

पुणे विभागातील विविध जिल्ह्यांत तपासणी करून एकूण ९२ हजार ५४१ किलो आणि लिटर अन्नसाठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. यामध्ये दोन दूध संस्थांना पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
पुणे जिल्ह्यात अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज आणि प्रियदर्शनी दूध संकलन केंद्राच्या टँकरमधील सुमारे ५३ हजार लिटर दूध भेसळीच्या संशयावरून नष्ट
नाशिकमधून आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी भावली धबधब्यावर गेलेल्या पुनम भागवत आणि त्यांच्या कुटुंबावर केला हल्ला.
पीएमपी बस चालकाने जाणूनबुजून गाडी दाबली, असा आरोप करत एका कॅब चालकाने भर रस्त्यात राडा घातला. कॅब चालकाने पीएमपी बस चालकाला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील शनिवार वाडा जवळ घडला. पीएमपी बस चालक मुद्दाम त्याची बस कॅबला रस्ता अडवून त्याला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे या कॅब चालकाचे म्हणणे होते. पण त्याचा राग अनावर इतका झाला.
जळगावात विद्यापीठासमोर अपघात चारचाकी ने दुचाकीला दिलेल्या धडकेत नववधूचा मृत्यू...*
वैशाली भाऊसाहेब पाटील असे २१ वर्षीय मयत नववधूचे नाव असून सहा दिवसांपूर्वी लग्न झाल्याची माहिती
सासरहून दुचाकीवरून माहेरी जाताना अपघात ; नववधूचे काका जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
शिरपूर शहरातील 'अक्षद ट्रेडिंग' या किराणा दुकानातून झालेल्या 14 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे, मतीन तेली आणि मकसूद मेहतर अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
डोंबिवलीतील गाजलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या अन्य तीन साथीदारांना न्यायालयाने २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चारही आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी लेखी स्वरूपात आपला युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरी नगरीत दाखल झाली. सोन्याच्या जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करत वारकरी आणि ग्रामस्थांनी माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत केले.
VO : टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगांचे स्वर आणि हवेत उधळला जाणारा भंडारा यामुळे संपूर्ण जेजुरी भक्तिरसाने न्हाऊन निघाली. भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलीय जेजुरीत भंडाऱ्याच्या सुवर्णवर्षावात न्हालेली जेजुरी आज भक्ती, समता आणि माणुसकीचा जिवंत उत्सव बनलीय
शिरपूर शहरातील 'अक्षद ट्रेडिंग' या किराणा दुकानातून झालेल्या 14 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे, मतीन तेली आणि मकसूद मेहतर अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत,
चारही आरोपींना व्हिसीद्वारे करण्यात आले हजर
दोन्ही वकिलाचा लेखी स्वरूपात युक्तिवाद झाला
माऊलींच्या दर्शनाची आस मनात घेऊन लाखो वारकरी पायी चालत असताना, त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही सेवाभावी हातांनी उचलली आहे. दिंड्यांमधून सुरू असलेली मोफत वैद्यकीय सेवा थकलेल्या वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे.
VO : लांबच्या पायी प्रवासामुळे होणारा थकवा, पायांवरील फोड, ताप, सर्दी-खोकला आणि अंगदुखी यांवर डॉक्टर, परिचारिका व स्वयंसेवक तातडीने उपचार करत आहेत. औषधोपचाराबरोबरच मायेचे दोन शब्द आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देत ही सेवा वारकऱ्यांना नवचैतन्य देत आहे. “सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून सुरू असलेली ही मोफत आरोग्यसेवा वारीतील माणुसकी, समर्पण आणि भक्तीचा तेजस्वी आविष्कार ठरतेय
बदलापुरात FDAनं मोठी कारवाई केलीय. ग्राहाला बुरशी लागलेला पिज्झा बेस दिल्याप्रकरणी राऊत चौकातील फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित करण्यात आलाय. ग्राहकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात मनसेनं आवाज उठवला होता. त्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळी फ्लिपकार्ट मिनिट्सच्या गोडावूनवर छापा मारत सर्व खाद्यपदार्थांची तपासणी केली. काल संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई आज दुपारपर्यंत सुरू होती. या कारवाईदरम्यान याठिकाणी FDA अधिकाऱ्यांना काही डर्टी खाद्यपदार्थ आढळून आले. त्यानंतर या फ्लिपकार्ट मिनिट्स ब्रांचचा परवाना निलंबित करण्यात आलाय. तर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी केलीय.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांवर निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे मोठे संकट ओढवले आहे. कर्ज काढून, मोठ्या आशेने शेतात पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तब्बल 10 ते 12 दिवस उलटूनही सोयाबीनची उगवण न झाल्याने त्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता न्यायासाठी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांनी चांदूर रेल्वेच्या एसडीओ कार्यालयावर सोमवारी धडक दिली. बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगावर बांधून राजुरा येथील शेतकरी भूषण काळे अनोखा निषेध नोंदविला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने राम मंदिर देणगी चोरीविरोधात चंद्रपुरातील अंचलेश्वर महादेव मंदिरात आंदोलन करण्यात आले. रघुपती राघव राजाराम सत्याग्रहात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले. खा. प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः आंदोलनात सुरेल विठ्ठल भजन गात सहभाग घेतला. राम कुणा एकाचा नाही- राम सर्वांचा आहे- आमच्याही मनात राम आहे, असे सांगत खा. धानोरकर यांनी आमचा मुद्दा हा राम मंदिर देणगी चोरीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एल निनोच्या प्रभावामुळे ऑक्टोंबर महिन्यापर्यंत शेती सिंचनाला पाणी न सोडता केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र पावसाअभावी भात पीक करपायला लागली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढवलं आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पवनी तालुकाप्रमुख जितेंद्र इखार आणि भंडारा उपजिल्हा प्रमुख किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरणाच्या डावा कालवा अभियंता आर आर हरिणखेडे यांना पाण्यासाठी घेराव घातला. जोपर्यंत पाणी सोडणार नाही, तोपर्यंत गोसेखुर्दच्या डावा कालवा कार्यालयात हे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे
