मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात मंत्रीपदी वर्णा लागावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासह भाजपच्या आमदारांची रस्सीखेच सुरु होती. पंरुतु, पहिल्या टप्प्यात काही आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराजीनाट्य रंगले. याच पार्श्वभूमीवर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं विधान केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी २३ आमदार मंत्री होऊ शकतात. यामध्ये भाजप-सेनेच्या आमदारांना पुढील विस्तारत संधी मिळू शकते. सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या तुलनेत १५ टक्के मंत्री करता येतात, असं मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार पुढील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra cabinet expansion) बोलताना म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी २३ मंत्र्यांची भर पडू शकते. सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या तुलनेत १५ टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात एकूण ४३ मंत्री होऊ शकतात. यापैकी २०मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी २३मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. यात भाजप-सेनेच्या आमदारांना पुढील विस्तारत संधी मिळू शकते.हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.