Ernakulam Blast: केरळमधील विस्फोटानंतर मुंबई -पुणे अलर्टवर गृहमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि पुण्यातील अलर्टवर मोठी अपडेट दिलीय.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

Home Minister Devendra Fadnavis:

केरळच्या एर्नाकुल येथील कलामासेरीच्य्या एका प्रार्थनास्थळी झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झालाय. तर ३६ ते ४० जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलमासेरीतील ख्रिश्चन धर्माचे लोक प्रार्थना करत होते. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी या प्रार्थनास्थळी २ हजार जण उपस्थित होते. (Latest News)

या बॉम्बस्फोटानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय. दरम्यान केरळ विस्फोट प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. एनएसजी कमांडो घटनास्थळी पोहोचतील असं शाह यांनी फोनवरून सांगितलं.

राज्यातील मुंबई आणि पुण्यात अलर्ट देण्यात आलाय. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन अपडेट दिलीय. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केरळ विस्फोट प्रकरणावर भाष्य केलं. या घटनेनंतर नवीन असा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आम्ही सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्टवर राहत असते. त्यामुळे वेगळा असा कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाहीये.

परंतु मुंबई आणि पूणे हे दोन्ही महत्त्वाचे शहरं आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. कोणते देशविघातक कृत्य होऊन नये म्हणून नेहमी लक्ष ठेवावी लागते, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपले मत मांडले. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहोत.

मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी त्यांचा जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis On Tweet : 'मी पुन्हा येईन' व्हिडीओमागील नेमका अर्थ काय? फडणवीस काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com