वाशिम जिल्ह्यात खरिपाच्या 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पेरणी केलेल्या पिकांना पाऊसाची आवश्यकता असताना गेल्या आठ दिवसांपासून पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे ते शेतकरी आपली पिके वाचण्याकरिता तुषार सिंचनाचा आधार घेत पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय कडाक्याच्या उन्हात कपाशीचे कोवळे अंकुर वाचवण्यासाठी स्पिंकलरद्वारे सिंचन सुरू आहे. मात्र,सिंचनाची सुविधा नसलेला कोरडवाहू शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून वाढत्या चिंतेने हवालदिल झाला आहे.
आमदार रवी राणा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हनुमान चालीसा आंदोलनाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, त्या वेळी हनुमान चालीसा पठणाचे आवाहन केल्यामुळे त्यांच्यासह नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि १४ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आता उद्धव ठाकरे हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाची भाषा करत असल्याचे सांगत रवी राणा यांनी त्यांचे "शुद्धीकरण" सुरू झाल्याची टीका केली.
जेजुरीत पालखी दाखल होत असताना दिंडीतील काही वाहनांचे चालक अल्पवयीन असल्याची बाब समोर आली आहे. एका युवकाने स्वतःचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगितल्याने पालखी सोहळ्यातील वाहन सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.
वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीव्र शोकसंवेदना
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; संबंधित यंत्रणांना अधिक दक्षतेच्या सूचना
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, तर जखमी वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत नांदेडचे गोपाळ राठोड आणि हिंगोलीचे विष्णू डोक या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी मित्रांसोबत पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या या दोघांचा धबधब्यात मौजमजा करताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-१ ने तळोजा परिसरात मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला. बाटलीवाला कंपाऊंड येथे आयशर ट्रकमधून दोन छोटा हत्ती वाहनांमध्ये गुटखा भरला जात असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ६४.६० लाख रुपयांचा प्रतिबंधित राजनिवास पान मसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेली १ आयशर ट्रक व २ छोटा हत्ती वाहने असा एकूण १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांची मागणी....
अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवल त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे देखील अडीच वर्षे पूर्ण झाले आता पुढची सुमित्रा पवारांना द्यावी....
शिवसेना शिंदे गट, भाजप त्यानंतर आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा...
महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना विराजमान करावा अशी मागणी नंदुरबारची जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी केले आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की, विठुरायाच्या दर्शनासाठी भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनास पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना वेदनादायक आहे. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. भाविक वारकऱ्यांच्या सुरक्षेस सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पुण्यात्म्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांना सद्गति लाभो व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो ही पांडुरंगाच्या चरणी नम्र प्रार्थना.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, म्हसवडसह पूर्व भागात पावसाने पाठ फिरवल्याने डाळिंब, सिताफळ, बाजरी, मका, ऊस यांसारखी पिकं करपू लागली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा संपत चालला आहे आणि शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. जनावरांसह नागरिकांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. विहिरी आटल्या, तलाव कोरडी पडली शेती करपू लागली त्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकटासह दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच असून, आज आणखी एका अपघातात दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी झाले. पायी वारी करत असताना हा अपघात घडल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जेजुरी येथे झालेल्या अपघातात आठ वारकरी जखमी झाले असून, त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींपैकी एका महिलेच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली असून, तिच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
आज माऊलींच्या वारीत सासवड ते जेजुरी मार्गावर बेलसर फाट्या नजीक एका टेम्पोची धडक बसून तीन महिला वारकरी यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती विकास पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आहे.
- आतपर्यंत ६० टक्केच पेरण्या झाल्या, जवळपास ४० टक्के क्षेत्र अजुन पावसाच्या प्रतीक्षेत..
