Maharashtra News Live Update: चाकणमध्ये दिवसभर वाहतूककोंडी; रात्रीही पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

Marathi Breaking Live Headlines Updates: आज पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गुंज कार्यक्रम, राज्यात पावसाचा जोर ओसरला, रिक्षा चालकांना मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On

चाकणमध्ये दिवसभर वाहतूककोंडी; रात्रीही पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

चाकणमधील पुणे-नाशिक महामार्गावर दिवसभर सुरू असलेली वाहतूककोंडी रात्रीपर्यंत कायम राहिली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामावरून परतणारे कामगार, प्रवासी आणि विकेंडसाठी बाहेर पडलेले नागरिक मोठ्या कोंडीत अडकले. सकाळपासून वाहतूक संथ असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्रीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने चाकणमधील वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गडचिरोलीत मुसळधार पावसाला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यात आज संकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. गडचिरोली जिल्ह्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरात सध्या 27 अंश सेल्सिअस तापमान असून 90 टक्के आर्द्रतेसह ढगाळ वातावरण आहे.

अक्कलकुव्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू; बांबूच्या झोळीतून नेताना प्राणज्योत मालवली

अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम वेहगी बारीपाडा गावात वेळेवर उपचार न मिळाल्याने आजारी आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोट व छातीत तीव्र वेदना होत असल्याने महिलेला रुग्णालयात नेण्याची गरज होती. मात्र गावात पक्का रस्ता, नदीवर पूल आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने रुग्णवाहिकेशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर ग्रामस्थांनी बांबूच्या झोळीतून तिला वाहत्या नदीतून नेण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी पोहोचण्यास विलंब झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्ता, पूल आणि आरोग्य सुविधांची तातडीने मागणी केली आहे.

शिरपुरात न्यायालयाच्या उद्घाटनावेळी न्यायमूर्ती वराळेंचा प्रशासनाला टोला

धुळे जिल्ह्यातील शिरपुरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्यासह उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची उपस्थिती होती. प्रशासनाच्या विकासकामांच्या कार्यप्रणालीवर न्यायमूर्ती वराळे यांनी नाराजी व्यक्त केली. शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी प्रशासनाला कुंभमेळ्याची वाट का पाहावी लागते, असा सवाल त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या निमित्तानेच विकासकामे होत असतील, तर कुंभमेळा दरवर्षी किंवा दोन वर्षांनी यावा, असा खोचक टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.

मोरगाव येथील खासदार संजय राऊत यांच्या कार्यक्रमात गोंधळ

मोरगाव येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा रामरक्षा पठण कार्यक्रम उरकून व्यासपीठावरून खाली उतरत असताना एका महिलेने माझ्या प्रश्नाकडे लक्ष द्या असे म्हणतात पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले त्यादरम्यान गोंधळ उडाला खासदार संजय राऊत हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत..

उल्हासनगरच्या लालचक्कीत महाकाय झाड पावसामुळे कोसळले; वाहनांचे नुकसान

उल्हासनगरच्या लालचक्की परिसरात सततच्या पावसामुळे महाकाय झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या काही वाहनांचे नुकसान झाले. पावसामुळे झाडांची मुळे कमकुवत झाल्याने झाड कोसळल्याचे सांगितले जात आहे. झाड कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे पाच झाडे कोसळल्याची माहिती आहे.

ठाण्यात शिवसेनेत पक्षप्रवेशांचा धडाका; उबाठा, काँग्रेससह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

ठाण्यातील मातोश्री गंगुबाई शिंदे हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पालघर महिला जिल्हाध्यक्ष मेघा म्हात्रे, श्रमजीवी संघटनेचे रुपेश डोले यांच्यासह नालासोपारा परिसरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. तसेच कांदिवलीतील काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोहद मलिक, अपक्ष उमेदवार प्रमोद शिवाजी पाटील आणि जालना जिल्ह्यातील दत्ता पाटील खोजे यांनीही समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर मुंबईतील मुस्लिम समाजातील नागरिकांनीही यावेळी पक्षप्रवेश केला.

