Live Batmya in Marathi 12 February 2024 | Latest Update on Ashok chavan, Manoj Jarange, Mumbai, Pune, Sangli and Overall Maharashtra
Live Batmya in Marathi 12 February 2024 | Latest Update on Ashok chavan, Manoj Jarange, Mumbai, Pune, Sangli and Overall Maharashtra Saam TV

Maharashtra News Live: पुण्यात २० फेब्रुवारीला ओला, उबर सेवा बंद राहणार, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता

Today's Live Marathi News (12 February 2023): राज्यातील आणि देशातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

पुण्यात २० फेब्रुवारीला ओला, उबर सेवा बंद राहणार, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता

२० फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबर सेवा राहणार बंद

पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता

२० फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवड मधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन

कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने

जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप

येत्या २० फेब्रुवारी पासून RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला मिळाले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

गोरक्ष गाडीलकर साई संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश

गाडीलकर वस्त्रोद्योग विभागात नागपूर येथे रेशीम संचालक म्हणून होते कार्यरत

तातडीने साईबाबा संस्थानचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाला कोर्टाकडून कोणताही दिलासा नाही

एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या पत्नी आणि मुलास अद्याप कोर्टाकडून कोणताही दिलासा नाही. अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहे. उद्या कोर्ट सुनावणी कोर्ट फैसला देणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात पत्नी आणि मुलाने याचिका केली आहे. तर अटकपूर्व जमीन न घेण्यावर राजन साळवी ठाम आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा १९ फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 फेब्रुवारी रोजी होणारा राज्यातील सातारा जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या घरी बैठक

बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल, सलमान खुर्शिद,अजय माकन,मुकूल वासनिक, मोहन प्रकाश बैठकीला उपस्थित

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुरुवात

मी काँग्रेसमध्येच राहणार : आमदार संग्राम धोटे

'माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या संदर्भातील काही अफवा प्रसरवण्यात आल्या, त्याचे खंडन करत मी काँगेसमध्येच राहणार असून कुठंही जाणार नसल्याचे मत काँग्रसचे राजुरा क्षेत्राचे आमदार आणि चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. त्यांनी अशोक चव्हाण यांना शुभेच्छाही दिल्या. आमदार धोटे हे चव्हाण यांचे खास मानले जातात.

मनीष सिसोदिया यांना ३ दिवसांचा जामीन मंजूर

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोर्टाकडून 3 दिवसांचा जामीन मंजूर

नातेवाईकांच्या लग्नासाठी राउज एवेन्यू कोर्टाने मंजूर जामीन केला

13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत जामीन मंजूर

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया सद्या तुरुंगात आहेत.

Ashok Chavan: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस हायकमांड अलर्ट

अशोक चव्हाण यांनी राजीनामा देताच दिल्लीतील हायकमांड अलर्ट

राज्यातील काँग्रेसच्या आमदारासोबत तातडीनं संपर्क करण्याच्या सूचना

पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना फोन

आज मुंबईत राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांची बैठक

माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे आजच्या बैठकीला उपस्थितीत राहणार

Live Batmya in Marathi 12 February 2024 | Latest Update on Ashok chavan, Manoj Jarange, Mumbai, Pune, Sangli and Overall Maharashtra
Maharashtra Politics: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता; आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू!

अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा मंजूर

अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. विधीमंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Dhanghar Reservation: धनगर आरक्षणाबाबत 16 तारखेला निकाल येणार?

धनगर आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. धनगर आरक्षणाबाबत हायकोर्टात सुनवणी संपली आहे. या धनगर आरक्षणाचा येत्या १६ तारखेला निकाल येणार आहे.

खंबाटा आणि अभिनव चंद्रचूड आणि प्रविशा शहा, अॅड दत्ता माने यांनी बाजू मांडली. आज 77 वी सुनावणी पार पडली, 2

017 पासून केस सुरू होती. धनगड राज्यात अस्तित्वात नाही, राज्यात धनगर अस्तित्वात आहे, त्यांना एसटी च्या सवलती मिळाव्यात ही प्रमुख मागणी आहे.

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी : माणिकराव ठाकरे

'अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते सुद्धा मुख्यमंत्री होते. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला विजयी मिळवून देणं ते आमचं काम आहे. आता अधिक उत्साहाने काँग्रेस जोमाने पुढे जाईल. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहेत, अशी प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली.

