Nashik Water Supply : नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Nashik Water Supply Cut Today : नाशिककरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण येत्या शनिवारी आणि रविवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
Nashik Water Supply Cut TodaySaam TV

मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात पाणीकपात करण्यात आली आहे. नाशिककरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण येत्या शनिवारी आणि रविवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
Ujani Boat Accident : उजनी धरणात बुडालेल्या ६ पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले; पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू

गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्ती तसेच जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी आणि रविवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्यामुळे दोन दिवस नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. नाशिक शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराला रोज २० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं असून अघोषित पाणाकपातीला सुरुवात केली आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणात केवळ १,०९१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे.

धरणात आरक्षित असलेला पाणीसाठा १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. नाशिक व अहिल्यानगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडल्यामुळे यंदा नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com