
कोल्हापूर गगनबावडा येथे गर्भवती महिलेचं आईपण हिरावलं.
रस्ते खचल्यामुळे महिलेने अर्धा रस्ता पायी चालून अॅम्ब्युलन्स पकडली.
वाटेतच प्रसूती झाली आणि बाळाचा मृत्यू झाला, मात्र महिला सुरक्षित आहे.
पूरस्थितीमुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होत असून रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांचा फटका लोकांना बसतोय.
रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातलाय. यामुळे गाव-गावांचा संपर्क तुटलाय. पुराच्या पाण्याने अनेक रस्ते खचले आहेत. या सर्वपरिस्थितीचा फटका आरोग्य सेवेला बसत आहे. सर्वत्र निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे, या प्रकोपाने एका महिलेचं आईपण हिरावल्या गेलंय.
रस्ता खराब असल्यामुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी पाय पीट करावी लागलीय. अर्ध्या रस्ता पायी चालल्यानंतर त्यांना एक रुग्णवाहिका मिळाली, परंतु वाटेतच प्रसूती झाली. यात महिला सुरक्षित आहे पण तिच्या बाळाचं मृत्यू झालाय. ही हृ्दयदावक घटना कोल्हापूरमधील गगनबावडा तालुक्यात घडलीय.
गगनबावडा तालुक्यात बोरबेट गावातील २९ वर्षीय महिलेचं आईपण निसर्गाच्या प्रकोपानं हिरावून घेतलंय. कल्पना आनंदा डुकरे असे या महिलेचं नाव आहे. कल्पना डुकरे ह्या प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९:४५ वाजता दाखल झाल्या होत्या.पण रुग्णलयातील अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रेफर करण्यात आले.
पण मुसळधार पावसामुळे गगनबावडा-कोल्हापूर रस्ता पूरग्रस्त झाला होता. रस्ता बंद असल्याने १०८ रुग्णवाहिकेने असळजपर्यंत प्रवास केला. तिथून पडवळवाडीमार्गे खोकुर्लेपर्यंत त्या चालत गेल्या. खोकुर्ले येथून त्यांनी दुसरी रुग्णवाहिका घेतली, पण त्याच रुग्णवाहिकेतच कल्पना याची डिलिव्हरी झाली.
डॉ. स्वप्नील आणि ड्रायव्हर सतीश कांबळे यांनी अथक प्रयत्न करून आईला वाचवले, पण दुर्दैवाने बाळाचा जीव वाचला नाही. कल्पना यांची नाजूक प्रकृती लक्षात घेता, त्यांना सीपीआर रुग्णालयात सुखरूप पोहोचवले. १०८ रुग्णवाहिकेची तत्परता जीवनदायी ठरली, पण ग्रामीण वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.