Solapur-Pune highway Closed : पावसाचे रौद्ररूप, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Solapur Pune highway closed due to Sina river flood : सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सिना नदीला पूर आला असून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग लांबोटी येथे बंद करण्यात आला आहे. पुलावर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Solapur-Pune highway Closed
Solapur-Pune highway Closed
Published On

Solapur Pune Expressway Closed : सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. पाच ते सात दशकात पहिल्यांदाच सीना नदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्गही पूरामुळे बंद करण्यात आला आहे. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक लांबोटी येथे एका बाजूने वळवण्यात आलीय. त्यामुळे पुलावर वाहणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय बार्शी-कुर्डूवाडी या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सोलापूर-पुणे महामार्गा रात्री १० वाजल्यापासून बंद आहे.

सीना नदी प्रवाहात वाढ! सोलापूर- पुणे महामार्ग बंद

सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्गवरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या लांबोटी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता

Solapur-Pune highway Closed
पावसामुळे संकटात असलेल्या लातूरला भूकंपाचे धक्के, नागरिकांची रात्री पळापळ

मागील चार दिवसांपासून सोलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात कोळेगाव येथील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सीना नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक पूल पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीमुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे शेताला नदीचे स्वरूप आलेय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यात आता महामार्गही ठप्प झालाय.

Solapur-Pune highway Closed
Devendra Fadnavis : पोस्टमार्टम शिवाय जनावरांची नुकसान भरपाई मिळणार, देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

सीना नदी पात्राची पाणी पातळी वाढल्याने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाला आहे. लांबोटी पूल परिसरात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. रात्री १० वाजल्यापासून लांबोटी पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबावण्यात आल्याने वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लांबोटी परिसरातील सर्व हॉटेल्स ही बंद असल्याने प्रवाशांचे हाल होतायेत. मात्र खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लांबोटी पुलावरून पाहाणी करणार आहेत. त्यामुळे ही वाहतूक नेमकी कधी पूर्ववत होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Solapur-Pune highway Closed
Dharashiv Floods: घरात चिखल, मुलांची वह्या-पुस्तके पाण्यात, आईच्या अश्रूचा बांध फुटला, काळजाला धस्स करणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com