Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची सरशी? कोण मारणार बाजी? मतमोजणीला सुरुवात

Gram Panchayat Election Result: राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे.
maharashtra gram panchayat election 2023 result Chhatrapati Sambhaji Nagar, Ahmednagar Beed Kolhapur Pune Updates
maharashtra gram panchayat election 2023 result Chhatrapati Sambhaji Nagar, Ahmednagar Beed Kolhapur Pune UpdatesSaam Tv
Published On

Gram Panchayat Election Result Live Updates

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कुणाची सरशी? कोण मारणार बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

maharashtra gram panchayat election 2023 result Chhatrapati Sambhaji Nagar, Ahmednagar Beed Kolhapur Pune Updates
IMD Rain Alert: स्वेटर नाही, रेनकोट बाहेर काढा; राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना झोडपणार

राज्यभरातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींपैकी अंदाजे २९३ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपला सक्रीय सहभाग दाखवला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह अनेक बड्या नेत्यांची कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह भरला होता. तसेच मतदारांनाही अनेक आश्वासनं दिली होती.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल देखील आज समोर येणार आहे. त्यामुळे मतदाराने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यात कोणकोणत्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या, यावर नजर टाकूयात

राज्यातील २९३ ग्रामपंचायतींचे निकाल बिनविरोध

  • भाजपा - ६६

  • शिंदे गट - ५५

  • ठाकरे गट - २५

  • काँग्रेस - २०

  • शरद पवार गट - २०

  • अजित पवार गट - ६९

महायुतीकडे १९० ग्राम पंचायती आहेत, महाविकास आघाडीकडे ६५ ग्राम पंचायती आल्या आहेत.

maharashtra gram panchayat election 2023 result Chhatrapati Sambhaji Nagar, Ahmednagar Beed Kolhapur Pune Updates
ST Bus Strike: राज्यातील एसटी कर्मचारी आजपासून संपावर जाणार; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार, मागण्या काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com