...तर राज्यात मास्कसक्ती; आरोग्य मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv
Published On

जालना - एकीकडे महाराष्ट्रात मास्कसक्तीचे निर्बंध हटवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सध्याच्या कोरोना (Corona) रुग्ण संख्येच्या बाबतीत खाली 8 व्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा परीणाम आहे.

हे देखील पाहा -

सर्व वयोगटातील नागरीकांना लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील मात्र मास्क नागरीकांनी वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

Rajesh Tope
राज्यात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजितदादांचं महत्वाचं वक्तव्य

रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत असल्याने सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. भविष्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास मास्क सक्ती करावी लागेल असा ईशारा देखील टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त टोपे यांच्या हस्ते जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com