
अख्या देशाचं लक्ष लोकसभा २०२४ च्या निवडणुकीकडे लागलंय. या निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडणुकीनंतरच मिळेल. परंतु त्याआधी करण्यात येणाऱ्या सर्व्हेमधून जनतेचा कौल काय असेल याचा अंदाज येत आहे. सकाळ समुहाने कल महाराष्ट्राचा सर्व्हे केलाय. यात लोकसभा २०२४ विषयी महाराष्ट्रातील जनतेचा कौल काय आहे याचा अंदाज घेण्यात आलाय. सकाळ समुहाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मात्र मोठा उलटफेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest News)
राज्यात उलटफेर होणार?
राज्यात भाजपविरोधात वातावरण तयार झाल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे. सकाळच्या सर्वेक्षणामुळे अनेक राजकीय पक्षांची धकधक वाढलीय. त्याचवेळी आपण जर केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर तुलनात्मक पाहिलं तर अनेकांना केंद्राचं काम प्रभावित करत आहे. केंद्र सरकारने दोन टर्ममध्ये जी कामे केली आहेत. ते सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यावरुन राज्यातील जनतेच्या मनात मात्र केंद्र सरकारची वेगळी प्रतिमा दिसत असल्याचं सर्व्हेतून दिसत आहे. पण त्याचवेळी राज्यातील केंद्राकडून किंवा राज्यातील भाजप नेत्यांनी केलेल्या सत्ता परिवर्तनामुळे भाजपविरोधातील वातावरण तयार झालंय.
या सर्वेक्षणात मतदान करताना आपले प्राधान्य कोणाला असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 40.3 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवलीय. तर इंडिया / महाविकास आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर तर 10.3 टक्के लोकांनी यापैकी कोणीही नाही, असं म्हटलं आहे.
आधी शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली त्यानंतर अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर मोठा गोंधळ उडालाय. आधीच सरकार कमी कालावधीसाठी बनलं आहे.राज्य सरकारने काय काम केलं हेच लोकांना कळत नाहीये. सरकारचं धोरण काय हे सांगण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळे राज्य सरकारविरोधात नकारात्मकता दिसत आहे. यामागे राज्यातील जनता भावनिक झालीय. प्रादेशिक पक्षात फूट पाडल्यामुळे नागरिकांचा भावना दुखावल्या गेल्या असल्याची मत राजकीय विश्लेषकांनी मांडलंय.
मतदान करताना प्राधान्य कुणाला असेल?
सर्वेक्षणात लोकसभा आगामी निवडणुकीत (२०२४) मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात यात 33.6 टक्के लोकांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. तर तर कााँग्रेसला 18.5 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला 12.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अहजत पवार) 3.9, शिवसेना (एकनाथ शिंदे ) 4.9 आणि शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 12.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यातच मनसे 1.4 टक्के, शेकाप 0.3 टक्के, एमआयएम 0.6 टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 0.4 टक्के, प्रहार 0.3 टक्के वंचित 0.3 टक्के, केसीआर यांच्या पक्षाला 0.2 टक्के, आम आदमी पक्षाला 0.5 टक्के, अपक्ष 1.3 टक्के आणि इतर 5 टक्के प्राधान्य असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.