राज्यात 100 कोटींचा घोटाळा? हेल्थ एटीएमची विनाटेंडर खरेदी?

Maharashtra Health ATM Scam: राज्याच्या आरोग्य खात्यात 100 कोटींच्या हेल्थ एटीएमचा घोटाळा समोर आलाय... मात्र हा घोटाळा कसा करण्यात आलाय? हेल्थ एटीएमची किंमत कशी वाढवण्यात आलीय? आणि सरकारी नियम कसे पायदळी तुडवले आहेत
Health ATMs purchased at inflated prices without following tender norms, leading to a ₹100 crore scam in Maharashtra’s health department.
Health ATMs purchased at inflated prices without following tender norms, leading to a ₹100 crore scam in Maharashtra’s health department.Saam Tv
Published On

राज्याच्या आऱोग्य खात्यातील घोटाळ्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही... त्यातच आता एका कंपनीकडून विनाटेंडर कोट्यवधी रुपयांचे हेल्थ एटीएम खरेदी प्रकरण साम टीव्हीने उजेडात आणलंय... 4 लाख 48 हजार रुपयांचं हेल्थ एटीएम तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांना खरेदी करण्यात आलंय...मात्र हा घोटाळा कसा करण्यात आलाय?

जीएम पोर्टलवर हेल्थ एटीएमची किंमत 4 लाख 48 हजार

मात्र कंपनीने 5 लाख 37 हजार रुपयांचं कोटेशन दिलं...

तर प्रत्यक्षात हेल्थ एटीएमची खरेदी तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांना करण्यात आलीय..

त्यामुळे प्रत्येक मशीनमागे 1 लाख 62 हजार रुपयांचा घोटाळा

हेल्थ एटीएम खरेदीत घोटाळा? (HEADER)

राज्याच्या उद्योग विभागाने घालून दिलेल्या खरेदी नियमांची पायमल्ली

केंद्रीय दक्षता आयोगाच्या टेंडरबाबतच्या निर्देशांचेही उल्लंघन

खनिकर्म विभागाचा राखीव 100 कोटींचा निधी वळवून यंत्र खरेदीचा घाट

साम टीव्हीने या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात धक्कादायक माहिती समोर आली.. एका कंपनीकडून 23 प्रकारच्या आरोग्य तपासण्या करणाऱ्या हेल्थ एटीएमच्या खरेदीसाठी तत्कालिन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी प्रस्ताव दिला..राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हेल्थ एटीएम बसवण्यासाठी सावंतांच्या कार्यालयाने आरोग्य खात्याला निर्देश दिले... मात्र ही प्रक्रिया कशी राबवली

28 नोव्हेंबर 2022

तत्कालिन मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून यंत्रखरेदीचा प्रस्ताव

6 डिसेंबर 2022

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना 1504 आरोग्य केंद्रासाठी हेल्थ ATM साठी मागणी नोंदवण्याचे निर्देश

खनिकर्म विभागाच्या राखीव निधीतून 10 कोटींचे 150 हेल्थ एटीएम खरेदी

यंदा 100 कोटींच्या 1350 हेल्थ एटीएमच्या खरेदीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु

हेल्थ एटीएमबाबत सरकारने किंवा आरोग्य संचालनालयाने कुठलीही तांत्रिक मान्यता आणि उपयोगिता प्रमाणपत्र दिलं नसताना आरोग्य खात्याने हेल्थ एटीएम खरेदीचा घाट घातलाय... त्यासाठी आरोग्य खातं 100 कोटींचा चुराडा करण्याच्या तयारीत आहे... साम टीव्हीने आरोग्य खात्यातील हेल्थ एटीएमच्या खरेदी घोटाळा समोर आणल्यानंतर आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत.. तर याआरोग्य मंत्र्यांनी असा प्रकार घडला असल्यास कारवाईचा इशारा दिलाय.

आरोग्य विभागच नाही तर खनिकर्म विभागानेही कुठलीही शाहानिशा न करता देयक अदा करण्यास मंजूरी दिलीय... तर नंदुरबार, भंडारा, रत्नागिरी, वाशिम, गोंदिया, हिंगोली, नांदेड, सांगली जिल्हा आऱोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची चर्चा रंगलीय..

त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com