Government Employees Strike: सरकारी कर्मचारी रस्त्यावर; ठिकठिकाणी कामबंद आंदोलन, राज्यभरात नेमकं काय घडतंय?

Maharashtra Employees Strike: आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Government Employees Strike in mumbai pune Thane nasik kolhapur chhatrapati sambhajinagar many district
Maharashtra Government Employees Strike in mumbai pune Thane nasik kolhapur chhatrapati sambhajinagar many districtSaam TV
Published On

Maharashtra Government Employees Strike

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी करत राज्यात ठिकठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

या आंदोलनाला शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Government Employees Strike in mumbai pune Thane nasik kolhapur chhatrapati sambhajinagar many district
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; शिवरायांच्या स्मारकासमोरच तरुणाने घेतलं विष

पुण्यातील ससून रुग्णालयामधील नर्सेस संपावर

पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयामधील परिचारिकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. जिल्हा आणि ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे.

कोल्हापुरात सरकारी कर्मचारी आक्रमक

जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मध्यरात्री पासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील आणि शासकीय मुद्रणालय मधील कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.

नाशिकमध्येही संपाचे पडसाद

नाशिक (Nashik News) जिल्ह्यातही राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी यात सहभागी होणार असल्याने राज्यात आरोग्य सेवा देखील विस्कळीत होण्याची भिती व्यक्त केली जाते आहे.

संभाजीनगरमध्येही सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

छत्रपती संभाजीनगर (Sambhaji Nagar) शहरातील घाटी रुग्णालयातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संपांचं हत्या उपसलं आहे. रुग्णालयाच्या परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांकडून जोरदार निदर्शने देखील करण्यात आले. रुग्णसेवर जास्तीचा परिणाम होऊ नये म्हणून, विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी सेवा देण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

मुंबईत जे.जे रुग्णालयातील कर्मचारी संपावर

मुंबई आणि ठाण्यातील सरकारी कर्मचारी देखील संपावर पुकारला आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयात कर्मचारी संपावर गेले आहेत. तर ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेला मोठा फटका बसला असून रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

Maharashtra Government Employees Strike in mumbai pune Thane nasik kolhapur chhatrapati sambhajinagar many district
Bus Accident: धावत्या बसमध्ये चालकाला फिट, दुचाकीस्वारांना ५० फूट फरफटत नेलं; थरकाप उडवणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com