Maharashtra News Live Update: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात

Marathi Breaking Live Headlines Updates : आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठा आंदोलन, ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात

- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मनसेच्या सदस्य नोंदणी

- अभियानालाही सुरुवात करणार आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळळ्याला मळ्यार्पण करतील..

- तिथून शहरातील सिंधू महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविद्यालय आणि एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या भेटीगेटी आणि विद्यार्थी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत.

समृद्धी महामार्गावरील बोगदा आज १ तास बंद राहणार

- समृद्धी महामार्गावरील बोगदा आज १ तास बंद राहणार

- समृद्धी महामार्गावरील नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा १ तासांसाठी बंद राहणार

- दुपारी १२ ते १ या वेळेत बोगदा बंद ठेवण्यात येणार

तुळजाभवानी मंदीरात दर्शन रांगेत बदल,पुढील पाच दिवस बिडकर पायऱ्यामार्गे भाविकांना मंदीरात प्रवेश

तुळजाभवानी मंदीरात दर्शन रांगेत बदल,पुढील पाच दिवस बिडकर पायऱ्यामार्गे भाविकांना मंदीरात प्रवेश

३० अॉगस्ट पर्यंत मंदीराचे महाद्वार भाविकांसाठी राहणार बंद

तुळजाभवानी मंदीरात श्रावण पोर्णिमा तसेच सलग सुट्ट्यांमुळे गर्दी होण्याची शक्यता

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नरहरी झिरवळांकडून थट्टा

नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे झिरोळांकडून थट्टा

खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं.. आणि आंदोलन करायचो...

विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरूच तोडगा निघाला नाही.. चर्चा निष्फळ

Raigad : ठाकरेंच्या पहाणी दौऱ्याकडे शासकिय अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ, शिवसैनिकांमध्ये संताप

मुंबई गोवा महामार्गाच्या काल झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शासकिय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. कामाची सद्यस्थिती काय आहे. काय करणार हे सांगण्यासाठी एकही अधिकारी दौऱ्यात आला नाही. यामुळे ठाकरे सेनेचे सैनिक संतप्त झाले असून अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com