्र सुरूच

पुणे-नाशिक महामार्गावरून मंचर-भिमाशंकर आणि राजगुरुनगर-भिमाशंकर हे दोन्ही रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी पोखरले गेलेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकी भीषण अवस्था रस्त्याची झालीय या मार्गावरून दररोज शेकडो भाविक, पर्यटक आणि स्थानिक प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतायत. खड्डे, निसरडे वळणे वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागलाय.या खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह प्रवाशांनी रस्त्यावर बसून प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध नोंदवला.

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात जोरदार पाऊस

जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरामध्ये काल रात्री जोरदार पाऊस पडला आहे .या पावसामुळे शेवगळ ,आणि शिंदेवडगाव या गावातील नद्यांना पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ ,शिंदे वडगाव,पानेवाडी, आवलगाव या परिसरामध्ये पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.दरम्यान जालना जिल्ह्यातील इतर भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

रेल्वेत चोरी करणाऱ्या तीन जणांना अटक

भुसावळ रेल्वेत प्रवाशांकडील मोबाइलसह इतर वस्तू चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या बॅगसह इतर साहित्य परत करण्यात आले आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर ऑपरेशन 'यात्री सुरक्षा' आणि ऑपरेशन 'अमानत' मोहिमेत रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा दलाचे गुन्हे प्रतिबंधक व शोध पथकाने ही कारवाई केली.

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन मुंबईकडे रवाना

उघडपणे नाराजी जाहीर केल्यानंतर मनसेच्या वरिष्ठा कडून त्यांची मनधरणी

अमित ठाकरे यांनी मुंबईला भेटण्यास बोलावले असल्यामुळे आज सकाळी प्रकाश महाजन हे छत्रपती संभाजीनगर मुंबईला निघाले

मनसेचे नाशिक मध्ये झालेल्या शिबिराला प्रवक्ते असलेल्या प्रकाश महाजन यांना बोलावले नसल्यामुळे त्यांनी उघड पण नाराजी व्यक्त करत प्रवक्ते पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता

ऐकावं ते नवलच स्वच्छता कामगाराला सोपवली अध्यापनाची जबाबदारी

सध्या रिक्त पदांमुळे राज्यात शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याच्या उद्देशाने पुलगाव नगर पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सारेच चकीत झाले. मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकाला मदत आणि मुलांचे शैक्षणिक हित जोपासण्याच्या हेतूने एका उच्च शिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यावर अध्यापनाची जबाबदारी सोपविल्याचा आदेश काढण्यात आला.त्यांच्या या निर्णयानाने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शिक्षक समितीने करत त्याचा विरोध करण्यात आला.

शैक्षणिक वर्ष नवे, गणवेश मात्र जुनेच, मावळातील एकोणीस हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला आला आहे. तरीही मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यावरच शाळेत यावे लागत आहे.. मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व नगरपालिका मिळून 292 शाळा कार्यरत आहे त्यामध्ये एकोणीस हजार 636 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शासनामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो, मात्र यंदा कोणत्याही शाळेमध्ये अद्याप पूर्णपणे गणवेश वाटप झालेला नाही.

९.९७ कोटींच्या शासन महसुलास चुना,अकोल्याच्या व्यापाऱ्यास अटक

प्रत्यक्षात मालाची खरेदी-विक्री न करता फक्त जीएसटीची बिले देऊन व त्याबदल्यात कमिशन घेऊन उरलेली रक्कम परत करण्याचा गोरखधंदा सध्या फोफावला आहे.असे व्यापारी सध्या अमरावती जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत.अकोला येथील प्रतीक गिरीराज तिवारी याला तब्बल ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी जिएसटी विभागाने अटक केली आहे.अकोल्याच्या तिवारीने स्वामी सार्थ किराणा या नावाने सिमेंट, स्टील रॉड्स, हार्डवेअरसाठी जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली होती. या व्यवसायाच्या संशयास्पद व्यवहारावर जीएसटी विभाग नजर ठेवून होता.राज्यातील सात व्यापाऱ्यांकडून तिवारी यांनी खोटी बिले घेतल्याचे तपासात उघड झाले आहे, शिवाय कर्नाटक राज्यातील दोन व्यापाऱ्यांनी देखील जीएसटी कायद्याखाली नोंदणी केली व नंतर ती रद्द केली. हा जीएसटी कायद्यान्वये गुन्हा व फसवणुकीची रक्कम पाच कोटींवर असल्याने दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा आहे.

अमरावती लागत च्या वलगांवमध्ये दारूच्या नशेत धुंद इसमाचा थरारक अपघात

अमरावती लागत च्या वलगांव येथे नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले या पुलाला सौरक्षक कठडे नसल्याने काल रात्री एका दारूच्या नशेत धुंद व्यक्ती ७०फूट खाली पडला मात्र नन्तर सर्वांना चकित करणारा थरारक प्रकार घडवला. पुलावरून तब्बल ७० फुट खाली हा इसम कोसळला.

खालापूर मधील मंगलम कंपनीत मोठी आग

खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील मंगलम कंपनीत रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. कापूर तयार करणाऱ्या या कंपनीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील कच्चा माल असल्याने आग भडकली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. खोपोली नगर पालिका, पाताळगंगा एमआयडीसी आणि परिसरातील कंपन्याच्या अग्निशमन यंत्रणा, पोलिस तसेच हेल्प फाउंडेशन चे बचाव पथक यांनी मोठ्या प्रयत्नाने अडीच तासात आग आटोक्यात आणली. या आगीत कंपनीतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही

पादचारी महिलेची चैन हिसकावून पसार झालेल्या तरुणाला बेड्या

कल्याण पूर्वेकडील गणेशवाडीत घरातला कचरा कुंडीत टाकून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून एक अज्ञात चोरटा पसर झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली होती .या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या चोरट्याला बेडा ठोकल्यात प्रीतम रमेश जाधव असे नाव आहे . तपासा दरम्यान अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी माहिती समोर आली आहे . कल्याण पूर्व वालधुनी परिसरात राहणारा प्रीतम याच्याकडे घराचे भाडे भरण्यासाठी पैसे नव्हते घराचे भाडे भरण्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन केला आणि पहिल्यांदाच त्याने या पादाचारी महिलेची चैन हिसकावून तो पळून गेला . चैन विकून मिळालेला पैशातून त्याने घडाचे भाडे भरले मात्र मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com