Maharashtra Lok Sabha Election : वर्ध्याची जागा मिळाली या पक्षाला? उमेदवारीसाठी काँग्रेसच्या या माजी आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

Lok Sabha Election 2024/MVA Seat Allocation : लोकसभेच्या तारखा जाहीर होऊनही महाविकास आघाडीकडून राज्यात अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. वंचित सोबत असणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे. त्यातचं वर्धा लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार गटाला मिळाली आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

चेतन व्यास

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभेच्या तारखा जाहीर होऊनही महाविकास आघाडीकडून राज्यात अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. वंचित सोबत असणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे. त्यातचं वर्धा लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार गटाला मिळाली आहे. मात्र उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यासाठी खलबते सुरू असून आज काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटाची भेट घेतली आहे. त्यामुळे अमर काळे वर्धेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीतून विदर्भात शरद पवार गटाला केवळ एक जागा मिळाल्याने वर्धेच्या जागेवर सक्षम उमेदवार देण्यासाठी धडपड सुरू आहे. वर्धेच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता परंतु जागा शरद पवार गटाला मिळाली. त्याला काँग्रेसमधून विरोध झाला होता. अखेर काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्या माजी आमदाराला शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यासाठी पडताळणी करण्यात आली आहे. सोमवारी अमर काळे यांनी जयंत पाटील यांची तर आज सकाळी सिल्वर ओक वर शरद पवार यांची घेतली भेट घेतीली होते. शरद पवरांच्या भेटीदरम्यान अमर काळे यांच्या पत्नी व मुलगा होता उपस्थित होते. त्यामुळे वर्धेच्या जागेवर अमर काळे तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमर काळे काँग्रेसचे माजी आमदार असून काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र शरद पवार गटाकडून अमर काळे यांना वर्धेतून निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला जात आहे. पण अमर काळे यांनी शरद पावरांकडे विचार करण्यासाठी काही वेळ मागितल्याची माहिती आहे. काँग्रेस ऐवजी शरद पवार गटाकडून लढण्याचा मोठा निर्णय पदाधिकारी व सहकार्यांशी चर्चा करून घेणार असल्याचंही समजत. शरद पवार गटाकडून आधी हर्षवर्धन देशमुख, नितेश कराळे व राजू तिमांडे यांची नावं चर्चेत होती. तर आता काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या भूमिकडे लक्ष लागलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Ravikant Tupakar News: राजू शेट्टी माझे गुरु नाहीत, रविकांत तुपकर यांची स्पष्टोक्ती; लोकसभा लढण्याचीही घोषणा

कसा आहे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला?

महाविकास आघाडीने जागावाटप करताना दोन फॉर्म्युले तयार केले होते. महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला सोडून २२-१६-१० चा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेतल्यास २०-१५-९-४ यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला २०, काँग्रेस पक्षाला १५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाला ९, वंचित बहुजन आघाडीला ४ जागा असणार आहेत.

'वंचित'ला शिवसेना गटाच्या कोट्यातून २, काँग्रेस पक्षाच्या कोटातून १ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून १ जागा देण्यावर तिन्ही पक्षाची तयारी असल्याचे बोलले जात आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com