- नागपूर विभागत सरासरी १९ लाख ५ हजार ७४० हेक्टरवर पेरणीयोग्य क्षेत्र.. आतपर्यंत ९ लाख ९९ हजार ३९० हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झाली..
- यामध्ये कापूस ५ लाख ४५ हजार ७६३ हेक्टर, सोयाबीन १ लाख ९८ हजार ७५५ हेक्टर, तूर १ लाख २२ हजार २८० हेक्टर तर भात पिकाची १ लाख २८ हजार ४७५ हेक्टरवर पेरणी झाली
ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक पडल्याने खालून जाणाऱ्या वाहना ंवर हा बॅनर पडणार तितक्यात एका दुचाकी स्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला..
पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर हिरवाईने नटला आहे.. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भंडारदरा परिसरात गर्दी करत आहेत
महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री आठ वाजता बैठकीचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील व इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार
तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही लावणार कोअर कमिटी बैठकीला हजेरी
केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार, राज्यातील संघटनात्मक बाबी, रखडलेल्या नियुक्त्यांसह पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार
कोअर कमिटी बैठकीत इतर मुद्द्यांवर चर्चा होणार का याकडेही लक्ष
नाशिक -
- नाशिक शहरात MNGL ची गॅस पाईपलाईन फुटल्याने झाली होती गॅस गळती
- सिरीन मिडोज परिसरातील गॅस गळतीचा धक्कादायक व्हिडीओ समोर
- काल सायंकाळी जवळपास 5 तास स्थानिक नागरिकांमध्ये होते भितीचे वातावरण
- गॅस गळतीमुळे पाच तास गॅस पुरवठा होता ठप्प
सिंधुदुर्ग -
कुडाळ तालुक्यातील जांभवडे- खोचरेवाडी पूल खचला
नागरिकांची गैरसोय; पुलाची तात्पुरती डागडुजी
कुडाळ तालुक्यातील जांभवडे- खोचरेवाडी येथे ही घटना घडली
गडनदी वरील पूल खचल्याने 25 ते 30 कुटुंबांना येण्याजाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई
२ वेगवेगळ्या ठिकाणी सुगंधित तंबाखू- गुटखा जप्त
जवाहरनगर आणि सिहोरा पोलिसांची धडक कारवाई, एकूण १८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
स्कॉर्पिओ आणि महिंद्रा जितो गाड्यांसह ४ आरोपी अटकेत, सुगंधित तंबाखूची तस्करी उघड
धाराशिव -
टीका करणारांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा, सचिन अहिर यांचा टीकाकारांना सल्ला
माझ्यासह सहा खासदार या तरुण फळीमुळे पक्षाला बळ मिळेल,लोकांची काम होतील
तुमच्याकडून लोक असतात तेव्हा चांगले असतात सोडली की वाईट होतात,असं कस चालेल? ; शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सवाल
उपसभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच सचिन अहिर तुळजाभवानीच्या दर्शनाला,सहकुटुंब घेतला आई तुळजाभवानीचे दर्शन
पुणे -
बदलीसाठी राजकीय दबाव टाकल्याने महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्याचे निलंबन
महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदलीसाठी दबाव टाकल्याने अभियंता अशीत जाधव निलंबित
दीड महिन्यापूर्वी अशी जाधव यांची पत विभागातून पाणीपुरवठा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदली झाली होती
बदली नंतर ते एक महिना रजेवर गेले होते. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदले होण्यासाठी दबाव टाकत असल्याने कारवाई
अतिरिक्त आयुक्त प्रजेत नायर यांनी अशीत जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढल्यास खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत
लातूर जिल्ह्यावर एल निनोच संकट
नदी- नाले कोरडे, अर्धा जुलै संपला तरी पाऊस नाही
पेरण्या खोळंबल्यामुळे बळीराजा चिंतेत
धाराशिव -
दशरथ कुटुंबीयांचा वारकऱ्यांना अन्नदानाचा ८० वर्षांपासूनचा सेवायज्ञ
वारकरी सेवेत चार पिढ्यांची अखंड परंपरा
आषाढी वारी म्हणजे सेवा, समर्पण आणि अन्नदानाची परंपरा. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय मागील ८० वर्षांपासून वारकऱ्यांना अन्नदान करत असून ही सेवा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे.
विशेष म्हणजे ८० वर्षांपूर्वी ज्या भाकरी,पिठलं आणि शुद्ध शेंगदाण्याच्या तेलाचा प्रसाद दिला जात होता,तोच प्रसाद आजही वारकऱ्यांना दिला जातो.
पुणे -
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मनोज पिंगळे यांचे आमरण उपोषण सुरू
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आज आंदोलनाचा तिसरा दिवस
mpsc च्या परीक्षा ह्या पूर्वी प्रमाणेचं ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे
यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात
यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील नवजीवन मंगल कार्यालयासमोर रात्री दरम्यान विचित्र अपघाताचा थरारक घटना घडली.
कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट दुचाकीला धडक दिली
या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे
कारनंतर थेट दुभाजकावर चढली
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेत कोणती जिवितहानी नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.