'भाजपचं दबावतंत्र सुरू आहेत. ज्या पक्षाचं देशाच्या चळवळीत काही योगदान नाही,देशाचं संविधान त्यांना मान्य नाही. विकासात्मक विचारावर मतदान होण्याची क्षमता नाही. अशोक चव्हाण यांनी असा निर्णय घेणं अंत्यत दुर्दैवी असून कोणत्याही कार्यकर्ता त्यांच्यासोबत जाणार नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्यापही घेतला नाही : अशोक चव्हाण

'मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्यापही घेतला नाही. मी दोन दिवसानंतर राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. मी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर मांडणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीकडे रवाना

दिल्लीला येण्यापूर्वी नाना पटोले छत्तीसगड रायपुरला जाणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ते भेट घेतील अशी शक्यता आहे. भारत जोडो न्याय यात्रा सद्या छत्तीसगढमध्ये आहे. तिथेच नाना पटोले राहुल गांधींची भेट घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये.

राज्य मागासवर्गीय आयोगाची लवकरच उद्या किंवा परवा महत्त्वाची बैठकीची शक्यता, सूत्रांची माहिती

राज्य मागासवर्गीय आयोगाची लवकरच उद्या किंवा परवा महत्त्वाची बैठकीची शक्यता, सूत्रांची माहिती

मराठा सर्वेक्षणाच्या मागासलेपणाचा अहवाल अंतिम टप्प्यात

मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत हा अहवाल मंजूर केला जाईल अशी शक्यता

अहवाल मंजूर झाल्यानंतर लगेच तो अहवाल सरकारकडे पाठवला जाईल

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सरकारला घरचा आहेर

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सरकारला घरचा आहेर

शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख

माथाडी कामगार मराठा नसेल तर अण्णासाहेब पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्यात माथाडी कामगार त्यांच्या पाठीमागे उभा राहिलाच कसा?

सरकारने तत्काळ सर्वेमध्ये सुधारणा कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल

नरेंद्र पाटील यांचा सरकारला इशारा

नवी मुंबईत माथाडी भवन येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजीत बैठकीत नरेंद्र पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांच्या गारपीटीने शेतकऱ्यांच मोठं नुकसान

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांच्या गारपीटीने शेतकऱ्यांच मोठं नुकसान

देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी आणि सेलू तालुक्यात नुकसान

पीक विम्याची ऑनलाईन तक्रार पोर्टलवर शेतकऱ्यांना नो रिस्पॉस

गहू,चना, तूर, कापूस पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान

मुंबईत अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशींना अटक

मुंबईत अनधिकृत रित्या वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशींना अटक

पकडण्यात आलेल्या ६ जणांमध्ये एका महिलेचा समावेश

वाडीबंदर, बीपीटी रोडवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती

गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गोंदियामध्ये रात्री बरसलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला. वादळी वारा व पाऊस झाल्याने मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक वादळी पाऊस आल्याने शेतात उभे असलेले मका पीक जमीनदोस्त झाले.

नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका

नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका

भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्याला अवकाळी आणि गारपीटीचा फटका

गारपीटीमुळे हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका

विदर्भातील सहा जिल्ह्याला आजही हवामान विभाकडून पावसाचा इशारा

पुण्यातील हडपसर भागात भन्नाट बिर्याणी हाऊस दुकानात सिलेंडरचा स्फोट

पुण्यातील हडपसर भागात सातववाडीमधील भन्नाट बिर्याणी हाऊस दुकानात सिलेंडरचा स्फोट

स्फोटात दुकान जळून झालं खाक

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

गोमांसाच्या विक्री प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री तिघांना केली अटक

गोमांसाच्या विक्री प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी शनिवारी रात्री तिघांना केली अटक

हुसेन शेख, शहजाद कुरेशी, सय्यद शाबाद अशी या तिघांची नावे आहेत

या तिघांकडून गोमांसच्या विक्रीसाठी आणलेल्या दोन गाड्या व १२०० किलो गोमांस सदृश्य मांस पोलिसांनी जप्त केले आहे

या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात मानद प्राणी कल्याण अधिकार्याने दिलेल्या तक्रारीनुसार कलम

429,34 भादंवि सह कलम11,5(सी), 9(ए),9(बी) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

हे गोमांस कुठून आणण्यात आले कोणाला विकले जाणार होते. या सर्व गोष्टीचा तपास माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

नाशिक : पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात महापालिका आक्रमक

नाशिक : पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात महापालिका आक्रमक

८ दिवसांत थकीत पाणीपट्टी न भरल्यास ४४,३८५ थकबाकीदारांचं पाणी तोडणार

९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची मोहीम

वारंवार आवाहन करूनही थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या ४४,३८५ थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याचा निर्णय

महापालिकेनं संकेत स्थळावर प्रसिद्ध केली थकबाकीदारांची ना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com