निवडणुकीत ट्विस्ट! गुलाल उधळला पण निकाल कोर्टात, सोलापूरनंतर धुळ्यातील विजयाने भाजपचं टेन्शन वाढलं

Dhule Local Body Polls : सोलापूर आणि धुळे येथे बिनविरोध विजयामुळे भाजपचे टेन्शन वाढलंय. कारण विजयांना कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पराभूत उमेदवार न्यायालयात गेले आहेत. या वळणाचा आगामी महाराष्ट्र स्थानिक निवडणुकांवर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.
Dhule Local Body Polls :
BJP’S UNOPPOSED WINS IN SOLAPUR & DHULE CHALLENGED IN COURTsaam tv
Published On
Summary
  • उज्वला थिटे यांनी निर्णयाला आव्हान देत न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय.

  • सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत आणि धुळे येथील नगरपरिषदेत भाजपला बिनविरोध विजय

  • दोन्ही ठिकाणच्या प्रतिस्पर्धेच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आलाय.

राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भाजपनं दोन ठिकाणी विजय मिळवलाय. सोलापूर आणि धुळ्यात भाजपनं बिनविरोध विजय मिळवलाय. मात्र या विजय मिळवूनही भाजपचे टेन्शन वाढलंय. त्याच कारण म्हणजे दोन्ही पराभूत उमेदवारांनी विजयाला आव्हान देत थेट कोर्टाचा दरवाजा ठोठवलाय.

Dhule Local Body Polls :
Maharashtra Politics: महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; राज्यातील राजकारणात नवीन पक्षाची एंट्री, शरद पवारांसह, महायुतीचं वाढलं टेन्शन

राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भाजपनं दोन ठिकाणी विजय मिळवलाय. सोलापूर आणि धुळ्यात भाजपनं बिनविरोध विजय मिळवलाय. मात्र या विजय मिळवूनही भाजपचे टेन्शन वाढलंय. त्याच कारण म्हणजे दोन्ही पराभूत उमेदवारांनी विजयाला आव्हान देत थेट कोर्टाचा दरवाजा ठोठवलाय.

त्यानंतर उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना थिटे यांनी आपण न्यायालयात न्याय मागणार असल्याचं सांगितलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं उज्वला थिटे म्हणाल्या आहेत.

Dhule Local Body Polls :
Maharashtra Politics: निवडणुकांच्या आधी राज्यात नवी घडामोड! ठाकरेंप्रमाणे राजकारणात आणखी दोन बंधू येणार एकत्र

अशीच स्थिती आता धुळ्यातील दोंडाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत आहे. येथे भाजप नेत्या नगराध्यक्षपदी विजयी होणार असल्याचे निश्चित झालंय. नयन कुवर रावल यांची येथील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. कारण महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आला. तांत्रिक कारणामुळे भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्यांनी आपण न्यायालयात धाव घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर त्याच्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शरयू भावसार यांनी अर्ज भरला होता. मात्र छाननी प्रक्रियेत शरयू भावसार यांचा अर्ज निवडणूक निर्णयअधिकारी शरद मंडलिक यांनी अवैध ठरवला.तांत्रिक कारणास्तव हा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध शरयू भावसार यांनी कोर्टात धाव घेतलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com