Forest teams continue search operations as leopard attacks rise across Maharashtra; government considers job aid for victim families.
Forest teams continue search operations as leopard attacks rise across Maharashtra; government considers job aid for victim families.Saam Tv

बिबट्यामुळे बळी, मिळणार सरकारी नोकरी?हल्ल्यात बळी पडलेल्यांना सरकारचा दिलासा?

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे राज्यात दहशत पसरलीय़. या पार्श्वभूमीवर वनविभाग लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय़ नेमका काय आहे? आणि याचा बिबट्यानं हल्ला केलेल्या कुटुंबाला कसा दिलासा मिळणार आहे?
Published on

बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं...उत्तर पुण्यासह अहिल्यानगर, धुळे, सोलापूर आणि कोल्हापुरातही बिबट्यानं थैमान घातलंय... अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात घरातील कर्ता पुरुषचं बळी ठरतो...त्यामुळे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्यांच्या घराची आर्थिक वाताहत होऊन मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती आणि कर्जाचा डोंगर कुटुंबाच्या चिंतेचा विषय बनतो..ज्यामुळे बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी वनविभाग लवकरच एका मोठा निर्णय घेणार आहे...

राज्यात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात जीवितहानीच्या प्रमाणात वाढ झालीय.. जुन्नर वनपरिक्षेत्रात आतापर्यंत 60 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.. त्यामुळे बिबट्या आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याची तयारी सरकार करतयं... त्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

काही दिवसांपूर्वी वनविभागानं बिबट्याच्या हल्ल्यात दागवणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती...त्यातच आता मृतांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्यानं वनविभागही बिबट्याच्या दहशतीनं हतबल झाल्याचं पाहायला मिळतयं...मात्र पैसे आणि सरकारी नोकरीसाठी कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये खोट्या हल्ल्याचा दावा करण्याचे प्रकारही समोर आलेत... त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय का?

हे शोधणंही वनविभागा पुढं नवं आव्हान असणार आहे...मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे हल्ल्यानंतर नुकसान भरपाई आणि नोकरी देण्यापेक्षा बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना कसं सुरक्षित ठेवता येईल यावर सरकारनं भर देणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com