water, maharashtra jeevan pradhikaran news
water, maharashtra jeevan pradhikaran newsSaam Tv

Maharashtra Jeevan Pradhikaran News : थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास दंड हाेणार माफ : मजिप्राची याेजना

मजिप्रानं अभय याेजनेस सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.
Published on

अंबरनाथ : नागरिकांनी थकीत पाणी बिल भरावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अभय योजनेची मुदत वाढविली आहे. विशेष म्हणजे अंबरनाथ (ambernath) आणि बदलापूर (badlapur) शहरातील ग्राहकांनी थकीत रक्कम एकरकमी भरल्यास नागरिकांना थकीत रक्कमेवरील दंडातून (fine) सवलत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती मिलिंद बसनगार (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) यांनी दिली. (maharashtra jeevan pradhikaran news)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहरांमध्ये मिळून मजीप्राचे ६० हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १६१ कोटी रुपयांची पाणीबिलांची थकबाकी आहे. यापैकी ९४ कोटी रुपये मूळ थकीत रक्कम तर त्यावर ६७ कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे.

water, maharashtra jeevan pradhikaran news
Nanded News : नांदेड शहरात इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमला भीषण आग; लाखाेंचे नुकसान

ही थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी अभय योजना लागू केली आहे. या योजनेला अद्याप हवा उत्तम प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

water, maharashtra jeevan pradhikaran news
Shirdi : पालकमंत्री ना ? मुख्यमंत्री ठरवतील तसं : दीपक केसरकर (व्हिडिओ पाहा)

या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. त्यामुळं या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार यांनी केलं आहे. दरम्यान या आवाहनानंतर आणि अभय योजनेची मुदत वाढवल्यानंतर आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी वसूल होते का? हे पाहावं लागेल.

Edited By : Siddharth Latkar

water, maharashtra jeevan pradhikaran news
Dongaon : साेन्याच्या मण्यांचा पाऊस पडलाे हाे....! गर्दीमुळं मुंबई नागपूर महामार्ग ठप्प

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com