Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा नेमका काय प्लॅन?

Ladki Bahin Yojana Application Last Date Update : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे अपडेट आहे. सरकार या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज आहे.
'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत
Mukyamantri Ladki Bahin YojanaSaam Digital
Published On

मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. परंतु अनेक महिलांनी अद्याप अर्ज केला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज नोव्हेंबर अखेरपर्यंत स्वीकारण्याची शक्यता असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे अपडेट

योजनेसाठी लाभार्थी उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट होती. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मुदतवाढ जाहीर करू (ladki bahin Yojana last date applications) शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय. या योजनेचं उद्दिष्ट राज्यामधील पात्र महिला आणि मुलींना प्रतिमहिना १५०० रुपये मासिक सहाय्य प्रदान करणं (Maharashtra Government) आहे.

अर्ज करण्याची मुदत वाढणार ?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने राज्यात साडेचार हजार कोटी रुपयांचे प्रारंभिक बजेट वाटप केलं होतं. सुमारे १ कोटी लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्यात सुमारे ३ हजार कोटी रुपये वितरित केले (ladki bahin Yojana Update) होते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी शक्यता आहे. प्राप्त आकडेवारीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत राज्यभरातून सुमारे २.२६ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर तब्बल २.१ कोटी अर्ज स्वीकारण्यात आलेत. १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी तीन हजार रुपये आधीच मिळाले आहेत. अनेक लाभार्थींकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करावे लागले.

'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'ला पुन्हा हायकोर्टात आव्हान, याचिकाकर्त्याने याचिकेत नेमका कशावर आक्षेप घेतला? वाचा

कोणते अर्ज पुन्हा स्वीकारणार?

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत. सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त लवकरात लवकर अर्ज निकाली काढण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली होती. सरकारी आकडेवारीनुसार लाभार्थ्यांकडून मोबाईल ॲपद्वारे सुमारे १.४ कोटी अर्ज प्राप्त (ladki bahin Yojana applications date) झालेत, तर पोर्टलद्वारे सुमारे ८५ लाख अर्ज आलेत. कागदपत्रे नसलेले किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसलेले अर्ज पुन्हा नोंदणी केल्यानंतर विचारात घेतले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळालेच नाहीत, असू शकतात ही कारणे

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com