ST Bus News: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Latest News: एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ST Bus
ST BusSaam Tv
Published On

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

ST Bus News:

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी ३८७ कोटींची मदत केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेत महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाला ३८७ कोटींची मदत केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याआधी राज्य सरकारने (MSRTC) एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच सण अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यामुळे यंदा आनंदात जाणार आहे.

ST Bus
Maratha Reservation : आरक्षण नक्की मिळेल, पण...आंतरवाली सराटीत सरकारच्या शिष्टमंडळाचे जरांगेंना आश्वासन

दरम्यान, कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका एसटी महामंडळाला बसला होता. त्यामुळे आर्थिक तोट्यात असलेले एसटी महामंडळ पुन्हा एकदा स्पीड पकडू लागली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी अर्ध्या तिकीट योजनेचा चांगला फायदा होत असून महामंडळाचे उत्पन्नही वाढले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ST Bus
Maval News : मनमानी विराेधात एकवटले शेतकरी, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर उद्या काढणार माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com