Maharashtra Live Update: मनमाड-पुणे रेल्वे ट्रकवर रेल्वे पुलावरून ट्रक खाली कोसळला
मनमाड-पुणे रेल्वे ट्रकवर रेल्वे पुलावरून ट्रक खाली कोसळला
अंकाई रेल्वे पुलावरून ट्रक रेल्वे ट्रॅक वर कोसळला
मनमाड कडून पुणे कडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक वर शीत पेय घेऊन जाणार हा ट्रक होता
ट्रक मधील समान काढण्याचे काम सुरू ट्रक बाहेर काढण्यात उशीर लागेल
या अपघातामुळे अंकाई रेल्वे पुलावरून होणारी वाहतूक जाम
अपघातात मात्र कोणी जखमी नाही,आघात होताच ट्रक चालकाने झाडांचा आधार घेत आपला जीव वाचवला
भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी
- भाग्यश्री फंड पुणे आणि अमृता पुजारी कोल्हापूर यांच्यात अंतिम सामना
होता . 2 - 4 पॉईंटने याने बाजी मारली . देवळीच्या रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होती. महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब 2024 -2025 देण्यात आलाय. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अनिल बोडे, आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांची नागरिकाला मारहाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.
Anil Bhosale : माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर
माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. शिवाजीराव भोसले बॅंक घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. शिवाजीराव भोसले बॅंकेचे अनिल भोसले हे अध्यक्ष होते.
Jalna News : ठाकरे गटाला धक्का! जालना जिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश
जालना जिल्हा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आसाराम बोराडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
उबाठा गटाला धक्का, शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह बोराडे यांचां शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश..
Mahad News : महाडमधील मांडले धरणाला ग्रामस्थांचा विरोध
महाड तालुक्यातील मांडले गावा हद्दीत धरणाच काम सुरु असून या कामाला ग्रामस्थांच्या एका गटाने विरोध केला आहे. धरणासाठी केलेली भुसंपादन प्रक्रिया आणि प्रकल्पबाधीत ग्रामस्थांना विश्वासात न घेता केलेली वृक्ष तोड याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत धरणाचे काम थांबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
२७ तारखेला पत्रकार परिषद घेऊन बरच काही दडलेल बाहेर काढणार - खासदार बजरंग सोनवणे
२७ तारखेला पत्रकार परिषद घेऊन बरच काही दडलेल बाहेर काढणार, खासदार बजरंग सोनवणे यांचं मोठं विधान
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माईंड सापडला पाहिजे तसेच ज्या मारेकऱ्यांना साथ दिली ज्यांनी आरोपींना पोलीस कस्टडीत रग पोहोचवली त्यांना सह आरोपी करावं
ज्या गाडीत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये गेले ती गाडी कुणाची?
कराड यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केले त्यांना नेमका आजार झालाय काय? ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी मिळते त्याच दिवशी कसे दुखते? - बजरंग सोनवणे यांचा पत्रकार परिषदेत सवाल.
विरार वाहतूक पोलिसांची दादागिरी
विरार वाहतूक पोलिसांची दादागिरी
बस चालकासह प्रवाश्याला केली मारहाण
लाकडी दांडक्याने भर रस्त्यावर बेदम मारहाण
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खाणिवडे टोल नाक्यावर घडली घटना
ज्ञानेश्वर घुगे असे वाहतूक पोलीस कर्मचारीचे नाव आहे
बस चालक विरुद्ध दिशेने आल्याने वाहतूक पोलिसानी थांबवले त्यावरून झाला वाद
युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने केलेले आंदोलनानंतर 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आल होतं. त्यानंतर युवक काँग्रेसचा अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला होता.
युवक काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Jalna : एकनाथ शिंदे जालन्यात दाखल, आझाद मैदानावर घेणार जाहीर सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात जालन्यातील देवमुर्ती येथील श्री दत्त आश्रम संस्थानला भेट देणार आहेत.
जालना शहरातील आझाद मैदानावर सायंकाळी साडे सहा वाजता एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे
सभेपूर्वी एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यातील डॉक्टर, वकील आणि प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
परिवहन विभागातर्फे आरटीओ प्रीमियर लीगचे आयोजन, वाहतुकीच्या नियमांची जनजागृती.
रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन विभाग नवी मुंबईच्या वतीने आरटीओ प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते.
बेलापूर येथील मैदानात आयोजित या क्रिकेट सामन्यामध्ये नवी मुंबई पनवेल मधील परिवहन अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात आली.
