

भारताचे निबंधक महासंचालक आणि जनगणना आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील २४ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरूवारी रात्री भारतीय प्रशासकीय सेवेतील राज्यातील २४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानेही या बदल्या करण्यास मान्यता दिली होती. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
वर्षा ठाकूर घुगे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांची मुंबई येथे औद्योगिक विकास महामंडळात CEO पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान लातूरला डॉक्टर भारत बास्टेवाड हे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निरोप देताना , जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी भावुक झालेत.
दरम्यान, बदली करण्यात आलेल्या बहुतेक आयएएस अधिकाऱ्यांची जनगणना कार्यक्रमात त्या-त्या जिल्ह्यात वा शहरात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. जनगणनेचे काम दीड-दोन वर्षे चालणार आहे.
प्रवीणकुमार देवरे- बुलढाणा
भारत बाष्टेवाड- लातूरला
महेश गोंदावले- गोंदिया
विजय राठोड- कोल्हापूर
वसुमना पंत- चंद्रपूर
कार्तिकेयन- सोलापूर
कुमार आशीर्वाद- नागपूर
मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
कृष्णकांत कनवारीया जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
सत्यम गांधी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. जास्मिन यांची कोल्हापूर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.