येवला-मनमाड मार्गावर बसची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

नाशिकच्या येवला-मनमाड महामार्गावर सावरगावजवळ धुळे-पुणे एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. जखमी तरुण मनमाडचा रहिवासी असून तो मनमाडहून येवल्याच्या दिशेने जात होता. अपघातानंतर ग्रामस्थ आणि प्रवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीला येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बसच्या वेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मोती तलावात बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू; बहिणीला वाचवताना भावाचाही बुडून अंत

सावंतवाडी येथील मोती तलावात बहीण-भावाच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. लिशा गोसावी यांनी तलावात उडी घेतल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी भाऊ रोहन गोसावी यांनी पाण्यात उडी घेतली. रोहन यांनी बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, रोहन गोसावी यांचा मृतदेह सापडला असून लिशा यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या घटनेने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Badlapur: बदलापूरकरांना लवकरच मिळणार नवीन रेल्वे भुयारी मार्ग

बदलापूर -

बदलापूरकरांना लवकरच मिळणार नवीन रेल्वे भुयारी मार्ग

खरवई ते बॅरेज रोड वाहतूक थेट आणि सुलभ होणार

बदलापूर नगरपालिकेकडून सर्वेक्षण सुरू

रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार-राजेंद्र घोरपडे

Pune: मला तुमच्या राजकारणाचा भाग करू नका, राहुल गांधींच्या भेटीच्या निरोपाला विद्यार्थिनीचा नकार

मला राहुल गांधी यांनी निरोप पाठवला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते पण मला कोणाला ही भेटायचं नाही कारण माझी मानसिकता कोणाला ही भेटायची नाही.

मला राजकीय फायद्यासाठी वापरू नका मी एक विद्यार्थ्यांनी आहे माझा राजकारणाशी कुठला ही संबंध नाही.

या घटनेमुळे आमच्या महाविद्यालयाचे वातावरण खराब झाले आहे त्यामुळे कृपा करून आमचे महाविद्यालयात राजकारण आणू नका अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनीने दिली आहे.

Pune: राहुल गांधी हॉटेल सेरेटोनमध्ये २ तास थांबणार आहेत

राहुल गांधी हॉटेल सेरेटोनमध्ये २ तास थांबणार आहेत

यावेळी पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.

Parbhani: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत  शेतकरी संवाद मेळावा

परभणी -

30 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

खासदार संजय जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह अन्य पक्षातील लोकप्रतिनिधींचा होणार शिवसेनेत प्रवेश

kolhapur: अन्न व औषध प्रशासनाची कोल्हापूर शहरात धडक कारवाई

कोल्हापूर -

अन्न व औषध प्रशासनाची कोल्हापूर शहरात धडक कारवाई

चार महिन्यात तब्बल 34 लाख 96 हजार रुपयांचा भेसळयुक्त माल केला नष्ट

Pune: राहुल गांधी पुण्यात दाखल, थोड्यात वेळात हॉटेलवर पोहचणार

राहुल गांधी काही वेळात हॉटेलमध्ये दाखल होतील ..

हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत..

हॉटेलच्या आत आल्यानंतर ते ब्रेकफास्ट करतील

Pune: पुण्यातील गणेशोत्सवात डीजेमधील प्लाझ्मा आणि प्रेशर मिडला बंदी

गणेशोत्सवात डीजेमधील प्लाझ्मा आणि प्रेशर मिडला बंदी

आगामी गणेशोत्सवात मध्ये डी जे साउंड सिस्टिम मध्ये प्लाझ्मा आणि प्रेशर मिड लावण्यास अजिबात परवानगी देऊ नका अशी मागणी पुणे शहरातील गणेश मंडळांनी आज पोलिस प्रशासनाला केली आहे.

आज पुणे पोलिस आयुक्तालयात आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय जवळपास झाला असल्याची माहिती सुद्धा पोलिस सूत्रांनी दिली आहे.

