Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकले मंत्री आणि अधिकारी? पटोलेंचा विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब

Nana Patole Pen Drive Expose Details: नाना पटोलेंनी विधानसभेत हनी ट्रॅपचा बॉम्ब फोडलाय... त्यामुळे खळबळ उडालीय... मात्र नाना पटोलेंच्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे?
Nana Patole raises pen drive in Assembly, alleging a massive honey trap scam involving ministers and top officials.
Nana Patole raises pen drive in Assembly, alleging a massive honey trap scam involving ministers and top officials.Saam Tv
Published On

हनी ट्रॅपमुळे राजकारण आणि प्रशासनात खळबळ उडाली असताना नाना पटोलेंनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकलाय.. या हनी ट्रॅपचं केंद्र नाशिक आणि ठाणे असल्याचा दावा पटोलेंनी केलाय......तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय...

खरं तर महायुती सरकारमधील मंत्री आणि 72 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून खंडणी वसूल केल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आलाय...तोच धागा पकडून नाना पटोलेंनी हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित करत खळबळ उडवून दिली...

हनी ट्रॅप प्रकरणाचा मास्टरमाईंड नाशिकमधील एका मोठ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचा दावा एका पक्षीय नेत्याने अनौपचारिक गप्पांमध्ये केला. आणि हनी ट्रॅप प्रकरणाचा भांडाफोड झाला..तर विधीमंडळात हा मुद्दा गाजल्याने वाटाघाटी आणि तडजोडी सुरु झाल्याची चर्चा आहे....त्यामुळे आता हनी ट्रॅप लावून गुप्त माहितीची देवाणघेवाण झालीय की वाटाघाटीपायी पैशांच्या तडजोडी? याचाही तपास करुन हे रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं... तर नेते आणि अधिकाऱ्यांनीही अशा प्रकरणापासून वाचण्यासाठी वो बुलाती है, मगर जाने का नहीं... हा मंत्र लक्षात ठेवायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com