Maharashtra News: दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

Maharashtra Breaking Marathi News : राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
Eknath Shinde Devendra Fadnavis saam tv
Published On

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दुष्काळाच्या मुकाबला करण्यासाठी आचारसंहितेचा अडसर निर्माण होतोय, असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच राज्यात सद्या आचारसंहिता लागू असल्याने दुष्काळी उपाययोजनांसाठी अडसर निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकारने निवडणूक आयोगाला आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे. आज निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी महत्वाची बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजी नगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परीस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

या बैठकीत दुष्काळसदृष्य परीस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचं देखील नियोजन करण्यात येणार आहे. जनावरांनाला लागणारा चारा पुरवठा संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
Nashik Water Supply : नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com