सरकार जनतेला लुटायला निघाली आहे - नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एसटी आणि वीज दरवाढीवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. 'सरकारने एसटी आणि वीज दरवाढ केली आहे, याचा आम्ही निषेध करतो. आमचं सरकार आल्यावर आम्ही महागाई कमी करू असं त्यांनी आश्वासन दिले. मात्र सरकार जनतेला लुटायला निघाली आहे. या महागाई बद्दल सरकारने पुनर्विचार करावा आणि तातडीने राज्यातील एसटी व इलेक्ट्रिक भाडेवाढ केली आहे ती कमी करावे आणि राज्यात वाढलेली महागाई कमी करावी ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे' असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट.
विजय वडेट्टीवार यांनी स्वतःचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता.
बीडमध्ये क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे..
बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर सकाळी 9 वाजून 15 मिनिटानी हा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
Beed: पिडीत युवतीची न्यायासाठी हाक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू
बीडच्या आष्टी तालुक्यात एका युवतीवर 25 नोव्हेंबर 2021 मध्ये अत्याचार करण्यात आला होता..
या प्रकरणातील आरोपी तुषार कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..
परंतु या प्रकरणातील न्यायालयातील तारखे वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माझी दिशाभूल केली..
या सर्व प्रकरणात कारवाई होऊ नये याकरिता आ. सुरेश धस हे दबाव टाकत असल्याचा आरोप या पिडीत युवतीने केला असून आता या प्रकरणात न्याय द्यावा, या मागणीसाठी या युवतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषन सुरू केले असून आज सलग दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे...
संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज आला समोर
गेवराई शहरातील एका दुकानातून हे ब्लँकेट खरेदी केल्याचा होत आहे आरोप..
ब्लँकेट खरेदी करतानाचा सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल..
Cid ने चौकशीसाठी बोलवलेले बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करताना सीसीटिव्ही व्हिडिओत कैद..
मात्र त्यांनी ब्लँकेट कोणाला दिले ? हे अद्याप अस्पष्ट.
सांगलीत फायनान्स कंपनीच्या विरोधात दलित महासंघाचे जोडेमारो आंदोलन
सांगलीत दलित महासंघाच्या वतीने विविध फायनान्स कंपनीच्या दादागीरी विरोधात जोडोमार आंदोलन करून निषेध करण्यात आले.
विविध फायनान्स कंपनी शून्य व्याज दरात वस्तू देण्याचे सांगून भरमसाठ छुपे व्याज घेऊन कर्ज देत आहेत.
एखादा हप्ता कर्जदाराचा राहिला की फायनान्स कंपनी कडून गुन्हेगाराना पोसून वसुली केली जाते आणि साधी मुदत ही दिली जात नसल्याचा आरोप करत दलित महासंघाने जोडोमार आंदोलन करून निषेध केला आहे.
नंदुरबारच्या जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
नंदुरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांनी जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता जिल्ह्यातील 25 ते 30 वैदकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून एका महिन्याचा 80 हजार पगाराची मागणी करत कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आता काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून डॉ वर्षा लहाडे यांनी केलेल्या पदाचा गैरवापर आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी करून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस ने केली आहे. लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास जिल्हा भरात युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाण्यातील श्रीनगर येथील चार शिक्षिकांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मनसेकडून बेदम चोप
यासंदर्भात शिक्षिकांनी मनसेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ शाळेत धाव घेत शिक्षकाला चोप दिला
संबंधित महिलांना श्रीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल के
प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागली आग
धाराशिव- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी केलेल्या फटाक्याच्या अतषबाजीमुळे लागली आग
पालकमंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
धाराशिव विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्या करून फटाक्यांची आतषबाजी
विमानतळ परिसरात असलेल्या गवताला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागली आग
शरद पवारांचा दौरा अचानक रद्द, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना रडू कोसळले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 27 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जनशताब्दी निमित्त शरद पवारांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार होता मात्र शरद पवारांची अचानक प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे मात्र दौऱ्याची आठ दिवसांपासून तयारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना मात्र यावेळी अश्रू कोसळल्याचे पाहायला मिळाले.
पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
पूर्व द्रुतगती मार्गाच्या ऐरोली ब्रिजवर चार वाहनांचा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी
वाहनांच्या रांगा आनंदनगर टोलनाक्यापर्यंत
घटना स्थळी मुंबई ट्रॅफिक पोलिस दाखल
Maharashtra Live Update :खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर
- विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचा पहिलाच नाशिक दौरा
- संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
- विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत घेणार बैठक
- मागील काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटासह भाजपमध्ये जाण्याच्या सुरू आहेत चर्चा
- पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत मैदानात
Mumbai Live Update : मुंबईच्या दिंडोशी भागात फर्निचर दुकानांना आग
दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या पाच ते सहा दुकानांना लागली आग
स्थानिक नागरिकांकडून दुकानांना लागलेले आग भिजवण्याचा प्रयत्न
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल
आग लेव्हल 2 ची असल्याने अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या बोलावल्या आहेत
सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी.आग लागली
आज 25 जानेवारी पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलय; मनोज जरांगे पाटील
उद्या 26 जानेवारी ला सगे सोयरे कायद्याच्या अधिसूचनेला एक वर्ष होतय...
समाज 1 वर्षापासून समाज रस्त्यावर झुंजतोय...
1 वर्ष लागतं सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायला...
मराठा समाजाची जान सरकारला नाहीये...
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे...
सगे सोयरे कायद्याची लगेच तातडीने अंमलबजावणी करावी...
साईबाबा मंदिर परिसरातील अब्दुल बाबा समाधीचा वाद पुन्हा पेटणार
शिर्डी येथील साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी परिसरात इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थांकडे जमा होतो मात्र अब्दुल बाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप सध्या केला जातोय. यावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्षेप घेतलाय हा सगळा प्रकार बेकायदेशीर असून समाधीवर जमा होणार पैसा सरकारकडे जमा व्हावा अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली होती
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षकांकडे दिल्यानंतर पत्नीची प्रतिक्रिया
परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आम्हाला न्याय भेटावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
वाल्मीक कराडची सिटी स्कॅन तपासणी, अहवाल डॉक्टरांकडे सादर
वाल्मीक कराडची सिटी स्कॅन तपासणी
अहवाल डॉक्टरांकडे सादर
पोटदुखीवर उपचार सुरूच
तपासणी करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरणार
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस.बी.राऊत यांची माहिती
शहरात महिलांच्या टोळीकडून रेकी.. सीसीटीव्ही मध्ये ही टोळी कैद
हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या विश्रामबाग मधील एसटी कॉलनी परिसरात आणि राम मंदिर येथे पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आठ ते दहा महिला दिसून येत असून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आले असून पोलीस त्या टोळक्याचा लवकरच छडा लागतील.
Devendra fadnavis Live Update : नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Maharashtra Live Update : - नागपूर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर
- रवींद्र सिगल यांच्यासह राज्यातील 4 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर
- तसेच राज्यातील 39 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
एसटी दरवाढी विरोधात लाडक्या बहिणी आणि युवकांची नाराजी
एसटी महामंडळाकडून 15 % ची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र याबाबत लाडक्या बहिणी आणि युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जातं आहे.सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष यामुळे दिसून येतोय.
मेळघाटात रुग्णालयातून गर्भवती महिला पळाली, दहेंद्री गावात सात दिवसापासून आरोग्य यंत्रणा तळ ठोकून
पहिली प्रसूती आणि त्यात नवव्या महिन्याची गर्भवती असलेल्या मेळघाटातील देहेंद्री गावातील महिलेचा रक्तदाब वाढल्याने अति गंभीर असतानाही तिने रुग्णालयात येण्यास नकार दिला, चूरणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला उपचारासाठी दाखल केले मात्र त्या ठिकाणी उपचार न घेता कालेय शेलूकर ही गर्भवती महिला रुग्णालयातून पळाली, आरोग्य विभाग यंत्रणा गर्भवती महिलेच्या घरी गेले मात्र चक्क आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना व डॉक्टरांना गर्भवती महिलेने व तिच्या कुटुंबाने अक्षरशःहा हाकलून लावले तिची कुठल्याही क्षणी प्रसूती होऊ शकते या परिस्थितीत बाळ व तिला काही होऊ नये यासाठी चक्क आरोग्य यंत्रणा सात दिवसापासून तिच्या गाव घरालगत गावात ठाण मांडून बसली आहे मात्र तरी देखील ती महिला रुग्णालयात उपचार घेण्यास तयार नाही, मेळघाटात आदिवासींवर अंधश्रद्धेचा पगडा असून उपचारासाठी रुग्णालयात न जाता घरीच भूमकाच्या मदतीने घरीच ते उपचार करतात.
