Honey Trap: हनीट्रॅपवाले मंत्री कोण? महाजन-लोढांचा फोटो राऊतांकडून ट्वीट

Honeytrap Scandal Rocks Mahayuti: महायुती सरकारमधील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असा दावा राऊतांनी केलाय. राऊतांनी कोणाचा फोटो ट्विट करत भाजपचं टेन्शन वाढवलंय.
Sanjay Raut tweets photo of BJP leader Girish Mahajan with Prafull Lodha, intensifying honeytrap allegations
Sanjay Raut tweets photo of BJP leader Girish Mahajan with Prafull Lodha, intensifying honeytrap allegationsSaam Tv
Published On

विधीमंडळ अधिवेशनात काँग्रेसच्या नाना पटोलेंनी हनी ट्रॅपवरुन पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकला होता. मुख्यमंत्र्यांनी हनी ट्रॅप प्रकरण नाकारलं असलं तरी महायुती सरकारचं हे प्रकरण पाठ सोडायला तयार नाही. कारण खासदार संजय राऊतांनी हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्री अडकल्याचा दावा केलाय.... त्यातील 2 मंत्री सत्ताधारी भाजपचे असल्याचा दावा केल्यांन खळबळ उडाली आहे.

यापूर्वी 2 गुन्हे दाखल असलेल्या जळगावच्या प्रफुल्ल लोढांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्वीट करत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या प्रकरणी सीबीआय चौकशीचं खुलं आव्हान दिलंय..दुसरीकडे स्फोटक वक्तव्यातून आपला टीआरपी वाढवण्याचं काम राऊत करत असल्याचा टोला भाजपने लगावलाय... तर दुसरीकडे राऊत म्हणजे मनोरंजन असल्याची टीका शिंदे गटाने केलीय.

दुसरीकडे प्रफुल लोढा गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल करायचा असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. मग नंतर असं काय झालं की लोढा याचा भाजपमध्ये प्रवेश झाला, असा सवालही खडसेंनी केलाय.

त्यातच आता संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढांकडील पेन ड्राईव्ह आणि सीडीचा उल्लेख करुन खळबळ उडवून दिल्याने हनी ट्रॅपमध्ये अडकलेले 4 मंत्री कोण? याचीच चर्चा रंगलीय..त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हनी ट्रॅपचा मुद्दा तापणार हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com