Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष होणार? सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Government Employees Retirement Age Increase to 60: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यासाठी संप केला होता. यातील महत्त्वाची मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करणे. याबाबत सरकार विचार करत असल्याचे सांगितले आहे.
Government Employees
Government EmployeesSaam Tv
Published On
Summary

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याची केली होती मागणी

शासनाच्या आश्वासानानंतर संप मागे घेतला

संपूर्ण देशात मागच्या ४ दिवसांपासून केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता. याचसोबत सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Government Employees
Government Employee Strike: १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, सार्वजनिक अन् रुग्णसेवेवर होणार परिणाम

सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असं सरकारने सांगितलं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यादेखील मान्य झाल्या आहेत. यामुळेच राज्यभरातील १८ लाख कर्मचारी आणि शिक्षकांनी केलेला संप काल स्थगित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.मागण्यांना मंजुरी देणारे लेखी पत्र दिल्याने सोमवापरपासून सर्व कर्मचारी आपल्या कामावर हजर होतील.

Government Employees
Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

मागण्या काय आहेत?

कर्मचाऱ्यांना १ मार्च २०२४ पासून राज्याची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात आली आहे. याबाबत १५ दिवसात अधिसूचना काढली जाणार

चतुर्थश्रेणी आणि वाहनचालक यांची भरती केली जाईल. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाआल.

१,२०, ३० वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल.

१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयातील अडचणी निदर्शनास आणून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

इतर १८ मागण्यांबाबत चर्चा झाली असून त्यासंदर्भातील लेखी वृ्त्त संघटनेला देण्यात आले आहे.

Government Employees
Maharashtra Government: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी १०० रुपयांत होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com