रत्नागिरीतील ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे सेना ॲक्शन मोडमध्ये
24 तासात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आपला शिलेदार निवडला
मंगेश साळवी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नवीन रत्नागिरी तालुकाप्रमुख
मंगेश साळवी यांच्या नावाला येत्या दोन दिवसात मातोश्रीवरूनही ग्रीन सिग्नल मिळणार
शिवसेनेला का शह देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सेना ऍक्टिव्ह मोडवर
मंगेश साळवी यांना रत्नागिरी तालुकाप्रमुख पदासाठी वरिष्ठांकडून विचारणा सूत्रांची माहिती
काल उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे सेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी केला होता शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत यामध्ये कोणीही नाराज होण्याचे कारण नाही: मंत्री शिवेंद्रराजे भोसले
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
“ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं 'गांधी आणि संविधान' पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात षटतीला एकादशी निमित्ताने आकर्षक सजावट
संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवलं आहे... हजारो भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत किर्तन भजनाच्या कार्यक्रमात दंग होत आहेत... मंदिरात सजवलेल्या फुलांच्या माळांमध्ये प्रामुख्याने झेंडु, जर्बेरा, निशीगंध आणि वेगवेगळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला असुन माऊलींचे रुप फुलुन गेलय
एसटीच्या भाडेवाडीचा फटका वाहकांनाही, एसटीच्या भाडेवाडीमुळे प्रवाशांना सुट्टे पैसे कसे द्यायचे?
एस टी महामंडळाचे आजपासून प्रवासी भाडया मध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर यामध्ये आता वाहकांना प्रवाशांना सुटे पैसे कसे द्यायचे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.अनेक ठिकाणी एसटी बसची तिकीट ही कुठे 91 रुपये, तर कुठे ७४ रुपये ते कुठे 86 रुपये अशी असताना आम्ही प्रवाशांना नऊ रुपये सुट्टे कुठून देणार? असा प्रश्न वाहकांनी उपस्थित केला.
Maharashtra Live Update : वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठीचा न्यायालयात अर्ज
वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठीचा न्यायालयात अर्ज
फरार असताना संपत्ती बाबतची माहिती केली होती जमा
शंभरहून अधिक बँक खाते आले होते समोर
बँक खाते करण्यात आले होते सिझ
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर होणार कारवाई
पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर
पुणे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड' मेट्रोचे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये असणारं उपलब्ध
पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असणार
११८ रुपये शुल्क असणारे हे कार्ड २६ जानेवारी रोजी प्रवाशांसाठी केवळ २० रुपयांत उपलब्ध असणार असल्याची पुणे मेट्रो प्रशासनाची माहिती
या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी ३० टक्के सवलत मिळणार आहे.
अधिकाधिक पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी ही खास सोय प्रजासत्ताकदिनी पुणे मेट्रोने दिली आहे
पुणे पोलीस ॲक्शनमोडमध्ये, ग्रामीण भागात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार, प्रतिबंधात्मक कालावधी दरम्यान कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे,वाद्य वाजविणे यास प्रतिबंध असणारं.
पुणे शहराच्या एन्ट्री पॉईंटसवर महापालिका उभारणार अत्याधुनिक वातानुकुलीत ७ स्वच्छतागृहे
नागपूरच्या धर्तीवर पुण्यात देखील उभारण्यात येणार वातानुकूलित स्वच्छतागृह
पुणे महानगरपालिकेकडून मागवण्यात आले प्रस्ताव
पे अँन्ड यूज सूत्रांनुसार उभारण्यात येणार स्वच्छतागृहे
पुणे शहराच्या सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, आहील्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशन जवळ अशा ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार
एका स्वच्छतागृहासाठी साधारण ५० लाख रुपयांचा येणार खर्च
पुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून वर्षभरात ९० कोटी रुपयांचा दंड वसूल
शहरात वर्षभरात १० लाख ६३ हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई
तर १३४५ वाहन चालकांचा परवाना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला रद्द
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यपी वाहनचालक, ट्रिपल सीटवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई
Maharashtra Live Update : अजित पवार आज पुण्यात
अजित पवार पुण्यातील सर्किट हाऊस येथे दाखल
अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांच्या अनेक बैठका
तसेच स्थानिक आमदार पुण्यातील सर्किट हाऊस येथे अजित पवारांची घेणार भेट
पुण्याच्या भोरमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद
पुण्याच्या भोरमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद
दैनंदिन शेतीच्या कामातून विश्रांती घेऊन, बदल म्हणून शेतकऱ्यांना एक दिवस जीवनाचा आणि क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता यावा.. तसेच ग्रामीण भागात एकता व सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सायबेज आशा संस्थेकडून भोरच्या शेतकऱ्यांसाठी, क्रिकेट स्पर्धेचं आयोजन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.