विरार : वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. ३५ वर्षे एक हाती सत्ता असलेल्या वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही सीट पडल्या आहेत. मोठ्या पराभवाने वसईतील पिता-पुत्रांना मोठा धक्का बसला आहे. ठाकूर पिता-पुत्रांच्या पराभवाने महायुतीचा दबदबा वाढला आहे.
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तर बोईसर विधानसभेत विद्यमान आमदार राजेश पाटील पराभूत झाले आहेत. वसईतील तिन्ही आमदारांच्या पराभवाने हितेंद्र ठाकूर यांचा गड कोसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांनी पराभव केला आहे. भाजपच्या स्नेहा दुबे- पंडित ३ हजार १५३ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नालासोपारा विधानसभेत क्षितीज ठाकूर यांचा पराभव तर भाजपचे राजन नाईक यांनी केला आहे. तीन टर्मचे आमदार क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाल्याने मतदारसंघात बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.
बोईसर विधानसभेत विद्यमान आमदार राजेश पाटील हे देखील पराभूत झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे हे देखील विजयी झाले आहे. या निकालाने बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे निश्चित झालं आहे.
विजय पाटील (काँग्रेस) - ६२३२४
हितेंद्र ठाकूर (बविआ) - ७४४००
स्नेहा दुबे (भाजप) ७७५५३
नोटा २३४६
महायुती -२२४
महाविकास आघाडी ५०
इतर - १३
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.