राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुंबई येथील सर एच एन रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
धोम धरणाच्या 2 वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. कृष्णा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पायथा वीजगृह आणि दोन वक्र दरवाज्यातून एकूण 2500 क्युसेक इतका कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. धोम धरणात सध्या 82 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने निर्णय घेतलाय.
ठाण्यातील उपवन तलाव या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय करणं रॉय या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सदरचा मृतदेह पोलिसांचा हवाली केला आहे. करणं मानपाडा येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई आयुक्तांनी भेट घेतली आहे, या बैठकीत नवी मुंबई घटनांवर चर्चा करण्यात आली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवले जातील, तसेच उज्ज्वल निकम सारखे ज्येष्ठ वकील हे प्रकरण हाताळतील, अशी माहिती CM एकनाथ शिंदे यांनी दिली.
हांडेवाडी येथे हांडे लॉन्स मागे असणाऱ्या गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून ६ वाहने दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हंडेवाडी सर्वे नं 7 येथील इंडस्ट्रीयल भागात आग लागली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षावर दाखल... सोबत फोन DCP देखील उपस्थित आहेत. गेल्या दहा दिवसात नवी मुंबई येथे घडलेल्या गंभीर प्रकरणाबाबत बैठक होत असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांंनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पुण्याच्या कात्रज परिसरातून २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून राजस्थानमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून २१ लाख ३८ हजार रुपयांचे १०६ ग्रॅम मेफेड्रोनसह दुचाकी असा २२ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक करण्यात आली आहे. बाजार समितीच्या ९० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजारसमिती फी ची रक्कम वसूल करून ९० लाखांचा अपहार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली असून अंतरवाली सराटीत उपचार करण्यात येत आहेत. त्यांना आज चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू करण्यात आले आहे.
अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड केली होती. त्यावरून वातावरण तापलं आहे. त्यात आता राज ठाकरे यांना ताब्यात घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.
वरळीत आज ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आले होते. वरळी येथील जांभोरी मैदानातील बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. वरळीतील ज्येष्ठ नागरिकानी मनसेवर गंभीर आरोप केला आहे.
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी होणार आहे. दिल्ली येथील पटीयाला कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.दिल्ली पोलीसांत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी पूजा खेडकर यांनी पटीयाला कोर्टात धाव घेतली होत. युपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सीएसएमटी इथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तब्बल 1 तासासाठी बिघाड झाल्यामुळे अजूनही लोकल प्रचंड उशिराने धावत आहे. अनेक लोकल एकामागे एक उभ्या असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची तयारी सुरू असून उद्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची रंगशारदा येथे बैठक होणार आहे. या बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहून घराघरापर्यंत शिवसेना ठाकरे गट प्रचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
वरळीत आज ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आले होते. वरळी येथील जांभोरी मैदानातील बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या एका खोलीला त्यांचा विरोध आहे.
सिंहगड घाटात दरड कोसळली असून गडाकडे जाणारा मार्गबंद झाला आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना आज पहाटे घडली असून जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदीर व परीसराच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील काही बाबींवर पुजारी मंडळाने आक्षेप घेतला आहे.तुळजापुर मंदीर व मंदीराच्या पुर्वेच्या बाजुस विकास करण्यात यावा अशी पुजारी मंडळाची मागणी असुन यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रवेशद्वारावर पूजारी मंडळाच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू केले.
आमचा विकासाला विरोध नाही तर जो विकास होणार आहे तो मंदीराच्या पुर्वेला करावा अशी मागणी पुजारी मंडळ व तुळजापूरातील नागरीकांनी केलीय दरम्यान याबाबत निर्णय न झाल्यास यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे तुळजाभवानी मंदीराच्या विकास आराखड्यावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून दुपारी ते पुण्यामध्ये दाखल होतील. दुपारी तीन वाजता ठाकरे हे पुलाचीवाडी येथे शॉक लागून मृत्युमुखी मुलांच्या कुटुंबाची भेट घेतील आणि त्यानंतर एकया नगरी येथील पूरग्रस्त लोकांना भेट देणार आहेत. यानंतर आदित्य ठाकरे पुण्यातील श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी आदित्य ठाकरे पुण्यातील पूरस्थिती कशामुळे आली आहे, यावर प्रेझेंटेशन देणार आहेत. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
सिंहगड घाटात दरड कोसळली असून सिंहगडकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना आज पहाटे घडली. जेसीबीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
राहाता शहरात टँकर चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. साकुरी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वनाथ बनसोडे ( वय 40 वर्षे ) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालक आणि टँकर ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची आहे, मराठा क्रांती ठोक मोर्चाची अशी मागणी आहे.
उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले असून मातोश्रीबाहेर आंदोलन सुरू केले आहे. आता उध्दव ठाकरे घेणार मराठा क्रांती ठोका मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर भेटीसाठी रमेश केरे पाटील दाखल झाले आहेत.
उरणमधील यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज अलिबागकर रस्त्यावर उतरले. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अलिबागकर एकत्र येत तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सलग चौथ्या दिवशी पुण्यात गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. पावसामुळे धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणेकरांच्या घरात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणी स्वच्छ होत होत नसल्याचे दिसून येत आहे.
मुसळधार पावसामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांमुळे खडकवासला येथे बैलाचा तर मालखेड येथे दुभत्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. खडकवासला आणि मालखेड येथे ही घटना घडली आहे. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये प्रसंगावधान राखल्याने शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज चांदीवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला
मराठा क्रांती ठोक मोर्चाने मातोश्री बाहेर आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात उध्दव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.
नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळच्या मनपूर जवळील पुलावर २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मनपूरजवळील नाल्याच्या पुलावर सकाळी ये - जा करणाऱ्या नागरीकांना एक तरुण फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुनील बाबाराव तोडसाम असं या तरुणाचे नाव असून तो आमराईपूरा आर्णी येथील होता.
लालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोटानंतर घरामध्ये आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. एक महिला आणि तिच्या २ मुलांचा समावेश आहे. जखमींवर मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणास सुरुवात झाली. 2023 मध्ये खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. शिवाय शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर हमीभाव देण्यात यावा, यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे आज संभाजीनगर दौऱ्यावर असून ते उपोषणकर्त्यांना भेट देण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीच्या दापोलीत डोंगराला भेगा पडल्याने मानवी लोक वस्तीला धोका निर्माण झाला आहे. दापोली किरंबा गावच्या डोंगराला सुमारे चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या आहेत. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असून डोंगर कोसळल्यास शिवाजीनगर किरंबा गावाला धोका निर्माण होऊ शकतो, असं बोललं जात आहे.
IAS पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पाटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज कोर्टात सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. पूजा खेडकर या नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.
राणीच्या बागेत वाघांच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. वीर जिजामाता उद्यानातील नर वाघ शक्ती आणि वाघीण करिश्मा खेळता खेळता एकमेकांसमोर आले. अवघ्या काही फुटांवरून वाघांची झुंज बघून प्रेक्षकांचा थरकाप उडाला. वाघांची झुंज बघण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अदानी यांच्या भेटीनंतर राज्यातील काही प्रकल्पांवर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी २ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता 6 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाने या सुनावणीसाठी 3 सप्टेंबर ही तारीख यापूर्वी निश्चित केली होती. मात्र कोर्टाच्या मॅटर लिस्टमधे ही तारीख नव्याने अपडेट करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही, म्हणत ठाकरे सेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.