यावर पोलिसांनी सुद्धा या दोन्ही गोष्टींवर बंदी आणण्याचे ठरवले आहे

Pune: गणेशोत्सवात डीजेमधील प्लाझ्मा आणि प्रेशर मिडला बंदी करा, गणेश मंडळांची मागणी 

पुणे -

गणेशोत्सवात डीजेमधील प्लाझ्मा आणि प्रेशर मिडला बंदी करा

गणेश मंडळांची पुणे पोलिसांकडे मागणी

आज पुणे पोलिस आयुक्तालयात आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी हा निर्णय जवळपास झाला असल्याची माहिती सुद्धा पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Jalna: अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

जालना -

अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

एकनाथ शिंदेंवर जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर सत्तारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

मात्र चूक दुरुस्त करून द्या, मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

Ahilyanagar: राहुल गांधींच्या 'छात्रो की गुंज' कार्यक्रमासाठी अहिल्यानगरमधून हजारो विद्यार्थीनी पुण्याकडे रवाना

अहिल्यानगर -

राहुल गांधींच्या 'छात्रो की गुंज' कार्यक्रमासाठी अहिल्यानगरमधून हजारो विद्यार्थीनी पुण्याकडे रवाना

संगमनेर येथून हजारो विद्यार्थीनी पुण्याकडे रवाना

जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात जवळपास दोन हजार विद्यार्थिनी होणार कार्यक्रमात सहभागी

छात्रो की गुंज कार्यक्रमामुळे विद्यार्थीनींमध्ये प्रचंड उत्साह

अजगराच्या एन्ट्रीने घरात उडाली खळबळ,  घरातील हॉलमधील टेबलाखाली आढळला सात फुटांचा अजगर

यवतमाळच्या दिग्रस येथील महेशनगरातील राजेश जाधव यांच्या घरातील मुख्य हॉलमधील टेबलाखाली तब्बल सात फूट लांबीचा अजगर लपून बसल्याचे निदर्शनास आले. अचानक घरात अजगर आढळल्याने कुटुंबीयांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

लासलगावमध्ये कांडा प्रश्नी कांदा परिषदेचे आयोजन

वाढत्या कांद्याच्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क अथवा निर्यातबंदीचे निर्णय घेऊ नयेत, या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन आशिया खंडातील अग्रगण्य कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले.

योग्य दिशेने जाणारा युवा समाजाला जगवतो - देवेंद्र फडणवीस 

नवी मुंबईतील उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, योग्य दिशेला जाणारा युवा समाजाला जगवतो...

सदावर्तेंच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक; माजलगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत केली कारवाईची मागणी

बीडमध्ये ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यावरून आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. बीड मधील एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा आरोप करत माजलगाव शिवसेनेने थेट शहर पोलीस ठाणे गाठलंय. सदावर्ते यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असून, त्यातून शिवसैनिक आणि नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय.

विद्यार्थ्यांचा देशरक्षण करणाऱ्या जवानांना अनोखा स्नेहबंध

देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यवतमाळच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘माझ्या हातची राखी माझ्या सैनिक भावासाठी’ हा अभिनव आणि भावस्पर्शी उपक्रम राबविला.रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या.

एटापल्ली तालुक्यातील 40 गावातील नागरिक वाघांच्या दहशतीने झाले भयभीत

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात सध्या वाघांची दहशत प्रचंड वाढली आहे. परिसरातील तब्बल चाळीस गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघांच्या वाढत्या वावरामुळे शेतीची कामेही रखडली आहेत.दोलंदा येथील हरी वड्डे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या परिसरात भीतीचे सावट आणखी गडद झाले. त्यातच पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आणि विविध ठिकाणी वाघांचे होणारे दर्शन यामुळे नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत.

फुलेनगरमध्ये दोन गटांत दगडफेक, कोयत्याने हाणामारी 

ठाण्यातील कळवा परिसरातील फुलेनगर येथे दोन गटांत दगडफेक आणि कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. काही तरुणांकडून अमली पदार्थांचे सेवन करून स्थानिकांना त्रास दिला जात असल्याच्या प्राथमिक माहितीतून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा दगडफेक आणि कोयत्याने धाक दाखवतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, कळवा पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीस्वारांचा स्टंटचा थरार 

पुणे-मुंबईपुरताच मर्यादित असलेला स्टंटचा थरार आता कोकणातील रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे दोन दुचाकीस्वार धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवताना दिसून येत आहेत. त्यांची ही स्टंटबाजी सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

कल्याण स्टेशन परिसरातून दिवसा मुंबई पोलिस कर्मचाऱ्याची बुलेट चोरीला सीसीटीव्हीत घटना कैद

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची ३५० क्लासिक बुलेट कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील तहसीलदार कार्यालयाबाहेरील फुटपाथवरून चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, बुलेट चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, चोरीला गेलेल्या बुलेटचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.

