Baramati Election Result: विजय निश्चित होताच गुलाल उधळला! सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Baramati Vidhansabha Election Result: बारामतीत निकाल येण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला गेला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Baramati Vidhansabha Election Result
ajit pawarsaam tv
Published On

Ajit Pawar vs Yugendra Pawar: संपूर्ण देशाचं लक्ष बारामती विधानसभेकडे लागून आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युंगेंद्र पवार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पवार कुटुंबियांच्या बालेकिल्लात काका विरुद्ध पुतण्या यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान मतमोजणीचा कल हा अजित पवारांच्या बाजूने झुकताना दिसून येत आहे. अजित पवारांनी मोठी आघाडी घेताच बारामतीत जल्लोष पाहायला मिळाला आहे.

Baramati Vidhansabha Election Result
Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

अजित पवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बारामतीत निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मतमोजणीच्या ११ व्या फेरीनंतर अजित पवार ५३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवारांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे अजित दादा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर जेसीबीने गुलाल पुष्पगुच्छचा वर्षाव केला.

Baramati Vidhansabha Election Result
Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

बारामती विधानसभेतून अजित पवार रिंगणात उतरल्यानंतर, शरद पवारांनी युगेंद्र पवारांना त्यांच्या विरोधात उतरवण्याचा निर्णय घेतला. युगेंद्र पवारांबद्दल बोलायचं झालं, तर ते अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळाली आहे. अजित पवार पुन्हा एकदा बारामतीचे सुत्र हाती घेणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. अजित पवारांनी १९८२ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांना ५ वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भुषवण्याची संधी मिळाली आहे. अजित पवार हे बारामतीचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे २ गट पडले आहेत. दोघांनीही बारामतीत प्रचारासाठी चांगलाच जोर लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com