Maharashtra Guardian Ministers: भुजबळांचं पालकमंत्री पद बुडालं; दादा भुसे पडले भारी

Chhagan Bhujbal: भुजबळ नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना हे पद मिळालं नाही.
Maharashtra Guardian Ministers
Maharashtra Guardian MinistersSaam TV
Published On

Maharashtra News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुधारीत पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. एकूण ११ जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळालेत. अजित पवारांना त्यांना हवं असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालं. मात्र नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे छगन भुजबळांना भारी पडले आहेत. भुजबळ नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते. (Latest Marathi News)

भुजबळांचं नाशिकचं पालकमंत्री व्हायचं स्वप्न हुकलंय. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपला गड राखून ठेवलाय. पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनाही नाशिकचं पालकमंत्री पद मिळालेलं नाही.

Maharashtra Guardian Ministers
Mumbai Crime News : व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला, समोर महिला अन् ते दृश्य बघून ७३ वर्षांचे आजोबा हादरलेच

अजित पवारांचं दबावतंत्र यशस्वी

गेल्या अठवडाभरापासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटलाय.

पुण्याचे दादा...अजित दादा

अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद हवे होते. मात्र चंद्रकांत पाटील आपलं पालकमंत्री पद सोडण्यास तयार नव्हते. अशात अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अजित पवारांच्या नाराजीचा महायुतीवर परिणाम होऊनये यासाठी काल झालेल्या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांना देण्यात आल्याचं चित्र दिसतंय.

पालकमंत्री पदाच्या विस्तारावरून आमदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी नव्हताच. उदय सामंत हे पालकमंत्री आहेत त्यामुळे तिढा असण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे काही ठरवत आहेत त्या प्रमाणे आम्ही चाललो आहोत.", असं भरत गोगावले म्हणालेत.

Maharashtra Guardian Ministers
Pune Crime: ऑनलाईन ओळख पडली महागात! तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य; धक्कादायक घटनेने पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com