साखरेचे दर वाढताच सर्वसामान्यांची आवडती जिलेबी पोहोचली 160 रुपये किलोवर

साखरेच्या दरवाढीनंतर सर्वसामान्य नागरिकांचा आवडती जिलेबी सुद्धा आता महागली आहे...किलोमागे तब्बल 40 रुपयाची दरवाढ झाल्याने याचा फटका मिठाई विक्रेत्यांसह जिलेबी खवय्यांना सुद्धा बसला आहे.... साखरेचे दर 42 रुपयांवर होते तेव्हा 120 रुपये किलोने जिलेबी विकली जायची, त्यानंतर साखरेचे दर 60 ते 65 रुपयांवर पोहोचल्यानंतर जिलेबी 140 रुपये किलो झाली. मात्र आता साखरेचे दर 75 रुपयांवर पोहोचताच जिलेबीच्या दरात वाढ होऊन जिलेबी 160 रुपये किलो विक्री केले जात आहे... त्यामुळे जिलेबी दर वाढीचा परिणाम खवय्यांना सोसावा लागणार आहे...

आमदार अभिजीत पाटील यांच्या आमदार आपल्या गावी मुक्कामी या उपक्रमाला प्रतिसाद

एंकर -माढा मतदार संघातील मतदारांच्या समस्या गावात जाऊन सोडवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी आमदार आपल्या गावी मुक्कामी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नंदुरबार बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीवर २ गुन्हे दाखल 

नंदुरबार बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट...

आरोपी चेतन कोळीवर पुन्हा नव्याने दोन गुन्हे दाखल...

अत्याचार प्रकरणी आरोपी चेतन कोळी याला पुन्हा चार दिवसांची सुनावण्यात आली पोलीस कोठडी....

नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय टी ची स्थापना....

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी चेतन कोळी वर आतापर्यंत चार गुन्हे दाखल....

शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल 

शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.

नंदुरबार नगरपालिकेच्या जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची मागणी

नंदुरबार नगरपालिकेच्या जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची मागणी..

नंदुरबार पालिकेचे विरोधी पक्ष नेता हिरालाल चौधरी यांचा आंदोलनाचा इशारा

Nagpur : नागपुरात अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

- नागपुरात अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

- नागपूरच्या कामठी मार्गावर ई-बाईक अनियंत्रित होऊन तरुणी दुभाजकावर आदळली, बसच्या चाकाखाली आल्याने अंजलीचा जागीच मृत्यू

- अंजली पांडे ही तरुणी रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून आलेल्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसखाली आली, तेवढ्यात त्या बसच्या चाकाखाली आलीय..

धाराशिवच्या होर्टी येथील निवासी दिव्यांग अस्थिव्यंग शाळेला खासदार ओमराजे निंबाळकरांकडून भेट

धाराशिवच्या होर्टी येथील निवासी दिव्यांग अस्थिव्यंग शाळेला खासदार ओमराजे निंबाळकरांकडून भेट

शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी विचारपूस, स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांचा सांभाळ करा शिक्षक आणि संस्थाचालकांनाही सूचना

तर अशा गरजू आणि निराधार मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचं लोकांना आवाहन

ओसरगाव टोलवर सिंधुदुर्गच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन

ओसरगाव टोलवर सिंधुदुर्गच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन

अवाणिज्य वाहनांना टोलमाफीचा फलक

व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत

इलेक्ट्रिक बसमध्ये चालकाचा मोबाईलवर खेळ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

इलेक्ट्रिक बसमध्ये चालकाचा मोबाईलवर खेळ; प्रवाशांच्या जीवाशी धक्कादायक खेळ..

खामगाव–मेहकर प्रवासात चालकाचा निष्काळजीपणा कॅमेऱ्यात कैद; कारवाईची मागणी

लातूरच्या उदगीरमध्ये 2 हजार 134 कोटीचा महाघोटाळा

लातूरच्या उदगीर मध्ये 2 हजार 134 कोटीचा महाघोटाळा

तीन दिवसापासून आयकर विभागाचे अधिकारी उदगीरमध्ये

श्याम शिवप्रसाद कलानी याच्यासह 16 कंपन्या विरोधात गुन्हा दाखल

तळेगाव आंबी रोडवर टेम्पोला आग, क्षणात टेम्पो जळून खाक

तळेगाव-आंबी एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे गावच्या हद्दीत आज सकाळी मालवाहतूक टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

नवलाख उंबरे गावाजवळून टेम्पो जात असताना अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.

पाहता पाहता संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला.

Yavtamal : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 कोटी मदतीचा प्रस्ताव

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने 31 कोटी 54 लाख 99 हजाराच्या मदतनिधी मागणीचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाकडे पाठविला आहे, त्यामुळे आता नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिकमध्ये तीन दिवस ‘कुंभ भक्ती संगम’मधून भक्तिसंगीताचा जागर

- नाशिकमध्ये तीन दिवस ‘कुंभ भक्ती संगम’मधून भक्तिसंगीताचा जागर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २८ ऑगस्टला शुभारंभ

- नाशिकमध्ये २८ ते ३० ऑगस्टदरम्यान भव्य भक्ती-सांस्कृतिक महोत्सव

- कुंभमेळा प्राधिकरणाकडून तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’चे आयोजन

- २८ ऑगस्टला प.पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन

उनाड गुरांचा मिऱ्या-नागपूर महामार्गावर त्रास, वाहतुकीला मोठा अडथळा

मिऱ्या–नागपूर महामार्गावर सध्या उनाड गुरांचा मोठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतोय.

दिवस-रात्र गुरे थेट रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

विशेषतः रात्रीच्या वेळी ही गुरे अचानक समोर आल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

रस्त्यावर निवांत बसलेल्या गुरांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो .

राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष; राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही -महेंद्र दळवी

राज्यात महायुती भक्कम असली तरी रायगडमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद काही मिटत नाही.

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो.

आता महेंद्र दळवी यांनी पुन्हा राष्ट्रवादीसह सुनील तटकरेंवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी हा नेहमीच खोडा घालणारा पक्ष आहे.

रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा शाब्दील युद्ध

रायगडच्या पालकमंत्री पदी मंत्री पदावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली आहे. गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी माझा देखील पुढाकार होता अस वक्तव्य तसुनील तटकरे यांनी केल होत. तटकरे यांच्या या वक्तव्या वरून आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर जोरदार टीका केली आहे. तटकरेंनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. त्यांनी उगीच याबाबत श्रेय घेऊ नये. दिड पावणे वर्ष उशिर का झाला त्यांनी ते सांगाव असा सवाल दळवी यांनी केला आहे

नियमबाह्य शिक्षक भरती, शालार्थ आयडी नोंदींची चौकशी सुरू

नियमबाह्य शिक्षक भरती, शालार्थ आयडी नोंदींची चौकशी सुरू

चोपड्यात पथकाची कारवाई; चार शाळांना बजावली नोटीस

बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी

राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे साहिलला न्याय; खासदार बळवंत वानखडे यांचा घणाघात

काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत. साहिल नावाच्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून FIR दाखल करून घेतले,

"गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासुन सावधान" अशा आशयाची कळंब मध्ये ठाकरे गटाकडून फलकबाजी

"गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासुन सावधान" अशा आशयाची कळंब मध्ये ठाकरे गटाकडून फलकबाजी

कळंब मधील ठाकरे गटाकडून निवडुन आलेल्या सर्वच 9 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गट आक्रमक

मतदारांच्या विश्वासघात केल्याची ठाकरे गटाकडून फलकबाजी करत निषेध

Latur : लातूर जिल्हा बँकेची ‘शुभमंगल’ योजना; शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज

लातूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘शुभमंगल’ कर्ज योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने या योजनेअंतर्गत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Buldhana : बुलढाणा शहरातील नागरी समस्यांवर आमदार गायकवाडांची पाहणी

बुलढाणा शहरातील नागरी समस्यांवर आमदार गायकवाडांची पाहणी...

स्वच्छता, अतिक्रमण व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना कडक सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com